अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
श.. शेअर बाजाराचा : परहस्ते गतं धनम् Print E-mail

चंद्रशेखर ठाकूर - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कस्तुरचंद प्लँटेशन स्कीममध्ये माझ्या वडिलांनी पसे गुंतविले होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी पण आता त्या कंपनीचा पत्ता किंवा फोन काहीच सापडत नाही तेव्हा काय करावे, असे राजेश जडे विचारतात.  या कंपनीसारख्याच अनेक कंपनी सागवान वगरेची लागवड वगरे भूलथापा मारून लाखो रुपये लोकांकडून गोळा करून गायब झाल्या. अशा शेकडो कंपन्यांनी नोंदणी न करताच पसे गोळा करायला सुरुवात केली होती. जनहित ध्यानात घेता नियामक संस्थेने त्याना नोटीसा पाठवून योग्य ती कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देखील दिली होती.
 
कोलकाता-बंगळुरूपाठोपाठ एअरटेलचे ‘फोर-जी’ पुण्यात दाखल Print E-mail

प्रतिनिधी, पुणे
आता इंटरनेटवरून मोठय़ा आकाराच्या फाईल्स आणि व्हिडिओज् एकाच वेळी डाऊनलोड करणे सहज शक्य बनविणाऱ्या ‘एअरटेल फोर-जी एलटीई’ (लाँग टर्म इव्होल्युशन) ही वायरलेस ब्रॉडबँड सेवा ‘भारती एअरटेल’ने गुरूवारी पुण्यात सादर केली. कंपनीने कोलकाता आणि बंगळुरूपाठोपाठ या सेवेसाठी पुणे शहराची निवड केली.

 
‘किंगफिशर’च्या टाळेबंदीला पुन्हा मुदतवाढ Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
वेतन-तिढय़ावर  कर्मचारी व व्यवस्थापनादरम्यान मार्ग निघत नसल्याने किंगफिशर एअरलाईन्सने पुन्हा टाळेबंदी आणखी तीन दिवसांनी वाढविली आहे. हवाई परवाना रद्द करण्याबाबत कंपनीकडून नागरी हवाई महासंचालनालयाला द्यावयाच्या उत्तरासाठीही मुदतवाढीची कंपनीची मागणी आहे.

 
‘फर्निचर व सजावट उद्योगातील प्रावीण्याला चालना आवश्यक’ Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
वास्तूरचना, बांधकाम, अंतर्गत सजावट तसेच फर्निचर क्षेत्रातही विदेशी भागीदाऱ्यांना चालना मिळणे येत्या काळात अपरिहार्य दिसत आहे. भारतात या क्षेत्रात उपलब्ध कौशल्य व उद्यमप्रतिभेला विदेशातून प्रचंड संसाधनांचे पाठबळ यातून मिळू शकेल, असा विश्वास यूबीएम इंडेक्स ट्रेड फेअर्सचे व्यवस्थापकीय संचालक लियाकत अली खान यांनी केले.

 
देशाच्या ८० टक्के मनुष्यबळाच्या सुरक्षिततेचा कोणीच वाली नाही Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
व्यावसायिक सुरक्षा आणि स्वास्थ्यविषयक भारतात गेल्या ५० वर्षांपासून कायदेकानू अस्तित्त्वात आहेत, पण या संबंधाने नियामक यंत्रणा मात्र अपुरी किंबहुना अस्तित्त्वातच नाही. देशाच्या संघटित क्षेत्रात जेथे देशाच्या एकूण श्रमशक्तीच्या केवळ १० टक्के लोक रोजगारात आहेत, तेथेही या यंत्रणेला तपास-परीक्षण करणे शक्य होत नाही.

 
जनकल्याण बँकेच्या ‘ई-लॉबी’चे पनवेलमध्ये रविवारी उद्घाटन Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
दिवसाचे २४ तास आणि वर्षांचे ३६५ दिवस ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध स्वयंचलित उपकरणाद्वारे कार्यरत असणारी बँकिंग शाखा अर्थात ‘ई-लॉबी’ सुविधा पनवेल शहरात सर्वप्रथम उपलब्ध करून देण्याचा मान जनकल्याण सहकारी बँक पटकावणार आहे.

 
संक्षिप्त : ..तर सहाराविरुध्द कारवाईचा ‘सेबी’ला अधिकार : सर्वोच्च न्यायालय Print E-mail

  गुंतवणूकदारांकडून जमा केलेले २४ हजार कोटी रुपये परत करण्यासंदर्भात सहारा समूह कागदपत्रांची पूर्तता करीत नसेल तर त्याविरोधात कारवाई करण्याचा भांडवली बाजार नियामक सेबीला सर्वाधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. संपूर्ण परिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून जमा केलेले २४,००० कोटी रुपये सव्याज परत करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सहाराला ३१ ऑगस्ट रोजी दिला आहे.

 
रिझव्‍‌र्ह बँकेवर कडवेपणाचा ठपका Print E-mail

 

*  व्याजदर कपातीसाठी बँकांकडून वाढता दबाव
*  घसरता विकास दर लक्षात घ्या : संयुक्त राष्ट्र
व्यापार प्रतिनिधी , मुंबई - शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

जगात सध्याच्या घडीला सर्वाधिक व्याजाचे दर असलेल्या भारतात मध्यवर्ती बँकेची धोरणात्मक कठोरता उत्तरोत्तर टीकेचे लक्ष्य बनताना दिसत आहे. प्रमुख दरांबाबत रिझव्‍‌र्ह बँकेचे कडवे धोरण देशाच्या आर्थिक विकासावर विपरित परिणाम करीत आहे, असा ठपका संयुक्त राष्ट्राने एका अहवालाद्वारे भारतावर ठेवला आहे. तर देशाचा आर्थिक विकासदर पाच टक्क्यांच्या खाली येऊ नये, असे वाटत असेल तर रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कपातीचे पाऊल उचलणे नितांत गरजेचे आहे, असे आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकप्रमुखांनी म्हटले आहे.

 
विलासी काळ.. Print E-mail

वेळ दाखविणारे उपकरण म्हणून घडय़ाळे ही एक अत्यावश्यक व सर्वापाशी हवी अशी गोष्ट ठरते. गेल्या दीड शतकाहून अधिक काळ घडय़ाळनिर्मितीत असलेल्या स्विस स्वॉच समूहाच्या ओमेगा वॉचेसने विलासी (लक्झरी), ज्वेलरी, स्पोर्ट्स,  डिझायनर आणि आता स्मार्ट अशी मनगटी घडय़ाळांना नवनवी परिमाणे बहाल करीत आणली आहेत. उत्तम कारागिरीचा नमुना असलेली अशी जगातील सवरेत्कृष्ट आणि ऐश्वर्यसंपन्न घडय़ाळे मुंबईकरांना येत्या शनिवार,
 
‘सत्यम’चे संस्थापक राजू यांच्या ८२२ कोटींच्या मुदत ठेवी गोठविल्या Print E-mail

अंमलबजावणी संचालनालयाच्या हैदराबाद कार्यालयाची कारवाई
पीटीआय, हैदराबाद/ नवी दिल्ली

चार वर्षांपूर्वी आर्थिक ताळेबंदात  घोटाळे केल्याची कबुली देणाऱ्या व सध्या तुरुंगात असलेल्या बी. रामलिंगा राजू यांच्या मालकीच्या सत्यम कॉम्प्युटर सव्‍‌र्हिसेस लिमिटेडच्या ८२२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी गोठविण्याचे आदेश बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने दिले. काळा पैसा जमविण्याच्या सत्यम विरोधातील खटल्यात हा निर्णय हैदराबाद कार्यालयाने घेतला आहे. सध्या ही खाती महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र समूहातील महिंद्रू सत्यमच्या ताब्यात आहेत. पूर्वाश्रमीच्या सत्यम कॉम्प्युटरचा संस्थापक-अध्यक्ष असलेल्या राजू यांनी जानेवारी २००८ मध्ये आर्थिक घोटाळ्याची कबुली दिल्यानंतर या कंपनीचा ताबा २००९  मध्ये बोली प्रक्रियेत महिंद्र समूहातील टेक महिंद्रकडे आला आहे.
 
सिंडिकेट बँकेचा शनिवारी स्थापनादिन Print E-mail

*  सार्वजनिक क्षेत्रातील सिडिंकेट बँक येत्या शनिवारी, २० ऑक्टोबरला आपला ८८ वा स्थापना दिवस साजरा करीत असून, त्या निमित्ताने देशभरात बँकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 
रुपयाचा तीन आठवडय़ाचा नीचांक Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
अमेरिकन अर्थव्यवस्था भक्कम असल्याची आकडेवारी जाहीर झाल्याने गुरुवारी विदेशी चलन व्यवहारात अमेरिकी चलन- डॉलरही भाव खाऊन गेला. परिणामी भारतीय चलन रुपयाने ५४ पैशांची घसरण नोंदवित तीन आठवडय़ांपूर्वीचा तळ गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया ५३.४१ पर्यंत खाली आला. महिनाअखेरपयर्ंत रुपया ५४ पर्यंत घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुरुवारी दिवसभरात तो ५३.४३ या नीचांकापर्यंत गेला होता. रुपयाने अलिकडेच म्हणजे ४ ऑक्टोबर रोजी ५१.७४ हा सहा महिन्यांचा उच्चांक दाखविला होता.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>