एका वैचारिक क्रांतीचा प्रवास : नैसर्गिक धर्मशास्त्र ते नैसर्गिक निवड
मुखपृष्ठ >> विशेष लेख >> एका वैचारिक क्रांतीचा प्रवास : नैसर्गिक धर्मशास्त्र ते नैसर्गिक निवड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

एका वैचारिक क्रांतीचा प्रवास : नैसर्गिक धर्मशास्त्र ते नैसर्गिक निवड Bookmark and Share Print E-mail
अनुवाद : प्रदीप रावत
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चार्ल्स डार्विन यांच्या १९ व्या शतकातील उत्क्रांतीविषयक सिद्धांतांनी सर्व प्रस्थापित विचारांना आणि सत्ताधारी वर्गानाही प्रचंड धक्का दिला. या सत्ताधारी वर्गात सर्वात प्रमुख प्रवाह होता तो धर्मपीठांचा. विज्ञानविश्वात तोपर्यंत फिजिक्स झपाटय़ाने प्रगत होत होते. परंतु जीवसृष्टीचा अभ्यास करून उत्क्रांतीविषयक सिद्धांताने फिजिक्सने आखून दिलेल्या सीमाही ओलांडल्या. तेव्हापासून आयझ्ॉक न्यूटननंतर चार्ल्स डार्विन यांचे नाव क्रांतिकारक वैज्ञानिक म्हणून घेतले जाऊ लागले. डार्विन यांचे एक स्वतंत्र आणि समांतर विचारपीठच निर्माण झाले. जवळजवळ शंभर वर्षे या डार्विन पीठाचा दबदबा इतक्या प्रचंड प्रमाणात होता की त्याला आव्हान देणारे प्रतिगामी व सनातनी म्हणून संबोधले गेले. परंतु गेल्या काही वर्षांत विश्वाच्या उत्पत्तीविषयी, जीवसृष्टीच्या निर्मितीविषयी आणि उत्क्रांतीविषयी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवे सिद्धांत निर्माण होऊ लागले. या पाश्र्वभूमीवर माजी खासदार प्रदीप रावत यांनी भाषांतरित केलेला कॅलिफोर्निया विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ इकॉलॉजी अ‍ॅण्ड इव्होल्यूशनरी बायॉलॉजीचे प्रा. फ्रान्सिस्को जे. आयला यांच्या विवेचनाचा हा स्वैर अनुवाद.

आधुनिक विज्ञानाच्या उगमांचे स्रोत कोपर्निकन क्रांतीत गवसतात. कोपर्निकस, केपलर, गॅलिलिओ आणि न्यूटन यांनी १६ व्या व १७ व्या शतकांमध्ये लावलेल्या शोधांमुळे विज्ञानयुग अवतरले. भौतिक नियमांनी बद्ध असलेली ‘गतिमय जडसृष्टी’ (Matter in Motion) असे त्यांनी नैसर्गिक जगताचे स्पष्टीकरण दिले. निरीक्षण व प्रयोगाद्वारे या भौतिक नियमांचा शोध लावता येतो आणि त्या नियमांना पारखता येते. वैज्ञानिक पद्धतीने सृष्टीचे आकलन शक्य आहे
हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. परंतु सजीवांची उत्पत्ती व वैविध्यपूर्ण शरीररचना कोपर्निकन क्रांतीतून वगळल्या गेल्या. सजीवांची अमर्याद विविधता आणि विस्मयकारक अनुकूलन हे ईश्वरी योजना व उद्देशाचे (Plan and Purpose) फलित आहे, असे गृहीत धरले गेले. त्यांची निर्मिती निसर्गसिद्ध नसावी असे वाटणे स्वाभाविक आहे. उदाहरणार्थ, विलियम पॅले या इंग्रज धर्मवेत्त्याने ‘नॅचरल थिओलॉजी’ (नैसर्गिक धर्मशास्त्र, १८०२) या ग्रंथाद्वारे, शरीररचनेवर आधारित युक्तिवाद (Argument-From-Design) तपशीलवार सादर केला आहे. विश्वनिर्मात्याच्या अस्तित्वाचे प्रभावी प्रमाण म्हणून त्या युक्तिवादाचा पॅलेने वापर केला आहे. मानवी डोळ्यांची कार्यक्षम रचना सर्वज्ञ विश्वनिर्मात्याचा नि:संदिग्ध पुरावा असल्याचे प्रतिपादन त्याने केले. डोळ्यांसाठी आवश्यक अशी परस्परपूरक यंत्रणा केवळ योगायोगाने (यदृच्छेने) निर्माण होऊ शकत नाही. ‘‘(डोळ्यांच्या रचनेत केवळ योगायोगाने निर्माण झालेली) पारदर्शक भिंगांची साखळी असली पाहिजे. प्रकाशकिरणांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या प्रतिमेचे प्रक्षेपण त्या साखळीद्वारे साध्य झाले पाहिजे. ती प्रक्षेपित प्रतिमा उमटण्यासाठी त्या साखळीच्या सरतेशेवटी पाश्र्वपटल असले पाहिजे. ते पटल अचूक भूमितीय अंतरावर  असले पाहिजे. त्या ठराविक जागी असल्याशिवाय सुस्पष्ट प्रतिमा निर्माण होऊ शकणार नाही. तसेच प्रतिमापटल व मेंदू यांच्यात दळणवळण साधण्यासाठी मोठी मज्जा असली पाहिजे.’’
कोपर्निकन क्रांतीमुळे भौतिकशास्त्रांनी प्रगतीचे अनेक टप्पे पार केले. परंतु त्यामुळे जीव व जगताबद्दल मानवजातीची संकल्पना दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या दोलायमान अवस्थेप्रमाणे झाली. थेट एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत ही द्विधा मनस्थिती टिकून राहिली. भौतिक नियमांच्या आधारे गवसलेली वैज्ञानिक स्पष्टीकरणे निर्जीव सृष्टीबाबत प्रभावशाली ठरत होती. केवळ पृथ्वीवरील नव्हे तर अंतराळातील सर्व जडसृष्टीपर्यंत त्या प्रभावाची व्याप्ती होती. सजीवसृष्टीची उत्पत्ती व जटिल शरीररचनांची कारणमीमांसा मात्र पॅलेपुरस्कृत सृष्टिनियमबाह्य (Supernatural) स्पष्टीकरणांद्वारे केली जात होती. सृष्टिनिर्मात्याच्या अगाध कृत्यांवर ही स्पष्टीकरणे अवलंबून होती. या जगतातील अतिशय विविध, जटिल व मनोवेधक जीवसृष्टीचे स्पष्टीकरण त्याच्याच आधारे देण्याची धडपड चालू होती.
या सैद्वांतिक सावळ्या गोंधळातून सुस्पष्ट मार्ग दाखविण्याचे काम डार्विनच्या असामान्य प्रतिभेने केले. त्याने जीवशास्त्राला कोपर्निकन क्रांतीत समाविष्ट करून वैज्ञानिक क्रांती पूर्णत्वास नेली. गतिमय जडसृष्टीची नियमबद्ध व्यवस्था (Lawful System) जीवसृष्टीच्या धारणेससुद्धा लागू पडते, अशा प्रकारची व्यवस्था सृष्टिनियमबाह्यशक्तीच्या अधीन नसते, केवळ मानवी तर्कशक्तीच्या बळावर जीवसृष्टीचे आकलन शक्य आहे, हे डार्विनने निदर्शनास आणले. डार्विनला आव्हान देणारे कोडे असामान्य स्वरूपाचे होते. विश्वनिर्मात्याची भूमिका सिद्ध करणाऱ्या ‘शरीररचनेवर आधारित युक्तिवादाचे’ सामथ्र्य विलियम पॅलेने ‘नॅचरल थिओलॉजी’ या ग्रंथाद्वारे प्रभावीपणे व्यक्त केले होते. जिथे जिथे कार्यशक्ती किंवा शरीररचना आढळते तिथे तिथे आपण कर्त्यांचा शोध घेतो. यदाकदाचित घडय़ाळ नजरेस पडले तर घडय़ाळजीचे अस्तित्व आपण गृहीत धरतो. सजीवांच्या रचना, अवयव व वर्तणुकी विशिष्ट हेतू किंवा क्रिया साध्य करण्यासाठी गठीत झाल्या आहेत. त्यांची ही कार्यक्षम शरीररचना (Functional Desing) आणि उपांगे (Features) विश्वनिर्मात्याच्या (Designer) अस्तित्वाचा पुरस्कार करतात असे वाटते. परंतु सजीवांच्या जटिल शरीररचना आणि क्रियाशीलता भौतिक प्रक्रियेद्वारा म्हणजे नैसर्गिक निवडीमुळे निर्माण होतात. विश्वनिर्माता किंवा इतर कोणी सृष्टीनियमबाह्यशक्ती या निर्मितीसाठी गृहीत धरण्याची आवश्यकता उरत नाही. जीवसृष्टीची भौतिक नियमांनुसार उकल करून दाखविणे हे डार्विनचे महान योगदान आहे. त्यामुळे सजीवांची उत्पत्ती व अनुकूलन, वैपुल्य व वैविध्याचा अजबखाना, या सर्व बाबी विज्ञानाच्या कार्यकक्षेत आणल्या गेल्या. सजीवांना विशिष्ट हेतूसाठी ‘शरीररचना’ प्राप्त झाल्या आहेत हे डार्विनला मान्य होते. शरीररचना प्राप्त होणे याचा अर्थ क्रियाशीलता साध्य करण्यासाठी रचनाबद्ध होणे (Functionally organized). विशिष्ट जीवनपद्धतींशी सजीवांनी अनुकूलन प्राप्त केलेले असते आणि विशिष्ट क्रियांसाठी त्यांच्या उपांगांनी अनुकूलन साध्य केलेले असते. पाण्यात जगण्यासाठी माशांनी अनुकूलन प्राप्त केलेले असते. रक्तातील घटकांचे परस्पर प्रमाण नियमित करण्यासाठी मूत्रपिंडांची रचना केलेली असते. घट्ट पकडणे शक्य व्हावे  याकरिता मानवी हाताचे प्रयोजन असते. सजीवांनी प्राप्त केलेल्या या अनुकूलनांचे शक्यप्राय असणे विशिष्ट रचनांवर अवलंबून असते. या शरीररचनांचे भौतिक स्पष्टीकरण देण्याचे कार्य डार्विनने केले. सजीवांची वरकरणी हेतूपूर्वक (बुद्धिपुरस्सर) वाटणारी लक्षणे आता विज्ञानाच्या कार्यपद्धतीद्वारे समजणे शक्य झाले आहे. तत्पूर्वी, याच पद्धतीने निर्जीव सृष्टीचे वास्तव समजणे शक्य झाले होते. भौतिक प्रक्रियांमधून आविष्कृत होणाऱ्या सृष्टीच्या नियमांनुसार आता जीवसृष्टीचेसुद्धा आकलन शक्य झाले आहे.
जैविकरचनांचे (Bio-designs) डार्विनने दिलेले स्पष्टीकरण
उत्क्रांतीच्या सिद्धांताबद्दल डार्विनला यथायोग्य श्रेय दिले जाते. एकोणिसाव्या शतकाच्या मधल्या दशकांमध्ये निसर्गअभ्यासकांनी सजीवांची उत्क्रांती सामान्यत: स्वीकारली होती. डार्विनने ‘दि ओरिजिन ऑफ स्पीशीज’ या ग्रंथामध्ये सजीवांची उत्क्रांती सप्रमाण सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची रास रचली आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांताला वैज्ञानिक सत्याचा दर्जा प्राप्त करून देणे ही डार्विनची कामगिरी निश्चितच मोलाची आहे. परंतु वैचारिक इतिहासात डार्विनने
त्याहून अधिक मोलाची कामगिरी बजावली आहे. वैविध्याला जन्म देणारी समान पूर्वज परंपरा (Common descent with diversification) सिद्ध करण्यासाठी त्याने पुरावे गोळा केले. पण ही उत्क्रांतीप्रक्रिया सिद्ध करणे हे कदाचित डार्विनच्या या सर्वश्रेष्ठ ग्रंथाचे दुय्यम उद्दिष्ट असावे. ‘दि ओरिजिन ऑफ स्पीशीज’ हा ग्रंथ प्रामुख्याने हे जटिल कोडे सोडविण्यासाठी केलेला सलग व प्रदीर्घ युक्तिवाद आहे. भौतिक प्रक्रियेद्वारे सजीवांनी अनुकूलन, जटिल शरीररचना, वैविध्य आणि थक्क करणाऱ्या करामती साध्य केल्या आहेत. डार्विनने मांडलेल्या ‘जैविकरचनेच्या सिद्धांताचा’ (Theory of Biodesign) उत्क्रांती हा अपरिहार्य परिणाम आहे. या कारणाकरिता डार्विनने उत्क्रांतीचा पुरावा सादर केला आहे.
कोपर्निकन क्रांती जीवनसृष्टीला लागू करणे ही डार्विनची सर्वात क्रांतिकारी कामगिरी आहे. सजीवांची उत्क्रांती सिद्ध करण्यापेक्षा हे कार्य निश्चितच अधिक मोलाचे आहे. भौतिक प्रक्रियांमधून आविष्कृत होणारे सृष्टीचे नियम त्याने जीवनसृष्टीला लागू केले. सजीवांची उत्पत्ती व शरीररचना यांचे स्पष्टीकरण देणे डार्विनमुळे शक्य झाले. तोपर्यंत असे स्पष्टीकरण केवळ निर्जीव सृष्टीबाबत दिले जात होते. एच. एम. एस. बीगल या नाविक दलाच्या सर्वेक्षण जहाजातून डार्विनने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली होती. त्या पाच वर्षांच्या प्रवासानंतर लगेच १८३७-१८३९ च्या दरम्यान लिहिलेल्या ‘नोटबुक्स’मध्ये डार्विनने नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताच्या शोधाची नोंद केली आहे. त्यानंतर पुढील काळात तो त्या शोधाचा उल्लेख पुन्हा पुन्हा ‘माझा सिद्धांत’ असा करतो. १८३० च्या अखेरीपासून ते १८८२ साली त्याच्या मृत्यूपर्यंत डार्विनचे जीवन त्या सिद्धांतासाठी समर्पित होते. तो सिद्धांत व त्याची सहकारी गृहीतके भरभक्कम पुराव्यांच्या आधाराने सिद्ध करण्यासाठी तो अविरत झटला. विशेषत: व्यापक आनुवंशिक गुणभिन्नता (Hereditary variation) आणि सजीवांची अफाट जननक्षमता (Fertility), नेहमीच उपलब्ध अन्नपुरवठय़ापेक्षा किती तरी पटीने अधिक असते हे गृहीतक सिद्ध करण्यासाठी त्याने खूप परिश्रम घेतले. डार्विनसाठी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आयुष्यभराची सोबत होती. त्याने निरीक्षणाचा सातत्याने पाठपुरावा केला. तसेच सिद्धांताची सत्यता पडताळण्यासाठी असंख्य प्रयोग केले. सर्व संभवनीय आक्षेपांचे निराकरण करावे यासाठी तो सतत प्रयत्नशील होता.
