महात्मा जोतिराव फुले यांचे नाटक - तृतीय रत्न
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महात्मा जोतिराव फुले यांचे नाटक - तृतीय रत्न Bookmark and Share Print E-mail
पुणे वृत्तान्त
श्रीराम रानडे
‘‘महात्मा जोतिराव फुले हे कर्ते समाजसुधारक होते. शूद्रातिशूद्रापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी त्यांनी भगीरथासारखे अखंड परिश्रम केले. आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी नाटक या माध्यमाचाही उपयोग केला. दि. २८ नोव्हेंबर हा जोतीबा फुले यांचा स्मृतिदिन . या पवित्र दिवसाचे औचित्य साधून महात्मा फुले यांनी लिहिलेल्या ‘तृतीय रत्न’ या नाटकाविषयी..’’
विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। हे सारे अनर्थ एका अविद्येने केले।।
हे अनर्थ दूर करण्यासाठी जोतिराव फुल्यांनी व्रत घेतले शूद्रातिशूद्रांना शिक्षण देण्याचे! ‘शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे’, या सिद्धांतावर जोतीरावांचा पूर्ण विश्वास होता. त्याचबरोबर दलाली आणि मक्तेदारीविरुद्ध बंडखोरी ही त्यांची निष्ठा होती. या कार्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपली वाणी, लेखणी वापरली. प्रत्यक्ष कृतीमधून समाजाला प्रेरणा दिली. मानव्याची आच निर्माण करण्यासाठी माणूस प्रथम जागा केला पाहिजे, या जाणिवेने फुल्यांनी साहित्य निर्माण केले. त्या साहित्य प्रकारात त्यांनी नाटक हा प्रकारसुद्धा वापरला. त्यांनी लिहिलेल्या नाटकाचे नाव ‘तृतीय रत्न’!
तृतीय रत्न या नाटकाचा सारा इतिहासच मुळी नाटय़पूर्ण आहे. पण हे नाटक प्रत्यक्ष लिहिण्यापूर्वी जोतिबा फुल्यांची जडणघडण कशी होत होती हे पाहणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. १८४१ ते ४७ या काळात जोतिबांचे माध्यमिक शिक्षण इंग्रजी मिशनरी शाळेत झाले होते. १८४७ साली टॉमस पेनच्या ‘राइट्स ऑफ मॅन’ या क्रांतिकारक ग्रंथाचे त्यांचे वाचन झाले होते. १८५४ मध्ये त्यांनी स्कॉटिश मिशनरी शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली होती. थोडक्यात जोतिबा फुल्यांची कार्याची दिशा अस्पष्टशी का होईना तयार झाली होती. १८४८ मध्ये त्यांनी शूद्रातिशूद्र मुलींसाठी शाळा काढली. तेव्हा जोतीबांचे वय अवघे २१ वर्षांचे होते आणि वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी नाटक लिहिले ‘तृतीय रत्न’. त्यावेळी त्यांच्या स्वतंत्र विचारांची सिद्धता झाली होती आणि नाटक या माध्यमामधून आपले विचार समाजासमोर मांडू शकू याची खात्रीही त्यांना वाटत होती. तृतीय रत्न नाटक लिहिण्याचा आपला हेतू जोतिबांनीच एके ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेला आहे. जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या नि:पक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून सन १८५५ सालात दक्षिणा प्राइझ कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वत:च्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली.
तृतीय रत्न या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी आजतरी काहीही ठोस पुरावा उपलब्ध नाही. मात्र मधे १२५ वर्षांचा दीर्घकाळ लोटल्यानंतर इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह तृतीय रत्न हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर तृतीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. प्रारंभी ‘त्रितीय’ असा शब्द होता, असेही दिसते. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात ही एक नाटय़पूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ १८४३ साली विष्णुदास भावे यांनी केला. पण मराठी नाटय़लेखन १८५६ साली प्रथम झाले आणि ते गो. म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई पण तृतीय रत्न (तृतीय नेत्र) या १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.
जोतिबा फुले हे एक परिवर्तनवादी चळवळ चालवित होते. आपली चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता. तृतीय रत्न या नाटकात त्यांनी अत्यंत प्रभावीपणे याचा उपोयग केलेला आहे, हे दिसून येते.
या नाटकाला म्हटले तर तसे कथानक नाही. त्यामुळे नायक, नायिका, खलनायक अशी पात्रे नाहीत. एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठच पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वत:चे असे चेहरे नाहीत. कारण नाटकाची संकल्पनाच मुळी प्रातिनिधिक पातळीवर झालेली आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसऱ्या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे आणि या नाटकाचा मथितार्थ म्हणजे शूद्रातिशूद्रांनो उठा, जागे व्हा. शिक्षण घ्या. शहाणे व्हा. डोळस बना. विद्येचा तृतीय नेत्र उघडा.
नाटक म्हणून तृतीय रत्नचे लेखन सलग झालेले असले तरी ती अनेक प्रवेशांची मालिकाच आहे आणि लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाटय़ किंवा वगनाटय़ (वग म्हणजे ओघ. कथानक मधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) दोन फेऱ्या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाटय़ात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्नची आहे. ठराविक नाटय़गृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केलं जावं अशीच याची अत्यंत लवचिक रचना आहे. ‘पथनाटय़’ म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे.
या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाटय़रचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे.
हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब त्याला साधलेले आहे आणि तेसुद्धा नाटय़कथानकात जरासाही खंड न येऊ देता! नमुन्यासाठी एकच उदाहरण येथे देतो..
बाई : (किंचित भय वाटून म्हणते) तर ते (ग्रह) मजला पीडा करीत आहेत काय?
जोशी : तुला तर नाही. पण तुझ्या होणाऱ्या मुलाच्या मुलावर फार ते टपले आहेत. माझ्याने सांगवत नाही. त्यांचा ते शेवट कसा करतील.
यावर विदूषकाची प्रतिक्रिया पाहा..
विदूषक - जोशी जर मरणापासून माणसे वाचवितात तर इंग्रज सरकार सर्व औषधी उपाय करण्यास एकीकडे ठेवून, सर्व इस्पितळेही मोडून ते सर्व काम जोशाच्या गळ्यात का बांधीत नाही?
तमाशातला कसबी सोंगाडय़ा जशा हजरजबाबीपणा करून प्रेक्षकांना जागवत असतो, तोच प्रकार जोतिबांच्या विदूषकाने केलेला आहे. ‘तृतीय रत्न’ हे नाटक आता वाचकांसाठी उपलब्ध आहे. शिवाय या नाटकासंबंधीचे विविध लेख प्रा. दत्ता भगत, डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. अरविंद वामन कुलकर्णी (विस्मरणात गेलेली नाटके), प्रा. सीताराम रायकर यांनी लिहिलेले आहेत. अभ्यासकांनी आणि जिज्ञासू वाचकांनी ते जरूर वाचावेत. जोतिबा फुल्यांनी पुढील काळात ‘ब्राह्मणाचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शिवाजीराजाचा पोवाडा’, ‘शेतकऱ्याचा आसूड’, ‘अखंडाची रचना’ असे विपुल लेखन केले. ‘सत्यशोधक समाज’ हे तर त्यांच्या विचारांचे, प्रयत्नांचे मूर्त स्वरूपच म्हणता येईल. पण तरीही ‘तृतीय रत्न’ हे नाटक लिहून फुल्यांनी नाटय़क्षेत्रात जे अमोलिक योगदान दिले त्याविषयी मराठी नाटय़प्रेमी त्यांची ऋणाईतच राहील. महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन! तुम्हा तो सुखकर हो शंकर!
 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो