अवघे ‘रधों ’
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अवघे ‘रधों ’ Bookmark and Share Print E-mail
प्रतिनिधी - रविवार  १० ऑक्टोबर २०१०
www.padmagandha.com
रघुनाथ धोंडो कर्वे हे कृतिनिष्ठ तत्त्वनिष्ठेचे चालते बोलते उदाहरण होते. व्यक्तिस्वातंत्र्य, विवेकवाद आणि इहनिष्ठा या त्रिदलाने ते समाजपुरुषाची पूजा करीत होते आणि समाज त्यांना काय देत होता? ‘अपमान, उपहास, निंदा, त्रास.’
आज आपल्या समाजाने रधोंप्रतिपादित जीवनमूल्ये स्वीकारली आहेत. लोकशाही, स्त्रीपुरुषसमता ही त्याचीच तर अपत्ये आहेत.स्त्रीमुक्तीचा निकराने पुरस्कार करणारे मामा वरेरकर, कुटुंबनियोजनाच्या आद्य प्रचारक शकुंतला परांजपे, स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक स्वातंत्र्याला ललित आविष्कार देणाऱ्या गौरी देशपांडे यांचा मूलस्त्रोत रघुनाथ धोंडो हाच आहे.
त्यांच्यावर आपण केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याची, त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारातून उतराई होण्याची संधी ‘पद्मगंधा प्रकाशना’ने उपलब्ध करून दिली आहे. ‘पद्मगंधा प्रकाशन’चा ‘रधों’ हा समग्र प्रकल्प येत्या १४ ऑक्टोबरला- रधोंच्या ५७ व्या स्मृतिदिनी प्रकाशित होत आहे. आपण रधोंचे हे समग्र साहित्य घेऊन रधोंच्या ऋणातून उतराई करू शकतो.
‘समाजस्वास्थ्य’कार रघुनाथ धोंडो कर्वे हे १८८२ ते १९५३ या कालखंडात महाराष्ट्रात एक वादळी अन् वादग्रस्त व्यक्तिमत्व होऊन गेले. रधोंचे विचार व त्यांचे महत्त्व त्यांच्या काळातील समाजाला समजले नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. समाजाने त्यांना त्यांच्या कार्यात अडथळे आणून त्रस्त केले. त्यांच्यावर खटलेही भरले गेले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वकिलपत्र घेऊन ‘रधों’ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण संपूर्ण हयातभर आणि मृत्युनंतरही ते उपेक्षितच राहिले. आज मात्र त्यांच्या कार्याची थोरवी निस्संशय समाजमान्य झाली आहे. विसाव्या शतकातील या द्रष्टय़ा पुरुषाचे व्यक्तित्व व विचार मराठीत प्रथमच आणण्याचा संकल्प ‘पद्मगंधा प्रकाशना’चे आठ वर्षांपूर्वी केला. डॉ. अनंत देशमुख ह्यांच्या साक्षेपी संपादन, संशोधन व अभ्यासवृत्तीमुळे पद्मगंधाचा हा संकल्प आज सिद्धीस गेला आहे. एकूण २१६८ पृष्ठांचा हा प्रकल्प आठ पुस्तकांत विभागला आहे. विसाव्या शतकातील एका द्रष्टय़ा पुरुषाचे विचार केवळ वाचण्यासाठीच नाही, तर अभ्यास व संशोधन करणाऱ्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. स्वत: रधोंचे महत्त्वाचे असंग्रहीत, अप्रकाशित, प्रकाशित व दुर्मीळ साहित्य या निमित्ताने एकत्र मिळणार आहे, ही या प्रकल्पाची जमेची बाजू आहे. प्रकल्पातील आठही पुस्तके अतिशय वैशिष्टय़पूर्ण आहेत.
१. असंग्रहित र. धों. कर्वे : या ३०४ पानांच्या ग्रंथात प्रो. र. धों. कर्वे यांनी त्यांच्या समकालीन अन्य नियतकालिकांमध्ये लिहिलेले व आजपर्यंत अलक्षित राहिलेले दुर्मीळ लेख समाविष्ट केले आहेत. प्रो. कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ व्यतिरिक्त अन्य प्रतिष्ठित नियतकालिकांतही संततिनियमन, लैंगिक शिक्षण, अश्लीलतेचे प्रश्न यांसंबंधी लेखन केले आहे.संततिनियमन वा लैंगिक प्रश्न याव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांवरही लेखन केले आहे. या सर्व लेखांतून त्यांचा साहित्य, संगीत, नाटक, भाषा, सिनेमा इत्यादी विषयांवरचा अभ्यास, त्यांची रसिकवृत्ती प्रत्ययास येते.
२. ‘समाजस्वास्थ्य’मधील निवडक लेख : लोकशिक्षक व प्रबोधन हे मूळ उद्दिष्ट ठेवून र. धों. कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक सुरू केले. २६ वर्ष ४ महिने इतका काळ ते चालले. त्यांच्या मृत्युनंतरचा अंक त्यांनी आधीच पूर्ण केलेला असल्याने तो नंतर प्रसिद्ध झाला आणि मराठीतील एका महत्त्वाच्या मासिकाचे अवतारकार्य नोव्हेंबर १९५३ ला संपले. लिंगमानसशास्त्र व सामाजिक आरोग्य या विषयांसंबंधी आस्था असलेल्या कव्र्यानी समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची चिकित्सा करणे व त्यासंबंधीच्या उपायांची चर्चा करणे या उद्देशाने ‘र. धों.’नी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक अतिशय जिद्दीने चालविले. ‘समाजस्वास्थ्य’चे हे अंक दुर्मीळ असल्याने या पुस्तकामुळे जिज्ञासूंची मोठी सोय झाली आहे.
३. शेष समाजस्वास्थ्य : ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकात रघुनाथरावांव्यतिरिक्त त्याकाळातील अनेक जबाबदार व्यक्तींनी लेखन केले. या लेखकांमध्ये मामा वरेरकर, भास्करराव जाधव, माधवराव बागल, शंकरराव किलरेस्कर, दुर्गा भागवत, प्रो. दामोदर कोसंबी, कॅप्टन गो. गं. लिमये, गो. स. सरदेसाई या प्रसिद्ध व्यक्तींनी तर ना. स. बापट, के. बा. गजेंद्रगडकर, वि. वि. लिमये, श्री. यादव, रा. ज. गोखले, कृ. बा. बाबर, मनोहर लिमये, ग. र. मुळे, श्री. म. वर्दे, प्रा. बा. वा. सावर्डेकर या तुलनेने फारशा प्रसिद्ध नसलेल्यांनीही त्यात लेखन केले आहे.रघुनाथरावांचे आप्तस्वकीय यांचेही समाजस्वास्थ्यमध्ये लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यात त्यांच्या वहिनी इरावतीबाई कर्वे, बंधू शंकरराव, दिनकरराव, भास्करराव व के. भा. लेले  या आप्तांनीही लेखन केले आहे.
प्रस्तुत ग्रंथाचे वेगळे वैशिष्टय़ म्हणजे रघुनाथरावांना लेखांमध्ये, लेखांच्या शेवटी मतभेद नोंदवण्याची सवय होती व शेवटी ‘संपादक’ असे ते लिहीत असत. ‘शेष समाजस्वास्थ्य’मध्ये ते तसेच ठेवण्यात आले आहे. ‘शेष समाजस्वास्थ्य’मध्ये कथांचा समावेश केला नसला तरी त्यांची स्वतंत्र सूची परिशिष्टात दिली आहे.
४. बुद्धिप्रामाण्यवाद : ‘द रॅशनॅलिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही मुंबईतील तेव्हाच्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांच्या तरुणांची संस्था होती. या ध्येयवादी तरुणांनी ‘रीझन’ नावाचे इंग्रजी नियतकालिक सुरू केले.’प्रो. र. धों. कर्वे यांचा ‘रीझन’शी अतिशय जवळचा संबंध होता. संपादक, लेखन, ग्रंथपरीक्षक, पत्रलेखक अशा विविध भूमिकांतून त्यांनी ‘रीझन’ला योगदान दिले आहे.
प्रो. र. धों. कर्वे यांचे इंग्रजीतील असे सर्व लेखन ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या शीर्षकाने मराठीत प्रथमच प्रसिद्ध होत आहेत.  प्रा. मधुकर तोरडमल यांनी रघुनाथरावांच्या शैलीतच हा अनुवाद केला आहे.
५. निवडक ‘शारदेची पत्रे’ : ‘शारदेची पत्रे’ वा ‘शारदेचं पत्रं’ हे सदर ‘समाजस्वास्थ्य’च्या जुलै १९३१ च्या अंकापासून सुरू झाले. रघुनाथरावांनी स्वत: टोपणनावाने हे लेखन केले. त्याची प्रेरणा अ. ब. कोल्हटकर यांच्या लेखनातून घेतली असावी.‘शारदेची पत्रे’ हे समाजस्वास्थ्य मासिकातील एक महत्त्वाचं सदर. तत्कालीन नियतकालिकसृष्टीचे त्यात अत्यंत प्रत्ययकारक दर्शन घडते. तत्कालीन वाद-विवादांची महत्त्वपूर्ण नोंद अभ्यासकांना मनोरंजक व उपयुक्त ठरणारी आहे. या सर्व दृष्टीने हे १६८ पानांचे लहान असले तरी महत्त्वाचे संपादन ठरते.
६. मोपांसाच्या कथा : अनुवादक म्हणून र. धों. कर्वे यांनी केलेले हे महत्त्वपूर्ण कार्य आहे. गि. द. मोपांसा या प्रसिद्ध फ्रेंच कथाकाराच्या कथांचा परिचय प्रत्यक्ष अनुवाद करून प्रो. र. धों. कर्वे यांनी मराठी वाचकांना करून दिला आहे. प्रस्तुत पुस्तकात गि. द. मोपांसाच्या एकतीस कथा असून ‘समाजस्वास्थ्य’मध्ये वेळोवेळी प्रसिद्ध झाल्या आहेत.
७. र. धों. कर्वे : मते आणि मतांतरे : प्रो. र. धों. कर्वे यांचे चरित्र व कार्य यांविषयी अनेकांच्या मनात कुतूहल आहे.प्रस्तुत पुस्तकात धोंडो केशव कर्वे, भा. वि. वरेरकर, श्री. शं. नवरे, श्री. के. क्षीरसागर, भास्कराव कर्वे, शकुंतला परांजपे, अप्पा पेंडसे, प्रभाकर पाध्ये, म. वा. धोंड, जे. व्ही. नाईक, विठ्ठल प्रभू, ग. प्र. प्रधान व  अनंत देशमुख यांचे लेख समाविष्ट केलेले आहेत. या लेखांतून रघुनाथरावांविषयी केलेली चर्चा अभ्यासपूर्ण आणि उदबोधक अशी आहे.
८. ‘समाजस्वास्थ्य’कार : या प्रकल्पातील डॉ. अनंत देशमुख यांचा स्वत:चा हा स्वतंत्र ग्रंथ आहे. रघुनाथरावांच्या साहित्याचे संशोधन, संपादन करताना डॉ. अनंत देशमुखांना जी नवी साधनसामग्री उपलब्ध झाली. त्या साधनसामग्रीच्या आधारे त्यांनी रघुनाथराव कव्र्याचे हे चरित्र उभे केले आहे. विसाव्या शतकातील एका वादळी, वादग्रस्त परंतु ध्येयवादी, बुद्धिनिष्ठ समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीचा वेध घेण्याचा येथे प्रामाणिक प्रयत्न झाला आहे. आजपर्यंत अज्ञात असणाऱ्या रघुनाथरावांच्या जीवनाचे कंगोरे यात स्पष्ट होतात. एकूण २४६ पृष्ठांच्या या ग्रंथामुळे र. धों. कर्वे यांचे चरित्र नव्याने उपलब्ध झाले आहे.
उत्तम निर्मिती, चित्रकार रविमुकुल यांची मुखपृष्ठे व मांडणी यांमुळे अतिशय उत्तम निर्मितीमूल्य असलेल्या या २१६८ पृष्ठांचा प्रकल्प पद्मगंधाच्या परंपरेला शोभेल असाच आहे. गेली आठ वर्षे संपादक/संशोधक - डॉ. अनंत देशमुख व प्रकाशक अरुण जाखडे यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील जिज्ञासू मराठी वाचक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे.
या प्रकल्पामुळे विसाव्या शतकातील एका द्रष्टय़ा विचारवंताचे मूळ लेख, चरित्र, जीवनकार्य आणि चिकित्सा उपलब्ध होत आहे. २१६८ पृष्ठांची विभागणी आठ पुस्तकात केली आहे. त्यातील शेवटची दोन पुस्तके रघुनाथरावांची नसून रघुनाथरावांविषयी आहेत. श्री. ज. जोशी यांच्या ‘रघुनाथाची बखर’ या कादंबरीमुळे व अमोल पालेकरांच्या ‘ध्यासपर्व’ या सिनेमामुळे रघुनाथरावांचे आयुष्य ललित व सिनेमा स्वरूपात काही प्रमाणात समजले.  प्रस्तुत प्रकल्प मात्र अतिशय गांभीर्याने व चिकित्सक वृत्तीने खुद्द रघुनाथरावांचे विचार व साहित्य घेऊन येत आहे. मराठीतील हा पहिला धाडसी प्रयत्न केल्याबद्दल संपादक डॉ. अनंत देशमुख व पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे यांना धन्यवाद दिले पाहिजे!
आठ पुस्तकांचा समग्र ‘रधों’ मूळ १८०० रुपये किंमतीचा प्रकाशकांनी सवलत मूल्य केवळ १३०० रुपयांना उपलब्ध करून दिला आहे.