‘सृष्टिज्ञान’ वसा विज्ञानप्रसाराचा!
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

‘सृष्टिज्ञान’ वसा विज्ञानप्रसाराचा! Bookmark and Share Print E-mail
अवधान
कविता भालेराव -   रविवार, २४ जुलै २०११
१ जानेवारी १९२८ या दिवशी ‘सृष्टिज्ञान’ या मासिकाचा जन्म झाला. विज्ञानाची सुबोध माहिती मराठीतून वाचकांना द्यावी या उद्देशाने प्रा. गोपाळ रामचंद्र परांजपे यांनी समविचारी सहकाऱ्यांच्या साहाय्याने हे मासिक सुरू केले. प्रा. परांजपे यांना हे मासिक सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली, याचा इतिहासही उद्बोधक आहे.
प्रा. गो. रा. परांजपे उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेले होते. पण महायुद्धाचे वारे वाहू लागले आणि नाइलाजाने त्यांना जर्मनीतून शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावे लागले. परंतु जर्मनीत असताना त्यांना तेथील वैज्ञानिक प्रगती, लोकांमधील विज्ञानजागृती, त्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला होता. भारतात याउलट परिस्थिती होती. देश पारतंत्र्यात होता. भारतीयांना इंग्रजीतून शिक्षण घ्यावे लागत होते. इतिहासासारखा विषयही इंग्रजीतून शिकावा लागत होता. गणित आणि विज्ञानाचा तर प्रश्नच नव्हता. यास्तव आपणच काहीतरी करायला हवे, हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यादृष्टीने ते कामाला लागले.
भारतात परतल्यावर प्रा. परांजपे ‘रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ म्हणजेच आताच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ या संस्थेत अध्यापक म्हणून रुजू झाले. या संस्थेतील काही अध्यापकांच्या साहाय्याने प्रा. परांजपे यांनी ‘फिलॉसॉफिकल असोसिएशन’ नावाचे एक मंडळ स्थापन केले. आणि या मंडळातर्फे इंग्रजी आणि मराठी या  भाषांतून विविध वैज्ञानिक विषयांवर व्याख्याने सुरू केली. मराठीच्या व्याख्यानांना जास्त श्रोते जमत. यानिमित्ताने अशा वैज्ञानिक माहितीची समाजाला खूप गरज आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले. या विज्ञानविषयक व्याख्यानांमधील माहिती कायमस्वरूपी लेखरूपात लोकांना वाचायला मिळाली तर उपयुक्त ठरेल, या विचाराने प्रा. परांजपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सोसायटी फॉर दि प्रमोशन ऑफ सायंटिफिक नॉलेज’ या नावाने एक संस्था स्थापन केली. या संस्थेचे पहिले कार्य म्हणून केवळ विज्ञान विषयाचा सुबोध मराठीतून प्रसार करणाऱ्या ‘सृष्टिज्ञान’ या मासिकाची योजना आखली गेली.
जुलै २०११ म्हणजे या महिन्यात ‘सृष्टिज्ञान’चा एक हजारावा अंक प्रकाशित झाला आहे. गेली ८४ वर्षे हे मासिक सातत्याने विनाखंड प्रकाशित होत आहे. ही गोष्ट मराठी नियतकालिकांच्या इतिहासात एकमेवाद्वितीयच मानावी लागेल. केवळ ‘विज्ञान’ विषयाला वाहिलेले हे मासिक मराठी वाचकांना विज्ञानाभिमुख करणे, त्यांच्या मनात विज्ञाननिष्ठा रुजविणे, तसेच विज्ञानातील नवे शोध, नवे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अत्यंत निष्ठेने करत आहे.
आर्थिक पाठबळ नसेल तर मनात कितीही इच्छा असली तरी अनेक नियतकालिके नाइलाजाने बंद करावी लागल्याचा इतिहास आहे. ‘सृष्टिज्ञान’लाही अगदी पहिल्या एक-दोन वर्षांपासूनच आर्थिक परिस्थितीशी सामना करावा लागला आणि आजही तीच परिस्थिती आहे. असे असूनही ‘सृष्टिज्ञान’ मासिकाने एक हजारव्या अंकापर्यंत वाटचाल केली आहे. ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे. या यशामध्ये आर्यभूषण मुद्रणालय आणि महात्मा फुले वस्तुसंग्रहालय या दोन संस्थांचा मोलाचा वाटा आहे.
प्रा. गो. रा. परांजपे मुंबईत नोकरीला  होते. त्यांचे मित्र शं. ब. सहस्रबुद्धे यांनी पुण्यातील त्यांच्या बालोज्ञान मुद्रणालयात ‘सृष्टिज्ञान’चा पहिला अंक छापून दिला. त्यानंतरही पहिले वर्षभर त्याचे मुद्रण बालोज्ञानने केले. परंतु त्या काळच्या परिस्थितीनुसार अंकासाठी पुणे-मुंबईच्या वाऱ्या करणे जिकिरीचे, खर्चाचे आणि वेळखाऊ होत होते. म्हणून मग दुसऱ्या वर्षी मुंबईतच मोरमकर यांच्या लक्ष्मीनारायण मुद्रणालयात हे काम सुरू झाले. पुन्हा काही अडचण येऊन पुण्याच्या गणेश महादेव आणि कंपनीकडे ‘सृष्टिज्ञान’चे काम द्यावे लागले.
अशा तऱ्हेने या मासिकाची पहिली पाच वर्षे अत्यंत कसोटीची गेली. परंतु १९३३ मध्ये ‘सृष्टिज्ञान’ला दत्तक-पिता भेटला. आर्यभूषण मुद्रणालयाचे तेव्हाचे व्यवस्थापक वामनराव पटवर्धन यांनी या मासिकाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेतली. कोणताही आर्थिक लाभ या कामातून होणार नाही, हे माहीत असूनही एक आवश्यक समाजसेवा या भावनेतून ‘सृष्टिज्ञान’चे काम त्यांनी अंगावर घेतले आणि जानेवारी १९३३ पासून डिसेंबर १९७४ अशा ४२ वर्षांच्या प्रदीर्घ काळात आर्यभूषण मुद्रणालयाने ‘सृष्टिज्ञान’ची संपूर्ण आर्थिक जबाबदारी स्वीकारली आणि अतिशय चोखपणे ती पारही पाडली. त्यांना संपादक मंडळाची साथ होतीच. या काळात ‘सृष्टिज्ञान’चे अनेक विशेषांक प्रकाशित झाले. ‘सृष्टिज्ञान’चे भाग्य असे की, आर्यभूषणच्या सर्व व्यवस्थापकांनी या मासिकाला कायम आपले मानले. संपादकांची प्रत्येक नवी योजना, नवी कल्पना त्यांनी उचलून धरली आणि ती यशस्वी करण्यासाठी अविश्रांत परिश्रमही घेतले.
एक विशेष गोष्ट इथे सांगावीशी वाटते. ‘सृष्टिज्ञान’चा ५०० वा अंक प्रकाशित करण्याचे ठरले तेव्हा आर्यभूषणचे भिडे हे व्यवस्थापक होते आणि त्यांच्या पत्नी ‘सृष्टिज्ञान’च्या कार्यवाह म्हणून काम पाहत होत्या. ५०० व्या अंकासाठी भिडे यांनी खूप झटून तयारी केली. आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रणे वाटावीत तशा हौसेने ५०० व्या अंकाच्या समारंभाची निमंत्रणेही दोघांनी केली. या प्रसंगावरून लक्षात येते ती ‘सृष्टिज्ञान’ने कमावलेली पुण्याई!
आर्थिक जबाबदारीचा बोजा कमी झाल्यामुळे ‘सृष्टिज्ञान’च्या संपादकांना अंक वाचनीय, माहितीपूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करता येऊ लागले. या काळात मोहोरदार कागदावरचे बहुरंगी मुखपृष्ठ, भरपूर चित्रे आणि आकृत्या असणारे प्रत्येकी ६४ ते ८० पानांचे ‘सृष्टिज्ञान’चे खास विशेषांक काढण्यात आले. तसेच अंकाचा लहान म्हणजे क्राऊन आकार बदलून क्राऊन अष्टपत्री असा मोठा करण्यात आला.
१९७४ मध्ये ‘सृष्टिज्ञान’पुढे नवे संकट उभे राहिले ते म्हणजे आर्यभूषण मुद्रणालय बंद झाले आणि आता ‘सृष्टिज्ञान’चे भवितव्य काय, ही मोठीच चिंता संस्थापक प्रा. गो. रा. परांजपे, सल्लागार, संपादक मंडळ आणि असंख्य हितचिंतकांना पडली होती. सुदैवाने महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाच्या संचालकांनी आणि विश्वस्त मंडळाने ‘सृष्टिज्ञान’च्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी उचलली आणि जानेवारी १९७५ पासून हे मासिक म. फुले वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाखाली प्रकाशनात खंड न पडता सुरू राहिले. आजही ‘सृष्टिज्ञान’साठी गिरीश बापट यांचा सदैव मदतीचा हात असतो. त्यांनी या मासिकाचे मोल ओळखले आहे. त्यामुळेच ‘सृष्टिज्ञान’चा एक हजारावा अंक आज प्रकाशित झाला आहे.
प्रा. गो. रा. परांजपे यांच्याकडे मासिकासाठी लेखक मिळविण्याचे उत्तम कसब होते. ते अतिशय कौशल्याने विज्ञानातील तज्ज्ञ लोकांना लेखन करण्यास प्रवृत्त करत. ‘सृष्टिज्ञान’ मासिक हा त्यांचा ध्यास आणि श्वास होता. त्यांनी विज्ञानाच्या विविध शाखांमधील वैज्ञानिकांना संपादक मंडळावर घेतले होते. डॉ. वि. ना. भाजेकर, प्रा. श्री. ल. आजरेकर, प्रा. प्र. रा. आवटी, प्रा. मो. ल. चंद्रात्रे, डॉ. मो. वा. चिपळूणकर, डॉ. वि. ना. गोखले, डॉ. गो. रा. केळकर, आ. मा. लेले, प्रा. भालबा केळकर, प्रा. प्रभाकर सोवनी, डॉ. अ. ब. सप्रे, प्रा. य. बा. राजे, डॉ. वा. द. वर्तक, गो. बा. सरदेसाई, निरंजन घाटे अशी ही यादी कितीतरी मोठी आहे. सध्याचे संपादक मंडळ निरंजन घाटे आणि राजीव विळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळमळीने ‘सृष्टिज्ञान’चे काम करत आहे.
गेल्या ८४ वर्षांच्या काळात ‘सृष्टिज्ञान’ने सुमारे ४०,००० पृष्ठांचा विज्ञानविषयक उपयुक्त माहितीपूर्ण व वाचनीय मजकूर पुरवला आहे. विज्ञानाच्या बहुविध शाखा-उपशाखांतील माहिती सुबोध, सोप्या मराठी भाषेतून देण्याचे कार्य केले आहे. ‘सृष्टिज्ञान’ला यापुढेही हे काम करायचे आहे. नवे ज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे परिस्थिती झपाटय़ाने बदलते आहे, बदलणार आहे. तेव्हा ‘सृष्टिज्ञान’लाही काळाबरोबर राहण्याची गरज आहे, याची संपादक मंडळाला जाणीव आहे. परंतु त्यासाठी वाचकांचेही सहकार्य मिळणे गरजेचे आहे. ‘सृष्टिज्ञान’ मासिकाने आगामी काळात अनेक नव्या योजना आखल्या आहेत. त्या अमलात आणण्यासाठी मदतीचे हात पुढे यावेत, अशी इच्छा एक हजाराव्या अंकाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.
 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो