अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
वाढीव टॅक्सी भाडय़ाला उमदा पर्याय ‘शेअर्डकॅब’ स्वस्त वातानुकूलित सेवेचा Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

मुंबई शहरासह उपनगरातील स्वतंत्र तसेच भागीदारीतील टॅक्सी व रिक्षा प्रवासी भाडे वाढलेले असतानाच काही नियमित मार्गावर यापेक्षाही माफक किंमतीत आणि तेही वातानुकूलित वाहनाने प्रवास करण्याची सुविधा निर्माण झाली आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या वाढीव भाडय़ाच्या तुलनेत २० ते ४० टक्क्यांपर्यंत स्वस्तात हा पर्याय उपलब्ध झाला आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमधील कार्याचा अनुभव असलेल्या प्रकाश सिकारिया व  एन. व्ही. सुब्रमण्यन या द्वयींनी  ‘शेअरकॅबडॉटकॉम’ ही कंपनी स्थापन केली असून शहरातील वाहतूक कोंडीसह प्रवाशांना सोसावे लागणाऱ्या अतिरिक्त भाडय़ातून सुटका होण्यासाठी काही नियमित मार्गावर भागीदारीतील टॅक्सी सेवा सुरू केली आहे.
 
‘टीजेएसबी’चे सतीश उतेकर ‘सर्वोत्तम मुख्याधिकारी’ पुरस्काराने सन्मानित Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
देशभरातील नागरी सहकारी बँकांमध्ये ‘सर्वोत्तम मुख्याधिकारी २०१२’ हा बहुमान टीजेएसबी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश उतेकर यांनी बहाल केला आहे. ‘बँकिंग फ्रंटियर्स’ या आघाडीच्या नियतकालिकाने अलिकडेच, लवासा, पुणे येथे आयोजित केलेल्या नागरी सहकारी बँकांच्या परिषदेत हा पुरस्कार उतेकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

 
बाजारात सावध स्थिरता; नजर रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणावर Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
विशेषत: विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा पंचवार्षिक वित्तीय आराखडा आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भांडवली बाजारावर अनुकूल परिणाम साधण्यास अपयशी ठरला. उलट रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंगळवारच्या अर्धवार्षिक पतधोरणाकडे डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी व्यवहारातील सावध पवित्रा कायम ठेवला. परिणामी, ‘सेन्सेक्स’ अवघ्या १० अंशांनी १८,६३५.८२ पर्यंत, तर ‘निफ्टी’ १.३० अंश वाढीसह ५,६६५.६० वर स्थिरावला.

 
रुपया ५४ च्या वर; महिन्याचा नीचांक Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
डॉलरच्या तुलने भारतीय चलन ५० पैशांनी घसरल्याने सोमवारी ते सव्वा महिन्याच्या नीचांकाला आले. त्यामुळे रुपया आता प्रति डॉलर ५४ च्या खाली आला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे दुसरे तिमाही पतधोरण उद्या जाहीर होत असताना आयातदार तसेच तेल कंपन्यांच्या वतीने आठवडय़ाच्या  सुरुवातीलाच अमेरिकन डॉलरची मागणी वाढली आणि रुपया ५४ च्या गाळात रुतला.

 
‘टेलिनॉर’ला भारतात सापडला नवा सोबती Print E-mail

 

पीटीआय , नवी दिल्ली - शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

बांधकाम क्षेत्रातील यूनिटेकबरोबर सामोपचाराने काडीमोडानंतर नॉर्वेच्या टेलिनॉरला भारतातील दूरसंचार क्षेत्रात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लक्षदीप इन्व्हेस्टमेन्ट्स अॅण्ड फायनान्सच्या रूपाने नवीन भागीदार मिळाला आहे. शुक्रवारी येथे त्यासंबंधाने उभयतांकडून करारही केला गेला. पूर्वाश्रमीची भागीदार कंपनी यूनिटेक वायरलेसपासून फारकत घेतल्यानंतर, टेलिनॉरने ‘टेलिविंग्स कम्युनिकेशन्स’ नावाने आपल्या भारतीय अंग स्थापित केले असून, लक्षदीपला या कंपनीत २६ टक्के भागीदार केले गेले आहे.

 
मल्ल्यांना ‘व्हर्जिन’ शुभेच्छा! Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

रंगेल स्वभावासाठी विजय मल्ल्या भारतात चांगलेच ओळखले जातात. जागतिक पातळीवर ब्रिटनचे रिचर्ड बॅ्रन्सन हे नावही यासाठीच घेतले जाते. मात्र व्यवसाय चालविण्याच्या बाबतीत दोघेही भिन्न! एकीकडे मल्ल्या यांच्या किंगफिशरचे पंख कर्जाच्या बोझ्याने छाटली गेली असताना बॅ्रन्सन यांच्या व्हर्जिन अॅटलांटिकने नव्या उमेदीने आकाशात झेप घेण्याचा विडा उचलला आहे. मिचमिच्या डोळ्याचे आणि लाल-गोबरे बॅ्रन्सन शुक्रवारी भारतीय पोषाखात मुंबई उपनगरात टॅक्सीवर ढोल घेऊन भांगडय़ासह आनंदोत्सवात साजरा केला. हाती होता भारतीय तिरंगा तर सोबतीला अपरिहार्य अशा भारतीय आणि विदेशी नारीही!
 
वेतनासाठी अंतर्गत स्रोतातून निधी जुळवणार : किंगफिशर Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली

तब्बल महिनाभर संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीच्या चार महिन्यांचा  पगार देण्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद ही अंतर्गत रचनेतूनच करण्यात आल्याचा दावा किंगफिशर एअरलाईन्सने केला आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी नागरी हवाई महासंचालकांनी भेटून आर्थिक तरतूद तसेच उड्डाण वेळापत्रकाबाबत लवकरच योजना सादर करू, असे या अध्र्या तासाच्या चर्चेत बिंबविले. तर कंपनीने याबाबत आपल्या भागधारकांसह संचालक मंडळालाही कल्पना द्यावी, असे नागरी हवाई संचालकांनी सांगितले.
 
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वस्त घरांच्या उपक्रम Print E-mail

 

सेंट्रल बँक राज्य सरकारशी  सहकार्य करार करणार    
व्यापार प्रतिनिधी, मुंबई

राज्यभरात सर्वत्र अल्प-उत्पन्न तसेच मध्यम-उत्पन्न गृहप्रकल्प उभारण्याचा, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना परवडणाऱ्या दरात घरे पुरविण्याच्या राज्य सरकारचा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेने सहकार्य देऊ केले आहे. मुंबईसह, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक व जळगाव या शहरात निवासी प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य कराराची बँकेने तयारी दाखविली आहे. सेंट्रल बँकेच्या पुढाकाराने गोरेगावच्या एनएसई मैदानावर ‘स्वप्न संकुल २०१२’ या दोन दिवसांच्या गृहप्रदर्शनाचे शुक्रवारी नगरविकास राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

 
श.. शेअर बाजाराचा : पॉवरफुल पॉवर ऑफ अॅटर्नी Print E-mail

चंद्रशेखर ठाकूर - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘ब्रोकरला पॉवर ऑफ अॅटर्नी देऊन मी पस्तावलो’ असे अनेक जण सांगतात. मात्र पॉवर ऑफ अॅटर्नीचे तत्त्वच कुणी लक्षात घेत नाही. शेअर्सची खरेदी किंवा विक्री करायची तर डिमॅट खाते असणे हे आवश्यक आहे हे सर्वानाच माहीत आहे. शेअर्स विकायचे असतील तर फोनवरून आपण दलालाला सूचना देऊ शकतो म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही. पण पुढील कार्यवाही म्हणजे डिलीव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप घेऊन डीपीकडे जाणे ही होय. मात्र तेवढी देखील तसदी घ्यायची नसेल तर आपण आपल्या दलालालाच पॉवर ऑफ अॅटर्नी देऊ शकतो. तसे केल्यास माझ्याऐवजी दलाल इन्स्ट्रक्शन स्लिप भरील.
 
मार्केट मंत्र : सणावळीची खरेदी करायची काय? Print E-mail

निमिष शाह - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सण आणि खरेदी हे नाते इतके पक्के आहे की, सणासुदीला ग्राहकाकडून भाव पाहिला जात नाही. हेच पाहा ना, सोन्याच्या भावाने आकाश गाठले असतानाही यंदा दसऱ्याला त्याच्या खरेदीचा जोर कायम असल्याचे दिसून आले. शेअर बाजारातही दिवाळीपर्यंत खरेदीचा जोर कायम राहण्याबाबतची जी आशा आहे ती यासाठीच! तरी जशी चर्चा आहे त्याप्रमाणे शेअर उलाढाल कर (एसटीटी) कमी करण्याचा अर्थमंत्रालयाने निर्णय घेतलाच तर या खरेदीला आणखी बळ मिळेल यात शंकाच नाही. तूर्तास शेअर निर्देशांक सरलेला आठवडाच काय, पूर्ण महिनाभर आहे त्याच पातळीवर घुटमळताना दिसत आहे.
 
शेअर बाजार आठवडय़ाच्या नीचांकावर Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
जागतिक शेअर बाजारातील अस्थिरता, कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल तसेच रिझव्र्ह बँकेच्या आगामी पतधोरणात फारसे बदल न होण्याची अपेक्षा यामुळे गुंतवणूकदारांनी शुक्रवारी अखेरच्या दिवशी अधिक प्रमाणात नफेखोरी अवलंबिली. परिणामी १३३.२९ अंश घसरणीसह ‘सेन्सेक्स’ १८,६२५.३४ या आठवडय़ाच्या नीचांक पातळीवर आला. ४१ अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ५,७०० च्याही खाली स्थिरावला.

 
‘महिंद्र’च्या वाहनांवर सणासुदीसाठी विविध योजना Print E-mail

प्रतिनिधी, पुणे
भारतात मोटार ही मर्यादित समाजाची गरज न राहता सर्वसामान्यांची गरज होऊ पाहात आहे. गरज पूर्ण करणे ही माणसाचा स्वभाव असून यासाठी उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि व्यावसायिक धडपडत आहेत. चारचाकी वाहनांच्या श्रेणीत व्यावसायिक आणि प्रवासासाठी भारतातील सर्वाधिक मोटार खपाच्या महिंद्रातर्फे नवीन वाहने बाजारात दाखल झाली आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>