एक तळमळ बोलकी झाली
मुखपृष्ठ >> idea exchange >> एक तळमळ बोलकी झाली
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

एक तळमळ बोलकी झाली Bookmark and Share Print E-mail

रविवार, २३ ऑक्टोबर २०११
alt

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अकरा संस्था.. प्रत्येक संस्थेचे कार्यक्षेत्र भिन्न, त्यांच्या कामाचा परिघही भिन्न.. पण त्या प्रत्येक संस्थेला ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमाने एकत्र आणले.

उपेक्षित, वंचित, शोषित आणि भौतिकदृष्टय़ा प्रगत समाजापासून दूर राहिलेल्या समाजघटकांतील माणूस घडविण्यासाठी आणि जगविण्यासाठी स्वार्थनिरपेक्ष सेवाभावाने काम करणाऱ्या या संस्थांना समाजाची साथ मिळाली, तर त्यांच्या कार्याला बळ मिळेल, या भावनेने समाजातील सत्प्रवृत्तींना सत्कार्यासाठी प्रवृत्त करण्याचे ‘लोकसत्ता’ने ठरविले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील या सेवाभावी संस्थांना मदत करण्याच्या आवाहनास असंख्य वाचकांनी भरभरून प्रतिसादही दिला, आणि या संस्थांचे कार्य निविघ्नपणे पार पडावे यासाठी अक्षरश हजारो हातांचे पाठबळ या उपक्रमाच्या माध्यमातून या संस्थाना लाभले.. ‘लोकसत्ता’वर दृढ विश्वास असलेल्या असंख्य वाचकांनी मुक्त हस्ताने या संस्थांच्या पदरी मदतीचे दान टाकले. या अनोख्या ‘दानयज्ञा’ची सांगता बुधवारी  झाली. वाचकांनी लोकसत्ता कार्यालयात पाठविलेले सहकार्याचे धनादेश संबंधित संस्थांकडे सुपूर्द करण्याच्या या हृद्य सोहळ्यात, या संस्थांच्या वाटचालीची ओळख तर झालीच, पण त्या संस्थांच्या आधारस्तंभांची आकाशाएवढी उंचीदेखील असंख्य वाचकांनी अनुभवली.. या सोहळ्याच्या निमित्ताने संस्थांच्या प्रतिनिधींनी लोकसत्ताच्या प्रतिनिधी आणि वाचकांशी संवादही साधला, आणि सेवाभावी कार्यामागील तळमळ ‘बोलकी’ झाली..
alt

सुमारे तीन तास रंगलेल्या या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, राज्यात काम करणाऱ्या, एकटेपणाने आपले कार्य पुढे नेणाऱ्या या संस्थांना एका समान आणि व्यापक व्यासपीठावर एकत्र आणण्याची अनोखी संकल्पनादेखील इथे रुजू घातली.. आता राज्यात सेवाभावी कार्य करणाऱ्या असंख्य संस्थांना एकत्र आणणारा एक दुवा उगवू पाहात आहे..  सेवाभावाला सहकार्य करणाऱ्या समाजाची अखंड साथ मिळणार असल्याची ग्वाही ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ उपक्रमामुळे या संस्थाना मिळाली आहे. या कार्यक्रमात बोलताना संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावनांतून हाच सूर पाझरत होता..
अहमदनगर जिल्ह्य़ात गेली २२ वर्षे एचआयव्ही बाधितांना स्नेहाचा आधार देणाऱ्या आणि alt
लालबत्ती भागात शरीरविक्रय करून उपेक्षित जिणे जगणाऱ्या शोषित महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या स्नेहालयच्या स्थापनेमागील उद्देशाची फळे आता जिल्ह्य़ात दिसू लागली आहेत. या संस्थेची माहिती देताना स्नेहालयचे प्रतिनिधी मिलिंद कुलकर्णी यांच्या शब्दांना या भावनेची किनार लाभली होती. ‘स्नेहालय’च्या भक्कम संरक्षणामुळे अल्पवयीन बालिकांचे लैंगिक शोषण थांबले, त्यामुळे सध्या नगर जिल्ह्य़ात एकही अल्पवयीन मुलगी वेश्याव्यवसायात नाही. पण दुसऱ्या बाजूला याच वेश्यांच्या किंवा आसपासच्या alt
झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये बाल गुन्हेगारी, बाल मजुरी आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. एचआयव्ही बाधितांना जीवन देणे आपल्या हातात नाही, पण निदान त्यांना मरण तरी माणसासारखे यावे, या तळमळीतून एचआयव्ही बाधितांसाठी स्नेहालयने काम सुरू केले, आणि स्नेहालय हा अनेकांच्या जगण्याचा आधार झाला.. एकीकडे हे समाधान असले, तरी दुसरीकडे तेवढीच नवीन आव्हाने समोर येतात. अशा आव्हानांचा सामना करताना संस्थांना अनेकदा स्वयंसेवक किंवा कार्यकर्त्यांची अडचण जाणवते. भरभरून आर्थिक मदत alt
देणारे अनेक असतात. पण खांद्याला खांदा लावून काम करणारे खूप थोडे मिळतात. म्हणजे आर्थिक मदतीची गरज संस्थांना नसते, अशातला भाग नाही. पण त्याबरोबरच आमच्या उपक्रमात सहभागी होऊन काम केल्यास जिल्ह्य़ातीलच नाही, तर राज्यातीलही अनेक समस्या दूर होतील, असा  विश्वास मिलींद कुलकर्णी यांनी व्यक्त केला.  
तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा लाभलेली कोल्हापूरची एक संस्था म्हणजे देवल क्लब गायन समाज! बाबा देवल या संगीतवेडाने झपाटलेल्या रसिकाने काही रसिकांना एकत्र आणले आणि alt
या संस्थेचा जन्म झाला. संगीत, नृत्य, नाटय़ अशा कलांचे एक प्रतिष्ठित व्यासपीठ अशी ख्याती प्राप्त झालेल्या या संस्थेचे प्रतिनिधी श्रीकांत डिग्रजकर यांनी यावेळी बोलताना संगीत कलेकडे पाहण्याच्या सरकारच्या मानसिकतेवर टीका केली. महाराष्ट्र शासनाकडे संगीत किंवा कलांच्या विकासासाठी निश्चित धोरण नाही. साधारणपणे पोट भरल्यानंतर करण्याची गोष्ट म्हणून सर्वच समाज संगीताकडे पाहतो. राज्य सरकारचा गायनकलेकडे पाहण्याचा दृष्टीकोनही हाच असतो. दक्षिणेकडे किंवा अगदी बंगालमध्येही संगीताला चांगलाच राजाश्रय मिळाला आहे. मात्र महाराष्ट्रात तसे प्रयत्न होत नाहीत. विविध संगीत महोत्सवांबरोबर शास्त्रीय संगीताच्या alt
प्रचारासाठी मोठय़ा प्रमाणात संगीत शिक्षणाचे वर्ग काढायला हवेत. त्याशिवाय उत्तम गायकांच्या गायकीचे डॉक्युमेण्टेशनही करण्याची गरज डिग्रजकर यांनी बोलून दाखवली. देवल क्लब आता या कलांची जोपासना करण्यासाठी डिजिटल लायब्ररी स्थापन करणार आहे. अशा उमेदीला ‘लोकसत्ता’ची साथ मिळाल्यामुळे रसिकांच्या मदतीचे हात लाभले, असे सांगताना डिग्रजकरांचा स्वर काहीसा भारावलेला भासत होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे आणि त्याचाही आधीपासूनचे ऐतिहासिक दस्तावेज बाळगणाऱ्या पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाचे हे शताब्दी वर्ष आहे. alt
मंडळाचा कारभार प्रचंड आहे. मोडी, कानडी, फारसी, अशा अनेक लिपींमधील दस्तावेजांचा समृद्ध साठा संस्थेच्या दप्तरी आहे, तर ४२ हजार हस्तलिखित पोथ्यांचे दुर्मिळ संचित संस्थेने जपले आहे. अनेक संस्थांचे अहवाल, शंभर वर्षांंपेक्षाही जुनी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके या संस्थेच्या संग्रही आहेत. गेली २० वर्षे या संस्थेचे चिटणीसपद सांभाळणाऱ्या श्री. मा. भावे यांनी संस्थेच्या कामाची माहिती देताना एक खंतदेखील व्यक्त केली. आपण इतिहास वाचतो, पण इतिहासाकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे, असे सांगताना समाजाच्या उदासीनतेची व्यथा त्यांच्या सुरातूनच पाझरत होती. देशाला भविष्यात विकासाच्या राजमार्गावरून वाटचाल करायची असेल, तर इतिहास जाणून घेणे आवश्यक alt
आहे. पण आपल्या देशात इतिहासाबद्दल अनास्था दिसते. भारत इतिहास संशोधन मंडळाने गेल्या शंभर वर्षांत अनेक संस्थांच्या अहवालांपासून नकाशे, शस्त्रास्त्रे अशा अनेक ऐतिहासिक मूल्य असलेल्या गोष्टींचा संग्रह केला आहे. अनेक भाषांतील दस्तावेज अजूनही पडून आहेत. त्यांचे संशोधन होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
कामाच्या व्यापात संस्था स्थापन करण्याचे राहूनच गेले असे सांगत स्वतच एक संस्था म्हणून काम करणारे महाडचे  डॉ. हिंमतराव बावस्कर हे विंचूदंशावरील उतारा व त्याच्या संशोधनाबद्दल प्रसिद्ध आहेत. संशोधन करण्यासाठी पैसा, स्पॉन्सरशिप लागते, या गोष्टींवर आपला विश्वास नाही. संशोधन करण्यासाठी मनात इच्छा आणि संशोधक वृत्तीची गरज असते. आयुष्यात आपण न्यूटन आणि आर्किमिडिज यांचा आदर्श ठेवला आहे. न्युटनला संशोधन करण्यासाठी केवळ एक सफरचंद पुरले. तर आर्किमिडिजला त्याचीही गरज पडली नाही, असे सांगत त्यांनी उपस्थितांना एक वेगळाच संदेश दिला. आतापर्यंत आपण स्वखर्चाने संशोधन केले होते. अनेकदा आपले संशोधन प्रसिद्ध करताना पैसे कमी पडले. पण त्यामुळे संशोधनात खंड पडला नाही. पण आता ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमातून आपल्याला आतापर्यंत न मिळालेले आर्थिक पाठबळ लाभले आहे. या पाठबळाच्या जोरावर आपल्याला नवनवीन क्षेत्रांत संशोधन करण्याचे आणि ते संशोधन प्रसिद्ध करण्याचे बळ मिळाले आहे, असे ते म्हणाले. डॉ. बावस्कर हे अथक परिश्रम आणि आगळी हिंमत यांचे प्रतिबिंब असल्याचा उल्लेख त्यांचा परिचय करून देताना कार्यक्रमाचे सूत्रसंचालक विनायक परब यांनी केला होता. बावस्करांचे ते शब्द ऐकताना श्रोत्यांना याची पुरती साक्ष पटली, आणि टाळ्यांच्या गजरात त्यांच्या उमेदीला श्रोत्यांची साथ मिळाली.
सेवाभावाने सुरू केलेल्या कामातून जगण्याचा अर्थ समजतो, आणि जीवनाचे सारदेखील उमगते. मतिमंद मुलांचे पालक असणे ही केवढी वेदना आहे, याची जाणीव झाल्याने सुमारे ३० वर्षांपूर्वी अविनाश बर्वे यांनी अमेय पालक संघटना नावाची ही संस्था स्थापन केली, आणि मतिमंदांच्या सेवेत झोकून घेतले. मतिमंद मुलांना वाढवताना आपल्यानंतर काय, हा प्रश्न सर्वच पालकांसमोर पडतो. या काळजीत टाकणाऱ्या प्रश्नाला उत्तर म्हणून आम्ही अमेय पालक संघटनेची स्थापना केली. अनेक वर्षे आम्ही या मुलांबरोबर काम करत आहोतच. या मुलांना झेपेल असा रोजगारही आम्ही त्यांना उपलब्ध करून दिला. मात्र एवढेच करून थांबता येत नाही. आणखी काम करण्यासाठी आम्हाला आर्थिक सहाय्याबरोबरच लोकांनी या उपक्रमात अधिकाधिक सहभागी होण्याचीही गरज वाटते, असे अमेय पालक संघटनेचे अविनाश बर्वे यांनी सांगितले. मतिमंदांची संख्या कोटींच्या घरात आहे, आणि आपल्याकडे एक लाखभर मतिमंदांसाठीदेखील पुनर्वसनाची सोय नाही, असे बर्वे म्हणाले, तेव्हा त्यांच्या कामाचे मोल नकळतपणे उपस्थितांच्या मनावर उमटले.
मुलीचं लग्न झालं, की तिचं माहेर तुटतं. परित्यक्तेला तर घरच उरत नाही. अशा वेदना सोबत घेऊन जगणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासाठी सुमारे २५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘वंचित विकास संस्थे’चा व्याप आज खूप वाढला आहे. वंचितांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी स्थापन झालेल्या या संस्थेचा विस्तार विदर्भ, मराठवाडय़ापासून पार मध्य प्रदेशातही झाला आहे, असे संस्थेचे प्रतिनिधी बाळकृष्ण भागवत यांनी सांगितले. आदिवासी मुले, परित्यक्ता महिला, वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची मुले या समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या वेगळ्या आहेत. त्या समस्यांचे निराकारण होण्यासाठी केवळ एक वंचित विकास संस्था पुरे पडणार नाही. त्यासाठी सर्वानीच एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजातील या घटकांनाही समान वागणूक देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. लोकसत्ताच्या उपक्रमामुळे अनेक हात एकत्र आले. त्या हातांचे बळ आता आमच्या पाठीशी आहे, याची जाणीव सुखावणारी आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
विदर्भातील एका माळरानावर महारोग्यांना हाताशी घेत ‘आनंदवन’ उभे करणाऱ्या बाबा आमटे यांचे पुत्र आणि महारोगी सेवा समितीचे प्रमुख डॉ. विकास आमटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सेवाभावी संस्थांमध्ये एकमेकांचे पाय खेचण्यासाठी चाललेल्या धडपडीवर ताशेरे ओढले. एका समान उद्दिष्टासाठी काम करणाऱ्या सर्व संस्थांनी एकत्र येत एक साखळी करून काम करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. सर्वाना आपल्या संस्थेचे कार्य कसे वाढेल, ही चिंता आहे. मात्र आपल्याला ‘आनंदवन’ लवकरात लवकर बंद कसे होईल, यात स्वारस्य आहे, असे ते म्हणाले. गेली अनेक वर्षे काम करूनही ही समस्या सुटत नाही, याबद्दल खेद वाटतो, असे ते म्हणाले. समाजसेवा करतानाही विविध गोष्टींचे संशोधन केल्यास त्याचा फायदा समाजसेवेलाच होतो, असेही त्यांनी आपल्या विविध संशोधनांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले. माध्यम प्रतिनिधींनीही केवळ राजकारण आणि राजकीय व्यक्तींना प्रसिद्धी न देता असे विधायक कार्य करणाऱ्या संस्थांना लोकांसमोर आणण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. हे काम थांबेल, तो दिवस यावा अशी बाबा आमटेंची इच्छा होती. पण अजूनही कुष्ठरुग्णांची समाजात भीषण उपेक्षा होत असल्याची खंत डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली. या रुग्णांना बोटांचे ठसे देण्यासाठी बोटेच नसल्यामुळे सरकारचे ‘आधार कार्ड’ मिळणे मुश्किल झाले, असे त्यांनी सांगितले, तेव्हा उपस्थितांमधून वेदनेचा हुंकार सभागृहात नकळत उमटून गेला.
पारधी, वडारी अशा समाजातील विविध जमातींमधील मुलांना प्रत्यक्ष ‘व्होकेशनल’ शिक्षण देण्यासाठी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमची स्थापना करणाऱ्या गिरीश प्रभुणे यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर ताशेरे ओढले. सध्याची शिक्षणव्यवस्था ही इंग्रजांनी ‘बाबू’ लोक घडवण्यासाठी सुरू केलेली व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेने परंपरागत आपला व्यवसाय करून जगणाऱ्यांच्या मुळावर पाय दिला. आयुष्यातील २० वर्षे फुकट घालवल्यावर पुन्हा काम करण्यासाठी एखादा अभ्यासक्रम करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. या जमातीतील तरुणांनी शिक्षण घेऊन नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना नोकऱ्याच न मिळाल्याने ते पुन्हा परंपरागत व्यवसायांकडे वळले. असा अनुभव सांगत समाजाने शिक्षणव्यवस्थेबाबत वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास सुरुवात करावी, असे ते म्हणाले.
एकटेपणा सोडून समाजासमोर यावे!
सेवाभावाने काम करणाऱ्या संस्थांनी एकटेपणा सोडून समाजासमोर यावे, असे मत लोकसत्ताचे प्रतिनिधी संदीप आचार्य यांनी यावेळी झालेल्या गप्पांमध्ये व्यक्त केले. प्रसिद्धीची हाव न बाळगता काम करणे हा गुण असला तरी त्यामुळेच संस्थांना आर्थिक डोलारा सांभाळताना कसरत करावी लागत असल्याने, आपण केलेले काम समाजासामोर आलेच पाहिजे, असा आग्रही मुद्दाही आचार्य यांनी मांडला. संस्थांच्या वतीने त्यावर आपले मत व्यक्त करताना वंचित विकास संस्थेच्या नीता कुळथेकर म्हणाल्या की, चांगल्या कामांच्या पाठीशी समाज उभा राहतोच, असा संस्थांचा अनुभव आहे. प्रसिद्धी मिळविताना मूल्यांशी तडजोड होता कामा नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
‘नियोजन, व्यवस्थापन आणि निरपेक्ष काम करणारे कार्यकर्ते हवेत’
alt
वाचकांनी या संस्थांना मदतरूपाने पाठवलेले धनादेश संस्थांच्या प्रतिनिधींकडे सोपवण्यासाठी दातृत्त्वासाठी परिचित असलेले एल अ‍ॅण्ड टीच्या वित्तीय सेवा विभागाचे प्रमुख वाय. एम. देवस्थळी आणि त्यांची पत्नी लीना देवस्थळी आवर्जून उपस्थित होते. या उदात्त कार्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकसत्ता’ने आपल्याला निमंत्रण दिल्याबद्दल त्यांनी ‘लोकसत्ता’ला धन्यवाद दिले. मात्र पुढील वर्षी एखाद्या सेवाभावी संस्थेच्या प्रमुखांनाच अशा कार्यक्रमाचे प्रमुखपद भूषवण्यास आमंत्रित करण्यात यावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाबाबत आठवण सांगताना देवस्थळी म्हणाले, ‘हा उपक्रम सुरू झाला त्यावेळी माझ्या बहिणीची शस्त्रक्रिया झाली होती. तिला प्रचंड वेदना होत होत्या. मी ‘लोकसत्ता’मधील या उपक्रमाबाबत तिला वाचून दाखवले आणि तिच्या वेदना बऱ्याच अंशी कमी झाल्या.’ समाजात आपल्या वेदनांचा आणि दुखांचा बाऊ करणाऱ्या अनेकांना हीच प्रचिती आली असेल, असे ते म्हणाले. या सेवाभावी संस्थांना काही मोलाच्या सूचना करताना देवस्थळी यांनी व्यवस्थापन कौशल्य, नियोजन या गोष्टींवर भर दिला. एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व विभागांची गरज या सेवाभावी संस्थांनाही आहे. संस्थांचा कारभार पारदर्शक असणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्तम प्रशासनाची आवश्यकता आहे. तसेच उद्या एखाद्या व्यक्तीने संस्थेच्या कार्याबाबत किंवा आर्थिक व्यवहारांबाबत शंका उपस्थित केल्यास तो अपमान किंवा राग न मानता त्या शंकांचे निरसन करण्यातही याचा उपयोग होतो. तसेच उत्तम व्यवस्थापन नसेल, तर अनेक संस्थांना भविष्यात अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम व्यवस्थापनाची गरज आहे. तसेच या संस्थांनी उत्तमोत्तम कार्यकर्ते मिळवण्यासाठी, कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यासाठी मनुष्यबळ विभागाकडे लक्ष देण्याचीही गरज त्यांनी बोलून दाखवली.
व्यवस्थापनाबरोबरच देवस्थळी यांनी नियोजनाकडेही या प्रतिनिधींचे लक्ष वेधले. एखादी संस्था सुरू केल्यानंतर त्या संस्थेची पुढील वाटचाल निश्चित करण्यासाठी कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. कार्यकर्ते मिळविणे हे गरजेचे आहे. मात्र योग्य त्या कार्यकर्त्यांना योग्य काम देणे, हे नियोजनाद्वारेच शक्य होईल. उत्तम नियोजनासाठी दूरदृष्टीची आवश्यकता असते, असेही ते म्हणाले. सर्व संस्थांच्या प्रतिनिधींना असा मूलमंत्र देताना देवस्थळी यांनी काही संभाव्य धोक्यांकडेही या सर्वाचे लक्ष वेधले. सामाजिक कार्य करताना अनेक व्यक्तींना त्या कार्याची झिंग चढते. त्यामुळे आपल्या संस्थेपेक्षाही आपण मोठे असल्याचीही भावना निर्माण होते. असे झाल्यास कार्यकर्ता आपल्या मूळ उद्देशापासून ढळण्याची शक्यता जास्त असते. संस्थेच्या कार्याला प्रसिद्धी मिळाली की, हे घडण्याची शक्यता जास्त असते. मात्र अशा प्रकारची धुंदी टाळण्यासाठी जास्तीत जास्त निरपेक्षपणे काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
लीना देवस्थळी यांनी आपल्या छोटेखानी भाषणात ‘लोकसत्ता’च्या उपक्रमाचे कौतुक केले. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमांतर्गत येणाऱ्या प्रत्येक संस्थेचे काम प्रचंड आहे. या संस्थांची ओळख महाराष्ट्रातील सर्व वाचकांना करून देत ‘लोकसत्ता’ने मोलाचे काम केले. मात्र कोणत्याही विधायक कार्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे तुलनेने सोपे असते. पैसे आणि दातृत्त्व असलेली कोणतीही व्यक्ती अशा कामांसाठी आर्थिक सहाय्य करू शकते. त्यात फार काही कष्ट पडत नाहीत. पण अशा कार्यासाठी स्वतला झोकून देण्याची गरज जास्त आहे. त्यासाठी लागणारे धाडस, निस्पृहता असे गूण आजच्या तरुणांकडे आहेत. मात्र त्यांना अशा संस्थांचा मार्ग दाखवून या संस्थांच्या कार्यात मदत करण्यासाठी एखादा उपक्रम ‘लोकसत्ता’ने हाती घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वाचकांच्या प्रतिक्रिया
alt
चांगले काम करणाऱ्या मंडळींना मदत करण्याची इच्छा नेहमीच असते. मात्र खात्रीलायक संस्था कोणत्या आहेत, ते कळत नाही. ‘लोकसत्ता’च्या माध्यमांतून संस्थांची आणि त्यांच्या कार्याची माहिती मिळाल्याने ते काम सोप्पं झालं. मला वाटतं ‘लोकसत्ता’ने हा उपक्रम दरवर्षी सुरू ठेवावा. खरोखर छान उपक्रम होता. रोज छापून येणाऱ्या वाईट बातम्यांमध्ये तो मरुस्थळासारखा होता. त्या माध्यमातून काही चांगल्या संस्थांची माहिती मिळाली. त्यांना मदत करता आली. त्यामुळे शक्य असल्यास ‘लोकसत्ता’ने रोजच्या बातम्यांमध्येही काही भाग चांगल्या माणसांच्या कामांसाठी राखून ठेवावा, अशी माझी सूचना राहील.
