नवे प्रश्न, नवे पेच, नवा विश्वास!
मुखपृष्ठ >> लेख >> नवे प्रश्न, नवे पेच, नवा विश्वास!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवे प्रश्न, नवे पेच, नवा विश्वास! Bookmark and Share Print E-mail
शफाअत खान ,सोमवार, १६ मे २०११
अभिनेते नंदू माधव यांनी महाराष्ट्रात गावोगावी फिरून, कुठे कुठे महत्त्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्र आणलं. गडचिरोलीपासून कोकणापर्यंतच्या अशा समविचारींचा एक मेळावा त्यांनी घडवून आणला. त्यातून नवे प्रश्न कळाले आणि नवा विश्वासही मिळाला. संमेलनाचा संक्षिप्त लेखाजोखा.
कार्यकर्ता, सामाजिक कार्य, लढे, आंदोलनं- हे आज चेष्टेने बोलण्याचे विषय आहेत. काही फॅशन म्हणूनही सुस्कारे टाकत बोलतात. काही काळाला दोषी ठरवत- आज आंदोलनासाठी पोषक वातावरणच नाही, या काळात लढे उभेच राहू शकत नाहीत, असे ठणकावून बजावतात.पण चित्र काही वेगळं आहे-आजही सामाजिक क्षेत्रात तळमळीने कार्य करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत, पण त्या कार्यकर्त्यांविषयी आपल्याला काहीच माहिती नसते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या अशा कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा, समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपल्या कामाचं परखड परीक्षण करावं, आपले अनुभव शेअर करावेत- या हेतूने मुंबईत ७ व ८ मे रोजी ‘सांगड कार्यकर्ता संमेलन’ भरविलं होतं. प्रामाणिक कार्यकर्ते आपापल्या गावात काम करीत असतात, लढत असतात. पण आज असे एकेकटय़ाने केलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत. एकटय़ा-दुकटय़ाने व्यवस्थेशी झुंजणं अशक्य होऊन बसलं आहे. मोठय़ा चलाखीने असले लढे दडपले जात आहेत, सर्व आंदोलनं पंक्चर केली जात आहेत.
सर्व चांगल्या कामांचा नाश होत आहे. भल्या प्रामाणिक माणसांना बदनाम केलं जात आहे. आपण सगळेच अस्वस्थ आहोत, पण किती दिवस आपण ही अस्वस्थता गोंजारत बसणार आहोत? सर्व कार्यकर्ते एकत्र आले तर लढय़ांना बळकटी येईल का? समविचारी माणसं एकत्र आली तर आपला दबाव गट निर्माण करता येईल का? विश्वास हरवून बसलेल्या, गोंधळलेल्या, हताश झालेल्या कार्यकर्त्यांला विश्वास तरी देता येईल का? अनेक प्रश्न डोक्यात होते. आमचा नाटकातला मित्र नंदू माधव- त्याने हे मनावर घेतलं. आता आपण काहीतरी करायलाच हवं- या विचाराने तो झपाटला गेला. नाटक- सिनेमा सोडून तो गावागावांतून फिरला. कार्यकर्त्यांशी बोलला. अनेकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला- कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न पूर्वीही झाले आहेत, कार्यकर्ते एकत्र येणार नाहीत, इगो आड येतात वगैरे- पण नंदू मागे हटला नाही. गडचिरोलीपासून थेट कोकणापर्यंतचे कार्यकर्ते गोळा केले आणि समविचारी मित्रांच्या साहाय्याने मुंबईत संमेलन भरवलं. संमेलनाला अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, देणगीदार असलं कुणीच नसल्यामुळे रूसव्या-फुगव्याची नाटकं झाली नाहीत. कुणी कुणाला मानधन देणार नव्हतं- ज्याने त्याने स्वत:ची गरज म्हणून एकत्र यायचं होतं. या गरजेपोटीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास दीडशे कार्यकर्ते स्वत:चा अनुभव, विचार आणि वेगळी दृष्टी घेऊन मुंबईत पोहोचले होते. दोन दिवसांत एकूण १२ सभांमधून भरपूर उलटसुलट चर्चा झाली. १२-१२ तास मोबाइल बंद करून श्रोते इतरांचे विचार ऐकत होते- स्वत:च मत मांडत होते. कार्यक्रम संपल्यावरही लोक एकमेकांशी बोलतच होते. सगळ्यांना- अचानक हरवलेले मित्र भेटल्याचा आनंद झाला होता.
पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात- नाटककार, दिग्दर्शक परेश मोकाशीने ‘पुराणकथा किती खऱ्या- किती खोटय़ा’ या विषयाची मांडणी केली. त्यांनी महाभारतातल्या अनेक कथा आधुनिक पद्धतीने उलगडून दाखविल्या. त्यांनी रंजक पद्धतीने विषय मांडला. रामायण, महाभारतात नंतर घुसडलेले चमत्कार सोडले तर मूळ रामायण-महाभारत आपला इतिहासच आहे व तो आपण नीट समजावून घेतला पाहिजे, या मुद्दय़ावर उलटसुलट चर्चा झाली. भालचंद्र नेमाडेंनीही आपली प्रतिक्रिया विस्ताराने नोंदविली.
गडचिरोलीजवळ मेंढालेखा नावाचे छोटेसे गाव आहे. त्या गावात आदिवासी गोंड जमातीचे लोक राहतात- फक्त साडेचारशे वस्ती असलेल्या या छोटय़ा गावाने देवजी तोफाच्या नेतृत्वाखाली सतत संघर्ष करून आपल्या गावाचा विकास साधला. त्या संघर्षांचा इतिहास मिलिंद बोकीलांनी मांडला. ‘आमच्या गावात आमचेच सरकार’- असा विचार करून गावाचा कारभार चालविला जातो. सर्व निर्णय एकमताने घेतले जातात. एकाचाही विरोध असेल तर त्याचं मतपरिवर्तन होत नाही तोपर्यंत निर्णय घेतला जात नाही. बहुमताने कारभार करणारे- निव्वळ संख्येच्या बळावर (अनेकदा लबाडीने) आपला निर्णय इतरांवर लादतात- ही छुपी हिंसाच असते असं देवजी तोफांचं मत आहे. आपण शहरी सुशिक्षित लोक स्वत:च्या न्याय्य हक्काच्या बाबतीत उदासीन असतो. आपण सतत संघर्ष टाळत असतो. त्यालाच सुसंस्कृत असणं समजतो. आपल्यासारख्या सुशिक्षित, सुसंस्कृत माणसांसाठी मेंढालेखाच्या संघर्षांचा इतिहास अद्भूत वाटावा असाच आहे.
विंचवाच्या विषावर औषध शोधणारे डॉ. हिंमतराव बावस्कर आजही सतत लढत असतात. हाताशी कोणतीही साधनं नसताना, सुविधा नसताना- आपल्याच लोकांनी इथे केलेले अडथळे पार करत ते गोरगरिबांच्या उपयोगी पडेल असं संशोधन करत राहतात. विषारी मण्यार सर्पाच्या दंशाने अनेक लोक दगावतात. त्यावर डॉक्टर बावस्करांचं संशोधन सुरू होतं तेव्हाची गोष्ट-
 मण्यारच्या दंशाने मरणारे सगळे गावातले हिंदूच होते. गावात भरपूर मुसलमान असूनही- मण्यार मुसलमानांच्या वाटय़ाला का जात नाही- या प्रश्नाचा ते विचार करू लागले आणि शेवटी हिंदू जमिनीवर झोपतात म्हणून मण्यारच्या तावडीत सापडतात आणि मुसलमान खाटेवर झोपतात म्हणून बचावतात- या निष्कर्षांपर्यंत डॉ. बावस्कर पोहोचले. ते क्षुल्लक वाटतील अशा गोष्टीचा पिच्छा पुरवितात आणि अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवितात. रायगड जिल्ह्य़ात सर्वहारा संघटनेतर्फे कातकरी समाजात काम करणाऱ्या उल्का महाजनांच्या बोलण्यात एक महत्त्वाचा मुद्दा होता. शोषित मुक्त झाल्यावर शोषकांचं मॉडेल समोर ठेवून जगू पाहतो- त्यांच्यासमोर दुसरं मॉडेल नसतं.
हिवरेबाजार गावाचा कायापालट करून टाकणारे पोपटराव पवार म्हणाले- अनुदानावर अवलंबून राहू नये- अनुदानाने माणसाचं पोट भरत नाही आणि माणूस मरतही नाही. माणूस फक्त पंगू होतो.
७० टक्के अ‍ॅक्टिविस्ट आणि ३० टक्के पोलीस अधिकारी असलेल्या सुरेश खोपडेंना वाटतं. अधिकारी कितीही वेगळ्या विचारांचा असला तरी जुन्या सिस्टीममध्ये त्याला वेगळं काही करता येत नाही. जुनी सिस्टीमच बदलायला हवी.
मुस्लिम स्त्रियांसाठी काम करणाऱ्या नागपूरच्या तलाकपीडित रुबिना पटेलने स्वत:ची कहाणी ऐकवली. त्यांच्या पिता आणि पतीने केलेल्या छळाच्या कहाणीने श्रोते हेलावले. त्यांना सर्वात जास्त दाद मिळाली. रुबिनाच्या बोलण्यावर धनाजी गुरवनी प्रतिक्रिया देताना काही धोके लक्षात आणून दिले. निसरडय़ा जागा दाखवून दिल्या. रुबिनाने आपल्या बोलण्यातून उभे केलेले काळेकुट्ट मुसलमान पुरुष- सर्वसामान्यांना आवडावे असेच आहेत. अशा मुसलमान पुरुषांच्या एकांगी चित्राला मिळालेली दाद फसवी असू शकते. हे चकवे लक्षात घेतले नाहीत तर चळवळीचा घात होऊ शकतो.
संध्याकाळी होणाऱ्या खुल्या चर्चेतही अनेक कार्यकर्ते मोकळेपणानं बोलत. अमरावतीहून आलेल्या रेहाना आणि भारती भेटल्या. रेहानाला बोलायचं होतं, पण चांगलं मराठी येत नाही म्हणून तिला (आणि इतर अनेकांना) अवघडल्यासारखं झालं होतं. ज्यांना चांगलं मराठी येतं त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही- हे सांगितल्यावर ती खुलली. बोलू लागली.
आता बोलणाऱ्यांना भाषेचं भय दाखवून थांबविता येणार नाही. त्यांनी बोलावं म्हणून प्रयत्न करावे लागतील. दोन दिवसांच्या संमेलनात अनेकांच्या ओळखी झाल्या. त्यांचे भलेबुरे अनुभव ऐकता आले. ते जगाकडे कसं बघतात हे समजावून घेता आलं.
उत्तरं मिळाली का? उत्तरं मिळावीत अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती. सर्वाना फक्त आपले प्रश्न तपासून बघायचे होते. आपल्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत असं म्हणणारे काही होते, पण आम्ही अशा आयत्या उत्तरांसाठी जमलो नव्हतो. नवे प्रश्न कळले, नवे गुंते, नवे पेच लक्षात आले. आमची उत्तरं आम्ही शोधू. आता मी एकटा नाही, एवढा विश्वास तर या संमेलनाने दिलाच आहे.
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो