लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख


स्वतंत्र खोली, तरी सुसंवादही हवा Print E-mail

alt

डॉ. अद्वैत पाध्ये , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
मानसोपचारतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांसाठी स्वतंत्र खोली असण्याचं हे युग आहे. त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्व विकासासाठी, निकोप वाढीसाठी हे गरजेचं असलं तरी पालक आणि पाल्य यांच्यातील सुसंवादाला कुठे खीळ बसता कामा नये, हे अधिक महत्त्वाचं आहे.
‘चांदोबा चांदोबा भागलास का, िलबोणीच्या झाडामागे लपलास का, िलबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी’ हे बालगीत आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकलं आहे. आता हे बालगीत आपण व्हिडीओ सीडीजमधून आजच्या मुलांना ऐकवतो आहोत. या गाण्यात म्हटल्याप्रमाणे पूर्वीची गृहसंस्कृती चिरेबंदी वाडय़ाची होती. दगडी चिरेबंदी वाडे, त्याचे मोठे लाकडी प्रवेशद्वार, ते बंद करायला फक्त एक लाकडी अडसर किंवा अगदी असले तर मोठे कुलूप. आत प्रवेश केल्यावर दिसे ते वातावरण सुंदर, पवित्र करणारे तुळशीवृंदावन व त्यापाशी तेवणारा दिवा! मग असे पडवी किंवा ओसरी. तिथून मुख्य घरातील खोल्या. वाडय़ाच्या भव्यतेप्रमाणे यासुद्धा मोठय़ा, प्रशस्त. दिवाणखाना, स्वयंपाकघर, कोठीची खोली, माजघर, बाळंतिणीची खोली, कुटुंबप्रमुख असलेल्या जोडप्याची खोली, वर छोटा चिंचोळा जिना किंवा मोठा लाकडी जिना जाई तो माडीवर.
 
भावनांचं बेट : मुलांची खोली मौजमजा आणि उत्साह Print E-mail

alt

पर्सी जिजिना , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
विक्री संचालक - सजावट
जोतून इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
मुलांमुळे घराला एक जागतेपण येतं..  सध्या मुलांची स्वतंत्र खोली ही संकल्पना रुळते आहे. ही खोली कशी असावी, त्यात कोणत्या गोष्टी आवर्जून असाव्यात, याविषयी.. निमित्त आहे, १४ नोव्हेंबर या बालदिनाचे..
लहान मुलांची खोली म्हणजे त्यांचं स्वत:चं असं छोटंसं विश्वच!  जिथे तो दिवसभराचा बहुतांश वेळ घालवितात. भरपूर मस्ती, खेळणं,  गृहपाठ करणं, पुस्तकं वाचणं, चित्र काढणं आणि रंगविणं या कामात ते दंग असतात. इथे ती स्वत:च्या काल्पनिक जगात दिवसभर रममाण होतात. मुलांच्या आयुष्याला वळण देण्यात विशेषत: त्यांच्या वाढीच्या वयात मुलांच्या खोलीची किती महत्त्वाची आहे, यावर अनेक बालतज्ज्ञांनी आपली मते मांडलेली आहेत.
 
सुरेख भेटवस्तू, खुलवी प्रियजनांची वास्तू! Print E-mail

 

alt

प्रणोती प्रकाश , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दीपावली म्हणजे वर्षांतला सगळ्यात मोठा आनंदाचा, उत्साहाचा सण! नवीन कपडे, छान छान वस्तू, लाडू, चिवडा, चकल्यांची मस्त मेजवानी, फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई आणि अर्थातच प्रियजनांच्या भेटीगाठी! त्यात या वर्षी तुमचं दिवाळी गिफ्ट हे इतरांच्या गृहसजावटीमध्ये भर घालणारं असेल तर..
आपण भारतीय म्हणजे मुळातच उत्सवप्रिय. त्यातही जर दिवाळीचा सण असेल तर आपल्या आनंदाला उधाणच येतं. दिवाळीत आपण आप्त, मित्रपरिवार यांच्याकडे जातो आणि या प्रेमाच्या भेटींचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एकमेकांना चविष्ट फराळाबरोबरच भेटवस्तूसुद्धा देतो. मुळात सणाच्या, आनंदाच्या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देणं हा आपला पूर्वीपासून चालत आलेला रिवाज आहे. शुभदिनाचं औचित्य साधून एकमेकांना भेटवस्तू दिल्या तर आनंदात भर तर पडतेच, शिवाय आपले नातेसंबंध अधिकाधिक समृद्ध, दृढ होण्यासही मदत होते. नात्यातला गोडवा, जिव्हाळा वाढतो. म्हणूनच कदाचित भेटवस्तू देण्याचा हा प्रघात आजही विनाखंड सुरू आहे. मग या वर्षी तुम्ही दिलेली गोड भेटवस्तू एखाद्याच्या घरातील सजावटीत चार चाँद लावणार असेल तर मग क्या बात है!

 
भिंत.. एक भावविश्व! Print E-mail

alt

लता दाभोळकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांनी भिंतीवर साकारलेलं विश्व सर्वस्वी त्यांचं असतं. त्यात ती रमतातही. त्यांच्या या व्यक्त होण्यातून मुलांच्या मनात चाललेल्या भावनांच्या कल्लोळाची जाणीव आपल्याला होऊ शकते. मुलांचं मन समजून घेण्याचं ते एक उत्तम माध्यम ठरू शकतं.
पाच वर्षांची मीनाक्षी भिंतीवर चित्र काढते.. लिहिते.. त्या वेळचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीयच! भिंतीवरच्या तिच्या चित्रांमध्ये तिनं तिचं सारं भावविश्व साकारलेलं असतं.. त्या चित्रांमध्ये ती आणि तिचा बाबा, शाळेतल्या लाडक्या बाई असतात. आणि हो तिला घाबरवून टाकणारी चेटकीणही! त्यातही एक चांगली आणि दुसरी दुष्ट! मग त्यांच्याशी बराच वेळ चालणारा तिचा संवाद.. आणि रोज आई ऑफिसमधून घरी आल्यावर तिला त्या चित्रांचा अन्वयार्थ उलगडून सांगताना तिची चाललेली शब्दांची जुळवाजुळव.. सारं काही मोहवून टाकणारं.. पण लहानग्या मीनाक्षीचं भिंतीवरचं हे भावविश्व तिच्या आजीआजोबांना फारसं रुचत नाही. त्यांच्या लेखी मीनाक्षीचा हा ‘उद्योग’ म्हणजे भिंती घाण करणं. मग कधी रागाने, कधी एखाद्या फटक्याने तिला भिंतीवर लिहिण्यापासून परावृत्त केलं जातं; पण त्याने लहानग्या मीनाक्षीवर फारसा फरक पडत नाही, कारण ती भिंत म्हणजे तिचं सारं भावविश्व असतं; जे तिच्या आनंदीवृत्तीला अधिक रूचणारं असतं.
 
लॅम्पची प्रकाशमय रचना Print E-mail

alt

संज्योत दुदवडकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
इंटीरिअर डिझायनर              
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा उत्सव! दीप, पणत्या, आकाशकंदील असा सगळा प्रकाशमयी सरंजाम दिवाळीच्या स्वागतासाठी आता सज्ज झाला आहे. पण या दिवाळीत पारंपरिक रोषणाईबरोबरच इलेक्ट्रिक लॅम्पच्या साहाय्याने घर छान प्रकाशमय केलं तर!
दिवाळीच्या स्वागतासाठी सगळ्यांची घरं आता छान सज्ज झाली असतील. घराची झाडलोट करून घरांना नवी झळाळी मिळाली असेल. दिवाळीत दिव्यांची आरास केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण या पारंपरिक दिव्यांच्या रोषणाईबरोबरच घरात आधुनिक, इलेक्ट्रिकल लॅम्पची रोषणाई केली तर.. मग तर तुमचं घर नक्कीच या दिवाळीत मस्त झळाळून उठेल.
गृहसजावटीत लॅम्प ही वस्तू अतिशय महत्त्वपूर्ण असते. घराची सजावट करताना एखादा कोपरा किंवा विशिष्ट जागा अर्थपूर्णरीत्या उठावदार करायची असेल तर लॅम्पची रचना हमखास केली जाते. यामुळे संपूर्ण खोलीला एक वेगळाच उबदार स्पर्श प्राप्त होतो. याआधी तुम्ही घरातील कोणत्याही खोलीत लॅम्पची मांडणी केली नसेल तर या दिवाळीत ती करून बघा, तुमचं घर नक्कीच उठावदार दिसेल. शिवाय हे काम अगदी एका दिवसात होण्यासारखं आहे. आपल्या आवडीचा लॅम्प इलेक्ट्रिशियनकडून लावायला तुमचा फार वेळ जाणार नाही. फक्त घरात कोणत्या जागेत लॅम्प लावायचा आहे, त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा लॅम्प चांगला दिसेल याचा विचार करून लॅम्पची निवड करा.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 11