वन मॅन आर्मीचं संमेलन
मुखपृष्ठ >> बातम्या >> वन मॅन आर्मीचं संमेलन
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वन मॅन आर्मीचं संमेलन Bookmark and Share Print E-mail
प्रतिनिधी
एखादा भव्यदिव्य कार्यक्रम करायचा असेल तर त्यासाठी प्रचंड पैसा, सत्ता आणि मनुष्यबळ लागतं, हा आजवरचा आपला अनुभव. चतुरंग प्रतिष्ठानसारख्या पारदर्शी कारभार असलेल्या सांस्कृतिक संस्थेकडेही सत्ता व पैशांचं पाठबळ नसलं तरी दांडगा लोकसंग्रहआणि समर्पित कार्यकर्त्यांचं मोहोळ या बळावर अनेक भव्य उपक्रम ते सहजगत्या यशस्वी करतात. गेल्या अनेक वर्षांचं चतुरंगचं सांस्कृतिक व सेवाभावी कार्य लोकांसमोर आहेच. त्याचाही लाभ त्यांना त्यांच्या उपक्रमांच्या यशस्वीतेकरता होत असतो. या पाश्र्वभूमीवर अशोक मुळ्ये या नाटय़क्षेत्रातील वल्लीचं सगळंच उफराटं असूनही ते असेच मोठे उपक्रम एकहाती यशस्वी करताना दिसतात, त्याचं आश्चर्य वाटतं. त्यांचं नको इतकं परखड वागणं-बोलणं आणि समोरची व्यक्ती जरा जरी आपल्या मनाविरुद्ध वागली (ती व्यक्ती मूलत: कितीही चांगली असली तरीही!) तरी तिला तटकन् तोडून टाकायलाही मुळ्ये मागे-पुढे पाहत नाहीत. त्यांचा हा एककल्ली स्वभाव पाहता हा मनुष्य मोठमोठे कार्यक्रम खिशात दिडकी नसतानाही कसा काय यशस्वी करू शकतो, हा चमत्कारच वाटतो. त्यांच्या दहशतवादी प्रेमाखातर अनेकजण त्यांच्या पाठीशी उभे राहतात, असं म्हटलं जातं. परंतु हेही अर्धसत्य आहे. कारण तसं असतं तर लोक फार फार तर एकदा वा दोनदा त्यांच्यामागे उभे राहतील. परंतु ते कायम त्यांची पाठराखण करणं अवघड. मुळ्ये यांना मानणारे, त्यांच्या प्रामाणिक, पारदर्शी स्वभावामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या या नाना उचापतींमुळे कधी कधी वैतागतही असतील; परंतु तरीही त्यांचे सगळे हट्टाग्रह ते पुरवतात, त्यांच्या उपक्रमांमागे पैशाचं पाठबळ उभं करतात, त्यांच्यासाठी राब राब राबतात, यामागचं रहस्य उकलत नाही.
तर अशा अशोक मुळे यांनी नुकतंच तरुण नाटय़कर्मीचं ‘असेही एक नाटय़संमेलन’ भरवलं होतं. या संमेलनाच्या आयोजनातही ‘जीवनगाणी’चे प्रसाद महाडकर, नाटय़सृष्टीतील एरव्ही परस्परांविरुद्ध कारवाया करणारी मंडळी मुळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. या संमेलनात नेहमीच्या संमेलनांसारखे रीतसर अध्यक्ष व स्वागताध्यक्ष नेमले गेले होते. नाटककार-दिग्दर्शक संतोष पवार आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांना अध्यक्ष व स्वागताध्यक्ष म्हणून निवडलं होतं. मात्र, त्यांना बहुमानाचे गणपती न बनवता प्रत्यक्ष रंगमंचावरील कार्यक्रमांमध्येही त्यांचा सक्रीय सहभाग होता. या दोघांनी नाटय़विषयक गंभीर विचार वगैरे मांडण्याच्या भानगडीत न पडता आपल्या प्रवासासंबंधात आपल्याला नेमकं काय वाटतं, याबद्दलचं विवेचन केलं. मकरंद अनासपुरे यांनी आपल्या घडणीत हौशी रंगभूमीवर झालेले आपले फटफजितीचे किस्से कसे कारणीभूत ठरले, हे कथन करून त्यांतून अनेक गोष्टी आपण कसे शिकलो, हे सांगितलं. नाटक लिहिताना व ते दिग्दर्शित करताना आपली नेमकी काय भूमिका असते, हे संतोष पवार यांनी स्पष्ट केलं. नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी या अध्यक्षद्वयीला उपदेशामृत पाजताना, ‘तुम्ही एकाच साच्यात अडकू नका. प्रेक्षकांचं मनोरंजन करता करता पुढे वैचारिक, गंभीर नाटकाकडेही वळा,’ असा सल्ला दिला.