ज्योती राऊत
 समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, हीच उपक्रमाच्या माध्यमातून मदत करण्याची भावना होती. ‘सर्व कार्येषु’मधील काही संस्थांना आधी भेट दिलेली असली तरी सर्व संस्थांना भेट देणे शक्य नव्हते. मात्र या संस्थांच्या नावांची ‘लोकसत्ता’ने शिफारस केल्याने त्या चांगल्यास असतील, याबाबतची खात्री होती. समाजातील केवळ सुशिक्षित आणि उच्चवर्णीयांनीच नव्हे तर प्रत्येकानेच आपल्या कुवतीनुसार काहीतरी मदत केली पाहिजे.
उदयचंद्र फाटक
 डॉ. बावस्कर यांच्या कार्याबद्दल बरेच ऐकले होते. एकटय़ाच्या हिमतीवर कोणत्याही मदतीशिवाय सुरू असलेल्या त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल वाचलेही होते. त्यांना संशोधन कामासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचेही माहीत होते. मात्र त्यांना मदत नक्की कुठे आणि कशी करायची हा प्रश्न होता. ‘सर्व कार्येषु’मुळे ते सोपे झाले. यासारखा उपक्रम राबविण्याची ‘लोकसत्ता’ची कल्पना अतिशय चांगली होती. पुष्कळ मंडळींना मदत करण्याची इच्छा असूनही योग्य मार्ग सापडत नाही. त्यांच्यासाठी एक चांगले माध्यम मिळाले.
श्रीकांत लागू
थोर समाजसेवक बाबा आमटेंच्या कामाबद्दल माहिती होती. त्यांच्या आनंदवनच्या कार्याबद्दलही बरेच ऐकले होते. मात्र अन्य काही संस्थांबद्दल काहीही माहिती नव्हते. ‘सर्वे कार्येषु’च्या माध्यमातून ती माहिती मिळाल्याने मदत करणे अत्यंत सोपे झाले. अन्यथा सर्वसामान्य मंडळींना इतक्या साऱ्या संस्थांची माहिती अभावानेच मिळते. एखाद्या सामाजिक संस्थेला फूल ना फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत करण्याची इच्छा आधीपासूनच होती. ‘सर्वे कार्येषु’मुळे त्यासाठी निमित्त मिळाले. हा स्तुत्य उपक्रम ‘लोकसत्ता’ने भविष्यातही सुरूच ठेवावा.
अरुणा नलावडे
समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य सुरू असते. प्रत्येकवेळी त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. अनेकदा समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असूनही काही करता येत नाही. त्यामुळे या प्रकारचे सामाजिक कार्य करणाऱ्यांचे कौतुक वाटते आणि त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची तळमळ मनात असते. ‘लोकसत्ता’ने अशा संस्थांची माहिती प्रकाशात आणून फार मोठे काम केले. त्यानिमित्ताने किंचित का होईना, समाजाचे ऋण फेडण्याची संधी मिळाली. ‘लोकसत्ता’ ने या प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबवावे. जेणेकरून उत्सवाला उधाण येऊन होणारा वायफळ खर्च; चांगल्या संस्थांवर करण्याचा संस्कार लोकांवर होईल आणि समाजकार्याला मदत करण्याची वृत्ती वाढत जाईल.
 शशिकला सावंत, एस. ए. नाईक, मीरा परांजपे,
सुलभा चिरमुले, अश्विनी गुळाणीकर, सी. व्ही. परांजपे, प्रगती साने,पल्लवी रेखी
संकलन :  रोहन टिल्लू, कैलास कोरडे

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो