अर्थसत्ता
मुखपृष्ठ >> अर्थसत्ता
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अर्थसत्ता
किंगफिशरच्या शेअरमध्ये ५ टक्‍क्‍यांनी वाढ Print E-mail

alt

नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर २०१२
किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या २६ दिवसांपासून कंपनीत सुरू असलेला संप गुरुवारी मागे घेण्यात आल्यानंतर एअरलाइन्सच्या शेअरच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी सुमारे ५ टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.
 
किंगफिशर संपकरी कर्मचारी कामावर रुजू Print E-mail

 

उड्डाणांना मात्र महिना लागणार
कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा थकलेला पगार डिसेंबपर्यंत मिळणार
पीटीआय , नवी दिल्ली - शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने अखेर कर्मचाऱ्यांचा चार महिन्यांचा थकलेला पगार येत्या डिसेंबपर्यंत देण्याचे मान्य दिले. त्यामुळे गेल्या २६ दिवसांपासून कंपनीत सुरू असलेला संप गुरुवारी मागे घेण्यात आला आहे. कंपनी व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधींमध्ये झालेल्या करारानुसार, कर्मचाऱ्यांना मार्चचा पगार येत्या २४ तासांत दिला जाणार असून एप्रिलचे वेतन ३१ ऑक्टोबपर्यंत, मेचे वेतन दिवाळीपूर्वी आणि जूनचे वेतन डिसेंबरअखेरीस अदा केले जाणार आहे, तर जुलै ते सप्टेंबपर्यंतचा थकलेला पगार पुढच्या मार्चपर्यंत दिला जाणार आहे.

 
‘सेन्सेक्स’ वधारला Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
कंपन्यांचे तिमाही वित्तीय निष्कर्ष तुलनेने फायद्याचे जाहीर होत असल्याने भांडवली बाजारात गुरुवारी निर्देशांकात वाढीचे चित्र दिसून आले. वायद्यांच्या ऑक्टोबर मालिकेच्या सौदापूर्तीच्या दिवशी ‘सेन्सेक्स’ ४८.६१ अंश वाढीसह १८,७५८.६३ वर स्थिरावला. तर ‘निफ्टी’तही १४ अंशांची वाढ झाल्याने तो ५,७०० च्या वर पोहोचला आहे.

 
मुकेश अंबानी यांचे अढळपद कायम! Print E-mail

मालमत्ता घसरूनही सलग तिसऱ्या वर्षी क्रमांक एकचे अब्जाधीश
वृत्तसंस्था, मुंबई

रिलायन्सचे मुकेश अंबानी हे यंदा पुन्हा अब्जाधीश भारतीयांच्या पंक्तीत सर्वोच्च स्थानावर कायम आहेत. मालमत्तेत घसरण होऊनही सलग तिसऱ्या वर्षी त्यांनी वरचे स्थान टिकवून ठेवले आहे. विशेष म्हणजे धाकटे बंधू अनिल अंबानी यांचे स्थान यंदा दोन पायऱ्यांनी उंचावले असून ते ६ अब्ज डॉलरच्या संपत्तीचे मालक आहेत.
‘फोर्ब्स इंडिया’च्या अब्जाधीशांच्या जाहीर झालेल्या यादीत  मुकेश अंबानी यांचे २१ अब्ज डॉलरच्या मालमत्तेसह पहिले स्थान कायम आहे. गेल्या वर्षभरात त्यात १.६ अब्ज डॉलरची घट झाली आहे.
 
‘स्वप्न संकुल’ गृहप्रदर्शन आजपासून Print E-mail

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
येत्या सणासुदीला मुंबई व आसपासच्या परिसरात स्वत:च्या मनाजोगते घरकुलाचे स्वप्न, ते देखील विशेष सवलत दरासह साकारण्याची संधी मिळाली तर कुणालाही हवीच आहे. घरकुलाच्या स्वप्नपूर्तीची ही संधी २६ आणि २७ ऑक्टोबर २०१२ रोजी गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई प्रदर्शन संकुल (हॉल २ ए) येथे आयोजित ‘स्वप्न संकुल २०१२’ या गृहप्रदर्शनातून ग्राहकांना मिळणार आहे.

 
दर्दी मुंबईकरांची खरेदीसाठी गर्दी.. Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करून मुंबईकरांनी अखेर दसऱ्याच्या निमित्ताने खरेदीवर विजय मिळविलाच. उद्योग, व्यापाऱ्यांसह चाकरमान्यांमध्येही गेल्या अनेक दिवसांपासून असलेले निराशेचे वातावरण खरेदीचा हंगाम सुरू झाल्याच्या निमित्ताने पार बदलून गेले होते.नटण्या-मुरडण्यापेक्षा गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे कल वाढत असल्याचे बुधवारी दिवसभर सराफ दुकानांमधून दिसत होते. त्यामुळे दागिन्यांपेक्षा वळे अथवा सोन्याची नाणी पसंत केली जात होती.

 
शिक्षा काय? Print E-mail

वसंत माधव कुळकर्णी
alt

जगातील महत्वाच्या वर्तमान पत्रात विक्रम पंडित यांच्यानंतर आणखी एका भारतीयाचे नाव ठळक बातम्यात झळकत आहे. फरक एवढाच की विक्रम पंडित यांचे नाव आदराने घेतले गेले. तर रजतकुमार  गुप्ता यांचे नाव एक आíथक गुन्हेगार म्हणून गाजत आहे. जगातील एक प्रमुख गुंतवणूक बँकिंग व निधी व्यवस्थापन कंपनी ‘गोल्डमन सॅक’ या कंपनीशी संमंधीत संवेदनशील माहिती फोडल्याच्या खटल्यात त्यांना न्यू योर्कच्या कोर्टात शिक्षा सुनावण्यात येणार आहे. जून महिन्यात त्यांना या खटल्यात दोषी ठरवण्यात आले होते. गुप्ता या खटल्यात प्रमुख आरोपी होते.
 
अडचणीतील सहकारी बँकांच्या पुनरूज्जीवनाचा उपाय सुकर! Print E-mail

‘बँक’ऐवजी ‘ब्रँच’ विलिनीकरणाला तत्त्वत: मान्यता
व्यापार प्रतिनिधी ,मुंबई

अडचणीत असलेल्या नागरी सहकारी बँकेचे अस्तित्व अबाधितराहील आणि ती संपूर्ण बँक अन्य सक्षम बँकेत विलीन केली जाण्यापेक्षा तिच्या काही शाखांचे अन्य बँकांत विलिनीकरण करून तिच्या पुनरूज्जीवनाच्या उपायांना रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी मुंबईत बोलाविलेल्या पतधोरणपूर्व बैठकीत तत्त्वत: मान्यता दिली आहे.
 
सीएनजी ‘दोस्त’ही लवकरच Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
alt

कमी वजन वहन क्षमतेच्या वाणिज्य वापराच्या वाहनातील अशोक लेलॅन्डच्या ‘दोस्त’ने भारतीय बाजारपेठेतील आपले वर्षभराचे अस्तित्व नुकतेच पूर्ण केले आहे. वर्षपूर्तीच्या निमित्ताने कंपनीने ‘दोस्त’ची मर्यादित श्रेणीही बाजारात उतरविली आहे. उत्तर भारतात कंपनीचे हे वाहन सीएनजी प्रकारातही सादर करण्यात येणार आहे.
हिंदुजा समूहाच्या या कंपनीने २.५ टन वजन वहन क्षमतेचा ‘दोस्त’ सप्टेंबर २०११ मध्ये रस्त्यांवर उतरविला होता.
 
मल्टीनॅशनल कंपन्यांचे धोरण Print E-mail

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

भारतात औषधांचं मोठं मार्केट आहे. त्याचंही आकर्षण या मल्टीनॅशनल कंपन्यांना आहे. एॅलोपॅथी औषधाला पर्याय म्हणून आयुर्वेदिक औषधे अनेक देशांतून स्वीकारली जात आहेत.
आर्थिक सुबत्तेच्या बळावर महासत्ता बनलेले देश, आपले हे स्थान अढळ राहावे म्हणून काय वाट्टेल ते करतात. प्रसंगी युध्दाची धमकी देऊन वेळ आल्यास इतर छोटया मोठया देशांवर युध्द लादले जाते. येथील राजवट उलथून टाकली जाते. हे सारे काही आपले हितसंबंध जपण्यासाठीच केले जाते.
 
बाजारात नवे काही.. Print E-mail

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
* पणशीकर ‘दिवाळी फराळ’ आता सातासमुद्रापार!
alt

पोह्यांचा चिवडा, भाजणीची चकली, तिखट शेव, शंकरपाळी, बेसनाचे लाडू, अनारसे इतकेच नाही नाचणीची चकली, सँडविच शंकरपाळी असे नाविन्यपूर्ण फराळाचे पदार्थ आणि चविष्ठ मिठाई एका फोनवर जगातील हव्या त्या पत्त्यावर आपल्या नातलगांना आता पाठविता येणार आहेत. प्रसिद्ध ‘पणशीकर टेस्टॉरन्ट’ने सणासुदीच्या काळात आपल्या जगभरच्या चाहत्यांना ही सोय करून दिली आहे. सणासुदीसाठी त्यांनी साडेतीन, साडेचार आणि साडेसात किलो अशा तीन वेगवेगळ्या वजनात ही ‘दिवाळी फराळ भेट’ हॅम्पर्स यासाठी उपलब्ध केली आहेत.
 
ऑटोशोमध्ये रंगणार थरार ‘४एक्स४’चा Print E-mail

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
alt

ऑटोकार या नियतकालिकातर्फे नित्यनेमाने भरणारा ऑटोकार परफॉर्मन्स शो यंदाही मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावर पहायला मिळणार आहे. यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षण खास ४एक्स४ वाहन प्रकाराच्या दालनांचे आहे. या सुपरकार गॅलरीत भक्कम आणि कुठल्याही रस्त्यांवर यशस्वी वाटचाल करणाऱ्या वाहनांची रेलचेल असेल. यंदा या प्रदर्शना दरम्यान आंतरराष्ट्रीय वाहन उत्पादक कंपन्यांबरोबर स्थानिक कंपन्याही सहभाग घेणार आहेत.
१ ते ४ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ११ ते रात्री ८ दरम्यान हे प्रदर्शन आहे. प्रवेशासाठी प्रत्येकी १५० रुपये शुल्क आहे.   

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>