देश-विदेश
मुखपृष्ठ >> देश-विदेश
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश
टागोर हे दुय्यम दर्जाचे नाटककार -गिरीश कर्नाड Print E-mail

पीटीआय, बंगळुरू

नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही.एस.नायपॉल यांच्यावरील टीकेनंतर आता ज्येष्ठ नाटय़कर्मी व अभिनेते गिरीश कर्नाड यांनी आता नोबेल विजेते भारतीय साहित्यिक रवींद्रनाथ टागोर हे दुय्यम दर्जाचे नाटककार होते, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. कर्नाड यांच्या वक्तव्यावर बंगाली चित्रपट व नाटय़ क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
 
चीनने तातडीने सुधारणा राबवाव्यात Print E-mail

पंतप्रधानपदाचे उमेवादर लि केकियांग यांचे प्रतिपादन
पीटीआय, बिजिंग

चीनपुढे सध्या अनेक जोखीम आणि आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी अनेक क्षेत्रांमधील सुधारणांबाबत अधिक वेळ दडवणे आता चीनला परवडणारे नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान पदाचे उमेदवार लि केकियांग यांनी शुक्रवारी केले.सध्या चीनमध्ये दशकातील नेतृत्वबदलाची प्रक्रीया सुरु आहे. कम्युनिस्ट पक्षाचे ५७ वर्षीय लि केकियांग सध्या उपपंतप्रधान असून नेतृत्वबदलाच्या प्रक्रीयेत लवकरच ते वेन जिआबो यांच्याकडून पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
 
विराट बोलंदाजी! Print E-mail

कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेण्टी-२० अशा सर्वच प्रकारच्या क्रिकेट सामन्यांत सातत्यपूर्ण खेळ करून गोलंदाजांच्या काळजात धडकी भरविणारा भरवशाचा फलंदाज म्हणून सध्या विराट कोहली याने आपला चांगला जम बसविला आहे. सध्या तो भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य घटक असला तरी भारतीय संघात प्रथमच निवड झाल्यानंतर पाहिलेले वैभव आणि त्या वेळी कर्णधार महेंद्रसिंग धोणी याच्यासमवेत सुरुवातीला संभाषण करताना उडणारी तारांबळ कोहली विसरलेला नाही.
 
ओबामा आशिया भेटीवर Print E-mail

मनमोहन सिंग यांचे निमंत्रण

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील परस्परसंबंधांना अधिक चालना देण्यासाठी उत्सुक असलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पुन्हा भारतभेटीचे निमंत्रण दिले आहे. ओबामा अध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल पंतप्रधानांनी गुरुवारी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. त्या वेळी ओबामा यांना भारतभेटीचे निमंत्रण देण्यात आले.
 
सुसान राईस होणार हिलरींच्या उत्तराधिकारी? Print E-mail

वॉशिंग्टन: संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत सुसान राईस ह्यांचे नाव अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर आहे. विद्यमान परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी आपले पद सोडण्याचा मनोदय यापूर्वीच जाहीर केला आहे. राईस यांची परराष्ट्रमंत्रीपदी निवड झाल्यास त्या कोंडालिसा राईस यांच्यानंतर अमेरिकेच्या पराराष्ट्रमंत्री होणाऱ्या दुसऱ्याच आफ्रिकी-अमेरिकी महिला ठरतील.
 
भारत-पाकिस्तानमधील व्यापार वाढणार Print E-mail

पीटीआय, इस्लामाबाद

वाघा सीमारेषेच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानमधील आयात-निर्यात लवकरच वाढणार आहे. या सीमारेषेवरून उभय देशांना लवकरच १०० टक्केआयात करता येईल, असा विश्वास भारताचे उच्चायुक्त शरत सभरवाल यांनी व्यक्त केला. लाहोर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री येथे ते बोलत होते. वाघा सीमारेषेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आयात-निर्यात व्हावी, यासाठी पाकिस्तान सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.
 
इंडोनेशियामध्ये पुराचे ११ बळी Print E-mail

जकार्ता : गेल्या दोन दिवसांपासून इंडोनेशियामध्ये पावसाने हैदोस घातला असून पुरामुळे ११ नागरिकांचा मृत्यू तर २०हून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नदीकिनाऱ्यावर असलेल्या सुलावेसी बेटांवरील ममासा जिल्ह्य़ामध्ये पूर आणि भूस्खलनामुळे जीवित आणि वित्त हानी झाल्याची माहिती सरकारी प्रवक्त्यांनी दिली.
 
गोव्यातील खाणींना खलनायक ठरवू नका Print E-mail

मुख्यमंत्री पर्रिकर यांचे आवाहन
पीटीआय, पणजी

गोव्यातील खाणींमुळे राज्याची भरभराट झाली असून त्यांच्याकडे केवळ एकाच दृष्टिकोनातून पाहू नका व त्यांना खलनायक ठरवू नका, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शुक्रवारी येथे केले. ब्रिटिश बिझनेस ग्रुपने आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते.
गोव्यामधील खाण व्यवसाय सध्या कमालीचा बदनाम झाला असून त्यास खलनायक ठरवले जात आहे.
 
दिग्विजय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा Print E-mail

न्यायालयाचा पोलिसांना आदेश
पीटीआय, उजैन

भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग आणि अन्य पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शुक्रवारी स्थानिक न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. सहा महिन्यांपूर्वी दिग्विजय सिंग यांच्या उज्जन दौऱ्यादरम्यान भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे संतप्त काँग्रेस नेत्यांनी पाठलाग करून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती.
 
शाहरुख खानविरुद्ध ‘एफआयआर’ Print E-mail

हिंदू देवतेच्या बदनामीचे प्रकरण
पीटीआय, मुझफ्फरपूर

हिंदू देवता राधेचे अवमूल्यन करणारे चित्रीकरण करून धार्मिक भावना दुखाविल्याबद्दल अभिनेता शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि निर्माता करण जोहर यांच्याविरुद्ध स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार येथील सदर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इजाज अहमद यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
कंबोडिया, म्यानमार, थायलंडचा दौरा Print E-mail

पी.टी.आय., वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर बराक ओबामा या महिनाअखेरीस आपला पहिला परदेश दौरा दक्षिण आशियामधील बर्मा, कंबोडिया, थायलंड या राष्ट्रांपासून सुरू करणार आहेत. त्यांच्यासमवेत या दौऱ्यामध्ये संरक्षण सचिव लिओन पॅनेटा आणि परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटनदेखील सहभागी होणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.

 
मोबाइल सेवा सुरू होणार? Print E-mail

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानमध्ये मोबाइल सेवा सुरू करण्यास मान्यता दिल्याचे पाकिस्तानच्या संसदीय मंडळास अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, अद्याप या संदर्भात काही बाबींची पूर्तता करावी लागणार आहे, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

 
‘टू जी’संबंधी उच्च न्यायालयातील सर्व याचिकांना स्थगिती Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली
टू-जी स्पेक्ट्रम परवानावाटप घोटाळ्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांना स्थगिती देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे करण्यात आलेल्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

 
‘मोदींवर टीका हे तर काँग्रेसचे नैराश्य’ Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी केलेली आक्षेपार्ह विधाने म्हणजे काँग्रेसचे नैराश्य आहे, अशी प्रतिक्रिया शुक्रवारी भाजपतर्फे देण्यात आली.

 
आसारामबापूंना दिलासा Print E-mail

सीबीआय चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
पीटीआय, नवी दिल्ली
 आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)मार्फत चौकशी करण्यास परवानगी देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. आसाराम बापूंच्या साबरमतीमधील आश्रमात २००८ साली दीपेश आणि अभिषेक या दोन मुलांचे मृतदेह आढळून आले होते.

 
सूरजकुंड येथे काँग्रेसचे मंत्री व ज्येष्ठ नेत्यांचा ‘संवाद’ Print E-mail

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फरिदाबादच्या सूरजकुंड येथे दिवसभर मंथन केले. आजच्या चर्चेतून पक्षाला ठोस योजना आखता येतील, असा विश्वास सोनिया यांनी व्यक्त केला.

 
कांडा, चढ्ढा यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ Print E-mail

नवी दिल्ली : माजी हवाईसुंदरी गीतिका शर्मा आत्महत्येप्रकरणी हात असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले हरयाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडा आणि त्यांची साथीदार अरुणा चढ्ढा यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्लीतील न्यायालयाने २१ नोव्हेंबपर्यंत वाढ केली आहे.

 
चीनने तातडीने सुधारणा राबवाव्यात Print E-mail

बिजिंग-चीनपुढे सध्या अनेक जोखीम आणि आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी अनेक क्षेत्रांमधील सुधारणांबाबत अधिक वेळ दडवणे आता चीनला परवडणारे नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान पदाचे उमेदवार लि केकियांग यांनी शुक्रवारी केले.

 
मनमोहन सरकार धोकादायक - केजरीवाल Print E-mail

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
बडय़ा नेत्यांच्या भ्रष्टाचारावर तोफ डागणारे अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी विदेशातील भारताच्या लाखो कोटी रुपयांच्या काळ्या पैशाबाबत गौप्यस्फोट केला. ही माहिती आपल्याला केंद्रातील सत्ताधारी काँग्रेसच्या एका नेत्यानेच दिल्याचाही दावा त्यांनी केला. त्याच वेळी देशाच्या सार्वभौमत्वासाठी मनमोहन सिंग सरकार धोकादायक ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 
मलालाच्या प्रकृतीत सुधारणा Print E-mail

लंडन / नवी दिल्ली : तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेली मानवाधिकार कार्यकर्ती मलाला युसुफझाई हिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शुक्रवारी दिली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>