नागपुरात होणार स्वाइन फ्लूची चाचणी ; डॉ. शिवकुमार चौहाण यांची घोषणा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नागपुरात होणार स्वाइन फ्लूची चाचणी ; डॉ. शिवकुमार चौहाण यांची घोषणा Bookmark and Share Print E-mail
नागपूर, १९ ऑगस्ट / प्रतिनिधी
‘स्वाइन फ्लू’संदर्भात रक्त आणि लाळेची तपासणी करण्यासाठी प्रिव्हेन्टिव्ह जेनेटिक डायग्नोस्टिक सेंटर (प्रिजीन) सुरू करण्यात येत असल्याची माहिती सेंटरचे संचालक डॉ. शिवकुमार चौहाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात फक्त पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही)मध्ये स्वाइन फ्लूची चाचणी करण्यात येत आहे. सध्याची परिस्थती बघता एन.आय.व्ही. वर चाचणीचा व्याप वाढला आहे त्यामुळे स्वाईन फ्लूच्या रिपोर्ट येण्यासाठी बराच विलंब लागतो. त्यामुळे नागपुरात या चाचणीची सोय करण्यात आली आहे. अजनी चौकातील प्रिव्हेन्टिव्ह जेनेटिक सेंटरमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गाईडलाईनप्रमाणे या सेंटरमध्ये ‘स्वाइन फ्लू’संदर्भातील चाचण्या होणार आहे. प्रयोग शाळेत स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या रुग्णाला मास्क सुद्धा देण्यात येणार आहे. प्रयोगशाळेत २४ तासात स्वाइन फ्लूचे निदान कळू शकेल, असा दावा डॉ. चौहाण यांनी केला आहे. या चाचणीसाठी जे साहित्य वापरण्यात येणार आहे ते डब्ल्यूएचओ प्रमाणित आहेत. एका दिवसात २०० रुग्णांची तपासणी करण्यात येणार असल्याचा दावा डॉ. चौहाण यांनी केला. पत्रकार परिषदेला सतिश रेहपाडे, अग्रवाल उपस्थित होते.