निमित्त मात्रेण
मुखपृष्ठ >> निमित्त मात्रेण
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

निमित्त मात्रेण
निमित्त मात्रेण : एक जीवनप्रणाली Print E-mail

altवीणा गवाणकर , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
माता म्हणजे केवळ जन्मदा नव्हे. जन्माला घातलेलं जगवणं, जोपासणं, सुसंस्कारित करणं, ते विकसित करणं.. जगभरच्या माता अण्वस्त्रविरोधात, युद्धाच्या विरोधात उभ्या राहतात. त्यांचंही वाण सर्वानी घ्यायला हवंय. 'No fists, No Knives. No Guns, No Bombs' या ललकारीला प्रतिसाद द्यायला हवा. मातृदिन हा एका व्यक्तीपुरता, एका दिवसापुरता नाही. ती जीवनप्रणाली आहे.

 
निमित्त मात्रेण : अक्षर गणिती Print E-mail

altवीणा गवाणकर , शनिवार , २८ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अगदी अलीकडेपर्यंत गणित आणि भौतिक शास्त्र या विषयांत पुरुषांची मक्तेदारी होती. या क्षेत्रात स्त्रीला प्रवेश नव्हताच.  स्वत:ची ओळख दडवून, कित्येकदा पुरुषी नावाने वावरून तिला संशोधन करावे लागे. अशाही वातावरणात आपल्या बौद्धिक क्षमतेची चुणूक दाखवत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या इतिहासातील दोन गणिती स्त्रिया म्हणजे
हायपेशा व सोफी जर्मेन....

 
निमित्त मात्रेण : आधी केलेची पाहिजे Print E-mail

वीणा गवाणकर, शनिवार, १४  एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआजकालची मुलं अवांतर वाचन करीत नाहीत, अशी सर्वच पालकांची सर्वसाधारण तक्रार असते. मात्र मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी लहानपणापासून जे जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात ते खरंच केले जातात का?..
अशाच काही जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांविषयी..

 
निमित्त मात्रेण : कैफियत एका वाचकाची! Print E-mail

altवीणा गवाणकर , शनिवार, ३१ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शालेय स्तरावरच मी पुस्तकांशी मैत्री केली तेव्हापासून आतापर्यंत ‘आत्ता काय बरं करावं?’ अशा विवंचनेला मला कधीच तोंड द्यावं लागलं नाही. ग्रंथालयाच्या आणि ग्रंथांच्या आधारानेच मी वाढले..

 
निमित्त मात्रेण : अशी ही चरित्रे Print E-mail

वीणा गवाणकर - शनिवार, १७ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआपल्या महाराष्ट्रातच मुंबईप्रमाणे चार-पाचशे वर्षांचा इतिहास असणारी कितीतरी शहरं आहेत. पुणे- नागपूर- औरंगाबाद- चंद्रपूर- ठाणे- अहमदनगर.. कितीतरी. या नगरींनी कितीतरी शाह्य़ा, राजवटी अनुभवल्यात.. त्यांच्या चारपाचशे वर्षांच्या अनुभवातून त्यांची विशिष्ट मानसिकता, जीवनपद्धती घडलेली असू शकते.. अशा नगरींचा आढावा घेणारी चरित्रं लिहिली गेली, तर तिथलं लोकजीवन, लोकमानस समजून घेण्यासाठी त्यांची मदत होईल. तो एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल.

 
निमित्त मात्रेण : सामथ्र्य लेखणीचे Print E-mail

वीणा गवाणकर - शनिवार, ३ मार्च  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altएक स्त्री, परदेशात कृष्णवर्णीय गुलामगिरीविरुद्ध लिहिणारी, तर दुसरी भारतात स्त्रीच्या गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवणारी. दोघींचं अस्त्र एकच- लेखणी. या लेखणीने इतिहास घडवला. ८ मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने स्त्रीच्या लेखनसामर्थ्यांविषयीचा खास लेख.. जास्तीत जास्त स्त्रियांनी लिहितं व्हायला पाहिजे हे सांगणारा..
जग काय फक्त वैज्ञानिक शोधांनीच घडतं का? एखादी वाङ्मयीन कृतीही समाजाच्या विकासाचं, त्याला सकारात्मक विचारासाठी प्रवृत्त करण्याचं काम करून दाखवते. अशा साहित्यकृती मग काळाच्या प्रवाहात स्वत:चं वेगळं अस्तित्व टिकवून राहातात. अमेरिकन लेखिका हॅरिएट बीचर स्टोव् (१८११-१८९७) यांची ‘अंकल टॉम्स कॅबिन’ ही कादंबरी अशाच चिरस्मरणीय साहित्यकृतींपैकी एक.

 
निमित्त मात्रेण : पण लक्षात कोण घेतं? Print E-mail

वीणा गवाणकर - शनिवार, १८  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altसागरी जीवशास्त्रज्ञ राचेल कार्सन आयुष्यभर पर्यावरणासाठी लढल्या. अर्थात त्यांचा लढा होता पुस्तकाद्वारे. त्यांच्यावर खूप टीका झाली, बदनामी झाली. खरं तर त्यांचा लढा होता तो मानवजातीसाठी, पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वृत्तीविरुद्ध, पण लक्षात कोण घेतो? आजही ही हानी तशीच चालू आहे..
आ पल्याकडे सण- समारंभ- उत्सव- यश- आनंद- निवडणुकीनंतरचे विजयोत्सव (की विजयोन्माद?) व्यक्त करण्यासाठी नव्हे, त्याचं प्रदर्शन करण्यासाठी फटाके उडवणं अनिवार्य होऊन बसलंय..

 
निमित्त मात्रेण : घाई कशाला? Print E-mail

altवीणा गवाणकर , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altविन्नी मंडेलांच्या निमित्तानं माझं मत पुन्हा एकदा पक्क झालं की जिवंत व्यक्तीचं ‘चरित्र’ लिहू नये. शेवटच्या श्वासापर्यंत माणूस जगत असतो. त्या प्रवासात तो केव्हाही त्याचा सांधा बदलण्याची शक्यता असते. त्याचं वेगळं रूप समोर येऊ शकतं. पूर्वायुष्य आणि उत्तर आयुष्य यातून निर्माण होणाऱ्या प्रतिमा सारख्याच असतील, असं नाही. मग घाई का करा?
केव्हातरी मधूनच घर नीट लावण्याची उबळ मला येते. बरेच दिवस साफसफाई करायची राहून गेलेली असते.

 
निमित्त मात्रेण : माझे आहे मजपाशी Print E-mail

वीणा गवाणकर - शनिवार, २१ जानेवारी
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआजीबाईच्या बटव्यावर माझा विश्वास आहे. कडू किराईत, तुळस, गवती चहा, कोरफड वगैरे माझ्या हाताशी नेहमीच असतात. घराच्या कुंपणात पावसाळ्यात किराईताची रोपं तरारून  येतात. ती वाळवण्याचा आणि मग तो चुरा डबाबंद करून ठेवण्याचा माझा परिपाठ आहे. अनेक प्रकारच्या पारंपरिक वनौषधी मी माझ्यासाठी, मुलांसाठी, नातवंडांसाठी वापरत आलेय. त्यामुळेच ‘आले-विजया’ची वार्ता मनाला आनंद देऊन गेली.

 
निमित्त मात्रेण : पोवाडा लसणीचा! Print E-mail

altवीणा गवाणकर , शनिवार , ७ जानेवारी २०१२
आजूबाजूला सतत काही ना काही घडत असतं, त्यातूनच मागचं काही आठवत जातं. भूत-वर्तमानाची वीण सतत घातली जात असते. मनाची ही प्रक्रिया सतत चालू रहाणारी, म्हणूनच विचारांना प्रवृत्त करणारी. काही तरी निमित्त घडतं आणि स्मृती - वास्तव यांची सांगड घालत मन विचारात हरवून जातं. मनातलं हे विचारं मांडणं हेच निमित्त मात्रेण.
‘‘दारिद्रय़, भूकबळी, शेतकरी आत्महत्या, अन्नधान्य टंचाई हे गंभीर प्रश्न आपल्या देशात कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे नव्हे, तर चुकीच्या मानवी धोरणामुळे निर्माण होतात,’’ असं ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ म्हणतात.