‘विचार’ निश्चित झाला की शब्द आपोआप सामोरे येतात
मुखपृष्ठ >> idea exchange >> ‘विचार’ निश्चित झाला की शब्द आपोआप सामोरे येतात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘विचार’ निश्चित झाला की शब्द आपोआप सामोरे येतात Bookmark and Share Print E-mail
संकलन, शब्दांकन : सुनील देशपांडे - रविवार, ५ जून २०११
विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधून

त्यांचे मनोगत जाणून घेणारा ‘आयडिया एक्स्चेंज - सामथ्र्य संवादाचे’ हा अभिनव मासिक उपक्रम ‘लोकसत्ता’ने गेल्या महाराष्ट्रदिनी सुरू केला. त्या अंतर्गत पहिला संवाद मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी साधण्यात आला होता. या मालिकेतील हा दुसरा संवाद गीतकार, संगीतकार, गायक, पटकथाकार, संवादलेखक, सहायक दिग्दर्शक अशी बहुपेडी कामगिरी बजावणाऱ्या स्वानंद किरकिरे यांच्याशी ..
श्रीकांत बोजेवार -  स्वानंद,  तुमची कलात्मक वाटचाल विविधांगी असली, तरी सध्या तुम्ही चर्चेत आहात ते गीतकार म्हणून. गीतलेखनाचा दर्जा खालावत असल्याच्या सार्वत्रिक तक्रारीच्या पाश्र्वभूमीवर जी आश्वासक नावं अलीकडच्या काळात आली त्यातले तुम्ही एक आहात. तुम्ही स्वत: आजच्या गाण्यांबाबत काय सांगाल?
किरकिरे - परिस्थिती सुधारली आहे, असं मला देखील काही दिवसांपूर्वी वाटत होतं. पण आता पुन्हा हे सगळं भलत्याच दिशेला जातंय की काय, असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. काय आहे, केवळ एका गीतकारामुळे वा संगीतकारामुळे परिस्थिती सुधारत नाही. त्या दर्जाचे निर्माते, दिग्दर्शक देखील असावे लागतात. राजकुमार हिरानीसारखा दिग्दर्शक नसता तर ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये लिहिली तशी गाणी मला लिहिता आली नसती. ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ हा चित्रपट निघाला नसता, तर ‘बावरा मन’सारखं माझं गाणं कधीही समोर आलं नसतं. मुळात जसा चित्रपट तशी त्यातली गाणी असणार. काही दिग्दर्शक आवर्जून वेगळं काही करण्याचा प्रयत्न करतात तेव्हाच माझ्यासारख्या गीतकाराला वेगळं लिहायची संधी मिळते. नुसतं ठरवून मी दर्जेदार गाणी लिहू शकत नाही. या इंडस्ट्रीत जे ‘हिट’ होतं त्याची चलती असते. बहुतांश लोकांना आमच्याकडून त्याच पठडीतलं काम हवं असतं. ‘एक अच्छा सा ‘कॅच फ्रेज’ दे दो, एक आयटेम नंबर दे दो, मुन्नी, शीला जैसा कुछ दे दो,’ अशी त्यांची भाषा असते. आता मागणीबरहुकूम ‘मुन्नी’, ‘शीला’ देण्याचा माझा पिंड नाही. म्हणून तर माझा ‘स्ट्रगल’ एका अर्थानं अजूनही सुरू आहे.
गिरीश कुबेर - सर्वसाधारणपणे ‘पूर्वीचं ते सगळं दर्जेदार आणि आजचं सगळं टाकाऊ’ असं मानण्याची मानसिकता दिसते.‘जुनं तेच सोनं’ या मानसिकतेवर तुमचा कितपत विश्वास आहे?
किरकिरे - ही मानसिकता सर्वच क्षेत्रांमध्ये असते. मला देखील तो अनुभव आलाय. पण कुणीतरी म्हटलंय त्याप्रमाणे या मंडळींना सांगायला हवं, की ‘एव्हरीथिंग दॅट इज ओल्ड इज नॉट गोल्ड अँड एव्हरीथिंग दॅट इज न्यू इज नॉट मॉडर्न’. आता गुलजार यांचं उदाहरण घ्या. ‘बिडी जलाई ले’सारखं आयटेम नंबर वा ‘कजरारे’सारखं गाणं देखील ते उत्तम लिहू शकतात. आजच्या काळात काही नवे प्रयत्न निश्चित होताहेत. काही नवे गीतकार येऊ पाहताहेत. गीतांची नवी भाषा आम्ही शोधतो आहोत. दहा वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. कुणी तरी मला विचारलं, ‘तुला गीतकार म्हणून संधी कशी मिळाली?’ मी म्हणालो, कुणी नव्हतंच इथं, संधी न मिळायला काय झालं? आता तशी परिस्थिती नाही. काही तरुण मुलीही गीतलेखनात येतायत. नवी पिढी नव्या दमानं, त्यांच्या भाषेत लिहू लागलीय हे सुचिन्ह आहे.
अतुल माने -  गीतलेखन आणि पटकथा-संवादलेखन यातलं कोणतं माध्यम तुम्हाला अधिक सोयीचं वाटतं?
किरकिरे - दोन्ही प्रकारांत मी रमतो. किंबहुना माझ्या आवडीच्या कोणत्याही कामात मला आनंद मिळतो. आता हे खरं, की गाणं लिहायला तुलनेनं कमी वेळ लागतो. कथा लिहायला थोडा अधिक आणि पटकथेला त्याहून अधिक वेळ द्यावा लागतो. ही सगळीच कामं आनंद देणारी आहेत. प्रत्येकाची मजा निराळी आहे. मला अधूनमधून अभिनय करणंसुद्धा आवडतं. तो मी केलाय देखील. सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केलंय आता इच्छा आहे ती दिग्दर्शक होण्याची. अमूक एका क्षेत्रात बस्तान बसवणं, तिथं टिकून राहणं हे माझ्या स्वभावात नाही.
सुनील डिंगणकर - ही वृत्ती किंवा दृष्टिकोन तुमच्यात कोठून आला?
किरकिरे - तो मी ठरवून आणला नाही. पण मला वाटतं, दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील शिक्षणानं हा दृष्टिकोन मिळाला असावा. ‘एनएसडी’चं प्रशिक्षण माझ्यासाठी खूप मोलाचं ठरलं. बऱ्याचदा मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी भाषा वापरली जाते. पण आज मी जे जे काही करतो, त्यातली एकही गोष्ट मी लहानपणी केली नाही. नाटक लिहिलं ते देखील कॉलेजमधल्या दिवसांत. हौशी रंगभूमीवर काम करताना जाणवलं की यातली सगळी कामं आपण स्वतंत्रपणे करू शकतो. दुसऱ्याचं नाटक करण्यापेक्षा आपण स्वत: नाटक लिहून का सादर करू नये, असं मला वाटलं. पुढे चित्रपटात आल्यानंतर स्वत: गाणं लिहिण्याची ऊर्मी आली ती याच दृष्टिकोनातून. नाटक असो वा सिनेमा, जे ‘परफेक्ट’ असेल ते देण्याचा माझा प्रयत्न असतो. लोकांना ते चांगलं वाटेल की वाईट हा नंतरचा मुद्दा.
गरीश कुबेर - चित्रपटाचा आशय आणि गाण्याचा फॉर्म यांची सांगड कशी घालता?
किरकिरे - आशय आणि फॉर्म यांच्यातला तिढा खूप जुना आहे. माझ्या मते गाणं लिहिण्याआधी तो चित्रपट कुठल्या प्रकारचा आहे, त्याची ‘भाषा’ काय आहे, त्यातल्या गाण्यांची प्रकृती काय असणार आहे, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं. काही कवी असे आहेत की चित्रपट कोणताही असो, त्यांची शैली एकच असते. त्यांची आयडेंटिटी सर्व गाण्यांत डोकावत राहते. माझ्यापुरतं विचाराल तर ‘लगे रहो मुन्नाभाई’चं गाणं असेल तेव्हा ‘बोले तो अब खोपडी के खोपचे में खलबली मचा दूॅँ’सारखं गाणं मी लिहितो. ‘खोया खोया चॉँद’सारख्या चित्रपटासाठी ‘क्यूं नये नयेसे दर्द की फिराक़ में तलाश..’ हे उर्दू लहेजा असलेलं गाणं लिहितो. ‘परिणिता’सारखी बंगाली वातावरणातली थीम असेल, तर  ‘पियू बोले’ लिहितो. ‘थ्री इडियट्स’सारखा विषय असेल, तेव्हा  ‘मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, लाइफ मिलेगी या तवेपर फ्राय होगा’ या बोलीतलं गाणं लिहून जातो. थोडक्यात, त्या चित्रपटाची भाषा काय हे शोधण्याचा मी प्रयत्न करतो. ती ‘भाषा’ एकदा गवसली की मग गाणी लिहिणं सोपं होतं. मला वाटतं, एकदा तुमचा ‘विचार’ निश्चित झाला की शब्द आपोआप सामोरे येतात.
विनायक परब - गाणं लिहायला कधी नकार दिलात का?
किरकिरे - गाणी लिहायचं नाकारलंय, असे प्रसंग नेहमीच येतात. बरेच निर्माते वा  संगीतकार दोन लव्ह सॉँग्ज, एक आयटेम सॉँग अशी ‘ऑर्डर’ घेऊन येतात तेव्हा लक्षात येतं की हे काम आपल्या पठडीतलं नाही. काही जण म्हणतात, ‘आम्हालासुद्धा एखादं ‘ऑल इज वेल’ लिहून द्या.’ आता एखाद्याला वाटतं म्हणून कोणत्याही गाण्यात ‘ऑल इज वेल’ कसं घालणार? म्हणून तर काय लिहायचं आहे हे निश्चित झाल्याखेरीज मी गाणं स्वीकारत नाही.
श्रीकांत बोजेवार - ‘रोबोट’चे डब संवाद लिहिण्याचा अनुभव कसा होता?
किरकिरे - अतिशय भीषण! त्या कामाचा केवढा मानसिक त्रास झाला हे मी सांगू शकत नाही. नुसते संवादच नाही, ‘रोबोट’ची गाणीसुद्धा मी लिहिली. त्यातले ‘किलिमंजारो मोहंजोदडो’, ‘कादल रद्दम’ यासारखे चित्रविचित्र शब्द कायम ठेवत. दिग्दर्शक शंकरला मी म्हणालो, अहो, हे काम फार अवघड आहे. पात्रांच्या ओठांच्या हालचालींशी मिळतंजुळतं लिहायचं तेही गाण्यांचा आशय लक्षात ठेऊन. मला हे जमणार नाही. पण ते लोक म्हणतात, तू एवढा विचार कशाला करतोस? गाण्याच्या शब्दांकडे कुणाचं लक्षच नसतं. ‘रोबोट’नंतर मात्र मी कानाला खडा लावला.
सुनील डिंगणकर - ‘एनएसडी’सारख्या संस्थांची कितपत गरज आहे? खासगी संस्थांमधून जे भरमसाठ शुल्क आकारलं जातं त्या तुलनेत ‘एनएसडी’ अधिक प्रभावी बनविता येणार नाही का?
किरकिरे- माझं मत विचाराल तर ‘एनएसडी’सारख्या संस्था आजही हव्या आहेत. आज सर्वच शैक्षणिक संस्था नफेखोरीच्या वाटेला जात आहेत. तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्हाला शिक्षण घेता येईल अशी परिस्थिती आहे, जी आपल्या देशाला भूषणावह नक्कीच नाही. म्हणजे पंडित नेहरूंनी काय स्वप्न पाहिलं होतं आणि आम्ही कोणत्या अवस्थेला आलो आहोत, याचा गंभीरपणे विचार करावा लागेल.  ‘एनएसडी’मध्ये आम्हाला हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असे. त्यामुळेच घरचा विरोध असूनही आम्ही कलेचं शिक्षण घेऊ शकलो. रघुवीर यादव, राजपाल यादव ही मंडळी अशा संस्थेतूनच आली. ‘एनएसडी’ ही खरोखरच आदर्श संस्था आहे. जगातल्या रंगभूमीबरोबरच देशातल्या सर्व प्रांतांमधलं नाटक तिथं शिकवलं जातं. नाटकाचं सर्वागीण शिक्षण दिलं जातं. व्यावसायिक संस्थांमध्ये हे मिळत नाही. तुम्हाला मूळ तत्त्वच नाही कळलं तर तुम्ही मोठी झेप कशी काय घेणार?
विनायक परब - मध्यंतरी  ‘एनएसडी’चे माजी विद्यार्थी असलेल्या कलावंतांनी एकत्र येऊन नवीन पिढीसाठी एखादी योजना तयार करावी अशी कल्पना समोर आली होती, त्याचं काय झालं?
किरकिरे - होय, वामन केंद्रेसारख्या मंडळींनी तसा प्रयत्न केला होता. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. आता सर्वच श्रेष्ठ कलावंत एकत्र येणार म्हटल्यावर मते-मतांतरे येणारच. पण त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत, हे खरं.
गिरीश कुबेर - ‘एनएसडी’सारख्या संस्थेतून आलेल्या कलावंतांचीदेखील एक वेगळी जातकुळी बनते. ‘आम्ही एनएसडीवाले’ या थाटाचा एक गंड त्यांच्या मनात असतो. तसं तुमच्या बाबतीत झालंय का?
किरकिरे - मी तरी तसा गंड कधीच बाळगला नाही. अनेकांना तर माझं ‘एनएसडी’शी नातं आहे, हेही माहीत नसतं. माझाही ते दाखवण्याचा आग्रह नसतो. मी ‘एनएसडी’चा म्हणून फिल्म इंडस्ट्रीनं मला वेगळी वागणूक द्यावी ही अपेक्षा करणं गैर आहे. माझी योग्यता मला कामातूनच सिद्ध करावी लागते. या माणसाला अधिक जाण आहे हे त्याच्या कामातूनच दिसलं पाहिजे. एकदा ते दिसलं की लोक आपोआपच त्याच्याकडे आकर्षित होतात. आता काही लोकांनी तसा आव आणला हे खरं. शेवटी ‘एनएसडी’ म्हणजे सर्वस्व नव्हे. तिथून आलेले वाईट कलाकारही दाखवता येतील आणि इतर ठिकाणाहून आलेले उत्तम कलाकारही नजरेला पडतील.
अतुल माने - नाटकाकडून सिनेमाध्यमाकडे येताना होणारा बदल तुम्ही कसा स्वीकारलात?

किरकिरे-  इंदोरमध्ये असताना मला नाटक आणि सिनेमा ही दोन्ही माध्यमं सारखीच वाटत. पण या दोन माध्यमांची ताकद दिल्लीला गेल्यानंतर कळली. पुढे मुंबईला आल्यावर सिनेमाबरोबरच सीरियलचं जगही अनुभवायला मिळालं. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणजे आपण स्थिरावलोय असं अजूनही मी मानत नाही. मला अजून सिनेमाचं दिग्दर्शन करायचंय. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तर काम केलंच आहे. ते करताना गाणी लिहिली. ओघानं पाश्र्वगायनही केलं. ‘ऑल इज वेल’ गाण्यामधला मुख्य आवाज माझा आहे. अशी वेगवेगळी माध्यमं मी धुंडाळली. पण सिनेमाची सगळी सूत्रं दिग्दर्शकाच्या हातात असतात एवढय़ासाठीच नाही तर स्वत:ला व्यक्त करण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणून मी दिग्दर्शनाकडे बघतो.
निशांत सरवणकर- सुधीर मिश्रा यांच्याकडून काय शिकायला मिळालं?
किरकिरे - सुधीरकडे मी बरंच काम केलं. ‘हजारों ख्वाहिशे ऐसी’, ‘कॅलकटा मेल’, ‘चमेली’च्या वेळी मी त्याचा सहाय्यक होतो. ‘ये साली ज़िंदगी’, ‘खोया खोया चॉँद’साठी गाणी लिहिली. ‘चमेली’चे संवाद लिहिले. सुधीरमुळे सिनेमा या माध्यमाशी माझी खऱ्या अर्थानं ओळख झाली. आयुष्यात केवळ पांढरा आणि काळा हे दोनच रंग नसतात तर काही करडय़ा छटाही असतात, त्याकडेही पहायला हवं, हे सुधीरकडून शिकलो. विचारात समतोलपणा आला. दिग्दर्शनातले तर बरेच धडे घेतले. कारण आशय आणि तंत्र या दोन्ही बाबतीत तो खूप ताकदीचा दिग्दर्शक आहे. त्याची जाण प्रगल्भ आहे. शिवाय आशयाबरोबरच रंजनाचं भानही त्याला आहे. त्याच्याशी माझं प्रदीर्घ काळापासून नातं आहे.
गिरीश कुबेर - ‘हजारों ख्वाहिशे ऐसी’ हा त्या काळातला सुरेख सिनेमा होता. हे वातावरण प्रत्येक सिनेमाच्या वेळी मिळतं का?
किरकिरे - जो चित्रपट तुम्ही करताय त्याच्याशी तुमचं नातं जोडलं गेलं तरच उत्तम काम होऊ शकतं.  ‘हजारों ख्वाहिशे ऐसी’सारखं वातावरण प्रत्येक वेळी मिळतंच असं नाही. ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘परिणिता’, ‘थ्री इडियट्स’ यासारख्या चित्रपटांत- किंबहुना, विनोद चोप्राच्या कोणत्याही चित्रपटाच्या वेळी माझी समरसता खूप होती. केवळ गाणीच नव्हे, पटकथा, पात्रनिवड या सर्व पातळ्यांवर विनोद आमच्याशी चर्चा करायचा. एकूण काय तर चित्रपट बनण्याची जी प्रक्रिया असते तिचा भाग व्हायला मला आवडतं. काही गीतकारांना शूटिंगला हजर राहणं बोअरिंग वाटतं. पण मला तसं नाही वाटत.
गणेश तिवारी - तुमच्या बोलण्यात खास इंदोरी ढंग जाणवतो. इंदोरचा किती वाटा आहे तुमच्या जडणघडणीत?
किरकिरे - इंदोरचा आणि एकूणच माळव्याचा खूप मोठा प्रभाव आहे माझ्यावर. माझं शिक्षण इंदोरलाच झालं. पूर्णपणे हिंदूी माध्यमात. त्या काळचे लेखक राहुल बारपुते, प्रभाकर माचवे यांच्यामुळे वाचनाची गोडी लागली. माझे आई-वडील दोघेही गाण्यातले. कुमार गंधर्वाकडे शिकायचे ते. कुमारांना लहाणपणापासून पाहिल्यानं त्यांचा खूप प्रभाव आहे माझ्यावर. शिवाय कुमारांचा हिंदी आणि मराठी या दोन्ही जगतांशी घरोबा असे. पु. ल., विंदा, पाडगावकर, बापट आदींच्या उपस्थितीत कुमारांच्या घरी रंगलेल्या मैफली मी बालपणापासून ऐकल्या. चित्रकला, शिल्पकला, पाककला या सर्व बाबतीत जिज्ञासेनं रस घेण्याची, त्यातून स्वत:साठी काही तरी घेण्याची कुमारांची वृत्ती जवळून पाहिली. अर्थात हेही सांगायला हवं की आयुष्याच्या एका टप्प्यावर मी इंदोरला कंटाळलो. तिथलं शांत, स्वस्थ, खवय्येगिरीचं वातावरण सोडून पळून जावंसं वाटण्याइतकी अस्वस्थता माझ्यात आली. अनेक चांगल्या लोकांचं टॅलंट केवळ इंदोरबाहेर न पडल्यामुळे कुजून गेलं. मी इंदोर सोडलं त्याचा फायदाच झाला.
प्रशांत दीक्षित- पूर्वी सिनेमाचा एकच प्रेक्षकवर्ग होता. आता मल्टिप्लेक्समुळे प्रेक्षकांचे स्तर निर्माण झालेयत. चित्रपटाचे संवाद वा गाणी लिहिताना या बदलाशी तुम्ही कसं जुळवून घेता?
किरकिरे-  नवीन पिढीचे काही प्रश्न आहेत. आता दर पाच वर्षांनी नवी पिढी येते आहे. दिग्दर्शकाच्या कार्यशैलीशी परिचित झालात की मग चित्रपटाची भाषा समजून घेणं कठीण जात नाही. ही भाषा कळली की लिहिणंही जमून जातं.
प्रशांत दीक्षित - याच ओघानं दुसरा मुद्दा. सलीम जावेद यांनीदेखील त्या काळातल्या तरुणांचे प्रश्न मांडले. उदाहरणार्थ ‘दीवार’. मूल्यांचा संघर्ष त्यातही दिसून आला. आजच्या तरुणांचे प्रश्न चित्रपटांतून मांडताना मूल्यांचं भान कितपत राखलं जातं?
किरकिरे - काळाप्रमाणे चित्रपटाची भाषा बदलली असली तरी मूल्यांचा संघर्ष कोणत्या ना कोणत्या? रूपात पहायला मिळतोच. ‘दीवार’चंच उदाहरण घेऊ. एक भाऊ स्मगलर, दुसरा पोलीस. पण आज तेवढी काळ्या-पांढऱ्या रंगातली मांडणी केली जात नाही. पण मूल्यांचा विचार नक्कीच दिसतो. माझ्या मते ‘थ्री इडियट्स’सारख्या चित्रपटातदेखील हा विचार दिसला आहे.
श्रीकांत बोजेवार - गुलजार यांच्याशी मध्यंतरी विंदांच्या कवितेवर बोलताना चर्चेची गाडी गाण्यांकडे वळली तसे ते तक्रारीच्या सुरात म्हणाले, ‘यार मैं कविता की बात कर रहा  हूँ मुझे गानों की तरफ मत खींचो.’ कविता की गीत, हा तिढा तुम्हालाही सतावतो का?
किरकिरे - दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे खरं. गाणं लिहिताना सिनेमाची जातकुळी, व्यक्तिरेखा, वातावरण अशा नाना गोष्टींचं भान ठेवावं लागतं. त्याउलट कविता हे स्वत:शी केलेलं हितगुज असतं. माजघरात गप्पा माराव्यात तसं. वेगळ्या भाषेत सांगायचं झाल्यास सिनेमाचं गाणं हे लग्नाच्या जेवणासारखं बनवावं लागतं. कविता ही भुकेच्या वेळी बनवलेल्या पिठलं-भातासारखी असते. कविता की गीत हा पेच अनेकांना भेडसावत आलाय. साहिर, कैफी, शकील, मजरूह, गुलजार यांनी दोन्ही पातळ्यांवर उत्तम कामगिरी करून ठेवल्येय. मी मात्र कविता फारशा लिहिल्या नाहीत. ज्या लिहिल्या त्या अजून प्रसिद्ध नाही केल्या. पण एक गंमत सांगू का, तुम्ही गाणं लिहायला बसलात की तुमच्यातला ‘कवी’ जागा होतोच. मला असं गाणं आवडतं ज्यात कविता दडलेली असते.
सुनील देशपांडे - कविता आणि गाणं या दोहोंतली दरी कमी करणाऱ्या गुलजार, जावेद यांच्या परंपरेत सध्या तुमचं नाव घेतलं जातं. विशेषत: तुमचं ‘बावरा मन’ हे गाणं तर तरुणांना प्रचंड आवडतं. लोकांना अजूनही भावपूर्ण, तरल गाणी विशेष भावतात, असं मानायचं का? ‘बावरा मन’विषयी अधिक काय सांगाल?
किरकिरे-  मला स्वत:लाही भावपूर्ण गाणं लिहायला आवडतं. या गाण्यामागे कोणताही व्यावसायिक उद्देश नव्हता. ते शंभर टक्के माझं हृद्गत आहे. मला गुणगुणण्याची पूर्वीपासून सवय आहे. गुणगुणताना काही तरी शब्द जुळवायचे हीदेखील एक सवय. मुंबईला आल्यावर उमेदवारीच्या काळात एकदा रिक्षातून जाताना ही कविता सुचली. आधी एक ओळ, मग दुसरी ओळ, मग पूर्ण कविता. ती मी माझ्या चालीमध्ये गुणगुणायचो. पाचृसहा वर्षे मित्रमंडळींमध्ये मी ती ऐकवत असे.  एकदा असाच ‘हजारों ख्वाहिशें’च्या सेटवर अभिनेता के. के. मेनन यानं ही कविता ऐकली. त्यानं लगेच ती सुधीर मिश्राला ऐकवायला सांगितली. सुधीरनं हे गाणं करू या असा आग्रह धरला अन् मलाच गायला लावलं. आता मी तयारीचा गायक नाही. पण लोकांना ते गाणं प्रचंड आवडलं.