खरं तर नाटय़संमेलनापेक्षा हा व्हरायटी एन्टरटेन्मेंट प्रोग्राम अधिक होता. अशोक मुळ्ये यांनी प्रास्ताविकात नेहमीची फटकेबाजी करत नाटय़-व्यावसायिकांचं गुणगान करतानाच त्यांना कानपिचक्याही दिल्या. कुठल्याही वादविवादांशिवाय या संमेलनाचे अध्यक्ष-स्वागताध्यक्ष निवडले गेले ते आपल्या एकाधिकारशाहीमुळेच, असे ते म्हणाले. कमीत कमी पैशांत भरवलं गेलेलं आणि कुठल्याही रुसव्याफुगव्यांशिवाय पार पडलेलं हे संमेलन आपल्यावरील लोकांच्या निरपेक्ष प्रेमामुळेच यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. शीतल तळपदे, सुनील देवळेकर, सोनिया परचुरे, प्रसाद महाडकर, विजय केंकरे, दिनू पेडणेकर, चंद्रकांत लोकरे, संतोष शिदम, निर्मिती सावंत, सुकन्या कुलकर्णी, विनय येडेकर, उषा नाडकर्णी, दिलीप जाधव आदी नाटय़कर्मीसह पडद्यामागील अनेक रंगमंच कलावंत या संमेलनाच्या यशस्वीतेकरिता झटले. म्हणूनच हे संमेलन इतक्या उत्साहात आणि रसिकांच्या तुडुंब गर्दीत पार पडू शकले, अशी कृतज्ञतेची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
परेश मोकाशी, अरुण होर्णेकर, समीरा गुजर, सुनील बर्वे, गुरू ठाकूर, किशोरी अंबिये यांना यावेळी माझा पुरस्कारांनी गौरविण्यात आले. हिंदी-मराठी चित्रपटांचे चालते-बोलते ज्ञानकोश इसाक मुजावर, ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज आणि स्मृतिचिन्हकार विजय सोनावणे यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
इसाक मुजावर यांचा हृद्य परिचय शिरीष कणेकर यांनी करून दिला.
‘गिरच्या जंगलातील सिंहांप्रमाणे इसाक मुजावरांसारख्या व्यासंगी व्यक्तींचं रक्षण आपण करायला हवं,’ असे उद्गार कणेकर यांनी यावेळी काढले. इसाक मुजावर यांच्या सखोल चित्रपट व्यासंगाचे अनेक किस्से त्यांनी कथन केले. भालजी पेंढारकरांच्या चित्रपटातून राज कपूरने पदार्पण केले तेव्हा भालजींनी त्यांना पाच हजार रुपये मानधन दिले होते. परंतु राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी ‘पाच हजार रुपया मानधन लेने की मेरे बेटे की हैसियत है क्या?’ असा सवाल भालजींना केला होता आणि ते पैसे परत देऊ केले होते. परंतु भालजींनी ते घेण्यास नकार दिला. तेव्हा त्या पैशांतून चेंबूरच्या स्टुडिओचा प्लॉट घेतला गेल्याचा किस्सा मुजावर यांनी याप्रसंगी सांगितला. नाटय़कर्मीचं स्नेहसंमेलन आणि मनोरंजनपर कार्यक्रम असं या स्वरूप असलेल्या या संमेलनाचा रसिकांनी मात्र पुरेपूर आनंद लुटला.  
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो