संक्षिप्त : पर्यावरण संतुलित योजनांसाठी १८३ ग्रामपंचायतींची निवड
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संक्षिप्त : पर्यावरण संतुलित योजनांसाठी १८३ ग्रामपंचायतींची निवड Bookmark and Share Print E-mail
मराठवाडा वृत्तान्त
जालना, ४ एप्रिल/वार्ताहर
जिल्ह्य़ातील १८३ ग्रामपंचायतींना पर्यावरण संतुलित ग्रामविकास योजने अंतर्गत एकूण ५ कोटी ७४ लाख रुपये निधी शासनाने मंजूर केला असून त्यापैकी १ कोटी ९४ लाख रुपये जिल्हा परिषदेस मिळाले आहेत. गावपातळीवर पर्यावरण रक्षणाच्या संदर्भात उपक्रम या योजनेंतर्गत राबवले जाणार आहेत.
गावपातळीवरील भौतिक विकासाची कामे हाती घेताना त्या परिसरातील वृक्ष, पाणी, जमीन, हवा इत्यादींचे योग्य संवर्धन करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याने शासनाने ही योजना हाती घेतली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोपवाटिका, वृक्षसंवर्धन, सांडपाण्याची विल्हेवाट, सौरऊर्जा पथदिवे, अपारंपरिक उर्जेचा वापर इत्यादी उपक्रम राबविण्यात यावेत, असा उद्देश आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीची पाणीपट्टी आणि घरपट्टीची वसुली किमान साठ ठक्के असणे आवश्यक आहे. त्याचसोबत गावातील साठ टक्के घरांमध्ये वैयक्तिक स्वच्छतागृहे आणि सांडपाण्याचे नियोजन व पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन आवश्यक आहे.
या अटींमुळे जिल्ह्य़ातील १९४ ग्रामपंचायतींनी या योजनेसाठी आपले प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी १८३ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ६५ ग्रामपंचायती भोकरदन तालुक्यातील तर ५० ग्रामपंचायती जाफराबाद तालुक्यातील आहेत. अंबड १६, जालना ७, बदनापूर ७, घनसावंगी ९, परतूर २० आणि मंठा १० याप्रमाणे अन्य तालुक्यांतील ग्रामपंचायतींची संख्या आहे. पर्यावरणाशी संबंधित उपक्रम राबविताना कुठल्या कामांना प्राधान्य द्यायचे, याचा निर्णय संबंधित ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत घ्यावयाचा आहे.    

जमिनीसाठी खून करणाऱ्या सावत्र मायलेकाविरुद्ध गुन्हा
जिंतूर, ४ एप्रिल/वार्ताहर

शेती हडपण्याच्या उद्देशाने तालुक्यातील भोगाव येथील मुंजाजी रामकिशन पुंजारे याचा सावत्र आई अन्सा रामकिसन पुंजारे आणि सावत्र भाऊ सुभाष रामकि सन पुंजारे यांनी संगनमत करून खून केला. मृत मुंजा याची पत्नी जना मुंजा पुंजारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मायलेकांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून खुनाच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आली आहे.
ाोगाव येथील मुंजा पुंजारे २ एप्रिलला शेतात जाण्यासाठी घरातून गेला तो परतलाच नाही. दि. ३ ला गावाबाहेरील विहिरीवर दुपारच्या वेळी भर उन्हात पोहण्यासाठी काही तरुण गेले असता एका गाठोडय़ात त्यांना मुंजाचा मृतदेह दिसला. पोलिसांनी सांगितले की, मुंजाची तीन एकर जमीन हडपण्याच्या उद्देशाने त्याची सावत्र आई अन्साबाई आणि सावत्रभाऊ सुभाष यांनी त्याचा खून केला. नंतर त्याचा मृतदेह जाळून एका गाठोडय़ात बांधून गावाबाहेरील विहिरीत फेकून दिला. या आरोपावरून वरील वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.    

अनधिकृत बांधकामांबद्दल वसमतमध्ये अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
हिंगोली, ४ एप्रिल/वार्ताहर

वसमतमधील अनधिकृत बांधकामे आणि लीजवर दिलेल्या जागेच्या संबंधाने नगराध्यक्ष मनीषा कडतन यांनी पत्र देताच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी  स्वच्छता निरीक्षक एच. पी. गवळी व अतिक्रमण विभागाचे सहायक ए. डी. सैंदाने यांना कारणे दाखवा नोटीस दिली.
श्रीमती कडतन यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना २८ मार्चला लेखी पत्र दिले.  शहरातील अनधिकृत आणि भाडेतत्त्वावर दिलेल्या सुमारे १०० ते १५० जागांच्या संबंधाने त्यांचा करार किती वर्षांसाठी आहे, याची विचारणा त्यांनी त्यात केली. याची नोंद नसताना अनेकांनी जागेचा उपयोग निवास आणि व्यवसायाच्या दृष्टीने अनधिकृत बांधकाम केले आहे. ही बाब गंभीर असून संबंधितांना नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करावी, असे पत्रात म्हटले होते.
हे पत्र मिळताच मुख्याधिकाऱ्यांनी श्री. गवळी व श्री. सैंदाने यांना २९ मार्चला कारणे दाखवा नोटीस दिल्या. त्यात म्हटले आहे की, वसमत शहरात अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे होत असल्याचे नगराध्यक्षांनी आदेशाद्वारे सादर केले आहे. यावरून आपण शहरात होत असलेले अतिक्रमणे, विनापरवाना बांधकामे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहात. अध्यक्षांनी वारंवार केलेल्या सूचना तसेच तोंडी आदेशाचे पालन होत नाही. ही बाब गंभीर असून शिस्तीविरुद्ध आहे. करिता तात्काळ शहरातील झालेले अतिक्रमण आणि विनापरवानगी बांधकामे आदींची स्वयं स्पष्ट लेखी अहवाल समक्ष सादर करावा अन्यथा आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अध्यक्षांनी नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देताच त्यांनी दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली. आता कर्मचारी शहरातील कोणकोणती अनधिकृत बांधकामे पाडून प्रशासनाला किती दिवसांत काय अहवाल देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.    

डॉ. परविंदरसिंग पसरिचा यांना हटवण्यासाठी उपोषण सुरू
नांदेड, ४ एप्रिल/वार्ताहर

गुरुद्वारा मंडळाचे अध्यक्ष डॉ. परविंदरसिंग पसरिचा यांना पदावरून हटवावे, या मागणीसाठी दहाव्या दिवशी साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान, पसरिचा हटाव मुद्दय़ावरून दोन गट पडले आहेत.
नांदेड गुरुद्वारा मंडळाचे अध्यक्ष परविंदरसिंग पसरिचा यांना पदावरून काढण्यात यावे, लोकनियुक्त मंडळ स्थापन करावे, तसेच पसरिचा यांच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला दिवसेंदिवस पाठिंबा मिळत आहे. शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे.
मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दुसरीकडे मंडळाचे सदस्य मोहनसिंग गाडीवाले यांनी माजी अध्यक्ष शेरसिंग फौजी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डॉ. पसरिचा यांच्या काळात मंडळाचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यांच्यामुळेच  गुरुद्वारा मंडळाची शतपटीने आर्थिक उन्नती झाली आहे. शिवाय संपूर्ण देश -विदेशात गुरुद्वारासाहिबचे नाव झाले आहे.
अशा व्यक्तींच्या विरोधात उपोषण करून दिशाभूल करणाऱ्या शेरसिंग फौजी यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.    

भारतीय संस्कृती जागविणारा उत्सव - डॉ. लहाने
लातूर, ४ एप्रिल/वार्ताहर

चैत्रपल्लवी संगीतोत्सव हा भारतीय संस्कृत जागविणारा उत्सव असल्याचे प्रतिपादन डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले.रणसम्राट क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित या उत्सवाचे उद्घाटन डॉ. लहाने यांच्या हस्ते झाले. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. व्यासपीठावर प्रा. जोगेंद्रसिंग बिसेन, श्याम कदम आदी उपस्थित होते. नववर्षांच्या स्वगाताला रुढी, परंपराची जोड देऊन नव्या पिढीसमोर आदर्श ठेवण्याचे काम होत असल्याबद्दल डॉ. लहाने यांनी मंडळाचे कौतुक केले. प्रा. देवेंद्र कुलकर्णी व चमूने सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. संदीप जगदाळे आणि शर्मिष्ठा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
भारताने विश्वचषक जिंकला. त्यात सचिन तेंडुलकरचे योगदान मोलाचे होते.
या कार्यक्रमप्रसंगी दीपक लोखंडे यांनी रांगोळीतून सचिन तेंडुलकरची प्रतिमा साकारली होती.    
प्रा. एकनाथ आबुज यांच्या ‘आई’ कथासंग्रहाचे प्रकाशन
बीड, ४ एप्रिल/वार्ताहर

मराठी साहित्यात गुन्हे कथा हा नवीन वाङ्मय प्रकार लोकप्रिय करणारे लेखक ज्येष्ठ पत्रकार प्रा. एकनाथ आबुज यांच्या ‘आई’ या कथासंग्रहाचे प्रकाशन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक संजयकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. आबुज यांचा हा सातवा कथासंग्रह आहे.
बीड येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक प्रा. एकनाथ आबुज यांनी वृत्तपत्रातून विपुल लेखन केले आहे. आतापर्यंत सुमारे दीड हजारांपेक्षा जास्त गुन्हेकथा त्यांच्या प्रकाशित झाल्या आहेत. याच कथांमधून गुन्हे कथांचं नातं क्राईम स्टोरी, सैतान, कामांध, होरपळ, शोकांतिका हे सहा कथासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या सातव्या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच संजयकुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस निरीक्षक सुदर्शन मुंडे, सहपोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे उपस्थित होते.    

भ्रष्टाचारविरोधी सार्वजनिक गुढी
लातूर, ४ एप्रिल/वार्ताहर

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी गंजगोलाईतील जय जगदंबा मंदिरासमोर सोमवारी सकाळी सार्वजनिक गुढी उभारण्यात आली. खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते ही गुढी उभी करण्यात आली.
या वेळी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, बसवंत भरडे, देविदास काळे, अभिमन्यू पवार, अनंत पाटील, अरविंद रेड्डी, महादेव कुंभार आदी उपस्थित होते.
मराठवाडा   विद्यार्थी कृतिसमिती, संवाद युवा मंच, संस्कृतदर्शन    मित्रमंडळ यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.    तसेच राजकुमार जोशी, नितीन पडिले, दीपक गंगणे, डॉ. उमाकांत जाधव आदी या वेळी उपस्थित होते.
सार्वजनिक गुढी उभारण्याचे हे १३ वे वर्ष आहे.     विश्वचषकाची प्रतिकृती ठेवून मिरवणूक काढण्यात आली. २० फूट उंचीच्या गुढीला सजवून शहराच्या विविध भागांतून ही मिरवणूक काढण्यात आली.    

‘साकेत’च्या अनुवादित पुस्तकांचे प्रदर्शन
औरंगाबाद, ४ एप्रिल/खास प्रतिनिधी

‘कशी वाढवावी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता’ आणि ‘द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
प्रिंटवेल इंटरनॅशनलचे संचालक प्रदीप शिंदे व सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. ‘सिंपल वेजस् टू ब्रिंग आउट द बेस्ट इन युवर एम्पलॉईज’ या प्रमोद बत्रा लिखित पुस्तकाचे अनुवाद सुधीर सेवेकर यांनी केले. या महिन्यातील ‘नवे पुस्तक प्रकाशन’ या कार्यक्रमांतर्गत साकेत प्रकाशनच्या दालनात श्री. शिंदे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकातील सांगितलेले नियम जर आपण प्रत्यक्षात अमलात आणले तर त्याचा आपल्या व्यवसायामध्ये नक्कीच फायदा होईल, असे प्रदीप शिंदे म्हणाले. सुधीर सेवेकर यांनी या पुस्तकाचे अनुवाद केले आहे. त्यांनी अनुवाद करतानाचे अनुभव सांगितले.
‘द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड’ या ऑग मॅन्डिनो यांच्या पुस्तकाने दोन कोटींची विक्री केली आहे. सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद प्रा. पुष्पा ठक्कर यांनी केले. या पुस्तकाचे प्रकाशन प्रिंटवेल इंटरनॅशनलचे संचालक सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. वस्तुविषयीची गरज ग्राहकांच्या मनात निर्माण करता आली पाहिजे. तसेच केवळ व्यवसायाला प्राधान्य न देता जीवनातील इतर पैलूंचेही संतुलन साधून शेवटी आपले सामाजिक ऋण कसे चुकवावे, याचे वर्णन अत्यंत हृदयस्पर्शी व सोप्या भाषेत करण्यात आले आहे, असे सुहास कुलकर्णी यांनी सांगितले. प्रा. पुष्पा ठक्कर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिमा साकेत भांड यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी वैद्य यांनी केले.    

नववर्षांचे जल्लोषात स्वागत; शोभायात्रेला चांगला प्रतिसाद
औरंगाबाद, ४ एप्रिल/प्रतिनिधी

हिंदूू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातून शोभायात्रा काढण्यात येते. यंदाही मोठय़ा जल्लोषात संस्थान गणपती येथून पारंपरिक वेषात ही यात्रा काढण्यात आली. स्वागत समितीच्या अध्यक्षा तथा शहराच्या महापौर अनिता घोडेले आणि शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत आरती करून संस्थान गणपती येथून यात्रेला ढोलताशांच्या गजरात सुरुवात झाली.
शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांच्यासह विविध हिंदू संस्था-संघटनांचा या यात्रेत सहभाग होता. आमदार सर्वश्री किशनचंद तनवाणी, प्रदीप जैस्वाल, संजय सिरसाठ, सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि त्र्यंबक तुपे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष बसवराज मंगरुळे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, अतुल सावे, पालिकेचे सभागृह नेते गिरजाराम हाळनोर, नंदकुमार घोडेले, राष्ट्रीय स्वसंसेवक संघ, मंदिर संरक्षण राष्ट्रीय धर्मसंसद या संघटनांचे पदाधिकारी या यात्रेत सहभागी झाले होते.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. यात सहभागी झालेल्या सर्वच जण आपापल्या पारंपरिक वेषात हजर होते. उंट आणि हत्तीवर बसलेले मावळे हे उपस्थिांचे लक्ष वेधून घेत होते. छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणा प्रताप यांच्यासह अनेक सजीव देखावे तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे या देखाव्यांमध्ये मुली मोठय़ा संख्यने सहभागी झाल्या होत्या. डोक्यावर कलश घेऊन अनेक महिला आणि मुलीही सहभागी झाल्या होत्या.  ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात येत होते. संस्थान गणपती ते यात्रेचा समारोप होणाऱ्या खडकेश्वर येथील मंदिरापर्यंत जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. चौकाचौकांत यात्रेवर फुलांचा वर्षांव होत होता. नागरिकांच्या वतीने यात्रेत सहभागी झालेल्यांसाठी शहागंज, सिटीचौक, गुलमंडी, औरंगपुरा, पुढे खडकेश्वर आदी ठिकाणी शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती.    

पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध पत्रकाराचे उपोषण
औरंगाबाद, ४ एप्रिल/प्रतिनिधी

भडकलगेट येथील पालिकेच्या खुल्या भूखंडावरच खासगी व्यक्तीने अतिक्रमण केले. येथील उर्दू दैनिकाच्या पत्रकाराच्या दरवाजासमोर भिंत बांधून रस्ताच अडविला. पत्रकार गजनफर जावेद यांनी रीतसर अर्जविनंत्या केल्या तरी पालिकेने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे अखेर जावेद यांनी अतिक्रमणाचा इशारा दिला होता. याची दखल घेत पालिकेने हे बांधकाम थांबविले.
श्रीमती जाहेदा बेगम मोहम्मद फक्रोद्दीन यांनी गुंडांच्या मदतीने हे अतिक्रमण केले असल्याचा आरोप जावेद यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केले आहे. जाहेदा बेगम यांना साजेद भीम या व्यक्तीचा पाठिंबा असल्याचेही त्यात म्हटले आहे. भडकल गेट येथे भूमापन क्रमांक ४३३२ हा पालिकेच्या मालकीचा खुला भूखंड आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथे बांधकाम सुरू झाले होते. जावेद यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन हे बांधकाम अनधिकृत असून ते थांबविण्यात यावे, अशी विनंती केली होती. अधिकाऱ्यांनी दखल घेऊन हे बांधकाम थांबविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. अधिकाऱ्यांचे आदेश असतानाही हे बांधकाम थांबले नाही. जाहेदा बेगम यांच्या वतीने बांधकाम करताना जावेद यांच्या घराच्या दरवाजाजवळच भिंत बांधून रस्ता बंद करण्यात आला. रातोरात हे बांधकाम झाल्यामुळे जावेद यांनी प्रशासनाला निवेदन देऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता. महापौर अनिता घोडेले यांनी आदेश दिल्यानंतर हे बांधकाम थांबविण्यात आले असून ते तातडीने पाडण्यात यावे, अशी मागणी जावेद यांनी केली आहे. कागदपत्रांची पाहणी झाल्यानंतर हे बांधकाम पाडण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. जाहेदा आणि साजेद भीम यांच्याकडून आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रारी जावेद यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली आहे.    

वेगवेगळ्या घटनांत दोन विवाहितांचा मृत्यू
औरंगाबाद, ४ एप्रिल/प्रतिनिधी

शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन महिलांचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. एकजण स्वयंपाक करत असताना भाजली होती तर दुसरी हरभरे धुण्यासाठी विहिरीजवळ गेली असता तोल जाऊन पडली.
शारदा सुधाकर वहाटुळे (वय २७, रा. पाल, ता. फुलंब्री) या स्टोव्हवर स्वयंपाक करत असताना २९ मार्चला भाजल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. तर उषा आण्णासाहेब शेजूळ (वय २५, रा. नायगव्हाण) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी हरभरे धुण्यासाठी त्या स्वत:च्या शेतातील विहिरीजवळ गेल्या असताना तोल जाऊन त्या खाली पडल्या. जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे रात्री त्यांचा मृत्यू झाला.
अन्य एका घटनेत स्टोव्हवर स्वयंपाक करत असताना १९ वर्षांची विवाहिता गंभीर भाजली. अर्चना सुनील जाधव (रा. एकनाथनगर, उस्मानपुरा) असे विवाहितेचे नाव आहे. रविवारी सायंकाळी स्वयंपाक करत असताना त्या भाजल्या होत्या. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या एका घटनेत गंगापूर येथील शासकीय रुग्णालयासमोर बेशुद्धावस्थेत पडून असलेल्या पुंजाराम नामदेव सातपुते (वय ४०, रा. सिद्धपूर, गंगापूर) यांचा रात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. पुंजाराम हे जखमी अवस्थेत पोलिसांना आढळून आले होते. गंगापूर येथील प्राथमिक उपचार केंद्रानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांच्या जखमी होण्याचे कारण समजले नाही.    

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र पळविले
औरंगाबाद, ४ एप्रिल/प्रतिनिधी

मुलांना घेऊन शिकवणी वर्गाकडे जाणाऱ्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास करण्यात आले. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यंकटेशनगर येथे घडली. महानंदा शंकर पाटील (वय ३२, रा. व्यंकटेशनगर) असे त्यांचे नाव आहे. दुपारी त्या दोन मुलांना घेऊन खासगी शिकवणी वर्गाकडे निघाल्या होत्या. दुचाकीवरून आलेले दोघे त्यांच्यासमोर थांबले आणि खिशातून एक चिठ्ठी काढून ‘मावशी, एवढा पत्ता सांगता का?’ अशी विनंती केली. चिठ्ठी हाती घेऊन त्यावरील पत्ता वाचण्यात त्या व्यस्त असल्याचा फायदा घेऊन त्यातील एकाने महानंदा यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र झटका देऊन तोडले आणि भरधाव वेगाने दोघे निघून गेले. जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली असून सहायक फौजदार वाय. डी. पठाण हे पुढील तपास करत आहेत.
दीड लाखांची घरफोडी
विदेशात गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरटय़ांनी रोख रकमेसह १ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. रविवारी ही घटना समोर आली. अजय रेणुकादास देशपांडे (रा. श्रेयनगर) यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ते गेल्या काही दिवसांपासून विदेशात मुलांकडे गेले होते. परतले असता चोरटय़ांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम आणि दागिने लंपास केल्याचे समोर आले. चोरटय़ांनी लोखंडी कपाटही तोडले होते.    

जन लोकपाल विधेयकासाठी आज लाक्षणिक उपोषण
भ्रष्टाचाराविरूद्धच्या जनअभियानाचा एक भाग
औरंगाबाद, ४ एप्रिल/खास प्रतिनिधी

भ्रष्टाचार विरोधात भारत या देशपातळीवर चालू असलेल्या जन अभियानाचा भाग म्हणून मंगळवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
ही माहिती भ्रष्टाचार विरोधात भारत या संस्थेच्या प्रतिनिधी डॉ. अर्चना सारडा, डॉ. सुजाता लाहोटी, प्रा. उत्तम काळवणे यांनी दिली.
उडान, भारत स्वाभिमान, सजग महिला संघर्ष समिती, औरंगाबाद पेन्शनर्स असोसिएशन, निसर्ग मित्र मंडळ, प्रेरणा ट्रस्ट, उर्जा सहयोग, आदी संघटनेच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. हे उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे. तसेच सायंकाळी सात वाजता पैठणगेट येथे मेणबत्ती प्रज्वलित करून भ्रष्टाचार विरोधी जन लोकपाल विधेयकासाठी पाठिंबा दिला जाणार आहे. या उपोषणासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जनहित प्रतिष्ठानच्यावतीनेही मंगळवारी विभागीय कार्यालयासमोर धरणे कार्यक्रम होणार आहे.
या धरणे कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. एच. एम. देसरडा व अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी केले आहे.    

राष्ट्रीय एकात्मतेसाठी सौर कालगणना महत्त्वाची -डॉ. चितळे
औरंगाबाद, ४ एप्रिल/खास प्रतिनिधी

सौर कालगणना पूर्णपणे वैज्ञानिक तर आहेच, तसेच ती पूर्ण भारतीय आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी ती दैनंदिन वापरात येणे गरजेचे आहे. या कालगणनेइतकी अचूक कालगणना जगात दुसरी कोणतीही नाही, असे उद्गार प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांनी काढले.
सौर कालगणना प्रचार प्रसार मंच या संस्थेच्या शुभारंभप्रसंगी डॉ. चितळे हे बोलत होते. मा. प. विधी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अतुल सावे आणि मंचाचे कार्यवाह केशवराव डोंगरे हे होते.
प्रारंभी मंचाचे कार्यवाह केशवराव डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका साधना सुरडकर आणि अभय मराठे यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सौर कालगणनेसंदर्भातील केंद्र शासनाच्या मूळ इंग्रजी पुस्तिकेची पुनर्मुद्रित आवृत्ती, तिच्या मराठी, हिंदी भाषेतील अनुवाद पुस्तिका आणि नव्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. सौर कालगणनेच्या प्रसारासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्याचे आश्वासन अतुल सावे यांनी दिले. यावेळी दत्तात्रय पदे, श्रीकांत काशीकर, आदी उपस्थित होते.
मंचाच्या विश्वस्त मंडळाची नावे यावेळी जाहीर करण्यात आली. मार्गदर्शक- डॉ. माधव चितळे, डॉ. विजय भटकर, अध्यक्ष- दा. कृ. सोमण, कार्यवाह- केशवराव डोंगरे, विश्वस्त- चं. ह. जोशी, संजय वांढेकर, प्रा. उपेंद्र कुलकर्णी, दत्तात्रय पदे, श्रीकांत काशीकर. अधिक माहितीसाठी मंचाचे कार्यवाह केशवराव डोंगरे (दूरध्वनी क्र. २३५००८८) आणि श्रीकांत काशीकर (भ्रमणध्वनी क्र. ९४२३४४९३४१) यांच्याशी संपर्क साधावा.    

वीज खासगीकरण करार रद्द करण्यासाठी अण्णा हजारे यांना साकडे
औरंगाबाद, ४ एप्रिल/खास प्रतिनिधी

औरंगाबाद शहरातील वीज वितरण प्रणाली खासगी भांडवलदार जीटीएल या कंपनीसोबत महावितरणने १५ वर्षांसाठी करार केला आहे. हा करार रद्द करण्यासाठी वीज कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साकडे घालण्यात आले आहे.
कृती समितीच्यावतीने या कराराची सर्व माहिती अण्णा हजारे यांना देण्यात आली. औरंगाबाद, नागपूरपाठोपाठ भविष्यात राज्यातील १४ शहरांच्या वीज वितरण प्रणालीचे खासगीकरण होणार आहे. हे खासगीकरण होऊ नये, महानिर्मिती कंपनीचे संच बंद करणे, महापारेषण कंपनीतील कंत्राट रद्द करणे, यासाठी कृती समितीच्यावतीने २६ ते २८ एप्रिलदरम्यान संपाची हाक देण्यात आली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन कृती समितीच्यावतीने हा करार घाटय़ाचा सौदा आहे, असे सांगण्यात आले. त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. या प्रकरणात मी स्वत: लक्ष घालेल, असे आश्वासन अण्णा हजारे यांनी दिले.
 समितीच्या शिष्टमंडळात निमंत्रक सय्यद जहिरोद्दीन, व्ही. वाय. सोमवंशी, संजय सरग, अमित कुलकर्णी, बी. एल. वानखेडे, संजय खाडे, बी. आर. फरकाडे, टी. डी. कोल्हे, आदींची समावेश होता.    

युनिनॉर मोबाईल कंपनीतर्फे अनोखी स्पर्धा
औरंगाबाद, ४ एप्रिल/खास प्रतिनिधी

युनिनॉर या मोबाईल कंपनीतर्फे औरंगाबादमध्ये एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दुकान सजवा आणि इनाम घ्या’ अशी दालने सजविण्याची स्पर्धा आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र आणि गोवा विभागातील जवळजवळ ३० हजार दालनांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविलेला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना नवी कोरी गाडी, परदेशी प्रवासाची संधी, मोटारसायकल, एलसीडी टीव्ही, डिजिटल कॅमेरे, मोबाईल आणि घडय़ाळ आदी बक्षिसे दिली जाणार आहेत. ही माहिती युनिनॉरच्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष ओलव्ह सँडे यांनी दिली.
युनिनॉरने भारतात सर्वात पहिल्यांदा विभागवार सवलतीची घोषणा केली आहे. सध्या भारतातील २२ विविध भागांमध्ये युनिनॉरला परवाना मिळाला आहे. २२ पैकी २१ शहरांमध्ये स्पेक्ट्रमचाही परवाना त्यांना मिळाला आहे, असे श्री. सँडे यांनी सांगितले.     

स्वच्छतागृहांसंबंधी निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांत खळबळ
गंगाखेड, ४ एप्रिल/वार्ताहर

ग्रामपंचायत सदस्यांना स्वच्छतागृहे बांधणे बंधनकारक असतानाही तालुक्यातील ६६८ पैकी ४३७ सदस्यांनी अद्याप स्वच्छतागृहे बांधलेली नाहीत. येत्या १० एप्रिलपर्यंत स्वच्छतागृहे बांधा अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, या पंचायत समितीच्या फतव्याने सदस्यांत खळबळ माजली असून पदे टिकविण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू आहे.
सात महिन्यांपूर्वी तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. निवडीनंतर मुदतीत घरी स्वच्छतागृहे बांधणे बंधनकारक होते. मात्र अद्यापपर्यंत केवळ २३१ सदस्यांनी स्वच्छतागृहे बांधली आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक शिरसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे पंचायत समिती प्रशासनालाही चपराक बसल्याने प्रशासन स्वच्छतागृहे न बांधलेल्या सदस्यांचा पाठलाग करीत आहे. गटविकास अधिकारी एस. एस. बरकते यांनी ४३७ ग्रामपंचायत सदस्यांना निर्वाणीच्या नोटिसी काढीत १० एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत दिली. यामुळे स्वच्छतागृह बांधण्यासाठी लागणारे साहित्य पंचायत समितीतून घेऊन जाण्यासाठी धावपळ सुरू आहे.     

रेणापुर तालुक्याला २५८  घरकुले मंजूर
परळी वैजनाथ, ४ एप्रिल/वार्ताहर

इंदिरा आवास योजनेत सन २००९-१० मध्ये दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, अल्पसंख्यांक लाभार्थी, अनुसूचित जाती, नवबौद्ध व सर्वसाधारण लाभार्थी अशी एकत्रित तालुक्यात २५८ घरकुले मंजूर झाली आहेत.
शासनाने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बलांना हक्काचा निवारा उभा करून देण्यासाठी ही योजना कार्यान्वित केली. या योजनेसाठी पंचायत समिती जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविते. तालुक्यातील दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्ध, सर्वसाधारण कुटुंबाची यादी जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात येते. यामध्ये ज्या गावची लोकसंख्या कमी असते त्या गावांना योजनेचा फायदा जास्त देण्यात येतो.
या योजनेत तालुक्याला २८३ घरकुले मंजूर झाली आहेत. २५ घरकुलाचे प्रस्ताव कागदपत्राअभावी अपात्र ठरले असून, २५८ घरकुले मंजूर होऊन या योजनेतील पैशांचा पहिला हप्ता संबंधित लाभार्थीच्या नावे बँकेत जमा करण्यात आला आहे. पुढील टप्प्यातील घरकुलाचे हप्ते देण्याकरिता पंचायत समितीकडे निधी उपलब्ध असून प्रत्यक्षात घरकुलाची पाहणी पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याने केल्याशिवाय मिळणार नाही.  तसेच सर्वाच्यासर्व घरकुलेही जिल्हा परिषदेकडून मंजूर झाली असून यात ज्यांनाही याचा लाभ मिळाला आहे त्यांना पत्रव्यवहार करून कळविण्यात आले आहे. ही योजना शासनाची असली तरी   प्रत्यक्षात    मात्र   ग्रामीण भागातील    राजकीय  पुढारी या योजनेचे भांडवल करून राजकारण करण्याचा व श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत.    

नवबौद्ध समाजातील गरीब कुटुंबांना समाजकल्याण विभागातर्फे घरकुल मिळणार
हिंगोली, ४ एप्रिल/वार्ताहर

कळमनुरीमध्ये अनुसूचित जाती नवबौद्ध समाजातील ३०० गरीब कुटुंबांना समाजकल्याण विभागातर्फे घरकुल मिळणार आहे. आमदार राजीव सातव यांनी त्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे.
कळमनुरीतील सुमारे ३७५ लाभार्थीनी समाजकल्याण विभागाकडे कळमनुरी नगरपालिकेच्या माध्यमातून २००८मध्ये प्रस्ताव सादर केले होते. त्याला मंजुरी मिळविण्यासाठी श्री. सातव यांनी समाजकल्याण मंत्रालयात सतत पाठपुरावा केला. यातील सुमारे १५ लाभार्थीचे प्रस्ताव काही त्रुटीमुळे रद्द केले तर ३०० लाभार्थीचे अर्ज मंजूर करण्यात आले.
त्यापैकी ७८ लाभार्थीना लवकर घरकुल मिळणार तर २२२ लाभार्थीना टप्प्याटप्प्याने दोन वर्षांत घरकुल मिळणार आहे.
एका घरकुलाची किमत साधारण दीड लाख रुपये असून, समाजकल्याण मंत्री   शिवाजीराव मोघे यांनी या घरकुल योजनेस मंजुरी दिली आहे. लवकरच    त्यांच्या   हस्ते  घरकुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे.    

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती ही गुणवत्तेचे मापन करणारी - प्रा. शिंदे
जालना, ४ एप्रिल/वार्ताहर

सर्वंकष मूल्यमापनातील सातत्यतेमुळे विद्यार्थ्यांमधील सर्व प्रकारच्या चांगल्या क्षमतांचा विकास होईल, असे जिल्हा प्रशिक्षण आणि शिक्षण    संस्थेचे     प्रा.  विजयकुमार शिंदे यांनी सांगितले.    
सर्वाना शिक्षण मोहिमेत जिल्ह्य़ातील निवडक शिक्षकांसाठी आयोजिलेल्या चर्चेच्या वेळी ते बोलत होते.
प्रा. शिंदे म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील बदललेल्या मूल्यमापन पद्धतीमुळे समाजात चर्चा होत आहे. आठव्या वर्गापर्यंत परीक्षा नसल्याने मुलांच्या गुणवत्तेचे काय होणार याची चिंता पालकांमध्ये आहे. शिक्षकांनी ही चिंता दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती ही गुणवत्तेचे मापन करणारी आहे.  या पद्धतीमुळे मुलांच्या केवळ स्मरणाचा नव्हे तर आकलन, उपयोजन, विचारशीलता, सृजनशीलता, कल्पकता इत्यादींचा पूर्ण विकास होणार आहे. या वेळी प्रा. डॉ. विशाल तायडे उपस्थित होते.    

जांबसमर्थ येथे चैत्र नवरात्र महोत्सवास प्रारंभ
अंबड, ४ एप्रिल/वार्ताहर

दक्षिण अयोध्या म्हणून समजल्या जाणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थळ असलेल्या जांबसमर्थ ता. घनसावंगी येथे श्रीराम मंदिरात व समर्थ मंदिरात आड चैत्र नवरात्र महोत्सवास प्रक्षाळ पूजेने सुरुवात झाली. रामनवमीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
समर्थ रामदास स्वामी यांची जन्मभूमी असलेल्या जांब तीर्थस्थळी साडेचारशे वर्षांपूर्वीचे जुने राम मंदिर आहे. हे मंदिर समर्थ घराण्याचे पुजास्थान समजले जाते तर दुसरे धुळे येथील समर्थ भक्त नानासाहेब श्रीकृष्णदेव यांनी जन्मस्थळी १५ एप्रिल १९३२ रोजी जन्मस्थळी उभारलेले भव्य दगडी मंदिर आहे. या मंदिरात समर्थ रामदास स्वामी जन्मोत्सव सोहळा भव्य स्वरुपात साजरा होतो. पहाटे काकडा आरती, विष्णू सहस्त्रनाम, गीतापाठ, नित्य अभिषेक, प्रसाद, प्रवचन, हरिपाठ, दासबोध वाचन तसेच कीर्तने होणार आहेत.    

पालिका सदस्यांच्या दुर्लक्षामुळे हिंगोलीत घाणीचे साम्राज्य
हिंगोली, ४ एप्रिल/वार्ताहर

शहरातील स्वच्छतेकडे नगरपालिका प्रशासनासोबतच पालिकेतील सदस्यांचे दुर्लक्ष झाल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पेन्शनपुरा भागात तर नगरसेवकांच्या घराजवळ साचलेले घाण पाणी अनेक घरामध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त आहेत.
शहरातील पेन्शनपुरा ग्रामीण पोलीस ठाण्यासह अनेक भागांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
पेन्शनपुरा भागातील नागरिक उमेश यादव, अर्जुन बंधू, विठ्ठल गादेकर, श्रीमती शाहू आदींनी मुख्य रस्त्यावर जमलेले गटारीचे घाण पाणी काढण्यासंदर्भात नगरपालिकेला कळविल्यानंतरही त्याकडे लक्ष न दिल्याने पेन्शनपुरा भागातील, मुख्य रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर घाण पाणी साचल्याने   नागरिकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले होते. तर काहींच्या घरांमध्ये हे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाल्याने येथील नागरिक चांगलेच संतापले होते.    

जालन्यात शुक्रवारपासून आंबेडकर व्याख्यानमाला
जालना, ४ एप्रिल/वार्ताहर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला या वर्षी शुक्रवारपासून  (दि. ८) सुरू होणार आहे. सहा दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी आमदार कैलास गोरंटय़ाल असतील. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी संजय गायकवाड राहतील.
व्याख्यानमालेतील व्याख्याते व विषय असे : दि. ८ - डॉ. आर. एन. साळवे (कोल्हापूर) - ‘आरक्षणाचे धोरण आणि सामाजिक न्याय’, दि. ९ - नजूबाई गावित (धुळे) - ‘परिवर्तन चळवळीतील अनुभव’, दि. १० - मोरेश्वर मेश्राम (भंडारा) - ‘आंबेडकरी चळवळ : काल, आज, उद्या’,  दि. ११ - प्रा. गंगाधर अहिरे (नाशिक) - ‘आंबेडकरी कार्यकर्त्यांचे बदलते संदर्भ’,  दि. १२ - प्रमोद कांबळे (यवतमाळ)  - ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक दृष्टिकोन आणि सद्य:स्थिती’. प्रा. संभाजी भगत यांचा ‘आंबेडकरी जलसा’ कार्यक्रम दि. १३ला होईल. सर्व व्याख्यानांना मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाटय़गृहात सायंकाळी ७ वाजता सुरुवात होईल. व्याख्यानमालेचे यंदा चौतिसावे वर्ष आहे.     

गुढीपाडवा उत्साहात साजरा
परळी वैजनाथ, ४ एप्रिल/वार्ताहर

हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा! हा सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. नववर्षांनिमित्त प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी आणि बाजारात नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
आज सकाळीच घरोघरी जास्तीत जास्त उंच आणि आकर्षक गुढय़ा उभारण्यात आल्या. गुढीची विधीवत पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आल्यानंतर कडुलिंबाचा फुलोरा प्रसाद म्हणून वाटण्यात आला. घरावर गुढी उभारल्यानंतर खास पाडव्यासाठी खरेदी केलेले नवीन कपडे, साडय़ा परिधान करून स्त्री-पुरुषांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली.
नागरिकांनी सकाळपासूनच प्रभु वैद्यनाथ मंदिरात गर्दी केली होती. मंदिराबाहेर मोठी रांग लागली होती. वेगवेगळ्य मंदिरांमध्ये, ग्राम देवालयातही दर्शनासाठी गर्दी केल्याचे   दिसत   होते. वैद्यनाथाची पिंड सजविण्यात आली होती.
ऊसतोड मजुरांची गुढी कोपीवरच
ऊसतोड मजुरांना उसाच्या फडातील कोपीवरच गुढी उभारावी लागली. या वर्षी कारखान्याचा गाळप हंगाम लांबल्याने सर्व ऊसतोड मजूर अद्यापि उसाच्या फडावरच आहेत. कडाक्याच्या उन्हात ऊस तोडून मजुरांनी आपापल्या सोयीने कोपीवरच गुढी उभारून हिंदू नववर्षांचे स्वागत केले. गुढी उभारण्याची परंपरा खंडित होऊ न देण्याची त्यांची भावना यामागे जाणवली.    

रस्त्यावरील रिक्षा, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांकडे पोलिसांची सोयीस्कर डोळेझाक
हिंगोली, ४ एप्रिल/वार्ताहर

वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या ४ हजार ७७५ वाहनांवर तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या १७७ वाहनावर कारवाई करून ८ लाख २८ हजारांचा दंड वसूल केला.
वर्ष २००९ मध्ये शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या ४ हजार ४२२ तर अवैध वाहतूक करणाऱ्या ९८ वाहनावर कारवाई केली आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या काही प्रमाणावर वाढली असली तर शहर वाहतूक   पोलिसांची ही कारवाई म्हणजे केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी असून आज हिंगोली शहरातील रस्त्यावर उभे राहणारे रिक्षा व मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून नेणारी वाहने वाहतूक पोलिसांना का दिसत नाहीत, अशी चर्चा नेहमी असते.    

यमगरवाडीच्या शैक्षणिक संकुलाचे १४ एप्रिलला सरसंघचालकांच्या हस्ते उद्घाटन
कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचेही उद्घाटन्
उस्मानाबाद, ४ एप्रिल/वार्ताहर

भटके-विमुक्त विकास परिषदेच्या यमगरवाडी येथील शैक्षणिक संकुल व कर्मचारी वसाहत वास्तूच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दि. १४ एप्रिलला यमगरवाडी येथे येत आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. अलका मांडके यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
जिल्ह्य़ात पारधी व इतर ३३ भटक्या समाजातील मुले यमगरवाडी येथे शिक्षण घेतात. या समाजाच्या विकासासाठी भटके विमुक्त प्रतिष्ठानामार्फत नवीन शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी होणार आहे. या कार्यक्रमास भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष वैजिनाथअप्पा लातुरे, कार्यवाह सुवर्णा रावळ, प्रा. गजानन धरणे, डॉ. अभय शहापूरकर आदी उपस्थित राहतील. सकाळी उद्घाटन व दुपारी व्याख्यान होणार आहे.    

तुळजामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
तुळजापूर, ४ एप्रिल/वार्ताहर

गुढी पाडव्याच्या सणाचे औचित्य साधून पूर्वापार प्रथेप्रमाणे श्री तुळजामातेच्या चरणी सेवा रुजू करण्यासाठी विविध प्रांतातील प्रामुख्याने भटक्या जाती जमातीच्या देवी भक्तांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे बाजारपेठ गर्दीने फुलून गेली.
अश्वीन महिन्यातील यात्रा सोहळ्यानंतर तुळजापूर क्षेत्री चैत्र वारीच्या वेळीही लाखोंच्या संख्येने देवी भक्तांची गर्दी होती. त्याप्रमाणे चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पूर्व तयारीस वेग आला आहे. पण चैत्र महिन्याच्या आरंभी आंध्र, कर्नाटक, गुजरात तसेच मध्यप्रदेशातील लमाण, गोंड, पारधी, भामटा राजपूत व तत्सम भटक्या जाती-जमातीचे देवी भाविक हजारोंच्या संख्येन पूर्वापार रुढी व प्रथेप्रमाणे परंपरागत वेषभूषा करून विविध वाद्यांसह थव्याने तुळजापूर येत असतात व आपली सेवा रुजू करतात. त्याप्रमाणे लमाण, गोंड, पारधी व अन्य भटक्या जाती-जमातींची आवक हजारोंच्या संख्येने सुरू झाल्याने मंदिराजवळ गर्दीत तर बाजार पेठेतील उलाढालीत प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी बाजारपेठेतील बहुतांशी वस्तू विशेषत: फळे, भाज्या, दूध यासारख्या वस्तूंची मागणी वाढल्याने दरातही वृद्धी झाल्याचे दिसून आले.     

तलवाडा पोलीस ठाणे लवकरच प्रशस्त इमातीत हलवणार
गेवराई, ४ एप्रिल/वार्ताहर

तलवाडा येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी ४४ लाख ७६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील पंधरा वर्षांपासून जायकवाडी प्रकल्पाच्या वसाहतीतून चालणाऱ्या तलवाडा ठाण्याला आता प्रशस्त नवीन इमारत मिळणार आहे.
तलवाडा पोलीस ठाण्यास निजामकालीन इमारत होती. १५ वर्षांपूर्वी इमारत पडू लागल्याने पोलीस स्टेशन नायकवाडी प्रकल्प वसाहतीत हलवण्यात आले. ठाण्याच्या नवीन इमारतीची अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश हात्ते यांच्या पाठपुराव्यामुळे ती मागणी मान्य झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी इमारतीला मंजुरी देण्याची घोषणा तलवाडी येथे केली होती.
 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो