अ‍ॅड vision
मुखपृष्ठ >> अ‍ॅड vision
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अ‍ॅड vision
अॅड vision : नावातच सारं काही! Print E-mail

altराज कांबळे, रविवार २९ एप्रिल २०१२
नावात काय आहे? तर- खूप काही! बऱ्याच छोटय़ा उद्योजकांच्या यशात त्यांच्या व्यवसायाच्या नावाचाच मोठा वाटा असतो. एखादं नेमकं नाव ग्राहकांच्या आयुष्यभर तोंडी अन् स्मरणात राहतं; तर एखादं चुकीचं नाव व्यवसायाला अपयशाच्या दारात उभं करतं. तुमच्या व्यवसायाचं नाव हे तुमचा व्यवसाय काय आहे, तुमची व्यवसायाची नीतिमत्ता, वेगळेपणा हे लोकांसमोर मांडत असतं. काहींच्या मते, नाव वेगळं, नावीन्यपूर्ण असावं. ते वाचल्यावर किंवा ऐकल्यावर एक विशिष्ट चित्र डोळ्यांसमोर उभं राहायला हवं. तर काहींच्या मते, नाव अतिशय साधं अन् माहितीपूर्ण असावं. माझ्या मते, दोघेही बरोबरच आहेत. पण ते नाव सार्थ करण्यासाठी तशाच प्रकारचं जाहिरातकौशल्यही वापरलं जायला हवं, तरच ते लोकांना पटेल किंवा त्यांच्या लक्षात राहील.

 
अ‍ॅड vision : व्यवसायाचं गणित Print E-mail

राज कांबळे, रविवार १५ एप्रिल २०१२
भारतात जवळपास सात कोटी लोक इन्टरनेटचा वापर करतात, तर जवळपास दोन कोटी लोकांनी मागच्या काही वर्षांत ऑनलाइन शॉपिंग केलीय.. कदाचित ई-कॉमर्स क्रांतीची ही सुरुवात म्हणायला हरकत नाही.
 
अ‍ॅड vision : ‘टॉमस’ - मदतीचा बूट Print E-mail

राज कांबळे ,१ एप्रिल २०१२
visit - www.toms.com
altअमेरिकेतल्या टेक्सासमधला ‘ब्लेक मायकोस्की’ सुखवस्तू अमेरिका सोडून अर्जेन्टिनामधल्या छोटय़ा गावात फिरण्यासाठी गेला अन् परत आला तो एक वेगळाच ध्यास डोक्यात घेऊन.. ही गोष्ट आहे अवघ्या ६ वर्षांपूर्वीची. म्हणजे २००६ साली ब्लेक मायकोस्की अर्जेन्टिनावरून परत आला अन् त्यानं ठरवलं की, गरीब-गरजू लोकांना ‘मोफत’ बूट बनवून द्यायचे, पण इतके पैसे आणायचे कोठून? म्हणून त्याने ठरवलं की, एखादी धर्मदाय संस्था काढण्यापेक्षा असा एखादा क्रिएटिव्ह व्यवसाय करू शकतो का? ज्याने हे शक्य आहे?

 
अ‍ॅड vision : सिनेमाचं ‘स्टंट’ मार्केटिंग Print E-mail

राज कांबळे ,१८ मार्च २०१२
altपरवा संजय गुप्ताने त्याच्या ‘शूट आऊट अ‍ॅट वडाला’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या लेटरहेडवरच थोडय़ाबहुत खाडाखोड करून अख्ख्या प्रसारमाध्यमालाच ती आमंत्रणपत्रिका म्हणून पाठवली. त्याचा हा ‘स्टंट’ त्याला नंतर तितकाच महाग पडला. शेवटी १० हजार रू. दंड व पोलीस आयुक्तांची माफी मागणारं वैयक्तिक पत्र या गोष्टीवर त्याला सोडण्यात आलं. पण या सर्वाचाच फायदा होणार आहे तो त्याच्या येणाऱ्या सिनेमाला. प्रत्येकाला एका रात्रीत माहीत पडलं की, ‘शूट आऊट अ‍ॅट वडाला’ अशा नावाचा एक सिनेमा येतोय.

 
अ‍ॅड vision : थेंब थेंब पाण्यासाठी.. Print E-mail

राज कांबळे , ४ मार्च २०१२
altपाणी! ज्याने रोज सकाळी आपण आंघोळ करतो, तोंड स्वच्छ करतो अन् पाण्याने आपली तहानही भागते. पण आपल्याला जाणवतही नाही की, आज जगात प्रत्येक सहाव्या व्यक्तीला पुरेसं किंवा स्वच्छ पाणी मिळत नाही. जगभरात प्रत्येक सेकंदाला पाण्याअभावी एका बालकाचा जीव जातोय.. म्हणजे जवळपास सहा हजार बालके प्रत्येक दिवशी!
जगाचं काय, सुमारे ३८ दशलक्ष भारतीय दरवर्षी पाण्याअभावी किंवा दूषित पाण्यामुळे आजारी पडतात. जवळपास १५ लाख बालके फक्त दूषित पाण्यामुळे हगवण किंवा जुलाबाने मृत्युमुखी पडतात.

 
अ‍ॅड vision : महागडे ‘ब्रॅण्ड’ कशासाठी? Print E-mail

राज कांबळे ,१९ फेब्रुवारी २०१२
altनुंकत्याच प्रसिद्ध झालेल्या सव्‍‌र्हेनुसार या वर्षी भारतातल्या प्रत्येक घरटी वार्षिक सरासरी उत्पन्न सुमारे ६० हजार रुपये इतके आहे. मागील वर्षांच्या तुलनेत ते जवळपास १५ टक्क्यांनी वाढले आहे. अन् दिवसेंदिवस ते वाढत आहे. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. आयटी क्षेत्रात आपण क्रांती घडवतो आहोत.

 
अ‍ॅड vision : पुण्य विकणे आहे! Print E-mail

altराज कांबळे , रविवार , ५ फेब्रुवारी २०१२
‘ये है बंबई नगरिया तू देख बबुआ, सोने-चांदी की डगरिया, तू देख बबुआ!’ अशा सोन्या-चांदीच्या डगरिया असलेल्या शहरात कोणीही लाखो रुपये कमावू शकतो. फक्त हवी असते, ती पैसे कमावण्याची आयडिया.. आणि ती आयडिया सर्वच ठिकाणी असते. रेल्वेत, रस्त्यात, फूटपाथवर, शेअर बाजारामध्ये, मंदिरात किंवा मंदिराच्या बाहेरही! सध्या ‘जुगाड’ हा हिंदीमधला शब्द आपली ‘ओळख’ बनलाय.

 
अ‍ॅड vision : कशी बनवाल घरोघरी कोलावरी? Print E-mail

राज कांबळे - २२ जानेवारी २०१२
altराज कांबळे हे जाहिरात क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. या क्षेत्रात प्रत्यही सृजनशीलतेला आव्हान मिळत असते. सृजनशील कल्पनेच्या निर्मितीप्रक्रियेबद्दलचे हे सदर..
कुणी ‘कोळ्यावरी कोळ्यावरी’, तर कुणी ‘नजर हाय तुझी कोल्यावरी’, तर कुणी ‘कोल्हापुरी कोल्हापुरी’ गातेय.. काय गाताहेत तरी काय हे?

 
अ‍ॅड vision : आयडियाची कल्पना! Print E-mail

राज कांबळे , रविवार , ८ जानेवारी २०१२
altराज कांबळे हे ‘बीबीएच’ या जाहिरात संस्थेत मॅनेजिंग पार्टनर आणि चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर म्हणून काम पाहतात. यापूर्वी ते लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये लो-लिंटास या जाहिरात कंपनीत दहा वर्षे व्हाइस प्रेसिडंट होते. जाहिरात क्षेत्रात प्रत्यही सृजनशीलतेला आव्हान मिळत असते. नित्यनव्या कल्पनेच्या जगात वावरणारे राज कांबळे या सदरात ‘कल्पने’च्या निर्मितीप्रक्रियेवर लिहिणार आहेत..
दररोज सकाळी टेबलावरचा पांढराशुभ्र पेपर आणि टोकदार पेन्सिल मला नव्‍‌र्हस करते.