नाशिक / प्रतिनिधी - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२ प्रकाश, लखलखाट, तेज आणि आनंद, यांचा मिलाफ असलेल्या दीपावलीच्या आगमनाच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठ गर्दीने फुलून गेल्याचे दृश्य नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र दिसत होते. शनिवारी ‘वसूबारस’ने दीपावलीला सुरूवात होणार असल्याने विविध वस्तू खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. |
नाशिक / प्रतिनिधी चौकशीच्या कचाटय़ात सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा प्रचंड गोंधळात पार पडली. बँकेच्या नियमबाह्य कामकाजावर आक्षेप घेणाऱ्यांना आपली मते मांडू देण्यात आली नसल्याची तक्रार काही सभासदांनी केली. |
अंतिम लढतीच्या उद्देशाने अंगाला तेल चोपडून भारदस्त व्यक्तिमत्वाच्या पहिलवानाने तयारी करावी, आणि रंगीत तालमीतच त्यास धोबीपछाड मिळाल्यावर सर्वाना धक्का बसणे साहजिकच. |
वैद्य विक्रांत जाधव आचार्य चरक यांची जयंती धन्वंतरी पूजनाच्या दिवशी सर्वत्र साजरी केली जाते. या निमित्ताने त्यांनी आयुर्वेद क्षेत्रात दिलेले योगदान, त्यांची कार्यपध्दती याविषयी.. ‘धनत्रयोदशी’ हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून ओळखला जातो. आरोग्यरूपी धनाच्या प्रार्थनेसाठी, भगवान धन्वंतरीची मनोभावे पूजा करून आरोग्याचे आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न या माध्यमातून होतात. |
नाशिक / प्रतिनिधी - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२ फटाके म्हणजे दिवाळीचे खास आकर्षण. ‘दिन दिन दिवाळी’ असे म्हणत सुरसुरी फिरविणाऱ्या बच्चे कंपनींमध्ये सध्या ‘फॅन्सी आयटम’ची जबरदस्त क्रेझ आहे. त्यांची आवड लक्षात घेऊन यंदा फटाक्यांमध्ये विविध फॅन्सी प्रकार दाखल झाले आहेत. फटाक्यांच्या किंमतीत २० टक्क्यांनी भाववाढ झाली असली तरी ग्राहकांच्या उत्साहावर त्यामुळे कोणताच फरक पडला नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. |
० मराठा आरक्षणसह विविध विषयांवर चर्चासत्र ० ‘शिवाजी अंडरग्राउंड..’चा प्रयोग नाशिक / प्रतिनिधी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फे १० ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सहाव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे येथे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कोल्हापूर संस्थानचे युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. |
नाशिक / प्रतिनिधी पालिकेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीसह इतर अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी सभागृहातच आंदोलन करण्याचे ठरवून गुरूवारी आगमन केले होते. परंतु महापौरांनी पुन्हा एकदा सभा तहकूब केल्याने डोईवर मागण्यांचा डोलारा घेऊन विशेष अवतारात दाखल झालेल्या दिनकररावांची सर्व तयारी वाया गेली. |
नाशिक / प्रतिनिधी इराकच्या थॅलेसेमियाग्रस्त पाच वर्षांच्या मुलीवर ‘बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट’ (मूलपेशी रोपण) ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येथील लोटस इन्स्टिटय़ूट ऑफ हिमॅटोलॉजी व ओकॉलॉजी आणि बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट सेंटर या संस्थेत यशस्वीपणे करण्यात आली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी या मुलीचे कुटुंबिय थेट इराकहून नाशिकला आले, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. |
अविनाश पाटील ‘त्या काळी जर तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, मॅटची सुविधा आणि पुरेसा आहार मिळाला असता तर निश्चितच राष्ट्रीय पातळीवरील प्रसिथ्द मल्लांमध्ये आपल्या नावाचा समावेश राहिला असता..’ |
नाशिक / प्रतिनिधी सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडणे व्यवहार्य वाटत नसल्याचे मत आ. जयंत जाधव यांनी मांडले आहे. नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडल्यास आधीच अडचणीत असलेला शेतकरी व सामान्य माणूस अधिक अडचणीत सापडेल. जिल्ह्य़ातून पाणी सोडल्यास प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शासनाबद्दल नाराजीची भावना पसरेल. |
नाशिक / प्रतिनिधी येथील शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयात रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या वेळी व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष डी. आर. पाटील, सचिव सरिता नारंग, मुख्याध्यापिका ज्योती चौधरी, प्रभाकर दवंडे, भल्लाशेठ राठी, कॅप्टन सुरेश आव्हाड, अवतार पनफेर, के. आर. देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते. |
नाशिक / प्रतिनिधी येथील के.टी.एच.एम. महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या सूचनेनुसार विद्यार्थी संशोधन प्रकल्प स्पर्धा ‘आविष्कार’चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा एक डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे. |
नाशिक / प्रतिनिधी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या चळवळीला प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने जनलोकपाल हवे असेल तर संसदेत निवडून येण्याचे आव्हान दिल्याने, आम आदमीने संघटित होवून हा लढा राजकीय क्षेत्रावर यशस्वी करावा, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या नाशिक शाखेच्या बैठकीत करण्यात आले. |
* अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात मोहीम * गोदावरीत वाहने धुणाऱ्यांना ५०० रुपये दंड नाशिक / प्रतिनिधी - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२ शहरातील वाढती अस्वच्छता.. घाणीचे साम्राज्य.. अनियमित घंटागाडी..अस्वच्छतेच्या फैलावामुळे निर्माण होणारे साथीचे आजार..यामुळे जाग आलेल्या महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. |
नाशिक / प्रतिनिधी तमसो मा ज्योतिर्गमय चा संदेश देणाऱ्या दीपोत्सवात आकाशकंदीलांचा लखलखाट असला तरी पणत्यांचे महत्व अधिक असल्याने बाजारपेठेत मातीच्या पणत्यांसह आकर्षक विद्युत रोषणाईचा साज ल्यालेल्या चायना बनावटीच्या पणत्यांच्या माळीही दाखल झाल्या आहेत. |
राज ठाकरेंच्या उपस्थितीत तीन माजी नगरसेवक मनसेत नाशिक / प्रतिनिधी महापालिकेच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची उधळण करीत सत्तास्थान मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जंगजंग पछाडले. परंतु, मतदारांनी ‘नवनिर्माणाचे’ स्वप्न दाखविणाऱ्या मनसेला कौल दिला. |
शहरातील १५ गतिमंद विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी नाशिक / प्रतिनिधी कोणी रांगोळी काढण्यात तर कोणी आकाशकंदील लावण्यात मग्न..कोणी दारासमोर पणत्या लावतंय तर कोणी फुलांच्या माळांची सजावट करण्यात गुंग..आपलं ‘घरकुल’ सुंदर दिसावे, यासाठी सर्वाची धडपड. अर्थात त्यासाठी कारण ठरलं ते दिवाळीचं. |
नाशिक / प्रतिनिधी सिन्नर ते नाशिक महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात येत असलेल्या जमीनधारकांच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही न करता केवळ एकतर्फी भूसंपादन होत असून प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर दडपशाही केली जात असल्याची भावना जमीनधारकांनी व्यक्त केली आहे. |
नाशिक / प्रतिनिधी नॅशनल इन्टिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) नाशिक जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा येथील रावसाहेब थोरात सभागृहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. सुधीर तांबे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुहास चौधरी, नगरसेवक डॉ. विशाल घोलप उपस्थित होते. |
विधानसभानिहाय चर्चा होणार नाशिक / प्रतिनिधी निफाड तालुक्यातील कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी निफाड बाजार समितीत शुक्रवारी शेतकरी व युवक मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व गृह तथा ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, प्रभारी अॅड. गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 1 of 14 |