रसग्रहण
मुखपृष्ठ >> रसग्रहण
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रसग्रहण
रसग्रहण : दोन ध्रुवांवरील साहसी प्रवास Print E-mail

लता दाभोळकर ,रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

पर्यटनाला जायचं म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर भारतातील प्रसिद्ध ठिकाणं वा भारताबाहेर अमेरिका, सिंगापूर, लंडन अशी मोजकीच नावं येतात. पण अंटाक्र्टिका वा आक्र्टिक ही नावं पुढे येणं याची सुतराम शक्यता नाही किंवा अशा प्रकारच्या प्रवासाला जाण्याची इच्छा बाळगणाऱ्याकडे आपलं भारतीय मन जरा संशयानंच पाहतं. कारण या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी धाडस आणि पैसा या दोन्ही गोष्टींची आवश्यकता लागते.
बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेल्या सुहास मंत्री यांनी मात्र हे धाडस केलं.
 
संक्षेपात.. Print E-mail

सुचिता देशपांडे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अब्दुल सत्तार इदींची कार्यओळख
alt

तिसऱ्या जगातील जनतेत मसिहा मानल्या जाणाऱ्या अब्दुल सत्तार इदी यांचे ‘केवळ मानवतेसाठी!’ हे आत्मकथन अत्यंत प्रेरणादायी असेच आहे. भारतात जन्मलेले इदी फाळणीनंतर किशोरवयात कराचीला स्थलांतरित झाले. १९४८ मध्ये मिठादर येथे त्यांनी धर्मादाय दवाखाना सुरू केला आणि अल्पावधीतच आपत्कालीन मदतकार्यासाठी त्यांनी रुग्णवाहिका आणि मालवाहू वाहनांच्या सेवेचे जाळे तिथे विणले.
 
रसग्रहण : गांधीवादी विचारांची वस्तुनिष्ठ मांडणी Print E-mail

डॉ. सदानंद मोरे  - १६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

महात्मा गांधींनी या जगाचा निरोप घेऊन आज साठांवर अधिक वर्षे होऊन गेली,  पण त्यांच्याविषयीचे कुतूहल व जिज्ञासा कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. अशा काळात वाचकांना गांधीजींबद्दल योग्य माहिती मिळण्याची गरज आहे. अन्यथा त्यांच्याविषयी गैरसमज पसरविणारे लिखाणच जास्त परिणामकारक ठरू शकले. याचा प्रत्यय आपणास ‘मी नथुराम..’च्या निमित्ताने आलेला आहेच.
 
रसग्रहण : ललितकलांच्या अभ्यासाचे अपरिचित दालन Print E-mail

डॉ. विद्याधर करंदीकर ,रविवार ९ सप्टेंबर २०१२

अत्यंत मोजके कार्यक्रम होऊनही ज्या प्रयोगाला मोठी प्रतिष्ठा लाभली असा ‘लावणीतील भक्तिदर्शन’ हा एक महत्त्वाचा मंचीय प्रयोग होता. या प्रयोगामुळे ‘ज्ञानोबा उत्पात’ हे नाव सर्वतोमुखी झाले. मूळच्या प्रसिद्धीपराङ्मुख ज्ञानोबांना प्रकाशात आणण्याचे काम पं. भीमसेन जोशी आणि पु. ल. देशपांडे या साधक कलाश्रेष्ठांनी केले. आजही या प्रयोगाच्या आणि ज्ञानोबांच्या आठवणी रसिकांच्या चर्चेत असतात.
‘ज्ञानोबा उत्पात’ हे ठळक नाव आपल्यासमोर प्रकर्षांने आलेले असले,
 
रसग्रहण : विचारकविता! Print E-mail

रविवार , २ सप्टेंबर २०१२

१९८० पासून परिवर्तनाची आस बाळगून क्रांतीची कविता लिहिणारे लहू कानडे ‘तळ ढवळताना’ या नव्या संग्रहाच्या रूपाने वाचकांसमोर आले आहेत.‘तळ ढवळताना’च्या आधीही लहू कानडेंच्या कवितेची जातकुळी लक्षात आली होतीच. परंतु यापूर्वीची त्यांची कविता कोणत्या पद्धतीने आविष्कृत झाली आहे हे पाहणं गरजेचं वाटतं. कारण कविता जर पुढे जात नसेल, आहे तिथेच अडकून पडत असेल तर उगीच संग्रहांच्या संख्येत भर टाकण्यात कुठलीच भरीव वाङ्मयीन कृती घडत नाही.

 
रसग्रहण : विज्ञानचष्म्यातून देव, आत्मा वगरे.. Print E-mail

डॉ.नागनाथ कोत्तापल्ले - २६ ऑगस्ट २०१२

देव, आत्मा, साक्षात्कार आदी मानवी जीवनातील अनेक श्रद्धांविषयी माणसाच्या मनात नेहमीच कुतूहल राहिलेलं आहे. माणसाच्या या श्रद्धांचा जगभरातले शास्त्रज्ञ गेली अनेक र्वष अभ्यास करत असून, त्या समजुती विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहत आहेत. या संशोधनाचा, त्यातून निघणाऱ्या निष्कर्षांचा वेध घेणारं निरंजन घाटे यांचं ‘संभव-असंभव’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. मानवी जीवनातील काही अनुभव असे असतात, की त्यामागील कार्यकारणभाव सांगता येत नाही. विशेषत: अध्यात्माच्या क्षेत्रातील काही गोष्टींचा उलगडा अजूनही झालेला नाही. जन्म व मृत्यू या दोन्ही गोष्टींमधील रहस्यमयता संपूर्णत: उलगडलेली नाही.
 
रसग्रहण : दंतकथेपलीकडचा खरा इतिहास Print E-mail

 

alt

रविवार १९ ऑगस्ट २०१२
मराठी माणसास इतिहास हा दंतकथेतून चघळायला आवडतो. महाराष्ट्र धर्म जागवणाऱ्यांवरील कादंबऱ्या याची साक्ष देतील. कोरा करकरीत इतिहास हा बहुधा आपल्याला पेलत नसावा. खरे तर शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतरचा महाराष्ट्र हा सारा ४०० वर्षांचा काळ. परंतु त्या काळाचीही विश्वासार्ह दफ्तरे आपल्याकडे नाहीत. निर्णयांच्या नोंदी ठेवणे, तपशील शास्त्रीय पद्धतीने नोंदवून ठेवणे याचे आपणास एकंदरीतच वावडे. त्यामुळे इतिहासाचे वस्तुनिष्ठ आकलन आपल्याकडे होत नाही. नंतर नंतर त्या दंतकथा इतक्या घट्ट होतात की त्यांचे उपकथानकच मुख्य कथानकास मारक ठरते. अशा उपकथानकाने मारला गेलेला खरा नायक म्हणजे थोरला बाजीराव.
    मराठी शौर्याचा मानदंड म्हणता येईल अशा थोरल्या बाजीरावाचे आयुष्य जेमतेम ४० वर्षांचे. आयुष्याची लढाई त्याची फक्त १७०० ते १७४० या काळातील. वडील बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाल्यावर १७२० साली, म्हणजे फक्त २०वर्षांचा असताना, त्यांची नेमणूक पेशवेपदी केली गेली. त्याचवेळी या जेमतेम मिसरूड फुटलेल्या तरुणाने थेट अटकेपार झेंडे लावायची गर्जना केली होती. दिल्लीतील मोगलांचे तख्त अशक्त झाले आहे, त्याच्या मुळावरच घाव घालू या.फांद्या आपोआप तुटतील अशी मसलत त्याने त्या कोवळय़ा वयात थेट छत्रपती शाहू महाराजांना दिली होती. त्याचे मोठेपण हे की त्याने आपले शब्द खरे करून दाखवले. आयुष्यात हा ४१ लढाया लढला.

 
रसग्रहण : मन धनरंगी रंगले… Print E-mail

 

alt

रविवार १९ ऑगस्ट २०१२
मराठीच नव्हे तर भारतीय समाजाची सध्याची गरज ही लक्ष्मीचे म्हणजे पैशाच्या व्यवहारांचे ज्ञान करून घेणे ही आहे. ही व्यक्तिगत नव्हे तर सामाजिक गरज आहे, हे भान दोन शतकांपूर्वी होते. लोकहितवादी यांनी ‘लक्ष्मीज्ञान’ नावाचा ग्रंथ लिहिला होता तर कृष्णशास्त्री चिपळूपणकरांनी अर्थशास्त्राची परिभाषा लोकांसमोर आणली. लोकमान्य टिळकांच्या काळात ‘केसरी’ तील अनेक लेख हे मुख्यत: अर्थशास्त्रीय विषयांवर असत. सार्वजनिक सभेच्या माध्यमांतून न्यायमूर्ती रानडे यांनीही अर्थशास्त्रीय विषयांची उकल करण्यास सुरुवात केली होती. परंतु, ती परंपरा पुढे चालू राहिली नाही. मधल्या काळात तर वृत्तपत्रांतून अर्थशास्त्रीय लेखन जवळपास बंद झाले आणि आर्थिक व्यवहारांवरील पुस्तकेही प्रसिद्ध होत नव्हती.
गेल्या दहा वर्षांत यामध्ये थोडा बदल झाला. मध्यमवर्गाच्या हातात थोडा पैसा येऊ लागल्यावर पुन्हा एकदा अर्थशास्त्राकडे लक्ष गेले. मात्र या विषयावरील पुस्तके ही मुख्यत:  गुंतवणुकीवरील आहेत. त्यांना मागणी चांगली असली तरी व्यक्तिगत गुंतवणुकीचा सल्ला म्हणजे अर्थशास्त्र नव्हे. अर्थशास्त्राचा आवाका फार मोठा आहे व राजकीय व्यवहारही त्याच्याशी जोडले गेले आहेत.
जयराज साळगावकरांच्या ‘पैसा आणि मध्यमवर्ग’ नव्या पुस्तकाने मध्यमवर्गाच्या पैशासंबंधीच्या धारणा विस्तारण्यास मदत केली आहे.

 
रसग्रहण : नात्यांचा शोध घेणाऱ्या कादंबऱ्या Print E-mail

 

alt

रविवार १९ ऑगस्ट २०१२
कथा, ललित गद्य आणि समीक्षा या प्रांतांमध्ये गेल्या पन्नास वर्षांच्या कालखंडात भरीव कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष यांनी कादंबरी हा प्रकार प्रथमच हाताळला आहे. अर्थात, त्यांनी लिहिलेल्या या दोन्ही कादंबऱ्या छोटेखानी आहेत. किंबहुना, त्यांना कादंबरी म्हणावं, की लघुकादंबरी याचा निर्णय वाचकांनीच घ्यावा, असं लेखिकेनंच सुचवलंय. काही वाचकांना त्या ‘दीर्घकथा’ही वाटू शकतील. असो.
‘बंदिश’ आणि ‘आयुष्य : पहिलं की तिसरं’ अशा या दोन कादंबऱ्यांच्या संग्रहाचं शीर्षक मात्र ‘तीन प्रहर’ असं आहे. आयुष्याच्या तिसऱ्या प्रहरी केलेल्या लेखनास अनुलक्षून लेखिकेनं हे शीर्षक दिलं असावं. (अर्पणपत्रिकेत तसा संकेत मिळतो.) आयुष्याच्या याच टप्प्यावर कादंबरी लेखनाची वाट शोधून पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. नातेसंबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न हा या दोन्ही कादंबऱ्यांमधील समान धागा आहे.
‘बंदिश’ ही पहिली कादंबरी विष्णू लिमये या शास्त्रीय संगीतातील यशस्वी गायकाची कहाणी सांगते. गाणे शिकण्यासाठी कोवळ्या वयात घरदार सोडून बाहेर पडलेल्या विष्णूचा विख्यात गायक होईपर्यंतचा प्रवास यात मांडला असून गुरु-शिष्य परंपरेसारख्या विषयावरही ती भाष्य करून जाते. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या विष्णूचे वडील हे स्वभावानं तुसडे, दुराग्रही आणि गाण्याविषयी तिरस्कार असणारे. याउलट आई कमालीची समंजस आणि त्याला प्रोत्साहन देणारी. कुठलंही नातं नसलेल्या परंतु जिवाभावाचा लळा लावणाऱ्या श्यामकाकांच्या पाठिंब्यानं विष्णू घरदार सोडतो. श्यामकाकांच्याच घरी राहू लागतो. त्यांच्याच प्रयत्नानं त्याला जोगबुवांसारखे गुरू लाभतात.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 2 of 2