निशांत सरवणकर - एका बाजूला ‘बावरा मन’ सारखं गाणं करताना दुसऱ्या बाजूला ‘ऑल इज वेल’ लिहिण्याची ताकद कोठून येते? गाणं लिहिताना तुम्हाला हे जाणवत नाही का?
किरकिरे - गाणी पूर्णत: भिन्न असली तरी दोन्हींचा उद्देश एकच. भावना लोकांपर्यंत पोहोचवणं. ‘थ्री इडियट्स’मधल्या मुलांचीदेखील एक भाषा आहे. त्यांच्या तोंडी गाणं टाकायचं तर ते त्यांच्याच भाषेत येणार. एक गाणं मला इंटरनेटवरचं एक कार्टून पाहून सुचलं. कोंबडीचं एक पिल्लू फ्राईड एग पाहून आईला विचारतं, ‘इज दॅट माय ब्रदर?’ ती कल्पना मला एवढी आवडली की सरळ या गाण्यात वापरली.
गिरीश कुबेर - कलाकाराचाही एक ताठा असतो. साहिरसारख्यांनी तो दाखवला. गायक वा संगीतकार असतील मोठे, मी त्यांच्यापेक्षा वरचा, असं साहिर म्हणायचे. कलाकारामध्ये हा ताठा असावा का?
किरकिरे - तसा ताठा असण्यात गैर काही नाही. अर्थात, हा ताठा वेगवेगळ्या मार्गानी दाखवता येतो. मला स्वत:ला अजून तरी वाटत नाही की आपण मिजास करण्याइतकं काम केलंय. अजून तरी मी स्ट्रगलरच आहे. मी लिहिलेली एक ओळदेखील बदलणार नाही हे सांगण्यातही एक माज असतो. तो असणं चांगलंच. कारण ज्याचं काम त्याला बरोबर ठाऊक असतं. तुम्ही डॉक्टरला बोलावणार आणि टाके कसे घालायचे हे त्याला सांगणार, हे कसं चालेल?
प्रशांत दीक्षित - विनोद चोप्रांनी एवढे उत्तम सिनेमे केले. मग पूर्वीच्या राज कपूरप्रमाणे त्याचं नाव का होत नाही? या पिढीत कुणालाच ते वलय का लाभत नाही?
किरकिरे - राज कपूर हा नट होता. आपल्याकडे नटाचं नाव अधिक होतं. मराठीत अलीकडेच ‘बालगंधर्व’साठी मी दोन गाणी लिहिली. उमेश कुलकर्णीच्या आगामी ‘देऊळ’साठीही मी लिहितोय. नाना पाटेकरचा त्यात रोल आहे. मराठीत खूप नवनवे विषय येऊ लागलेत हे चांगलं लक्षण आहे. नव्या दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी आपल्या मातीतले विषय धुंडाळले पाहिजेत. बंगाली, मल्याळी सिनेमे याच कारणानं वर गेले. तुम्ही जेवढे ‘लोकल’ व्हाल तेवढा ‘ग्लोबल’ परीघ तुमच्या कलाकृतीला मिळेल.
सुनील डिंगणकर - तुमची ओळख नेमकी कशी रहावी असं वाटतं?
किरकिरे-  माझ्या नावामागे प्रख्यात गीतकार यासारखी उपाधी नसली तरी चालेल. कारण मी आज गीतकार आहे. उद्या तसा राहीन की नाही माहीत नाही. तेवढय़ासाठीच मी झब्बा घालून, पान चघळून वावरत नाही. टी शर्ट घालूनही कविता-गाणी करता येतात. गीतकार म्हणून उगाच इमेज कशाला? बरेच लोक पहिल्या भेटीत मला म्हणतात, तुम्ही असे दिसत असाल असं वाटलं नव्हतं!  पण मला आज हे करायला आवडत असेल, उद्या वेगळं काही. म्हणून म्हणतो, माझी ओळख ‘स्वानंद किरकिरे’ अशीच रहावी!
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो