स्त्री जातक : स्वत:ला शोधताना..
मुखपृष्ठ >> स्त्री जातक >> स्त्री जातक : स्वत:ला शोधताना..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री जातक : स्वत:ला शोधताना.. Bookmark and Share Print E-mail

altअनघा लवळेकर  , शनिवार , १४ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
संसारात आणि आता नोकरी-करिअरच्या व्यापात स्त्री इतकी अडकून जाते की तिला स्वत:ला नेमकं काय हवंय तेच मिळत नाही; किंबहुना आपलं स्वत:चं वेगळं अस्तित्व, विचार, गरजा असू शकतात, याचं भान तिला नसतं. त्याच जाणिवांचं भान देणारं हे पाक्षिक सदर. जुने कागद चाळताना एक विरलेला - पिवळा पडलेला कागद मिळाला. १९९० साली ‘आत्मविश्वास’ नावाचा सुरेख चित्रपट आला होता. त्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मागविल्या होत्या. आरती मंगलकर या त्यातील मुख्य व्यक्तिरेखेवर मी एक स्फुट लिहिलं होतं- चक्क पहिलं बक्षीस मिळविणारं!

एखाद्या स्त्रीला स्वत:चा शोध घेण्याची संधी मिळाली तर तिच्यात किती प्रचंड बदल होऊ शकतात, तिचा आत्मसन्मान जागा झाला तर तिचं आयुष्य किती सार्थ होऊ शकतं, अशा आशयाचं काहीसं ते लिखाण होतं. आज २०-२१ वर्षांनंतरही ते पुन्हा वाचताना त्यातला सखोल अर्थ अजून जास्त कळला. त्या लेखनाच्या निमित्तानं माझ्यातलं व्यक्त होणं (किंचित लेखकपण) मला कसं सापडलं, त्याचा माझ्या ‘वढण्याला’ कसा हातभार लागला तेही जाणवलं. खरंच, स्वत:ला शोधत राहण्याची एक निरंतर इच्छा प्रत्येकाच्याच मनात जागी असते नाही? कधी हा शोध सरळ-सरधोपट मार्गानं जातो तर कधी अनंत खाचखळग्यांमधून नेतो.
स्त्रियांच्या बाबतीत तर हा ‘स्व-शोध’ जणू अनेकदा एक मृगजळच असतो. खुणावणारा, जवळ बोलवणारा आणि बघता बघता हुलकावणी देणारा एक फसवा रस्ता! ‘पिता रक्षति कौमार्ये..’ असं ‘पिता- भाऊ- नवरा- पुत्र’ या पुरुषवाचक रक्षकांच्या कोंडाळ्यात ‘स्व-शोध’ घेण्यासाठी ‘स्व’ तयार तर व्हायला हवा. कितीही शिकली, आर्थिकदृष्टय़ा संपन्न असली, पुढारीपण गाजवीत असली तरी ‘मधल्या नावाला’ पर्याय नाही, अशीच सर्वसाधारण परिस्थिती आहे. ‘आई- पत्नी- बहीण- मुलगी- काकू- मामी.. अशा विविधरंगी गुंतागुंतीच्या भूमिकांमधून स्त्रीपण निभावताना हा ‘मी’ मला सापडणार तरी कसा?’ हा प्रश्न बहुतेक स्त्रियांच्या मनात घर करून असतो. कधी छुपा, कधी उघड!
अर्थातच ‘स्व’चा शोध जर फक्त शरीरापाशीच थांबला तर तो फार अपुरा आहे, हेही कळायला हवंच. कधी कधी ते उमगत नाही आणि मग ‘आपलं अस्तित्व म्हणजे आपलं शरीर- आपलं दिसणं- आपलं तारुण्य’ अशा चक्रात मन सापडतं आणि अडकून बसतं. तथाकथित चकचकीत- ग्लॅमरच्या दुनियेतील कितीतरीजणी अशा ‘न संपणाऱ्या सौंदर्यचक्रात’ स्वत:लाच बांधून घेताना दिसतात आणि मग जेव्हा हा शोध समाधानाकडे नेत नाही हे कळतं तेव्हा निराश होतात. मुठीतून सटकणारी वाळू धरून ठेवण्याचा क्षीण प्रयत्न करणाऱ्या माणसासारखं स्वत:चा देह सतत ‘आकर्षक- दिखाऊ- प्रदर्शनीय’ ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. ग्लॅमरच्या जगाला हा शाप आहेच, पण सर्वसामान्य स्त्रीलासुद्धा अनेकदा ही भीती भेडसावताना दिसते. पण कारण एकच! ‘स्त्री म्हणजे तिचं शरीर’ हे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लहानपणापासून मनावर कोरून बिंबवलेलं असतं की बस! आणि तरीही त्या शरीराचे चोचले आरोग्यासाठी नाही, तर प्रदर्शनासाठी पुरवायचे अशीही अप्रत्यक्ष सक्ती असते. मग त्यातच गुरफटायला होतं. कालांतरानं त्यातलं व्यर्थपण कळायला लागलं तरी ते चक्र भेदणं अवघड बनतं. ज्यांना अतिशय मनापासून शरीराच्या पलीकडे स्वत:चा शोध घ्यावासा वाटतो, त्या मात्र त्यातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडतात. सुप्रसिद्ध अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन, नृत्यांगना मल्लिका साराभाई अशांना मग त्या पलीकडे स्वत:ला सिद्ध करण्याचे काही मार्ग दिसतात.
काही स्त्रिया स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वत:ला शोधू पाहतात. मग त्या अत्यंत खडतर परिश्रम करून आपापल्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवतात. आपल्या कुवतीची त्यांना जाण असते. त्या क्षमता अजून विस्तारण्याचा त्या प्रयत्न करतात. कला, साहित्य, उद्योग, राजकारण, सेवा, संशोधन, समाजकारण अशा विविध मार्गानी त्या आपल्या जगण्याचं प्रयोजन मांडत, उलगडत जातात.
काही व्यक्तींची उदाहरणं पाहूया. कविता ही तिशीतली कर्तबगार तरुणी आहे. आर्थिकदृष्टय़ा अगदी भक्कम आणि बुद्धीनं तल्लख. आई-वडिलांचं एकत्र छत्र दुर्दैवानं तिला खूप थोडा काळ मिळालं. त्यांच्या घटस्फोटानंतर ती आईकडे वाढली. आता आईला वाटतं की, कवितानं लग्न करावं, सहजीवनाचा आनंद घ्यावा. पण कविताचा लग्नसंस्थेवरचा विश्वास डळमळीत झालाय. तिला नक्की ठरवता येत नाहीये की आपल्याला नक्की काय हवं आहे? ‘आपल्यालाही लग्न टिकविता नाही आलं तर?’ या शंकेचा भुंगा तिचं मन पोखरतोय. कुटुंबाचं आणि तिचं  नातं याच्या उजेडात ती स्वत:चं मत, स्वत:ची जुळवून घेण्याची क्षमता जाणून घेऊ इच्छिते.
प्राजक्ता ही एक मध्यमवयीन- नोकरदार स्त्री आहे. चौकोनी विभक्त कुटुंबातला आधाराचा खांबच जणू. त्यामुळे पहाटेपासून तिचा जो घाण्याला जुंपलैला बैल बनतो तो रात्री अंथरुणाला पाठ लावेपर्यंत! स्वप्नातसुद्धा बिलं, डबे, कुणाची तरी असाईनमेंट, डेडलाइन, मुलांच्या शाळा-अभ्यास अशा भीतीदायक गोष्टी तिची पाठ सोडत नाहीत. स्वत:च्या साध्या-साध्या छंदांसाठीसुद्धा तिला अजिबात मोकळा वेळ मिळत नाही. मग ‘शोध’ वगैरे तर फारच लांब राहिलं.
नीलाचं अगदी उलट आहे. वेगळं करिअर-नोकरी करायची नाही असंच तिचे ठाम मत होतं. त्यामुळे मुले मोठी होईपर्यंत तिनं अगदी मनोभावे ‘गृहिणी’पद सांभाळलं, अगदी मिरवलंसुद्धा! एकीकडे संगीत शिकली, भरतकाम शिकली, कुकिंगचे क्लासेस घेतले, असं बरंच काही केलं. पण आता मुलं शिक्षणात बिझी झाली, नवरा सतत घराबाहेर, उद्योगात आणि नीला मात्र अगदी एकटी आपल्या आपल्यातच! घरच्यांचं अवलंबित्व कमी झालेलं, छंद मन रमविण्यापुरते, पण अपुरेपणा अजून ठळकपणे जाणवून देणारे वाटायला लागले. सगळंच ‘तात्पुरतं’ वाटायला लागलं. स्वत:तल्या कितीतरी इतर क्षमतांना कधी अवसरच मिळाला नाही, असं वाटायला लागलं.
विद्याताई साठीतल्या आजी. एकेकाळच्या शिक्षिका पण आता निवृत्त झालेल्या. पूर्ण आयुष्य कुणाच्या ना कुणाच्या धाकात- दबावाखाली काढलेलं. मिळवत्या असून परावलंबी. गृहस्वामिनी असून फक्त हरकाम्याची भूमिका जगलेल्या. आता त्यांना वाटतंय की कुठल्याही ‘संदर्भाशिवाय’ फक्त ‘माझी ओळख’ मिळेल का?
या सगळ्या व्यक्तिरेखा प्रातिनिधिक आहेत. प्रत्येकीला ‘स्व’शोधाची आस आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी आहे आणि प्रत्येकीचा अडथळाही वेगळा आहे. कविताचं स्वत:च्या आणि परिस्थितीबद्दलचं आकलन कमी आहे, प्राजक्ताला व्यवहारानंच जखडून ठेवलं आहे, नीलानं स्वीकारलेली चौकटच तिची मर्यादा बनली आहे, तर विद्याताईंचं आजपर्यंतचं झुकणं, इतरांचा दबाव हा त्यांच्यातल्या चैतन्याला थोपवून धरतो आहे.
मग या ‘स्व’शोधाची सुरुवत करायची कुठून? आणि कधी? खरंच स्वत:ला असं शोधता येतं का? ‘शोधणं’ आणि ‘सिद्ध करणं’ यात काय फरक आहे? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उमटले असतील. या प्रश्नांची उत्तरं आपणच आपली शोधायला हवीत. अशी उत्तरं शोधत ‘स्व’शोधाचा प्रवास करणाऱ्या कितीतरीजणी आपल्या अवतीभवती स्मृतीरूपात किंवा प्रत्यक्षही वावरताना दिसतील. त्यात स्वत:चा शोध कृष्णमय करणारी मीरा आहे, हिंदुस्थानच्या उत्कर्षांसाठी मातृभूमी त्यागून हिंदुस्थानमय होणारी निवेदिता आहे, उपेक्षेचे चटके सोसत शिक्षणमय झालेली सावित्री आहे, ‘चौथा कमरा’ उघडून दाखविणारी अमृता आहे आणि समाजमनाशी एकरूप होत जगलेली महाश्वेताही आहे. त्याच्या पुढच्या पिढीतही अशा कितीतरीजणी आहेत ज्या कदाचित प्रसिद्धीच्या झोतात न येताही एखाद्या दिवलीप्रमाणे आपल्या भोवतालच्या काळोखाला सोबत घेत इवल्या प्रकाशात आपलाच शोध घेत असतील.
त्यासाठी आधी स्वत:ला शोधत जाण्याची एक पक्की प्रबळ प्रेरणा हवी. बनचुकेपणा, तटस्थता, असहाय्यता किंवा नुसतीच आक्रस्ताळी आक्रमकता बाजूला ठेवून आयुष्याकडे पाहणं शक्य आहे. स्वत:विषयी आणि इतरांविषयीचं कुतूहल जागं ठेवणं, सहजपणे बदलांचा स्वीकार करीत जाणं, नवं शिकण्याची- अनुभवण्याची उर्मी ताजी ठेवणं, छोटय़ा-छोटय़ा संधी- धोके पत्करीत बदलांचे टप्पे पचवीत नेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कितीही साचलेपणा- संभ्रम वाटला तरी धूळ झटकण्याची जबाबदारी आपलीच आहे, हे सत्य स्वीकारून  सतत कृतिशील - विचारशील राहणं यातून हा ‘शोध’ अधिकाधिक अर्थपूर्ण होत जाईल, असं नक्कीच वाटतं. हे खूप अवघड वाटेल कदाचित, पण या धडपडीची मजा काही औरच आहे हे नक्की! शेवटी आपल्यालाही म्हणायचं असतं- ‘तो प्रवास सुंदरच होता.’
अशा प्रवासातल्या काही थांब्यांची चर्चा या सदराच्या निमित्ताने आपण करणार आहोत. विषय जरी ‘स्त्रीकेंद्री’ असला तरी लागू सर्वानाच होणारा आहे. प्रतिसादाचे स्वागत आहेच.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो