निमित्त मात्रेण : पोवाडा लसणीचा!
मुखपृष्ठ >> निमित्त मात्रेण >> निमित्त मात्रेण : पोवाडा लसणीचा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

निमित्त मात्रेण : पोवाडा लसणीचा! Bookmark and Share Print E-mail

altवीणा गवाणकर , शनिवार , ७ जानेवारी २०१२
आजूबाजूला सतत काही ना काही घडत असतं, त्यातूनच मागचं काही आठवत जातं. भूत-वर्तमानाची वीण सतत घातली जात असते. मनाची ही प्रक्रिया सतत चालू रहाणारी, म्हणूनच विचारांना प्रवृत्त करणारी. काही तरी निमित्त घडतं आणि स्मृती - वास्तव यांची सांगड घालत मन विचारात हरवून जातं. मनातलं हे विचारं मांडणं हेच निमित्त मात्रेण.
‘‘दारिद्रय़, भूकबळी, शेतकरी आत्महत्या, अन्नधान्य टंचाई हे गंभीर प्रश्न आपल्या देशात कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे नव्हे, तर चुकीच्या मानवी धोरणामुळे निर्माण होतात,’’ असं ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ म्हणतात.

आणि रा. रं. बोराडेंची छोटेखानी कादंबरी ‘रिक्त अतिरिक्त’ (२००९) वाचताना याचं प्रत्यंतर येतं. सहकारी साखर कारखाने, ऊस पिकवणारा शेतकरी आणि त्याची आर्थिक कोंडी, त्याची दुर्दशा वगैरेंची सांगड घालत ‘रिक्त अतिरिक्त’च्या माध्यमातून लेखक ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या दुर्दशेवर प्रकाश टाकतो. या कादंबरीचा ‘नाथाप्पा’ शेवटी ऊसाचं उभं पीक जाळतो आणि त्यात स्वत:ची आहुती देतो.
ऊस, कांदा, कापूस उत्पादकांच्या  करूण कहाण्या या नेहमीच्याच होऊन बसल्यात. शेतकरी संघटनेच्या १९८० सालातल्या ‘कांदा आंदोलना’पासून तर कांद्याला राजकीय व्यासपीठ मिळालं. आजही तो तिथं आहेच. अगदी अलीकडे कांदा निर्यातीवर बंदी घालून नंतर लगेच ती मागेही घेतली गेली. त्यावेळच्या बऱ्याच राजकीय घडामोडी प्रसार माध्यमातून पुढे आल्या.
कापसा-ऊसासाठीचे अपेक्षित दर उत्पादक शेतकऱ्याला मिळत नाहीत. बियाण्यासाठी, रासायनिक खतांसाठी वारेमाप खर्च झालेला असतो. उत्पादन खर्चाचीही भरपाई होण्याची चिन्हं दिसत नाहीत. कर्जबाजारी शेतकऱ्याला आपला प्रपंच रेटावा कसा, याचा घोर लागतो. जिकिरीला येऊन मोर्चे, रस्ताबंदी वगैरे मार्ग योजले जातात.. शेवटी काही आत्महत्या करतात. हे दुष्टचक्र खंडित का होत नाही?
राजकीय दूरदृष्टीचा अभाव, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, स्वार्थी ध्येयधोरणं, शासनकर्ते आणि सामान्य जनता यातली नाळ तुटली आहे म्हणून! पण हे फक्त आपल्याकडेच घडतं असं नाही. अगदी अलीकडे अतिशय नेट लावून एक चिनी कादंबरी वाचून पूर्ण केली. ती वाचत असताना आपल्या मराठी वृत्तपत्रातून कांदा-ऊस-कापसाच्या बातम्या वाचत होते. त्या चिनी कादंबरीच्या निमित्तानं जाणवलं की शेवटी मानवी व्यवहार सगळीकडे सारखेच. राजवटींनुसार तपशिलांत काय तो फरक!
तर त्या चिनी कादंबरीचं नाव ‘द गार्लिक बॅलड्स’ मो यान या चिनी लेखकानं ती १९८८ मध्ये प्रकाशित केली. एप्रिल १९८९ मध्ये चीनमधल्या ‘तिआनान्मेन’ चौकात कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध निदर्शने करणाऱ्या हजारो लोकांचे शिरकाण झाले. त्यानंतर या कादंबरीवर बंदी आली. पुढे १९९५ मध्ये तिचा इंग्रजीत अनुवाद झाला.
कथेचा सूत्रधार आहे एक अंध शाहीर. हा ‘पॅराडाइज काऊंटी’च्या सामान्य जनतेच्या सदसद्विवेकाचा प्रतीक आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला हा शाहीर आपल्या काव्य पंक्तीतून पुढील घडामोडींचं सूचन करतो. या कादंबरीच्या कथानकाची सुरुवात होते १९८६ सालच्या उन्हाळ्यापासून!
आपल्या प्रजेचं कल्याण करण्याच्या हेतूनं पॅराडाइज काऊंटीचा स्थानिक नेता आदेश देतो- ‘फक्त लसूण लावा! अन्य कशाचीही लागवड करायची नाही.’ आपला नेता चांगलं तेच सांगेल, यावर विश्वासून सगळी काऊंटी लसूण लावते. उदंड पिक येतं. सगळीकडे नुसता लसूणच लसूण! मग समृद्धीची स्वप्नं पाहत शेतकरी बाजारात लसूण विकायला निघतात. त्यांना सुखासुखी लसूण विकू देतील तर ते प्रशासकीय अधिकारी कसले. ते अधिकारी शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विविध कर लावतात. एवढय़ावरच प्रकरण थांबत नाही. त्या लसणीवर निर्यात बंदीही येते. किमती तर कोसळतातच. त्या लसणीला योग्य भाव मिळत नाही. काढलेला लसूण  खळ्यात तसाच पडून किती दिवस काढणार! शेतातल्या अजून काढून न आणलेल्या लसणीचं काय? हे स्थानिक अधिकारी तर गोदामांची सुविधाही देत नाहीत. आणि स्वत:ही तो लसूण विकत घेत नाहीत. सगळीकडचा लसूण कुजू लागतो. त्याच्या दरुगधीनं जनतेला जीव नको होतो. सतत किती लसूण खाणार, तोंडाला, श्वासाला, घामाला, कपडय़ालत्त्याला लसणीचा वास. प्रेमीजनांना प्रणयक्रीडा करणंही अशक्य होऊन बसतं. नफा तर सोडाच, पण लसणीसाठीचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. मग मुलाबाळांचा प्रतिपाळ कसा करायचा? त्यांना खायला काय घालायचं, तर लसूण! स्थानिक पुढाऱ्याला काऊंटीची जनता साकडं घालते. तो पाठ फिरवतो. कसलीही जबाबदारी घ्यायची टाळतो. चिडलेले गावकरी निदर्शनं करतात. त्याचं कार्यालय जाळतात. आपण ज्या पुढाऱ्यावर, ज्या नेत्यावर विश्वास ठेवला त्यानंच आपल्याला वाऱ्यावर सोडलंय, तो फक्त स्वत:चीच पोतडी भरतोय, असं दिसल्यावर तिथली जनता उठावाच्या तयारीला लागते. पुन्हा एकदा क्रांती करून हे चित्र बदलू, या भाबडय़ा आशेनं एक होते. उठाव करते. पण तिच्या पदरी अपयशच येतं. फसवणूक येते.
या उठावाच्या वेळी मोठी धरपकड होते. पकडल्या गेलेल्यांचं अस्तित्व फक्त ‘कैदी क्रमांक’ म्हणून उरतं. त्यातल्या एका खटल्यातील आपल्या वडिलांची बाजू मांडणाऱ्या तरुणाचं वक्तव्य वाचण्यासारखं आहे. हा तरुण स्वत: ‘मार्क्‍ससिस्ट लेनिनिस्ट टीचिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेक्शन’मध्ये इन्स्ट्रक्टर आहे. तो म्हणतो- ‘माझे वडील असे कसे वागले?..’ त्यांनी टीव्ही सेट फोडला, सरकारी कागदपत्रं जाळण्यात सहभाग घेतला.. का त्यांनी असं केलं?.. ते तर मुक्तिसंग्रामाचे पाईक. कम्युनिस्ट पक्षावर त्यांचं प्रेम आहे. पाचुंदाभर लसणीसाठी ते असे हिंसक कसे झाले? का झाले?’
तेव्हा कार्टात उपस्थित असलेल्यातून एकजण ओरडून म्हणतो- ‘ती कम्युनिस्ट पार्टी नि ही कम्युनिस्ट पार्टी वेगळी. ती कम्युनिस्ट पार्टी आता उरली नाही.’ तो मुलगा आपल्या वडिलांची बाजू मांडताना शेवटी म्हणतो, ‘पॅराडाइज काऊंटीत लसणीच्या निमित्तानं घडून आलेला हा उठाव, हा उद्रेक ही धोक्याची घंटा आहे. कोणताही राजकीय पक्ष आपल्या प्रजेच्या हिताकडे दुर्लक्ष करतो; तेव्हा तो आपल्या उच्चाटणासाठी प्रजेला आमंत्रण देत असतो.’
हे वक्तव्य अमुक एका देशासाठी, पक्षासाठी, राजवटीसाठी आहे असे म्हणता येईल!
‘रिक्त अतिरिक्त’ मधला नाथाप्पा पिकासमवेत स्वत:लाही जाळून घेतो, तर ‘द गार्लिक बॅलड्स’ मधला ‘कैदी क्र. ८८’ मुक्त होण्याच्या प्रयत्नात बंदुकीच्या गोळीची शिकार होतो.
श्रीमंत, समृद्ध होण्याची स्वप्नं बघणं चांगलं असू शकतं. पण ते साध्य होतं ते मूठभर भाग्यवंतांनाच, हेच विदारक सत्य ही कादंबरी अधोरेखित करते.
( हे सदर पाक्षिक आहे.)

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो