अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
पिवळ्या धातूला ३२ हजारी लकाकी! Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२

धनत्रयोदशीचा खरेदीचा मुहूर्त दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना पारंपरिक संपन्नतेचे प्रतीक असलेले सोन्याचा भावही कळसाला जाताना दिसत आहे. शुक्रवारी तोळ्याला सोन्याचा भाव ३२ हजार रुपये या विक्रमी स्तराला पोहचला.राजधानीत नवी दिल्लीत सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी २७० रुपयांनी वधारत ३२,०४० रुपयांपर्यंत गेला. पिवळ्या धातूने ही चमक २६ सप्टेंबर रोजी पाहिली होती. तर चांदीही येथे किलोमागे जवळपास हजाराने वाढून ७० हजारानजीक पोहोचली आहे.
 
मद्य जागले, किंगफिशर तरेल? Print E-mail

युनायटेड स्पिरिट्समधील ५३.४% हिस्सा ‘डिआजियो’कडे
कर्ज-कात्रीत सापडलेल्या मल्ल्या यांना ११,१६६ कोटींचे घबाड!
व्यापार प्रतिनिधी, मुंबई

जगातील सर्वात मोठी मद्यनिर्माता कंपनी ब्रिटनस्थित डिआजियोने भारतीय मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या उद्योगसमूहातील ‘कामधेनू’ कंपनी युनायटेड स्पिरिट्सवर अखेर ताबा मिळविला. मल्ल्या यांच्या या कंपनीतील ५३.४ टक्के हिस्सा सुमारे ११,६६६.५ कोटी रुपये (२ अब्ज अमेरिकी डॉलर) मोबदल्यात मिळविणाऱ्या डिआजियोने चालू वर्षांतील कुणाही विदेशी कंपनीकडून भारतात झालेल्या सर्वात मोठय़ा संपादन व्यवहारावर आपली मोहोर उमटविली आहे.
 
स्टेट बँकेच्या कामगिरीने निराशा! Print E-mail

‘सेन्सेक्स’मध्ये घसरण
व्यापार प्रतिनिधी, मुंबई

नफ्याची मोठी अपेक्षा असलेल्या आघाडीच्या कंपन्यांनी तिमाही निकालांमध्ये निराशा केल्याने एकूणच मुंबई शेअर बाजारावर त्याचा परिणाम आठवडाअखेर दिसून आला. सलग दुसऱ्या सत्रात घसरण नोंदविणारा ‘सेन्सेक्स’ यामुळे १८,७००च्या खाली जाऊन विसावला, तर ‘निफ्टी’ ५२.५० अंश घसरणीसह ५,६८६.२५ वर स्थिरावला.आघाडीच्या स्टेट बँकेने नफ्यातील ३० टक्के वाढ नोंदविली असली तरी दुसऱ्या तिमाहीत तिचे बुडीत कर्जाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.
 
मार्केट मंत्र : खरंच यंदाचा ‘मुहूर्त’ फळावा! Print E-mail

निमिष शाह - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गेला सप्ताहभर तेजीच्या दिशेने वर सरकत असलेल्या बाजाराला सप्ताहाच्या अखेरच्या दोन दिवसांनी अनाकलणीय ब्रेक लावला आहे. या घसरणीची जी कारणे पुढे येताना दिसत आहे ती मात्र चक्रावून सोडणारी आहेत. सध्या निकालांच्या हंगामात सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बँकांपेक्षा फार वेगळ्या कामगिरीची स्टेट बँकेकडून कोणी अपेक्षा करीत नव्हते.

 
मुहूर्ताचे सौदे यंदा सव्वा तासाचे Print E-mail

मुंबई : लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने होणारे भांडवली बाजारातील मुहूर्ताचे सौदे यंदा तब्बल सव्वा तासांपर्यंत विस्तारले आहेत. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात मंगळवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी ३.४५ ते ५ वाजेपर्यंत संवत २०६९ च्या स्वागताचे व्यवहार होतील. तर वायदे बाजारांमध्ये मुहूर्ताचे सौदे सायंकाळी ५.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत होतील.

 
हाकाटी कॉल दरवाढीची! Print E-mail

स्पर्धेच्या दबावापायी प्रत्यक्षात दरवाढीचे धाडसही नाही
व्यापार प्रतिनिधी , मुंबई - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२

एकीकडे स्पर्धात्मकतेचा वाढता दबाव; स्पर्धेत निभाव लागण्यासाठी करावा लागणारा प्रचंड भांडवली खर्च तर दुसरीकडे कंपनीची नफाक्षमताही टिकवून धरण्याची तारेवरची कसरत आता दूरसंचार कंपन्यांना पेलवेनाशी झाली असून, कॉलदरात वाढ करण्याशिवाय गत्यंतर नाही अशी हाकाटी उठू लागली आहे. दूरसंचार अग्रणी भारती एअरटेलने गुरुवारी एकूणच उद्योगक्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना दरवाढ अपरिहार्यच ठरेल, असे स्पष्ट प्रतिपादन केले.
 
साडेसात वर्षांच्या ‘छोटा हाथी’चे १० लाख सोबती Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

‘छोटा हाथी’ म्हणून तमाम वाहतुकदारांचा साथी बनलेल्या टाटा एसने गेल्या साडेसात वर्षांत १० लाख वाहनविक्रीचा अनोखा टप्पा पार केला आहे.मे २००५ मध्ये टाटा मोटर्सने टाटा एस हे छोटेखानी वाणिज्य वापरासाठीचे चारचाकी वाहन भारतीय बाजारपेठेत आणले होते. एक टन वजन वहन क्षमतेच्या वाहन विक्री क्षेत्रात त्याने कडवी स्पर्धा निर्माण केली. यानंतर दोन वर्षांनी कंपनीने याच ब्रॅण्डखाली चार चाकी प्रवासी वाहनही सादर केले.
 
टाटा पॉवरच्या अध्यक्षपदावरून रतन टाटा पायउतार Print E-mail

मुंबई : टाटा समूहातून येत्या महिनाअखेर निवृत्त होणारे रतन टाटा हे टाटा पॉवर कंपनीतून गुरुवारी पायउतार झाले. टाटा समूहातील या कंपनीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सायरस मिस्त्री यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आपले उत्तराधिकारी आणि समूहाचे अध्यक्ष म्हणून मिस्त्री यांचे नाव वर्षभरापूर्वीच जाहीर झाले आहे. दरम्यान समूहातून डिसेंबर २०१२ पर्यंत निवृत्त होईपर्यंत रतन टाटा हे टाटा पॉवरच्या संचालक पदावर राहणार आहेत.
 
मोबाइल ‘कॉल’ महागणार किती..? Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

एका मर्यादेपलिकडे दूरसंचार सेवा परवाना राखणाऱ्या कंपन्यांवर एकरकमी शुल्क अदा करण्याबाबत केंद्र सरकारने गुरुवारी निर्णय घेऊन काढलेल्या फर्मानामुळे भारती, व्होडाफोनकडून येत्या काही दिवसात मोबाइलचे दर वाढविले जाण्याची अटकळ आहे. येत्या आठवडय़ात होणार असलेल्या टूजी स्पेक्ट्रम लिलावानंतर ३० टक्क्यांच्या दरवाढीचे संकेत देणाऱ्या दूरसंचार कंपन्यांनी नव्या शुल्कापोटीची मात्राही ग्राहकांकडूनच वसुल केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
 
श.. शेअर बाजाराचा : ‘डिमॅट’विषयी गैरधारणा : काही ठळक प्रश्न Print E-mail

भाग पहिला
चंद्रशेखर ठाकूर - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शेअर बाजारातील व्यवहारांचे सार्वत्रिकीकरण, पारदर्शकता आणि गतिमानता ‘डिमॅट’ या संकल्पनेतून घडून आली. एकूणच ‘डिमॅट’बाबत गुंतवणूकदारांमध्ये अनेक गैरधारणा असून त्याचे निराकारण करणारी ही तीन भागातील मालिका..  
१. डिमॅट खाते किती व्यक्तींच्या नावे उघडता येते?
- जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या नावे डिमॅट खाते उघडता येते.

 
‘मॅग्मा फिनकॉर्प’ गृहवित्त क्षेत्रात Print E-mail

‘जीई कॅपिटल’च्या कर्ज व्यवसायावर ताबा
मुंबई : वाहन कर्ज पुरवठा क्षेत्रात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या मॅग्मा फिनकॉर्पने आता गृहवित्त क्षेत्रातील शिरकाव घोषित केला आहे. कंपनीने जीई कॅपिटलचा कर्ज व्यवसाय ताब्यात घेत या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

 
सलग सहा दिवसांच्या दौडीनंतर बाजाराला उतरंड Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
भांडवली बाजारातील गेल्या सहा सत्रातील वाढीला गुरुवारी अखेर चाप बसला. गुंतवणूकदारांच्या नफेखोरीच्या धोरणामुळे मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ ५६.१५ अंशांनी खाली येत १८,८४६.२६ वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ २१.३५ अंश घसरणीसह ५,७३८.७५ वर बंद झाला.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>