‘मिफ्टा’चा दिमाखदार सोहळा
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> ‘मिफ्टा’चा दिमाखदार सोहळा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

‘मिफ्टा’चा दिमाखदार सोहळा Bookmark and Share Print E-mail
मराठी भाषा, कलेच्या उत्कर्षांसाठी झटणे हे माझे कर्तव्यच - अमिताभ बच्चन
समीर परांजपे
दुबई, १९ डिसेंबर

महाराष्ट्राच्या भूमीने मला व माझ्या परिवाराला सर्वकाही दिले. महाराष्ट्रातील भाषा व कला यांच्या उत्कर्षांसाठी झटणे हे मी माझे कर्तव्य समजतो. त्याचदृष्टीने गेल्या काही वर्षांपासून आम्ही मराठी चित्रपटांची निर्मिती करीत आहोत. मराठी नाटक व चित्रपट खऱ्या अर्थाने आता आंतररराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून ‘मिफ्टा’ महोत्सवाने या प्रकियेला अधिकच वेग येणार आहे असे प्रतिपादन बिग बी अमिताभ बच्चन यांनी केले.
दुबई येथील पॅलेडियम या भव्य सभागृहामध्ये शुक्रवारी संध्याकाळी सुरु झालेला सोहळा रात्री उशीरापर्यंत उत्तरोत्तर रंगत गेला. या प्रसंगी अमिताभ बच्चन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी केलेल्या भाषणाने दुबईस्थित तसेच अन्य देशांतून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या मराठी जनांची मने जिंकून घेतली.
‘मिफ्टा’ चा हा पहिलावहिलाच भव्य सोहळा होता. अश्वमी थिएटर्स, राजा-राणी ट्रॅव्हल्स व लवासा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या या कार्यक्रमाचा हेतू विषद करताना अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले की, मराठी नाटक व चित्रपट हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर जावे, जगभरातील लोकांना त्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘मिफ्टा’चा घाट घातला आहे. ‘मिफ्टा’चा पुढील वर्षीचा कार्यक्रम हा लंडनमध्ये आयोजिण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. या समारंभात प्रख्यात समाजसेवक डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘मिफ्टा’ कार्यक्रमात विविध कलाप्रकारांतील पुरस्कारविजेते कोण असतील याची उत्सुकता साऱ्यांनाच लागलेली होती. गेल्या दोन वर्षांतील मराठी चित्रपटांचे परीक्षण करून सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला तो ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाला. मराठी चित्रपटांतील सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सचिन खेडेकर (मी शिवाजी राजे भोसले बोलतोय) आणि भरत जाधव (झिंग चिक झिंग) यांना विभागून, तर सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मुक्ता बर्वे (मुंबई-पुणे-मुंबई) यांना प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेला मराठी चित्रपट या गटात विहीर या चित्रपटाला मिळालेला पुरस्कार अमिताभ बच्चन यांनी उद्योगपती अजित गुलाबचंद यांच्या हस्ते स्वीकारला. या सोहळ्यादरम्यान सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, उमेश जाधव, मानसी नाईक, दिपाली सय्यद यांनी केलेल्या भन्नाट नृत्यांनी कार्यक्रमाची लज्जत वाढविली. ‘लिटिल चॅम्पस्’ आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत यांनी काही गाणी सादर केली. प्रख्यात गायिका पद्मजा फेणाणी, अजित परब व स्वप्नील बांदोडकर यांच्या सुश्राव्य गायनाने उपस्थित मराठी रसिकांवर गारुड केले.    
मराठी नाटय़विभाग
सवरेत्कृष्ट नेपथ्य - प्रदीप मुळ्ये (व्हाईट लिली नाईट रायडर), सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना - शीतल तळपदे (एक लफडे न विसरता येणारे), सवरेत्कृष्ट संगीत - मयुरेश माडगावकर (एक लफडे न विसरता येणारे), सवरेत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - मृणाल चेंबूरकर (काय डेंजर वारा सुटलाय), सवरेत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - भालचंद्र कदम (बाजीराव मस्तानी), सवरेत्कृष्ट अभिनेत्री - रसिका जोशी (व्हाईट लिली नाईट रायडर), सवरेत्कृष्ट अभिनेता - मोहन आगाशे (काटकोन -त्रिकोण), सवरेत्कृष्ट लेखक - डॉ. विवेक बेळे (काटकोन-त्रिकोण), सवरेत्कृष्ट दिग्दर्शक - गिरीश जोशी (काटकोन- त्रिकोण), सवरेत्कृष्ट सामाजिक आशय असलेले नाटक - काय डेंजर वारा सुटलाय ( लेखक - जयंत पवार), सवरेत्कृष्ट नाटक - काटकोन- त्रिकोण.
मराठी चित्रपट
सवरेत्कृष्ट चित्रपट कलादिग्दर्शक - नितीन चंद्रकांत देसाई (हरिश्चंद्रांची फॅक्टरी), सवरेत्कृष्ट ध्वनिमुद्रण - अँथनी रुबीन व प्रमोद थॉमस (विहीर), सवरेत्कृष्ट संकलन - सर्वेश ( मी शिवाजीराजे भोसले बोलतोय), सवरेत्कृष्ट कथा- जयंत पवार ( लालबाग-परळ), सवरेत्कृ ष्ट पटकथा -परेश मोकाशी (हरिश्चंद्राची फॅक्टरी), सवरेत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक - उमेश जाधव (हुप्पा हुय्या), सवरेत्कृष्ट छायाचित्रकार - संजय जाधव (जोगवा), सवरेत्कृष्ट संगीत - नटरंग (अजय- अतुल), सवरेत्कृष्ट गायिका - बेला शेंडे (नटरंग).
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो