धमाल, रंगारंग ‘असेही नाटय़संमेलन’!
मुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> धमाल, रंगारंग ‘असेही नाटय़संमेलन’!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

धमाल, रंगारंग ‘असेही नाटय़संमेलन’! Bookmark and Share Print E-mail
‘माझ्या नाटकांतून संस्कृतीतील विकृती आणि विकृतीतील संस्कृती दाखविण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. हे करत असताना प्रेक्षकांचं निखळ मनोरंजनही व्हायला हवं, ही माझी भूमिका असते. आणि मी माझ्या या भूमिकेशी प्रामाणिक राहत आलेलो आहे. त्यावरून समीक्षकांकडून माझ्यावर टीकाही होते. पण या टीकेमुळेच मी सतर्कही राहत आलोय. त्यामुळेच माझ्या नाटकांतून विषयांचं वेगळेपण आणि फ्रेशनेस जाणवतो,’ असे उद्गार तरुण नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेते संतोष पवार यांनी ‘असेही एक नाटय़संमेलना’च्या अध्यक्षपदावरून बोलताना काढले.
नाटय़क्षेत्रातील कलंदर व्यक्तिमत्त्व असलेल्या अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ‘वन मॅन शो’ नाटय़संमेलनाला काल रवींद्र नाटय़मंदिरात रसिकांनी ‘न भूतो- न भविष्यती’ अशी गर्दी केली होती. नाटय़कर्मीच्या सक्रीय सहभागातून भरलेल्या या संमेलनात रटाळ भाषणं, चर्चा, परिसंवाद यांना सपशेल फाटा देऊन नृत्य- नाटय़-संगीत, हास्यविनोद, हृद्य सत्कार आणि आपुलकीचे पुरस्कार यांना प्राधान्य दिलं गेलं होतं. अभिनेत्री फैय्याज, हिंदी-मराठी चित्रपटांचा चालता-बोलता ज्ञानकोश इसाक मुजावर आणि स्मृतिचिन्हकार विजय सोनावणे यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सुलभा देशपांडे, शिरीष कणेकर आणि गोपी कुकडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गौतम राजाध्यक्ष यांचं ‘चेहरे’ हे पुस्तक देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. तर अरुण होर्णेकर, परेश मोकाशी, गुरू ठाकूर, सुनील बर्वे, समीरा गुजर आणि किशोरी अंबिये यांना कलाक्षेत्रातील कामगिरीबद्दल माझा पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले. आशालता वाबगावकर, निर्मिती सावंत, भरत जाधव, खा. भारतकुमार राऊत, अजय अंबेकर व रवींद्र आवटी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
‘कलावंताला म्हातारपणी संमेलनाचं अध्यक्षपद देऊन काहीही साध्य होत नाही. म्हणूनच मी ऐन उमेदीत असलेल्या संतोष पवार यांना संमेलनाध्यक्षपद आणि मकरंद अनासपुरे यांना स्वागताध्यक्षपद देऊन आपल्या पुढील वाटचालीत त्यांनी नव्या उमेदीनं पुढे जावं, या हेतूने हे केलं आहे. हे दोघं महाराष्ट्राचे लाफिंग गॅस आहेत. लोकांचं पुरेपूर मनोरंजन करण्याचा वसा त्यांनी घेतलेला आहे. हे संमेलन भरवताना माझ्यावरील प्रेमापोटी माझी सर्व नाटय़सृष्टी माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे. अतिशय अल्प खर्चात हे संमेलन होत आहे. केवळ प्रचंड पैशाच्या जोरावर संमेलने यशस्वी करता येत नाहीत, हेच यातून सिद्ध होतं.’
स्वागताध्यक्ष मकरंद अनासपुरे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात या आगळ्या संमेलनाचं वैशिष्टय़ कथन केलं. चित्रपटांतून वेळात वेळ काढून नाटक करायला मला आवडेल, परंतु त्यासाठी चांगले नाटक मिळावे, अशी आपली अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष संतोष पवार व स्वागताध्यक्ष मकरंद अनासपुरे यांचा सत्कार करण्यात आला. नाडकर्णी यांनी आपल्या भाषणात, या दोघांनी केवळ मनोरंजनपर नाटकं व चित्रपटांपुरते सीमित न राहता वैचारिक-बौद्धिक मनोरंजन करणारी नाटकंही करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या संमेलनात अध्यक्ष व स्वागताध्यक्ष हे केवळ बहुमानाचे धनी नव्हते, तर प्रत्यक्ष रंगमंचीय आविष्कारांतही ते सहभागी झाले होते. संमेलनातील विनोदी प्रहसने संतोष पवार यांनी लिहून स्वत:च दिग्दर्शित केली होती. मकरंद अनासपुरे व संतोष पवार यांनी आबूराव-बाबूरावची धमाल जुगलबंदी सादर केली. सोनिया परचुरे यांनी गणेशवंदनेसह राग जनसंमोहिनीवर आधारित कथकनृत्य सादर केलं. त्यांच्या शिष्यांनी उत्तरार्धात ‘नटरंग’मधील ‘अप्सरा आली..’ ही लावणी कथक शैलीत सादर करून संमेलनात रंगत आणली.    
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो