रसग्रहण
मुखपृष्ठ >> रसग्रहण
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रसग्रहण
रसग्रहण :तरंगत्या भावभावनांचे चित्रण Print E-mail

शाम देशपांडे - रविवार ११ नोव्हेंबर २०१२

‘पाण्यावरचे दिवे’ हे लेखिका छाया महाजन यांचे अलीकडचे पुस्तक. यापूर्वी त्यांनी कथा, कादंबरी, ललित, अनुवादित असे वाङ्मयप्रकार समर्थपणे हाताळले आहेत. छाया महाजन यांनी सदरलेखनही केले आहे. त्यांनी ‘संवाद’ या वृत्तपत्रीय सदरात वर्षभर लेखन केले. या लेखांचे हे पुस्तक. या पुस्तकात ३६ लेख आहेत. त्यांचे विषयही वेगवेगळे आहेत.
 
रसग्रहण : बहुआयामी व्यक्तित्वाचा वेध Print E-mail

प्रा. रेखा अरुण मैड - रविवार ११ नोव्हेंबर २०१२

मराठी भाषा आणि साहित्याला नव्या वाटावळणांनी समृद्ध करणाऱ्या मराठवाडय़ाच्या प्रतिभासंपन्न भूमीतील ज्येष्ठ लेखक व समीक्षक तु. शं. कुलकर्णी. साहित्याच्या प्रत्येक क्रांतिकारी टप्प्याची डोळस नोंद अधोरेखित करत कथा, कविता आणि समीक्षा प्रांतात त्यांनी आपला वैशिष्टय़पूर्ण ठसा उमटविला. संपादन, अनुवाद क्षेत्रातील त्यांचे प्रभुत्वही लक्षणीय ठरले.

 
रसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा Print E-mail

राजेंद्र येवलेकर ,रविवार ४ नोव्हेंबर २०१२
alt

माणसाला आकाशातील चंद्र-ताऱ्यांचे कुतूहल फार पूर्वीपासून आहे, पण ज्या शक्तीने या विश्वाला जन्म दिला त्याचेच आपणही घटक आहोत. माणूस अशीच एक जगावेगळी निर्मिती आहे, त्यामुळे त्याला मी कोण आहे, हा प्रश्न तुलनेने थोडा उशिरा पडला असला तरी आता त्याबाबतही आपल्याला बरेच ज्ञान प्राप्त झाले आहे. माणसाचे आजचे स्वरूप हा उत्क्रांतीचा परिणाम आहे.
 
रसग्रहण : संक्षेपात.. Print E-mail

सुचिता देशपांडे ,रविवार ४ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
महाराष्ट्रीय संतकोश
alt

संत साहित्याचे गाढे अब्यासक डॉ. यू. म. पठाण लिखित ‘महाराष्ट्राची संतपरंपरा’ या ग्रंथाच्या तीन भागांतील हा पहिला भाग. यात जैन, शैव, वारकरी, महानुभाव, नाथ, समर्थ, दत्त, नागेश आदी विविध धर्माच्या, पंथांच्या आणि जातीच्या संतकवी - संतकवयित्रींची ओळख करून देण्यात आली आहे. त्यातील विविध नावांमध्ये त्या त्या संस्कृतीचे वेगळेपण जाणवते.
 
रसग्रहण : कलाकारीवरील प्रकाशझोत Print E-mail

प्रशांत मानकर ,रविवार,२१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘कागद, कॅनव्हास आणि कुंचला’ हे प्रा. मं. गो. राजाध्यक्ष यांचे नवे कलाविषयक पुस्तक. राजाध्यक्ष यांनी आजवर अनेक वृत्तपत्रे व नियतकालिके यांत कलाविषयक उद्बोधक लिखाण केलेले आहे. वृत्तपत्रांतील लेखांचे संचित या पुस्तकात त्यांनी एकत्रित केले आहे. भारतीय चित्रकलेला नवी दिशा देणारे लॉकवूड किपलिंग, तसेच व्हॅन गॉग, तुलू लात्रेक, जे. सी. लिएण्डेकर, नॉर्मन रॉकवेल या जागतिक कीर्तीच्या कलाकारांची शब्दचित्रे प्रा. राजाध्यक्ष यांनी या पुस्तकात रेखाटली आहेत.
 
रसग्रहण : तमाशाकलेची नवी मांडणी Print E-mail

लोकनाथ यशवंत , रविवार ,२१ ऑक्टोबर २०१२
alt

अस्सल मातीतून जन्माला येणारी कुठलीही कला असो- ती तिथल्या भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवेशाच्या अवकाशातूनच जन्माला येते. विशेषत: लोककलांच्या परंपरेला तर हे परिमाण लावल्याशिवाय त्यांचा विचारच होऊ शकत नाही. यासंदर्भात महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा समृद्ध वारसा खरोखरच अभ्यसनीय आहे.
 
रसग्रहण : संवेदनशील अभिनेत्याचं वेधक चरित्र Print E-mail

सुनील देशपांडे ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

आपल्याकडे अभिनेता (वा अभिनेत्री) केवळ त्या सर्वनामाने ओळखला जात नाही. एक तर तो ‘नायक’ असतो किंवा मग नुसता अभिनेता वगैरे. छाकडं रूप, उत्तम देहयष्टी आणि हिरोगिरीला साजेशी कामं पार पाडण्याची क्षमता असलेल्याला साहजिकच नायकाचा दर्जा मिळतो. या सर्व पात्रता नसलेल्यास नायकेतर कामं मिळतात आणि यथावकाश त्याच्यावर ‘चरित्र अभिनेता’ हा शिक्का बसतो. चित्रपट क्षेत्रातले पुरस्कार देतानादेखील ही वर्गवारी व्यवस्थित पाळली जाते.
 
रसग्रहण : स्त्री : जगण्याचा पसारा! Print E-mail

महेंद्र भवरे , रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

‘चिंध्यांची देवी आणि इतर कविता’ हा नामदेव ढसाळ यांचा काव्यसंग्रह लोकवाङ्मयगृहाने अलीकडेच प्रसिद्ध केला आहे. या सर्व कविता स्त्रीकेंद्री, स्त्रीविषयक अशा स्वरूपाच्या आहेत. त्यात आई, मावशी, बहीण, बायको, प्रेयसी, वेश्या या सर्व रूपांचा विविधांगी आविष्कार झाला आहे. ही सारी नाती कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनून अविभाज्यपणे येतात.
 
रसग्रहण : एक धगधगता जीवनप्रवास Print E-mail

प्रदीप राजगुरू , रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
alt

वॉशिंग्टन शब्द उच्चारताच जागतिक महासत्तेचा युगपुरुष (जॉर्ज वॉशिंग्टन) व त्याच्या नावाने दिमाखात मिरवणारी महासत्तेची राजधानी डोळ्यासमोर तरळते. परंतु ‘वॉशिंग्टन’ नाव धारण केलेला दुसराही एक स्वयंप्रकाशित तारा कितीजणांना माहीत आहे? डॉ. बुकर टी. वॉशिंग्टन त्याचे नाव. बुकर टी. यांचे जीवनही जॉर्जच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणारे आहे.
 
रसग्रहण : चित्त्याशी ‘माणुसकी’चं नातं Print E-mail
alt
रविवार  , ३० सप्टेंबर २०१२

कुतूहल आणि जिज्ञासा ही मानवाला निसर्गाने दिलेली मोठ्ठी देणगी आहे; ज्यामुळे माणसाने स्वतच्या अस्तित्वाच्या कोडय़ापासून विश्वनिर्मितीच्या रहस्यापर्यंत अनेक रहस्ये उलगडण्याचे प्रयत्न केले. रहस्याचा उलगडा करण्याच्या या वृत्तीचाच एक भाग म्हणजे प्राण्यांचा जीवनपट अभ्यासणं. प्राण्यांचे आयुष्य कसे असते? त्यांची कुटुंबव्यवस्था कशी असते? आपल्या पिल्लांना स्वावलंबी करण्याची प्राण्यांची रीत काय असते? अशा अनेक प्रश्नांनी मानवी मन अस्वस्थ होते. डिस्कव्हरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफिक यांसारख्या वाहिन्यांवरून या प्रश्नांचा उलगडा करणारे उत्तमोत्तम माहितीपट आपल्याला नेहमीच आकर्षून करून घेतात. या धर्तीवर एका चित्त्याची व त्याच्या कुटुंबाची जीवनकहाणी ‘ऑंखो देखा हाल’ अनुभवायची असेल तर ‘पिप्पाची मृत्यूशी झुंज’ या पुस्तकाला पर्याय नाही.
एका पाळीव चित्त्याचं पुनर्वसन करून त्याला पुन्हा जंगली बनवणं, नसíगक वातावरणापेक्षा बंदिवासात चित्त्याच्या प्रजोत्पादनात अडथळे येण्यामागील कारणे तसेच त्याचं संवर्धन करण्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे जाणून घेण्यासाठी जॉय अ‍ॅडम्सन झपाटल्या होत्या.

 
रसग्गहण : महानुभाव पंथ समजून घेताना... Print E-mail
alt
रविवार  , ३० सप्टेंबर २०१२

बाराव्या शतकातील चक्रधरस्वामी व त्यांनी स्थापन केलेला महानुभाव संप्रदाय काहीसा दुर्लक्षित राहिला. पण अभ्यासक व संशोधकांच्या अथक प्रयत्नांनी हा संप्रदाय प्रकाशात आला. या संप्रदायातील मंडळींनी विपुल लेखन केले आहे. परंतु  महाराष्ट्राने त्याची नीट दखल घेतली नाही. मोजक्या मंडळींनी त्याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यात संशोधक शं. गो. तुळपुळे यांचं कार्य मोलाचं आहे.
हा संप्रदाय जरी दुर्लक्षित राहिला तरीही त्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक इतिहासात मोलाची भर घातली आहे. या संप्रदायात विद्वान, अभ्यासक, चर्चकांची मांदियाळी होती;  तशीच स्त्री-पुरुष समानताही होती. हा संप्रदाय आधुनिक विचारसरणीची धुरा वाहणारा होता. या पाश्र्वभूमीवर डॉ. श्रीधर आकाशकर यांचे ‘महानुभावांचे योगदान’  व प्रभाकर वैद्य यांचे ‘चक्रधर’ ही पुस्तके चक्रधरस्वामी व त्यांचा महानुभाव पंथ यांची ओळख करून देण्यात मोलाची भर घालतात.

 
रसग्रहण : कर्ण समजून घेताना.. Print E-mail

अभय जोशी,रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

महर्षी  व्यासांनी ‘महाभारत’ लिहिल्यानंतर गेली हजारो वर्षे त्यावर अनेक प्रकारे उलटसुलट खल, चर्चा, लिखाण सुरू असून, महाभारताचा व्यापक वेध अजूनही संपलेला नाही. महाभारतात श्रीकृष्ण, भीष्म, धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, द्रौपदी, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, दुर्योधन, कर्ण, शकुनी आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्या- त्या भूमिकेतील त्यांचे वर्तन प्रसंगानुरूप साजेसेच होते. या सर्वामध्ये वादग्रस्त ठरला तो महारथी कर्ण. कर्णाला आजही ‘दानशूर’ म्हणून ओळखले जाते.
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2