सजीवांच्या जाती उत्क्रांत होण्यास कारणीभूत असलेली प्रक्रिया म्हणून नैसर्गिक निवडीचा शोध मान्यता पावला. तो शोध लावण्याचे श्रेय सार्थपणे डार्विनव्यतिरिक्त अल्फ्रेड रसेल वॅलेस (१८२३- १९१३) यालाही दिले जाते. भूगर्भशास्त्रज्ञ चार्ल्स लायल यांस डार्विनने पत्र लिहून कळविले की, १८ जून १८५८ रोजी वॅलेसचा एक संक्षिप्त निबंध टपालामार्फत त्यास मिळाला आहे. डार्विन लिहितो, ‘‘मी (१८४४) साली लिहिलेल्या (हस्तलिखित) मसुद्याचा सारांश काढावयाचा झाला असता तर वॅलेसने जे लिहिले आहे त्यापेक्षा अधिक सारांश काढता आला नसता.’’ वॅलेसच्या शोधनिबंधाने डार्विनवर वीजच कोसळली.
नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाचा वॅलेसने स्वतंत्रपणे लावलेला शोध हीसुद्धा असामान्य घटना आहे, परंतु सजीवांच्या शरीरचनांचे  स्पष्टीकरण देणे यात वॅलेसला रस नव्हता. सजीवांच्या जाती कशा प्रकारे उत्क्रांत झाल्या याची कारणमीमांसा करण्यावर त्याचा भर होता. त्याच्या दृष्टीने जीवजातींची उत्क्रांती ही एक सातत्याने घडणारी व विकसनशील प्रक्रिया होती. वॅलेसचा हा हेतू त्याच्या प्रबंधाच्या शीर्षकावरून स्पष्ट होतो : ‘ऑन दि टेनडन्सी ऑफ व्हरायटीज टू डीपार्ट इनडेफिनेटली फ्रॉम दि ओरिजिनल टाइप’ (मूळ जातीपासून सतत फारकत घेण्याची पोटजातींची प्रवृत्ती). उत्क्रांतीची वाटचाल सतत व विकसनशील असते असे वॅलेसचे मत होते, पण उत्क्रांती अपरिहार्यपणे विकास किंवा सुधारणा असते ही भूमिका डार्विनला मान्य नव्हती. त्याचप्रमाणे उत्क्रांतीमुळे कालौघात शरीररचना नेहमीच बदलते या निष्कर्षांशीसुद्धा तो सहमत नव्हता; किंबहुना ‘सजीव जीवाश्मांच्या’ (Living Fossils) अस्तित्वाबद्दल त्याला कल्पना होती. लक्षावधी वर्षे लोटल्यावरसुद्धा त्यांच्या शरीररचनेत लक्षणीय बदल झाला नसल्याची त्याला जाणीव होती. उदाहरणार्थ ‘नॉटीलस (Nautilus), लिंगुला (Lingul) इत्यादी काही अतिप्राचीन सिलुरियन (Silurian) प्राणी वर्तमान सजीव जातींपेक्षा फारशा वेगळ्या नाहीत.’ (सिलुरियन भूशास्त्रीय कालखंड ४१ कोटी ६० लाख वर्षांपूर्वीपासून ते ४४ कोटी ४० लाख वर्षांपूर्वीपर्यंत होता.)
१८५८ साली डार्विन एका बहुखंडीय प्रबंधाच्या लेखनात गुंतला होता. त्या पुस्तकाचे संभाव्य शीर्षक ‘ऑन नॅचरल सिलेक्शन’ होते, पण वॅलेसच्या प्रबंधाने प्रेरित होऊन डार्विनने, ‘दि ओरिजिन ऑफ स्पीशीज’ हा ग्रंथ लिहिला. पुढील वर्षी या ग्रंथाचे प्रकाशन झाले. मूळ बहुखंडीय पुस्तक संक्षिप्त रूपात प्रकाशित करण्याचा त्याचा उद्देश होता. ‘दि ओरिजिन’ व अन्य सर्व लिखाणाचा केंद्रबिंदू शरीररचनांच्या माध्यमातून एकूणच रचनाशास्त्र (Theory of Design) सिद्ध करणे हाच होता. त्याच्या दृष्टीने उत्क्रांतीची भूमिका दुय्यम दर्जाची आणि केवळ रचनाशास्त्राला साहाय्यकारी पुरावा यापुरती होती.
डार्विनचे ‘ओरिजिन’
उत्क्रांतीच्या सिद्धांताविषयी आजतागायत प्रकाशित साहित्यांपैकी सर्वात महत्त्वाचा ग्रंथ हीच ‘ओरिजिन ऑफ स्पीशीज’ची सुपरिचित ओळख आहे. हे प्रतिपादन वस्तुस्थितीला दुजोरा देते यात काही शंका नाही. डार्विनने त्या ग्रंथात असंख्य निरीक्षणे नोंदविली आहेत आणि वास्तव घटनांची उकल केली आहे. त्याने सादर केलेल्या पुराव्यातील तथ्य व सौंदर्य मन मोहून टाकते. त्या ग्रंथाला चिरकालीन महत्त्व प्राप्त झाले आहे, पण सजीव उत्क्रांत झाले हे तथ्य प्रस्थापित केले हेच केवळ त्या ग्रंथाच्या महत्तेचे कारण नाही. या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताद्वारे त्याने सजीवांच्या उत्क्रांतीचा इतिहास उलगडून दाखविला आहेच, पण त्याचबरोबर सजीवांनी अनुकूलन कसे प्राप्त केले याचाही रहस्यभेद केला आहे. त्याच्या ग्रंथाचे श्रेष्ठत्व या रहस्यभेदात सामावलेले आहे. ‘दि ओरिजिन’च्या प्रस्तावनेत आणि प्रकरण १ ते ८ मध्ये, नैसर्गिक
निवडीच्या आधारे सजीवांचे अनुकूलन व वर्तन यांचे स्पष्टीकरण दिले आहे; वेगळ्या शब्दांत सांगायचे तर सजीवांच्या वैशिष्टय़पूर्ण व वैविध्यपूर्ण ‘शरीररचनांची’  (Design) कारणमीमांसा त्याने केली आहे. पहिल्या प्रकरणात प्राणी व वनस्पती यांना कृत्रिम निवडीद्वारा पाळीव किंवा लागवडयोग्य बनविण्याच्या प्रक्रियेचे वर्णन डार्विनने केले आहे. चित्रविचित्र व नावीन्यपूर्ण कबुतरांची पैदास करणाऱ्या शौकिनांची (Fancier) कार्यपद्धती डार्विनने तपशीलवार नोंदवली आहे. ‘नवलाई’च्या (Spot- Mutation-  उत्परिवर्तन) पैदाशीसाठीच या मंडळींची धडपड चालू असते. नावीन्यपूर्ण वनस्पती व प्राण्यांच्या यशस्वी पैदाशीमुळे निवडप्रक्रिया काय साध्य करू शकते याची प्रचीती येते. सजीवांमध्ये साकारणाऱ्या सहजस्फूर्त आनुवंशिक गुणभिन्नतेतून (Spontaneous Hereditary Variation) पैदासकार खूप काही साध्य करतात. त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यास उपयोगी ठरतील अशाच गुणवैशिष्टय़ांची पैदासकार निवड करतात. ‘नवलाई’ प्रथम एका जीवात उद्भवते. ती नवलाई वेचक पैदाशीमुळे त्या जातीसमूहात अनेक पटीने वाढवता येते. अनेक पिढय़ा या पद्धतीने वेचक पैदास (Selective Breeding) करीत राहिल्यास ती नवलाई त्या जातीसमूहात किंवा ‘वंशात’ (Race) स्थिरावते. विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पैदासकारांनी या पद्धतीने निवडप्रक्रिया राबवली आहे. त्यामुळेच आपल्याला परिचित असलेल्या जातींची कुत्री, गुरे- ढोरे, कोंबडय़ा आणि अन्नधान्ये विकसित झाली आहेत.
माणसांनी कृत्रिम निवडीद्वारा इच्छित गुणधर्म कसे विकसित केले याचे विवेचन पहिल्या प्रकरणातच आले आहे. दुसऱ्या ते आठव्या प्रकरणात नैसर्गिक निवडीच्या कार्यपद्धतीचे विवेचन केले आहे. सजीवांच्या स्वयंलाभासाठी नैसर्गिक निवड त्यांच्यातील उपजत गुणभिन्नतेचा प्रसार कसा करते यासंबंधीचा युक्तिवाद या प्रकरणांमध्ये केला आहे. नैसर्गिक निवडीच्या प्रभावामुळे सजीवांना विविध रचना (Design) प्राप्त होतात. त्याचाच अर्थ सजीवांमध्ये अनुकूलयोग्य अवयव व क्रिया साकार होतात, परंतु निसर्गात आढळणाऱ्या सजीवांच्या शरीररचना ‘बुद्धिपुरस्सर’ (ntelligent design- ID) नसतात. सजीवांच्या शरीररचनांची देवाने किंवा माणसाने अभियंत्याच्या भूमिकेतून हेतुपुरस्सर निर्मिती केलेली नसते. नैसर्गिक निवडीला चालना देणाऱ्या भौतिक प्रक्रियेचा तो परिणाम असतो. पर्यावरणाशी अनुकूलन साधण्यासाठी सजीवांमध्ये ही क्षमता स्वाभाविकरीत्या निर्माण होते. नैसर्गिक निवड कार्यरत असते ती अशी : ज्या जीवांमध्ये लाभदायक गुणभिन्नता आहे, त्यांना कमी लाभदायक गुणभिन्नता असलेल्या जीवांपेक्षा अधिक वंशज असतात. जी गुणभिन्नता जीवांची प्रजोत्पादनाची व तगून राहण्याची संभाव्यता वाढवते अशा गुणभिन्नतेला लाभदायक गुणभिन्नता म्हणतात. या कारणास्तव लाभदायक गुणभिन्नतेच्या परस्परप्रमाणात काही पिढय़ा लोटल्यावर वाढ होते. जी गुणभिन्नता कमी लाभदायक किंवा हानिकारक असते, ती त्या जातिसमूहातून लोप पावते. सरतेशेवटी त्या जीवजातीतील सर्व जीवांमध्ये लाभदायक गुणधर्म आढळतील. लक्षावधी वर्षांचा कालावधी लोटल्यावर अशा प्रकाराने नवीन गुणधर्माचा उद्भव होतो.
सजीवांच्या शरीररचना जटिल (Complex Design) असतात. वर्तमान भाषेत ‘असुलभनीय जटिलता’  (Irreducible Complexity) हा शब्दप्रयोग जैविक जटिलतेच्या संदर्भात केला जातो. परंतु जैविक जटिलता ‘असुलभनीय’ (Irreducible) नसते. तिचे सर्व परस्परावलंबी घटक परिपूर्ण अवस्थेत एकाच वेळी आकस्मिक उद्भवत नाहीत; किंबहुना, डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतान्वये शरीररचना धीम्या गतीने व टप्प्याटप्प्याने साचत जाऊन उत्क्रांत होतात. अशा पद्धतीने वृद्धिंगत होणारी अनुकूलनक्षमता सजीवांना प्रजोत्पादनाच्या यशामुळे प्राप्त होते.
वेगवेगळे परिसर व पर्यावरण यांच्याशी अनुकूलन साधण्यास सजीव यशस्वी ठरले तरच उत्क्रांती घडते. तसेच कालौघात पर्यावरणामध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीशीसुद्धा अनुकूलन साधावे लागते. एका विशिष्ट वेळी प्राप्त परिस्थितीवर मात करणारे आनुवंशिक गुणभिन्नत्व (Hereditary Variations) उपलब्ध व्हावे लागते. तरच सजीवांना टिकाव धरणे (Survival) व प्रजोत्पादन यांसाठी अधिक सोईस्कर संधी प्राप्त होते. अशी संधी केवळ त्या विशिष्ट स्थळकाळाचा लाभदायक गुणभिन्नतेशी योग जुळून आल्यास प्राप्त होऊ शकते. या घडामोडींचा अनिवार्य परिणाम उत्क्रांतीच्या सक्रियतेत होतो. अनुकूलनाबाबत डार्विनने दिलेल्या स्पष्टीकरणाच्या आधारे हाच निष्कर्ष निघतो.
‘दि ओरिजिन’मधील शेवटच्या (१४ व्या) प्रकरणात डार्विन पुन्हा  एकदा त्याच्या ग्रंथातील अनुकूलन (Adaptation)) व शरीररचना (Biodesign) या प्रमुख संकल्पनांचा ऊहापोह करतो. शेवटच्या परिच्छेदात अत्यंत प्रभावी शब्दांत डार्विन त्याच्या संकल्पनेची भव्यता सादर करतो,
‘‘गर्द झाडा-झुडपांनी वेढलेल्या किनाऱ्याची आठवण मनात रम्य कल्पनांचे तरंग निर्माण करते.
अनेक प्रकारच्या वनस्पती दाटीवाटीने त्या किनाऱ्याशी लगट करीत असतात. पक्ष्यांच्या सुरावटींनी झुडपांना कंठ फुटतो. विविध प्रकारचे कीटक नाचत-बागडत असतात. ओलसर मातीतून किडे-मकोडे सरपटत असतात. या जीवांचे आकृतिबंध एखाद्या नक्षीप्रमाणे आखीव रेखीव असतात. या सजीवांची निर्मिती सृष्टीत कार्यरत असणाऱ्या भौतिक नियमांनी केली आहे. या वस्तुस्थितीची जाणीव मनाला अंतर्मुख करते.. अशा रीतीने, निसर्गातील निरंतर संघर्षांतून, दुष्काळ व मृत्यूच्या थैमानातून (या रौद्र मंथनातून), उच्च कोटीच्या प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे. या सृष्टीजन्य जीवतत्त्वाची अनेक शक्तिरूपे आहेत. आरंभीला एका किंवा मोजक्या शरीरांमध्ये या जीवतत्त्वाने श्वास फुंकला आहे. जीवनाबद्दलच्या या दृष्टिकोनात अपूर्व भव्यता आहे. एकीकडे गुरुत्वाकर्षणाच्या अपरिवर्तनीय नियमानुसार पृथ्वीची भ्रमंती चालू आहे. त्याच पृथ्वीवर जीवसृष्टीचा एक अभूतपूर्व प्रवास सुरू आहे. एका साध्या-सोप्या आरंभातून अत्यंत मनोहर, अत्यंत विस्मयकारक अशी असंख्य रूपे उत्क्रांत झाली आहेत आणि होत आहेत.’’
अनुकूलन आणि उत्क्रांती
पॅलेने हाताळलेल्या विषयालाच डार्विनने हात घातला आहे. सजीवांनी अनुकूलनाद्वारे प्राप्त केलेले बाह्यरूप व अंतर्रचना यांचे स्पष्टीकरण त्याने दिले आहे. विशिष्ट क्रिया पार पाडण्यासाठी या रचना निर्माण झाल्या आहेत हे तर सुस्पष्ट आहे. अनुकूलन साध्य करणारी आनुवंशिक गुणभिन्नता (Hereditary Adaptive Variations) अधूनमधून प्रकट होते (‘काही बाबतीत एकमेकांना उपयोगी ठरणारे बदल’) असा युक्तिवाद डार्विनने केला आहे. या प्रकारच्या लाभार्थी सजीवांना प्रजोत्पादनाची संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होते. असे उपयोगी आनुवंशिक गुणभिन्नत्व अधूनमधून उद्भवते. कबुतरांचे शौकिन व पाळीव जनावरांच्या पैदासकारांच्या यशामुळे हे अनुमान सिद्ध होते. अशा प्रकारचे लाभदायक बदल जोपासले जातात, वृद्धिंगत होतात आणि एकत्र येतात. त्याचबरोबर हानिकारक बदल लोप पावतात. या वस्तुस्थितीकडे डार्विनने लक्ष वेधले आहे. सजीवांच्या सर्व जीवनपैलूंना उत्क्रांती प्रभावित करते. शरीरशास्त्र (रूप व रचना- form and structure), शरीरक्रियाशास्त्र (क्रिया-  function), वर्तनशास्त्र ((behavio science) आणि परिस्थितीविज्ञान (परिसर व पर्यावरण,  habitat and environment). ही सर्व शास्त्रे परिवर्तनाचा अभ्यास करतात, सर्व प्रकारच्या परिवर्तनांच्या मुळाशी आनुवंशिक घटकांमध्ये होणारे परिवर्तन असते. या कारणास्तव उत्क्रांती म्हणजे सजीवांच्या आनुवंशिक रचनेत होणारे बदल असे जनुकीय संज्ञेप्रमाणे वर्णन केले जाते. काही जीव इतरांच्या तुलनेने सरस गुणधर्मामुळे (differential survivalजीवनकलहात टिकाव धरतात. आयुष्यभर अन्नासाठी स्पर्धा व संघर्ष, रोगराई, अपघात, परिसर अथवा पर्यावरणातील बदल इत्यादी अडथळे पार करणे आवश्यक असते. परंतु प्रजोत्पादन केले तरच जीवनकलहात यश मिळाले असे उत्क्रांतीदृष्टय़ा म्हणता येते. डार्विनने केलेली नैसर्गिक निवडीची मांडणी प्रामुख्याने या वस्तुस्थितीवर आधारित होती. जनुकीय व संख्याशास्त्रीय संज्ञांनुसार (genetic and statistical terms) प्रजोत्पादनाचे परस्पर प्रमाण विषम असते (differential reproduction). या तत्त्वानुसार नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाची आधुनिक मांडणी केली जाते. काही जनुके व जनुकीय संयुगे (genetic combinations)) त्यांच्या प्रतिस्पध्र्यापेक्षा अधिक प्रमाणात आनुवंशिक वारसा पुढील पिढीत संक्रमित करतात. नैसर्गिक निवडीचा हा सोपा अन्वयार्थ आहे. पुढच्या प्रत्येक पिढीत अनुग्रहित (favoured) जनुकांचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत जाऊन
सार्वत्रिक होते. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी जनुकांचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत जाते. पर्यायी जनुकांमधील (alternative genes) प्रजोत्पादनाच्या सापेक्ष प्रमाणाबद्दल संख्याशास्त्रीय झुकते माप म्हणजे नैसर्गिक निवड. (Natural selection is a statistical bias in the relative rate of reproduction of alternative genes)
उत्क्रांतीचे स्वरूप दोन टप्प्यातील प्रक्रियेच्या स्वरूपात मांडता येते. आनुवंशिक गुणभिन्न उत्परिवर्तनाद्वारे (mutation) प्रकट होते, हा पहिला टप्पा आहे. उपयोगी गुणभिन्नतांच्या परस्पर प्रमाणात नैसर्गिक निवडीद्वारा वाढ होते. तसेच कमी उपयोगी किंवा हानिकारक गुणभिन्नत्व पुढील पिढय़ांमध्ये कमी कमी होत सरतेशेवटी लोप पावते. उत्क्रांतीचा हा दुसरा टप्पा आहे. नैसर्गिक निवडीची व्याख्या करताना डार्विनने ‘उपयोगी’ (useful) व ‘हानिकारक’ (injurious) या संज्ञांचा वापर केला आहे. काही जीवांना उपयोगी गुणभिन्नत्व प्राप्त होते. अशा जीवनांना ‘टिकाव धरण्याची व प्रजोत्पादनाद्वारे वंशवृद्धीची उत्तम संधी असते’, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे अनेक पिढय़ांच्या पश्चात उपयोगी गुणभिन्नतांचे कमी उपयोगी किंवा हानिकारक गुणभिन्नतांशी असलेले परस्पर प्रमाण तुलनेने वाढते.
नैसर्गिक निवड ही केवळ ‘शुद्धीकरणाची’ प्रक्रिया नसते. एरवी अशक्यप्राय वाटणाऱ्या जनुकीय संयुगांची संभाव्यता तिच्यामुळे वाढते. ‘नावीन्य’ (novelty) उत्पन्न करण्याची क्षमता केवळ या वाढीव संभाव्यतेत असते. या दृष्टीने पाहिले तर नैसर्गिक निवड उत्परिवर्तनाच्या सोबतीने एक सर्जनशील (creative) प्रक्रिया आहे. एवढेच नव्हे तर ही प्रक्रिया लक्षावधी वर्षे अव्याहतपणे चालू आहे. वेगवेगळ्या वंशपरंपरेत आणि ज्यांत प्रत्येकी प्रचंड संख्येने जीव असतात अशा असंख्य जीवजातींमध्ये ही प्रक्रिया सक्रिय आहे. उत्परिवर्तन व नैसर्गिक निवड यांच्या परस्परसंबंधातून उत्क्रांती उद्भवते. विलक्षण अनुकूलन साध्य केलेले जीवनसृष्टीत या प्रकारच्या उत्क्रांतीने प्रचंड विविधता निर्माण  केली आहे. कॅब्रियन (Cambrian) भूशास्त्रीय काळातील (५४ कोटी २० लाख वर्षांपूर्वीचा कालखंड) आरंभीचे प्राणी व आधुनिक प्राणी यांच्यात वस्तुत: कोटय़वधी पिढय़ांचे अंतर आहे. या उत्क्रांती काळात घडलेल्या एकूण सर्व उत्परिवर्तनांची मोजदाद व तपासणी करणे शक्य आहे का? किमान त्यापैकी नैसर्गिक निवडीद्वारा वेचल्या गेलेल्या उत्परिवर्तनांची नोंद करणे तरी शक्य आहे का? हा उत्क्रांती इतिहासाचा कालपट आत्मसात करण्यास मानवाची आकलनशक्ती तोकडी पडते. लक्षावधी लहान आणि क्रियेच्या दृष्टीने लाभदायक बदल कालौघात साचत जातात. त्यातून डोळ्यांसारखे विलक्षण जटिल व अनुकूलनयोग्य अवयव उत्क्रांत होतात. एकूण उलाढालींच्या मानाने ही उत्क्रांती प्रक्रिया आपण सहजगत्या समजू शकतो.
नैसर्गिक निवड क्वचित उद्भवणाऱ्या उपयोगी जनुकांची राखण करते आणि त्यामानाने वारंवार उद्भवणाऱ्या हानिकारक जनुकांचा निचरा करते. परंतु एवढय़ापुरतीच नैसर्गिक निवडीची भूमिका मर्यादित नसते. चाळणी लावणे हे नैसर्गिक निवडीचे कार्य असले तरी ती केवळ शुद्ध नकारात्मक प्रक्रिया नसते. एरवी अशक्यप्राय वाटणाऱ्या जनुकीय युतींची संभाव्यता या प्रक्रियेमुळे वाढते. तसेच त्या प्रक्रियेद्वारे नावीन्य निर्माण करण्याचे सकारात्मक कार्यसुद्धा नैसर्गिक निवड करते. ही एक सर्जनशील प्रक्रिया आहे. ती उत्परिवर्तनांना प्रभावित करते, पण त्यांची ‘निर्मिती’ करत नाही. एरवी अस्तित्वात आलीच नसती अशी अनुकूलनयोग्य म्हणजेच क्रियाशील (functional) जनुकीय संयुगे तिच्यामुळे निर्माण होतात.
उद्दिष्टहीन व स्वैर प्रक्रियांमधून (random processes) अर्थपूर्ण व संघटित रचना (Meaningful and Organized) निर्माण होऊ शकत नाहीत असा युक्तिवाद डार्विनचे टीकाकार, उत्क्रांती सिद्धांताविरुद्ध पुरावा म्हणून, काही वेळा करतात. स्वैरपणे टाइपराइटरची अक्षरे बडविणाऱ्या माकडांचे उदाहरण या संदर्भात देण्यात येते. माकडांच्या असंख्य पिढय़ा लक्षावधी वर्षे अशा प्रकारचे हेतूविरहित टंकलेखन करीत आहेत असे समजा. तरीदेखील ‘दि ओरिजिन ऑफ स्पीशीज’ हे अर्थपूर्ण वाक्य ते कदापि लिहू शकणार नाहीत. उत्क्रांती केवळ स्वैरवृत्ती व हेतुशून्य प्रक्रियांवर अवलंबून असती तर ही टीका सार्थ ठरली असती. ‘अर्थपूर्ण’ म्हणजे सजीवांना उपयोगी, जनुकीय संयुगे अनुकूलनांद्वारे घडविण्याचे कार्य नैसर्गिक निवड करते. तिची प्रक्रिया अ-स्वैर व हेतुपूर्वक (nonradom processes) असते. समजा टंकलेखनादरम्यान अपघाताने निर्माण होणारे अर्थपूर्ण शब्द प्रत्येक वेळेस आपोआप निवडणारी प्रक्रिया अस्तित्वात आहे. अशी परिस्थिती उद्भवली तरच माकडांबरोबरची तुलना योग्य ठरेल. त्याचप्रमाणे असेसुद्धा टाईपराइटर हवेत ज्यांच्यात अक्षरांच्या ऐवजी आधीच निवडलेल्या शब्दांचा कळफलक (की-बोर्ड) आहे. ‘अर्थपूर्ण वाक्ये’ निर्माण झाल्यास प्रत्येक वेळी त्यांची निवड करू शकेल अशी प्रक्रिया त्या दुसऱ्या प्रकारच्या टाईपराइटरमध्ये अस्तित्वात असली पाहिजे. पहिल्या प्रकारच्या टाईपराइटरमध्ये,  ‘दि’, ‘ओरिजिन’, ‘स्पीशीज’ आणि इतर शब्द जेव्हा जेव्हा साकारतील, त्या प्रत्येक वेळी ते शब्द दुसऱ्या टाईपराइटरची कळ बनतील. असे घडल्यास अधूनमधून दुसऱ्या टाईपराइटरमध्ये अर्थपूर्ण वाक्ये साकारतील. तिसऱ्या प्रकारच्या टाइपराइटरमध्ये जर ‘अर्थपूर्ण वाक्ये’ कळ म्हणून समाविष्ट केली तर अर्थपूर्ण परिच्छेद प्रकटल्यास प्रत्येक वेळी निवडणे शक्य होईल. अशा प्रकारे विशिष्ट प्रक्रिया राबविल्यास अर्थपूर्ण पान किंवा प्रकरणसुद्धा यथावकाश निर्माण करता येईल. या प्रक्रियेतून जन्माला येणारे अंतिम उत्पादन ‘असुलभरीत्या जटिल’ (Irreducibly Complex) मजकूर असेल.
या प्रकारची तुलना मर्यादित अर्थाने अभिप्रेत असते. ती तंतोतंत जुळविण्याचा अट्टहास करायचा नसतो. एखादा मुद्दा सुस्पष्ट करणे एवढाच त्याचा हेतू असतो. उत्क्रांती केवळ स्वैरवृत्तीच्या प्रक्रियांचे फलित नसून त्यासोबत ‘निवडीची’ प्रक्रियासुद्धा कार्यरत असते. निवडप्रक्रियेतून अनुकूल संयुगे वेचली जातात, कारण त्यांचे पुनरुत्पादन अधिक परिणामकारकरीत्या घडते. त्यामुळे निवडलेली संयुगे संबंधित जातिसमूहात स्थिरावतात. ही बहुसंख्य अनुकूल संयुगे नव्या पातळीवरील संघटना (रचना) निर्माण करतात. या नव्या पातळीमध्येदेखील उत्परिवर्तन (स्वैरवृत्ती) निवडप्रक्रियेच्या जोडीने (हेतुपूर्वक, दिशादर्शक -  nonrandom, directional)पुन्हा आपला प्रभाव दाखवते. प्राण्यांची व वनस्पतींची शरीररचना म्हणजेच जटिल संघटना एका अर्थाने ‘असुलभनीय’ असते. ही संघटना एक किंवा फारच कमी टप्प्यात सुलभ करता येत नाही. वेगळ्या शब्दात सांगायचे तर त्या संघटनेचे संस्थापक घटक एक किंवा थोडय़ा टप्प्यात पृथक होऊ शकत नाहीत. या प्रकारचे सुलभीकरण अशक्य असते. पण लक्ष लक्ष पिढय़ांच्या अखंड साखळीला ही संघटनेची जटिलता ‘सुलभ’ करणे शक्य आहे. ही साखळी गुंफणाऱ्या टप्प्यांची ((steps) आणि पातळींची (levels) प्रचंड संख्या, केवळ अब्जावधी वर्षांच्या कालपटाच्या उपलब्धतेमुळेच शक्य आहे, तात्पर्य,     (उत्क्रांतीचा इतिहास ही ‘असुलभनीय जटिलता’ नसते.
‘नैसर्गिक निवडीद्वारा उत्क्रांती’ ही प्रक्रिया अब्जावधी वर्षे कार्यरत आहे. अतिशय धीम्या गतीने क्रमश: साचत जाणाऱ्या बदलांद्वारे ही प्रक्रिया निर्णायक भूमिका बजावते. यातून टिकाव धरणे व प्रजोत्पादन यासाठी काही सजीवांना अधिक योग्यता लाभते. ही अधिक योग्यता कुठल्याही वेळी सूक्ष्म स्वरूपाच्या गुणभिन्नतेत असते. उदाहरणार्थ, कमी किंवा अधिक अपत्ये जन्माला घालणे, एखाद्या विशिष्ट अमिनो आम्लाच्या निर्मितीसाठी सहाय्यभूत (catalyst) ठरणारे विकर ((enzyme) हजर अथवा गैरहजर असणे. वाढीव जटिलता नैसर्गिक निवडीचा अपरिहार्य परिणाम नाही ही बाबसुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. काही वंशपरंपरेत वेळोवेळी जटिलतेत वाढ होते ही वस्तुस्थिती आहे. जरी अशा वंशपरंपरा दुर्मिळ असल्या तरी उत्क्रांतीच्या कालपटावर त्या चटकन उठून दिसतात. वास्तविक पाहता अशी जटिलता अधूनमधून उद्भवते. अतिसूक्ष्म जीवाणू या पृथ्वीवरील सर्वात प्रदीर्घ आयुष्य लाभलेले सजीव आहेत. गेली साडेतीन अब्ज वर्षे हे जीव आपल्या ग्रहावर अखंडपणे वस्तीला आहेत. असे असले तरी अतिप्राचीन पूर्वजांपेक्षा त्यांच्या जटिलतेत काही विशेष फरक आजमितीस आढळत नाही. अधिक जटिल जीवांचा उद्भव जीवाणूंच्या पश्चात खूप काळ लोटल्यावर झाला. सुलभ रचना प्राप्त असलेल्या त्यांच्या     

सग्यासोयऱ्यांना नष्ट न करता ते उत्क्रांत झाले, हे विशेष. उदाहरणार्थ, साधारण पाच कोटी वर्षांपूर्वी नरवानरगणांचे पृथ्वीवर आगमन झाले. त्यांचे वंशज असलेल्या ‘होमो सॅपियन्सचा’, म्हणजे आपल्या आद्यपूर्वजांचा, साधारण दोन लाख वर्षांपूर्वी उद्भव झाला.
एखाद्या रचनेतून कोणत्या प्रकारची करामत साधायची याचा संकल्प आराखडा अभियंत्याकडे असतो. संकल्पित क्रिया त्या रचनेतून साध्य व्हावी याकरिता आपल्या गरजेनुसार  तो योग्य साहित्याची निवड करतो आणि पूर्वनियोजित रीतीने त्यांची रचना करतो. नैसर्गिक निवड मात्र अगदी विरुद्ध स्वरूपाची प्रक्रिया आहे. तिच्यात दूरदृष्टीचा अभाव असतो आणि एखाद्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ती कार्यरत होत नाही. किंबहुना ती एक शुद्ध नैसर्गिक प्रक्रिया असते, भौतिकरासायनिक आणि जैविक घटकांच्या परस्परांवरील परिणाम करणाऱ्या गुणधर्माचे फलित असते. सजीवांमधील प्रजोत्पादनाची वाढ विषम असल्यामुळे नैसर्गिक निवड कार्यरत होते. तिच्या जडणघडणीत पर्यावरणाची मुख्य भूमिका असते. त्यामुळे तिच्यात हेतुपूर्वकतेचा काहीसा आभास होतो. सरस प्रजोत्पादन क्षमता ही जनुकीय गुणभिन्नतेवर, परिसर व काळावर अवलंबून असते. पण नैसर्गिक निवड भविष्यातील पर्यावरणांचा वेध घेऊ शकत नाही. एरवी उत्तम अनुकूलन साधलेल्या सजीवांनासुद्धा पर्यावरणातील आकस्मिक किंवा मूलभूत बदलांवर मात करणे जवळपास अशक्यप्राय असते. जाती र्निबध होणे ही उत्क्रांती प्रक्रियेच्या इतिहासातील सर्रास घटना आहे. नवीन जातींची उत्पत्ती आणि त्यांचे यथावकाश नष्ट होणे या घटनांची गोळाबेरीज म्हणजे वर्तमानातील हयात जाती. ९९ टक्क्यांपेक्षा जास्त जीवजाती कालौघात नष्ट झाल्या आहेत. एक अब्जापेक्षा अधिक जीवजाती आजतागायत उत्क्रांत झाल्या असाव्यात. सुमारे १ कोटी जीवजाती हयात असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी २० लाख जीवजातींची मोजदाद करून सूची करण्यात आपल्याला यश आले आहे.
नैसर्गिक निवडीद्वारे घडणाऱ्या उत्क्रांतीची तुलना टंकलेखन करणाऱ्या माकडांशी करणे दिशाभूल करणारे आहे. अक्षरे किंवा शब्दांची अर्थपूर्ण जोडणी निवडणारे ‘कुणीतरी’ असते असे या संदर्भात गृहीत धरले जाते. परंतु अनुकूलयोग्य जनुकीय संयुगे निवडण्याचे कार्य उत्क्रांती प्रक्रियेत दुसरा ‘कुणीतरी’ करीत नसतो. सरस अनुकूलन साध्य करणारी जनुकीय संयुगे स्वत:चीच निवड (स्वयंवरण- Self Selection)) करतात. संख्याबळ वाढविण्याची त्यांची सरस क्षमता या स्वयंप्रेरणेला कारणीभूत असते.
सजीवांची अनुकूलनक्षम शरीररचना (संघटना- Organisation)), वैविध्य आणि उत्क्रांती यांचे स्पष्टीकरण नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेद्वारा देता येते. जगण्याची परिस्थिती पुष्कळ व विविध प्रकारे सतत बदलत असते. त्या परिस्थितीशी अनुकूलन साधल्यामुळे नैसर्गिक निवड सक्रिय होते. उत्क्रांतीला कुठलेही पूर्वनियोजित अंतिम लक्ष्य गाठायचे नसते. त्यामुळेच तिच्या प्रवासाचा आलेख सैरभैर (Haphazard) असतो. या दिशाहीन वाटचालीचे प्रतिबिंब जीवाश्मांच्या इतिहासक्रमात पाहावयास मिळते.
अनुकूलनक्षम प्रसरणे (Adaptive radiations), परिसरांचे विस्तार (habitat expansions), उत्क्रांतीची धुरा वाहणाऱ्या सजीवांच्या कायापालटांची मालिका (relays of one form by another), अधूनमधून पण अनियमितपणे उद्भवणाऱ्या वृत्ती (occasional but irregular trends) आणि जीवजाती नाश पावण्याच्या नित्य घडणाऱ्या ((extinctions), या सर्व घटनांचे समाधानकारक स्पष्टीकरण सजीवांच्या नैसर्गिक निवडीत (Natural Selection of Organisms) आहे. परंतु ही निवड जनुकीय उत्परिवर्तनाची स्वैरवृत्ती व पर्यावरणाचे आव्हान यांनी प्रभावित व बाधित असते. कुठल्याही स्वरूपाच्या विधिलिखित योजनेच्या आधाराशिवाय या जैविक घटनांचा वैज्ञानिक वृत्तांत देता येतो. या घटना एखाद्या सृष्टिनियमबाह्य़, सर्वज्ञ व सर्वशक्तिमान निर्मात्याने (an omniscient and all powerfull designer) योजलेल्या नसतात किंवा एखाद्या आंतरिक शक्तीने (immanent force) पूर्वनियोजित उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांना चालना दिलेली नसते. एखादे चित्र किंवा कलाकृतीपेक्षा जैविक उत्क्रांती सर्वस्वी भिन्न असते; त्याचे कारण कोणत्याही प्रकारच्या पूर्वनियोजित आकृतिबंधाची ती निष्पत्ती नसते.
सजीवाचे आकृतिबंध नैसर्गिक निवडीद्वारे साकारतात. साहजिकच लाभार्थी शरीरांमध्ये टिकाव धरणे व प्रजोत्पादन यांची संभाव्यता वृद्धिंगत होते. हानिकारक किंवा कमी अनुकूलनक्षम गुणधारकांवर मात करण्यात ते यशस्वी होतात. सजीवांच्या अनुकूलनांचे योगायोगावर आधारित विवेचन विश्वसनीय व संभवनीय असूच शकत नाही. पॅलेचा हा युक्तिवाद एका विशिष्ट मर्यादेपर्यंत योग्य आहे. पण डार्विनपूर्वी पॅलेसहित इतर कुणाच्याही काकदृष्टीला या अ-स्वैर (nonrandom) भौतिक प्रक्रियेचे (नैसर्गिक निवड) अस्तित्व जाणवले नाही. ही प्रक्रिया केवळ अ-स्वैर नसते तर दिशादर्शक असते. तिच्यात व्यवस्था उत्पन्न करण्याची आणि ‘नवनिर्मितीची’ क्षमता असते. सजीवांनी त्यांच्या उत्क्रांती इतिहासातून आत्मसात केलेले गुणधर्म योगायोगाने प्राप्त केलेले नसतात; ते गुणधर्म क्रियाशील उपयुक्ततेच्या (functional utility) निकषांनुसार निर्धारित होतात. सजीवांच्या जीवनविषयक गरजा भागविण्यासाठी जणू त्या गुणधर्माना ‘आकृतिबंध’ प्राप्त झालेला असतो.
योगायोग हा उत्क्रांती प्रक्रियेचा अविभाज्य घटक असतो. नैसर्गिक निवडीला उपलब्ध होणारी आनुवंशिक गुणभिन्नता उत्परिवर्तनांच्या आकस्मिक (chance) निर्मितीत असते. ज्या शरीरात ते उत्पन्न होतात, त्याच्या लाभ अथवा हानीबाबत त्यांची बांधिलकी नसते. पण उत्परिवर्तन आणि नैसर्गिक निवड या परस्परविरोधी प्रक्रिया आहेत. जीवनाच्या या महान मंचावर भूमिका बजाविणाऱ्या इतर सर्व स्वैर प्रक्रियांच्यासुद्धा विरोधात नैसर्गिक निवड सक्रिय असते (उदा. जनुकीय विचलन- Genetic drift). नैसर्गिक निवडीद्वारे उपयोगी गुणभिन्नतांचे संरक्षण होते आणि त्यांचे संख्याबळ वाढते. त्याप्रमाणे जे हानिकारक आहेत त्यांना नष्ट केले जाते. आनुवंशिक उत्परिवर्तनाशिवाय उत्क्रांती घडू शकत नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुणभिन्नता संक्रमित होण्याचे विषम प्रमाण त्याशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. पण त्याचबरोबर नैसर्गिक निवडीच्या अभावी, केवळ उत्परिवर्तन प्रक्रियेतून, अव्यवस्था व र्निवश होण्याचा धोका संभवतो. बहुतेक उत्परिवर्तने अपायकारक असतात हे या संभाव्यतेचे कारण आहे. उत्परिवर्तन व नैसर्गिक निवड यांच्या परस्पर सहयोगामुळे एका अभूतपूर्व उत्क्रांती प्रक्रियेला चालना मिळाली आहे. अतिसूक्ष्म जीवाणूंच्या नांदीने प्रारंभ झालेल्या या जीवननाटय़ात कालांतराने आमरी (ऑर्किड), पक्षी आणि मानव यांचे आगमन झाले. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार योगायोग व अनिवार्यता यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्परसंबंधातून जीवाची धारणा होते. निखळ अपघात (अनिश्चित व अनियमित- randomness) व अढळ नियमबद्ध (निश्चित व नियमिती determinism) यांची सांगड या प्रक्रियेत घातली गेली आहे. त्यामुळे अतिशय जटिल, वैविध्यपूर्ण आणि सुंदर अशी सजीवांची रूपे या विश्वात बहरली आहेत. आपली पृथ्वी मानवासह सर्व सजीवांचे वसतिस्थान आहे. मानव विचार व प्रेम करू शकतात. त्यांना इच्छास्वातंत्र्य व सर्जनशीलतेची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. आपल्या मानववंशाला जन्म देणाऱ्या उत्क्रांती प्रक्रियेचे विश्लेषण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ही जन्मदाती सर्जनशील आहे, परंतु तिला आत्मभान (अस्तित्वाची जाणीव) नाही. कुणाही निर्मात्याशिवाय निर्मिती करणे या प्रक्रियेला शक्य आहे. अशा या विलक्षण प्रक्रियेचा शोध हे डार्विनचे मूलभूत योगदान आहे.
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो