विश्ववाड्मय
मुखपृष्ठ >> विश्ववाड्मय
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विश्ववाड्मय
विश्ववाड्मय : बांगलादेशी आद्य साहित्यकार Print E-mail

प्रसाद बर्वे - रविवार ११ नोव्हेंबर २०१२

जाणकारांच्या मते या शतकातील सर्वात जास्त वाचला गेलेला बंगाली लेखक म्हणून शरत्चंद्र चट्टोपाध्याय यांच्याबरोबर हुमायून अहमेद यांचं नाव घेता येईल. त्यांचं लेखन सकारात्मक तसंच विधायक विचार आणि प्रवृत्ती दाखवतं. त्यांच्या कथारेषेत वास्तवाबरोबरच अतिनैसर्गिक, काहीसं जादुई तत्त्वही दिसतं. राजकारणाने भारलेल्या तत्कालीन तरुणाईला त्यांनी आपल्या रचनांद्वारे कलेचं रसग्रहण करायला आणि पुस्तकं वाचायलाही शिकवलं.

 
विश्ववाड्मय : काफ्काच्या बिबटय़ांची गोष्ट Print E-mail

alt

निखिलेश चित्रे , रविवार , ८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मोआसिर स्क्लियारनं बॉम फिम या प्रदेशाचं असंच उत्कट चित्रण आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून केलं. मात्र त्याच्या साहित्यावर असलेले संस्कार ब्राझिलियन किंवा लॅटिन अमेरिकन साहित्यापेक्षा युरोपियन साहित्याचे आहेत. त्याचे आई-वडील त्याच्या जन्मापूर्वी रशियातून ब्राझीलमध्ये स्थलांतरित झाले. तिथल्या ज्यू वस्तीत स्क्लियार लहानाचा मोठा झाला. स्वत:च्या ज्यू असण्याची जाणीव त्याच्या मनात कायम प्रखर राहिली. ज्यू असलेल्या काफ्काच्या साहित्याचे कळत्या वयापासून त्याच्यावर खोल संस्कार झाले. अल्पसंख्याक असणं, ‘बाहेरचा’ असणं या जाणिवांचा प्रत्यय त्याला काफ्काच्या साहित्यातून आला आणि काफ्काशी आपोआप सहानुभव जुळला.
 
विश्ववाड्मय : अक्षरशत्रू - लेखकांचं मंडळ Print E-mail

altनिखिलेश चित्रे , रविवार , १३ मे २०१२
altरशियन लेखक, समीक्षक, नाटककार
सिगिझमुंड क्रशिशानोवस्कीच्या ‘द लेटर किलर्स क्लब’ या कादंबरीतल्या पात्रांना अक्षरं नष्ट करावीशी का वाटतात? या मंडळाच्या अध्यक्षाच्या म्हणण्यानुसार, विचाराला खऱ्या अर्थानं स्वत:चं सृजनशील आयुष्य स्वतंत्रपणे जगायचं असेल तर त्याला लिखित शब्दांच्या बंधनातून मुक्त होणं आवश्यक आहे. िपजऱ्यातल्या सिंहाप्रमाणे अर्थ हा लिखित शब्दांच्या आत बंदिस्त झालेला असतो. लेखक हे त्या सिंहाच्या प्रशिक्षकाप्रमाणे शब्दांना पाळण्याचं, त्यांना माणसाळवण्याचं काम करत असतात.

 
विश्ववांड्मय : लेखक जेव्हा त्रिधा बनतो.. Print E-mail

altनिखिलेश चित्रे, रविवार १५ एप्रिल २०१२
altसेपेनिएग गेली अनेक वर्षे पॅरिसमध्ये निर्वासिताचं आयुष्य जगतोय. ‘द पिजन पोस्ट’ ही कादंबरीसुद्धा त्यानं ‘एड पेस्तनेज’ या टोपणनावानं फ्रेंचमध्ये लिहिली आहे. नव्या संदर्भात जगण्याची धडपड ही निर्वासित लेखकाची नियती असते.

 
विश्ववाड्मय : दुभंग व्यक्तिमत्त्वाचे कोस्लर Print E-mail

भालचंद्र गुजर - ४ मार्च २०१२
altराजकीय कादंबरीकार ते मानसशास्त्र आणि उत्क्रांतीवाद याविषयी संशोधन करणाऱ्या आर्थर कोस्लर यांच्या जीवनघटितांचा आणि बहुस्पर्शी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणे हे चरित्रकारापुढचे आव्हानच. ‘कोस्लर : दि इन्डिस्पेन्सिबल इंटलेक्च्युअल’ या ग्रंथात मायकेल स्कॅमेल यांनी हे आव्हान समर्थपणे पेलले आहे.
असाधारण बुद्धिमत्ता लाभलेल्या आर्थर कोस्लर यांचे जीवन आणि मृत्यू यांचा विचार केला तर ते रंगविण्यासाठी एखादा डोस्टोव्हस्कीच हवा. डोस्टोव्हस्कीप्रमाणेच कोस्लर हेही क्रांतिकारी राजकारणात सक्रिय होते आणि त्यांना फाशीची शिक्षा झालेली होती.

 
विश्ववाड्मय :टोलेजंग कादंबऱ्या आणि कमजोर वाचक Print E-mail

नीतिन रिंढे - १९ फेब्रुवारी २०१२
altहजारो पृष्ठांच्या आणि गुंतागुंतीची कथानकं असलेल्या टोलेजंग कादंबऱ्या बठक मारून, एकाग्र होऊन वाचाव्या लागतात. त्या समजावून घेण्यासाठी बौद्धिक आणि भावनिक क्षमता पणाला लावाव्या लागतात. एक प्रकारची सहनशक्ती वाचकाच्या अंगी असावी लागते. असा वाचक मुळातच अल्पसंख्य असतो.

 
विश्ववाड्मय : आंधळ्या घुबडाची सावली Print E-mail

altनिखिलेश चित्रे , रविवार , ५ फेब्रुवारी २०१२
altफ्रान्समध्ये शिकलेले इराणी लेखक सादिक हिदायत यांच्यावर काफ्काचे संस्कार होतेच. काफ्काच्या साहित्यातली दु:स्वप्नसृष्टी हिदायतच्याही लेखनात- आणि विशेषत:
‘द ब्लाइंड आऊल’ या कादंबरीत ठळकपणे आढळते. १९३७ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आधुनिक फारसी कादंबरीचा मानदंड समजली जाते. आधुनिकतावादी इराणी कादंबरीची खरी सुरुवातही
‘द ब्लाइंड आऊल’पासूनच झाली.
काही पुस्तकं वाचताना गुंतवून ठेवतात. स्थळ-काळाचं भान नाहीसं करतात. आपण त्यांच्या संपर्कात असेपर्यंत इतर कसलाही विचार करू शकत नाही.

 
विश्ववाड्मय : इजिप्तच्या आधुनिक मनाचा उद्गाता Print E-mail

भालचंद्र गुजर - २९ जानेवारी २०१२
alt१९८८ चे नोबेल पारितोषिकविजेते इजिप्शियन कादंबरीकार नगीब महाफूज यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने त्यांचे लेखन आणि आयुष्यावर टाकलेला झोत..
राजसत्ता आणि साहित्यिक यांच्यातील संघर्षांप्रमाणेच धर्मसत्ता आणि साहित्यिक यांच्यातील संघर्षही सार्वत्रिक तसेच सार्वकालिक असल्याचे विदारक वास्तव गेल्या शतकात ठळकपणे अधोरेखित झाले होते.

 
विश्ववाड्मय : अभ्यासू लालित्य जपणारी चरित्रकादंबरी Print E-mail

रविवार , ८ जानेवारी २०१२

पॅरिसच्या मोंमार्त् या उपनगरासारख्या भागात अनेक कलावंत राहात. त्यांच्या जीवनकहाण्या समजून घेताना कलेची ओळख व्हावी, किंवा उलटपक्षी, त्यांच्या कलेकडे साकल्याने पाहताना त्यांची जीवनचरित्रे समजावीत, असे त्या कलावंतांचे जगणे. म्हणजे यापैकी एखाद्या कलाकाराचा जीवनप्रवास समजून घेतला आणि त्याचे मनोव्यापार कसे होते याचा सुगावा घेतला, तरी त्याच्या कलेकडे पाहण्याची दृष्टी तयार होणारच, याची खात्री बाळगायला हरकत नाही. या खात्रीचे थेट प्रत्यंतर वाचकाला ‘मूलाँ रूज’ ही तुलूज लोत्रेक या चित्रकाराच्या जीवनावरील कादंबरी वाचताना येते.

 
विश्ववाड्मय : दोन पानांच्या शंभर कादंबऱ्या Print E-mail

निखिलेश चित्रे , रविवार , १ जानेवारी २०१२
altमान्गिनेलीच्या ‘सेंचुरिया’ या पुस्तकात alt

शंभर आख्यानं आहेत. प्रत्येक आख्यानाची लांबी दोन पानांपेक्षा जास्त नाही. मान्गिनेली त्यांना कादंबऱ्या म्हणतो. मूळ इटालियन पुस्तकाचं उपशीर्षक ‘शंभर छोटय़ा दीर्घ कादंबऱ्या’ असं आहे. मान्गिनेली या आख्यानांबद्दल म्हणतो, ‘या अर्करूपातल्या कादंबऱ्या आहेत. त्यात कादंबरीचे अत्यावश्यक घटक कायम ठेवून बाकी सगळ्या गोष्टी काढून टाकलेल्या आहेत.’