बलात्काराचा अर्थ
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बलात्काराचा अर्थ Bookmark and Share Print E-mail
लेख
आरती कदम ,शनिवार, २६ नोव्हेंबर २०११
alt
बलात्कार एकटय़ा स्त्रीवर केले जातात तसेच युद्धात हजारो स्त्रियांवर केले जातात.बलात्काराचा वापर कायमच शस्त्र म्हणून केला गेल्याचं इतिहास सांगतो. त्यामागे आहे स्त्रीला दुय्यम मानण्याची भावना. आत्तापर्यंत स्वत:तल्या ताकदीची कल्पना नसलेल्या स्त्रीने मात्र याविरुद्ध भूमिका घ्यायची आता वेळ आली आहे, आपल्या शरीराची युद्धभूमी व्हायला तिने नकार द्यायला हवाय..
स्त्रीच्या बाबतीत एक सनातन आणि सार्वत्रिक भीती मनाच्या तळाशी कायमच घर करून राहिलेली असते. ही भीती असते बलात्काराची.बलात्काराचा हा अक्राळविक्राळ वेताळ स्त्रीचे स्वातंत्र्य कायमच मर्यादित करत आला आहे. जो स्त्रीला एकांतात एकटीने जाण्याला किंवा रात्री-बेरात्री एकटीने फिरण्याच्या विचाराला संघर्षांचं रूप देत आला आहे.
 समाजशास्त्रीयदृष्टय़ा विचार करता याचं कारण बलात्कार स्त्रीच्या आयुष्याशी, तिच्या मानमर्यादेशी, तिच्या स्वातंत्र्याशी, तिच्या योनीशुचितेशी जोडला जातो. तिच्याबाबतीत तो शारीरिक, मुख्यत्वे भावनिक असतो. तो सामाजिक असतो तसा अनेकदा राजकीयही असतो. काय असतो हा बलात्कार? स्त्रीला दुय्यम मानणारी पुरुषी ताकद? वासनांधता? सत्तेचा, पशांचा माज? शत्रू पुरुषावर सूड उगवण्यासाठीचं शस्त्र? की त्याही पलीकडे जाऊन वंशविच्छेदाची व्यापक गरज? कारण शारीरिक गरज, वासना म्हणून एकेकटीवर केलेला बलात्कार ते युद्धात, धर्मयुद्धात, वंशयुद्धात हजारोंच्या संख्येने झालेले स्त्रियांबरील बलात्कार असा व्यापक आलेख या बलात्काराच्या बाबतीत मांडता येतो.
दिवसेंदिवस बलात्काराच्या संख्येत वाढ होत असल्याच्या बातम्या आपण वाचतच असतो. भारतात हे प्रमाण दर पंचवीस मिनिटाला एक बलात्कार, असं आहे. दिल्लीला तर बलात्काराची राजधानी म्हटलं जाऊ लागलंय.(एनसीआरबीनुसार भारतात होणाऱ्या चारपकी एक बलात्कार दिल्लीत होतो.) रोजच्या रोज प्रसिद्ध होणाऱ्या बलात्काराच्या बातम्या मन अस्वस्थ करत असतातच, पण या रोजच्या जगण्याच्या पलीकडे असणारा बलात्काराचा इतिहास खूपच भयानक, उद्ध्वस्त करणारा, वेदनादायी आहे. म्हणूनच जेव्हा मुक्ता मनोहर यांचं मनोविकास प्रकाशनने नुकतंच प्रसिद्ध केलेलं, ‘नग्नसत्य, बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध’ हे पुस्तक हाती आलं तेव्हा या बलात्काराचा, त्याच्या ‘पोकळ‘ अहंमन्यतेचा नव्याने विचार करावासा वाटला. कारण यात एका अतिमहत्त्वाच्या सत्याशी आपला थेट सामना होतो तो म्हणजे सगळेच बलात्कार हे फक्त त्या स्त्रीला उपभोगणं इतक्यापुरते मर्यादित नसतात, तर त्याशिवायचे बलात्कार हे स्त्री देहावर केले जात असले तरी ते असतात तिच्या जवळच्या पुरुषाच्या अहंकारावर, त्याच्या मानमर्यादेवर, अस्तित्वावर, त्याच्या जाती-वंश-  धर्मावर. कारण कोणत्याही युद्धात हरणाऱ्या पुरुषाचा सगळ्यात मोठा पराभव तेव्हा होतो जेव्हा त्याच्या बायकोवर, मुलीवर, बहिणीवर किंवा आईवर बलात्कार होतो. दोन पुरुषांमधल्या लढय़ामधलं बलात्कार हे अस्त्र आहे. आणि त्याला बळी पडते ती स्त्री.
नमुन्यादाखल पुस्तकातील ही काही ठळक उदाहरणे,
* युगोस्लाव्हियाच्या विघटन काळात म्हणजे १९९१ ते १९९५ या पाच वर्षांत जीवघेण्या संहाराचा जन्म झाला. या काळात बोस्नियात ५० हजार स्त्रियांवर बलात्कार झाले.
* रवांडातील तुत्सी जमात वंशविच्छेदनाची लक्ष्य ठरवण्यात आली होती. एप्रिल ते जुल १९९४ या १०० दिवसांत ८ लाख तुत्सींचा संहार करण्यात आला. त्यातल्या ५ लाख स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले.
* युनायटेड नेशन्सच्या पीस कीपिंग सेना आल्यापासून कंबोडियात वेश्या व्यवसायात अल्पवयीन मुलींची संख्या लक्षणीय पद्धतीने वाढली. १९९१ ला ती ६००० होती १९९२ मध्ये ती २०,००० झाली.
* दुसऱ्या महायुद्धात जपानतर्फेच सनिकांना लंगिक सुख पुरविणारया स्त्रिया अशी कंम्पर्ट वूमन ही जमात तयार करण्यासाठी आली. त्यात जपान, चीन, कोरीया, फिलिपाइन्स, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया येथून अगदी ११ वर्षांपासूनच्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलं. या काळात मुलीवर  रोज ३० ते ४० वेळा बलात्कार व्हायचे.  
 या पुस्तकातली अशी अनेक उदाहरणं वाचताना प्रामुख्याने जाणवतं ते हेच की बलात्कार हे शस्त्र म्हणून वापरलं गेलं आहे. पुरुषाकडचं असं अस्त्र ज्याच्या जोरावर तो आदीम काळापासून कायमच स्त्रीला भीती दाखवत आला आहे. तिच्यावर वर्चस्व गाजवत आला आहे. भीती ते प्रत्यक्ष बलात्कार यातून जाव्या लागणाऱ्या स्त्रियांविषयी, बलात्काराच्या सर्वव्यापीपणाविषयी लेखिका मुक्ता मनोहर यांच्याशी गप्पा झाल्या.
या पुस्तकात तुम्ही बलात्कारालाच बोलतं केलंय.
हो, मला हे पुस्तक म्हणजे नुसती माहितीवजा सत्य सांगायचं नव्हतं. बलात्काराचं जे सर्वव्यापी रूप आहे त्याला व्यक्त करायचं होतं. धर्मयुद्ध, वंशवाद, पहिलं-दुसरं महायुद्ध, बोस्निया,रवांडातील बलात्कार, गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमधले बलात्कार ते एकेकटीवर होणारे बलात्कार इतका व्यापक पट यात आहे. स्त्रीला बलात्काराचं लक्ष्य का बनवलं जातं, याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला आहे.  माणसांनीच माझा कसा उपयोग करून घेतला ते हा वेताळरूपी बलात्कारच सांगतो.     
स्त्री-पुरुषांच्या संबंधात तुम्ही बलात्काराकडे कसं पाहता.  
‘ मी हे करू शकतो,‘ ही वर्चस्वाची जाणीव पुरुषाच्या मानसिकतेत रुजत गेली. कुटुंबात श्रमविभागणी झाली तेव्हा पुरुष शिकारीला बाहेर पडू लागला तेव्हापासून तो अधिकाधिक आक्रमक होत गेला. आणि त्यानेच त्याला पुरुषी अहंकाराकडे नेलं.. स्त्री ही फक्त मूल जन्माला घालण्याचं साधन म्हणूनच पाहिली जात होती. योनीशुचितेला अवास्तव महत्त्व आलं. बाईच मोहात पाडते, असं समजवण्यात आलं. माझ्या दृष्टीने कुटुंबव्यवस्थेची ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
* याचाच अर्थ स्त्रीला दुय्यमत्व मिळत गेलं आणि तिने ते कित्येक शतकं निमूटपणे सहन केलं. पण बदलत्या काळात स्त्रीला आपलं दुय्यमत्व मान्य नाही. तरीही तिचा बळी जातोच आहे. याचाच अर्थ आताच्या प्रगत, श्रीमंत, सुशिक्षित जगातही स्त्रीच्या शरीराचा वापर अप्रत्यक्ष आणि कदाचित तिच्याही नकळत होतोच आहे.
 - हा सगळा चंगळवादाचा, नवीन तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. स्त्रीची आकर्षक, सुंदर आणि उपभोगासाठी तयार अशीच प्रतिमा जाणीवपूर्वक तयार केली जातेय. वाढते मोबाईल, कॉम्प्युटर गेममधली स्त्री ही तशीच आहे. चित्रपटांमधली     
वाढती लैंगिकता याचंच निदर्शक आहे. आज कोणतेही चित्रपट पहा, टीव्हीवरच्या मनोरंजनात्मक वाहिन्या पहा, यात स्त्रीचं शरीर ज्या पद्धतीने दाखवलं जातंय. ते उपभोगात्मक आहे. टीव्हीवर बलात्कार झाला आणि टोळकं बलात्कार करायला बाहेर पडलं, असंही झालेलं आहे. कारण सौंदर्याला अश्लीतेचा रंग चढवला जाऊ लागला आहे. यात आíथक गणितं आहेतच. याच गणिताला बेरजेत रूपांतर करणारा भयानक व्यवसाय आहे तो पॉर्न चित्रपटाचा. लंगिकता ही या बाजारपेठेच्या कक्षेतील महत्त्वाची घटक मानली गेली. आणि कोटय़वधीचा धंदा त्याभोवती रचण्यात आला. हे चित्रपट आज सहज उपलब्ध होताहेत. िलडा लवलेस या अश्लील चित्रपट तारकेचं ‘ऑरडियल’ नावाने आत्मचरित्र बाजारात आलं. त्यात अश्लीलतेतून लैंगिक भावना सतत उत्तेजित ठेवणाऱ्या या धंद्यातली अमानुषता सगळ्यांसमोर आली. एवढंच कशाला समाजातल्या वेश्या व्यवसायामागेही अर्थकारणच आह,े हा बाजार सातत्याने वाढावा यासाठी विविध राज्यांतल्या, देशांतल्या तरुण मुली या व्यवसायात जाणीवपूर्वक आणल्या जाताहेत. आजची सामाजिक परिस्थितीच बिघडत चालली आहे. त्यासाठी आमूलाग्र बदलाकडे पूर्णत: गेल्याशिवाय फरक पडणार नाही. त्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन हवा. माणसं जेव्हा माणसासारखं अधिक जगायला लागतील तेव्हाच फरक पडेल.
ही परिस्थिती बदलायची असेल तर स्त्रीनेच भूमिका घ्यायला हवी. राजस्थानची भंवरीदेवी  स्वत:च्या बलात्काराविरोधात आजही ठामपणे उभी आहे, पाकिस्तानमधल्या मुक्तार मईने स्वत:वरचा अन्याय बाजूला ठेवून अशा स्त्रियांसाठी लढाई सुरू केली आहे. यंदाचं शांततेचं नोबेल मिळवणाऱ्या लिबियाच्या लिमा बोवीने सेक्स स्ट्राईकसारखा मार्ग यशस्वीपणे राबवून दाखवला. स्त्रीने आपली ताकद आता दाखवायला हवी. आपलं शरीर युद्धभूमी  करण्याचं  तिने नाकारायला  हवं..
मुळात प्रत्येक स्त्रीने स्वत:ला प्रश्न विचारायला हवा, आपण किती वष्रे बळी पडायचं? आपण युद्धाच्या बाजूचे आहोत का? त्यातही संहारकता सहनशीलतेच्या पलीकडे गेलेली आहे. असं म्हणतात की धर्मयुद्धांमध्ये स्त्रियांवर बलात्कार झाले तेव्हा स्त्रियाही तिथे होत्या. म्हणजे बायका बलात्काराच्या बाजूने होत्या का? की ते तिथे फक्त शस्त्र म्हणून वापरलं गेलं. आणि ते त्यांना मान्य होतं? बाईची संवेदनक्षमता खूप वेगळी आहे. त्यातूनच स्त्रीने ठामपणे स्वत:साठी निर्णय घ्यायला हवा. रामायण, महाभारत काळाचा विचार केला तर, सीतेनेही युद्धाला ठाम विरोध केला होता. भर राजसभेत द्रौपदीला खेचत आणलं गेलं तेव्हा ‘मला हा कसं काय पणाला लावू शकतो’,असा प्रश्न तिने धाडसीपणे विचारला होताच. नेमकं काय घडलं त्या काळात, याचा अभ्यास केला पाहिजे. स्त्रीचे हक्क, अधिकार काय होते, ते का बदलले, याचा विचार व्हायला हवा.
 बलात्कारकर्त्यांना  कठोर शिक्षा देऊन याचं प्रमाण घटेल, असं वाटतं का? इस्लाम वा अरब देशात खूप कठोर शिक्षा असतात..
कठोर शिक्षेने प्रश्न सुटण्याला मर्यादा आहेत. शिवाय याचा दुसरा अर्थ स्त्रियांनी बुरख्यात असायला हवं. पुरुषाच्या नजरेस पडू नये, त्याला आकर्षक वाटायला नको म्हणून कायम काळे कपडे घालावेत. म्हणजे एका बाजूला पुरुषाची लंगिकता खूप जास्त असते, असं मान्य करायचं आणि स्त्रीला पापाचे धनी ठरवायचे, हा विरोधाभास आहे. बलात्कार का घडतो याचा सजगतेने विचार व्हायला हवा. मुख्य म्हणजे बलात्कार हा इतर गोष्टींबरोबर जातो म्हणून परिस्थिती बदलायची असेल तर दमनाविरुद्ध भूमिका घेणं गरजेचं आहे. शस्त्रास्त्रांवर जगात ८०० बिलियन डॉलर्स वार्षकि खर्च होतात, त्यातून निर्माण होणाऱ्या दहशतीविरुद्ध समाजमन तयार होण्यासाठी स्त्रियांनीच एकत्र यायला हवं. अनेक जणींना वास्तवाची, आजूबाजूला काय घडतंय याची कल्पनाच नाही. ती स्वत:च्या संसारातच अडकलेली आहे. मग एकत्रित भूमिका कशी घेणार? यासाठी गरज आहे ती सामाजिक बदलाची. त्यासाठी स्वयंपाकघरातली गुलामगिरी विकासाच्या एका टप्प्यामध्ये तोडलीच पाहिजे. ऑफिसेसमध्ये बालसंगोपन केंद्र, चांगलं ताजं जेवण मिळायला हवं. तिच्या सुरक्षेसाठी सोयी उपलब्ध व्हायला हव्यात. तिनेच पुढाकार घेऊन चळवळ उभारायला हवी.
या पुस्तकात जसा मी शेवट केला आहे तेच सांगते, हे मोठं आव्हान आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात मानवी ताकदीची, सृजनात्मक शक्तीची गरज आहे. त्यासाठी आता मी प्रत्येक दरवाजा ठोठावणार आहे..
मुक्ता मनोहरांबरोबर दरवाजा ठोठावणाऱ्यांची संख्या वाढणं, त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण त्यांच्याशी बोलताना एक सत्य ठळकपणे जाणवतं ते म्हणजे या बलात्काराचं अक्राळविक्राळ रूप त्याला बळी पडणाऱ्या आम्ही स्त्रियांनीच तयार केलंय. त्याच्या विरोधात आम्ही लढू शकत नाही, तेवढी ताकद आपल्यात नाही, या भ्रमातच आपण इतकी  वर्षे राहिलो. त्याच्याविरोधात एकत्रित यायला पाहिजे, असं तीव्रतेने कधी वाटलंच नाही किंवा वाटूनही पुढाकार घेतला नाही. इतकंच कशाला ग्लॅमरच्या नावाखाली प्रसिद्धी आणि पैशांसाठी आपल्या शरीराचा होणारा वापर आपणच होऊ दिला. आता वेळ आली आहे याला मर्यादा घालायची. कारण आपला बळी जाणं आपणच थांबवायला हवंय. बलात्काराचा अहंकार हा पोकळ आहे हे जाणवून दिलं पाहिजे, बलात्काराची भीती ही चिरंतन आणि सार्वत्रिक रहाणार नाही यासाठी आपणच  एकत्र पावलं टाकायला हवी आहेत. स्त्रीचं लंगिक जीवन ही तिची खासगी गोष्ट आहे. तिचं शरीर ही तिची प्रतिष्ठा आहे आणि ती राखणं आता तिच्याच हाती आहे..     ’

मुक्ता मनोहरांनी बलात्काराविरुद्ध मोहीम उघडण्याचं आवाहन केलं आहे. आपण साऱ्यांनीच या आवाहनाला प्रतिसाद द्यायला हवाय. तुम्ही जर या चळवळीत सहभागी होऊ इच्छित असाल तर आम्हाला जरुर कळवा. आमचा पत्ता - लोकसत्ता, चतुरंग इ एल १३८ टी टी सी इंडस्ट्रीयल एरिया, महापे, नवी मुंबई ४००७१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो