अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
अभ्युदय बँकेचे आता आंतरराष्ट्रीय व्हिसा डेबिट कार्ड Print E-mail

*  अभ्युदय सहकारी बँकेने आपल्या ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन ‘अभ्युदय इंटरनॅशनल व्हिसा डेबिट कार्ड’ मंगळवारी प्रस्तुत केले. ‘क्लासिक’ आणि ‘प्लॅटिनम’ अशी ही दोन प्रकारची कार्डे बँकेने आपल्या ग्राहकांसाठी प्रस्तुत केली आहेत.

 
सेन्सेक्स Print E-mail

गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२
alt


 
वेगाची नव्हे स्पर्धा स्थानाची.. Print E-mail

बरोब्बर दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेला कोरियन ब्रॅण्ड महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रने मुंबईत बुधवारी प्रथमच सादर केला. ज्या एसयूव्हीमध्ये महिंद्रची मात्तबरी आहे, त्याच

प्रकारातील सॅन्गयॉन्गचे ‘रेक्स्टॉन’ हे पहिले वाहन आहे. संपूर्ण ‘रेक्स्टॉन’पैकी केवळ २२ टक्के हिस्सा महिंद्रच्या पुण्यानजीकच्या चाकण प्रकल्पात तयार करण्यात आला आहे. यासाठी कंपनीने ६३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. महिन्याला ५०० हे वाहन तयार केले जाणार आहे. महिंद्र समूहाने नोव्हेंबर २०१० मध्ये कोरियातील सॅन्गयॉन्ग कंपनीचा सर्वाधिक ७० टक्के हिस्सा २,१०५ कोटी रुपयांना (४६.३ कोटी डॉलर) खरेदी केला होता. तर प्रवासी वाहन क्षेत्रात महिंद्र कंपनी पहिल्या सहा महिन्यातच ३२ टक्क्यांनी वाढली आहे.
 
टाळेबंदीपूर्वी व्यवहार? Print E-mail

शनिवापर्यंत यूनायटेड स्पिरिट-डिआजिओ हिस्सा प्रक्रिया होणार
व्यापार प्रतिनिधी
किंगफिशरच्या टाळेबंदीची मुदत संपण्यापूर्वीच तिला अर्थसहाय्य मिळण्याची शक्यता दुणावली आहे. किंगफिशरची सह कंपनी असलेल्या यूनायटेड स्पिरिटमध्ये अधिक हिस्सा खरेदी करून त्याबदल्यात रोकड पुरविण्याचा निर्णय ब्रिटनच्या डिआजिओमार्फत घेतला जाऊ शकतो.

 
सेबी अध्यक्षांची रेटिंग कंपन्यांकरिता बॅटिंग! Print E-mail

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
पतमानांकन संस्थांची बाजू उचलून धरत भांडवली बाजार नियामकाने कॉर्पोरेट क्षेत्राला याबाबत सबुरीने राहण्याचा सल्ला दिला. विविध संस्थांकडून दिले जाणाऱ्या पतमानांकनाच्या विरोधात कायदेशीर लढाई टाळण्याचा मार्ग सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी कंपन्यांना सुचविला आहे.

 
स्टेट बँकेचे प्रक्रिया शुल्क निम्म्यावर Print E-mail

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
देशातील पहिल्या क्रमांकाच्या राष्ट्रीयकृत भारतीय स्टेट बँकेने गृह तसेच वाहन कर्जासाठीचे प्रक्रिया शुल्क अध्र्यावर आणले आहे. सण-समारंभाचा मोसम लक्षात घेऊन बँकेने आजपासूनच (१७ ऑक्टोबर) हे शुल्क ५० टक्क्यांनी कमी करून ही विशेष सवलत योजना ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत राबविण्याचे ठरविले आहे.

 
राजीनामा देण्यासाठी पंडितांवर ‘सिटी’तूनचदबाव? Print E-mail

पीटीआय
न्यू यॉर्क
अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाची बँक असणाऱ्या ‘सिटी बँके’च्या प्रमुखपदाचा विक्रम पंडित यांनी सोमवारी दिलेला राजीनामा हा स्वेच्छेने नव्हे तर त्यांना तसे करण्यास परावृत्त करण्यात आले होते, अशी वृत्ते येथील आघाडीच्या प्रसिद्धीमाध्यमांनी दिली आहेत. राजीनाम्यासाठी त्यांच्यावर अंतर्गत व्यवस्थेतूनच दबाव होता, असेही याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.

 
पैसा येतो कैसा? केजीतच धडे! Print E-mail

शालेय स्तरावर अर्थसाक्षरोत्सवाचा वाढता प्रसार
वीरेंद्र तळेगावकर, मुंबई
परंपरेमुळे गुजराती, मारवाडी, जैन तसेच पारशी समाजातील मुलांना व्यवसायाचे धडे ते गल्ल्यावर बसण्याच्या वयापूर्वीच मिळतात. त्यांच्यामध्ये व्यावसायिकता असते मात्र उद्यमशीलता नसते.

 
संक्षिप्त व्यापार Print E-mail

नॉर्टनची सेवा आता हिंदीतूनही
० माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हायरस नाहीसा करण्यात आघाडीवर असणाऱ्या नॉर्टन बाय सिमेंटिकने भारतात हिंदी भाषेतील सपोर्ट सेंटर सुरू केले आहे. याद्वारे हिंदी भाषेत ग्राहक सेवा पुरविली जाणार आहे.

 
‘सिटीग्रुप’वरून विक्रम पंडित पायउतार Print E-mail

alt

न्यूयॉर्क , पीटीआय
जागतिक वित्तव्यवस्थेवर सर्वदूर विखुरलेल्या ‘सिटीग्रुप’च्या सर्वोच्च पदावरून मराठमोळे विक्रम पंडित अखेर मंगळवारी पायउतार झाले. तिसऱ्या तिमाहीचे घसरत्या नफ्याचे वित्तीय निष्कर्ष जाहीर होऊन एक दिवस होत नाहीत तोच पंडित यांनी समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला आहे.
‘सिटीग्रुप’ची धुरा आता मायकेल एल. कोरबाट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. समूहाच्या संचालक मंडळावर त्यांची एकमताने निवड झाली. ते यापूर्वी बँकेच्या युरोप, मध्य पूर्व तसेच आफ्रिका देशांतील व्यवसाय विभागाचे व्यवस्थापक म्हणून कार्यभार पाहत होते. डिसेंबर २०१२ अखेर निवृत्त होणारे व पंडित यांचे दीर्घकालीन सहकारी असलेले ‘सिटी’चे मुख्याधिकारी जॉन हेवेन्स यांनीही राजीनामा दिला आहे.
 
‘जीडीपी’ भाकितात ‘आयएमएफ’कडून आकडेमोडीत गल्लत : माँटेक Print E-mail

alt

वृत्तसंस्था , नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने अंदाजलेल्या ४.९ टक्क्यांचा भारताच्या आर्थिक विकासदराशी फारकत घेताना, देशाच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी त्यात आकडेमोडीची गल्लत असल्याचे म्हटले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत ५.५ टक्के दराने प्रगती साधली असताना आणि उत्तरार्धात हा दर वाढण्याच्या सर्व शक्यता असताना, आयएमएफने संपूर्ण वर्षांसाठी केलेले ४.९ टक्क्यांचे भाकीत तर्कसंगत वाटत नाही, असे अहलुवालिया यांनी पत्रकारांशी या संबंधाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.

 
सर्वच समभागांना ८ टक्क्यांचे सर्किट Print E-mail

alt

पडझडीत छोटय़ा गुंतवणूकदारांच्या बचावासाठी ‘सेबी’चा प्रस्ताव
व्यापार प्रतिनिधी , मुंबई
शेअर बाजार नियंत्रक ‘सेबी’ने बाजारात होणाऱ्या आकस्मिक घसरणीपासून छोटय़ा गुंतवणूकदारांचा बचाव करण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या समभागांसाठी सरसकट ८% सर्किट मर्यादा निश्चित केली आहे. दोन आठवडय़ापूर्वी शुक्रवारी, ५ ऑक्टोबर २०१२ रोजी निफ्टी निर्देशांकात सामील असलेल्या अनेक समभागांचे भाव अवघ्या मिनिटभरात २० टक्क्यांहून अधिक घसरण्यासारख्या घटनांतून संभाव्य नुकसान कमीत कमी राहावे, असा हा प्रयत्न आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>