निमित्त मात्रेण : माझे आहे मजपाशी
मुखपृष्ठ >> निमित्त मात्रेण >> निमित्त मात्रेण : माझे आहे मजपाशी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

निमित्त मात्रेण : माझे आहे मजपाशी Bookmark and Share Print E-mail

वीणा गवाणकर - शनिवार, २१ जानेवारी
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआजीबाईच्या बटव्यावर माझा विश्वास आहे. कडू किराईत, तुळस, गवती चहा, कोरफड वगैरे माझ्या हाताशी नेहमीच असतात. घराच्या कुंपणात पावसाळ्यात किराईताची रोपं तरारून  येतात. ती वाळवण्याचा आणि मग तो चुरा डबाबंद करून ठेवण्याचा माझा परिपाठ आहे. अनेक प्रकारच्या पारंपरिक वनौषधी मी माझ्यासाठी, मुलांसाठी, नातवंडांसाठी वापरत आलेय. त्यामुळेच ‘आले-विजया’ची वार्ता मनाला आनंद देऊन गेली. भारतानं नुकतीच ‘आल्या’च्या पेटंट संदर्भातली लढाई जिंकली. या आल्याच्या मदतीनं मीही सर्दीखोकल्याशी दोन हात करत आलेय. थंडीत आणि घनघोर पावसाळ्यात माझ्या स्वयंपाकघरात भरपूर आलं असतं. घसा खवखवू लागला, अंग मोडून आलंय असं वाटू लागलं की माझं आल्याचे छोटे तुकडे चावणं चघळणं सुरू होतं. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना त्यांच्या वयाच्या पंचाऐशीव्या वर्षी घशाचा कर्करोग झाला. घशात वारंवार श्लेष्मा जमा होऊन त्यांना खोकल्याची प्रचंड उबळ यायची. त्यामुळे त्यांना पुरेशी झोप, आवश्यक ती विश्रांती मिळत नसे. वनौषधींवर अभ्यास करत असलेल्या माझ्या एका दिरानं उपाय सुचवला की दिवसभरात त्यांना वारंवार आल्याचा ‘स्ट्राँग’ रस देऊन पाहा.. आणि आश्चर्य म्हणजे त्यांना एकाच दिवसात खूप आराम पडला.
एकूणच, ‘आजीबाईच्या बटव्या’वर माझा विश्वास कडू किराईत, तुळस, गवती चहा, कोरफड वगैरे माझ्या हाताशी नेहमीच असतात. घराच्या कुंपणात पावसाळ्यात किराईताची रोपं तरारून येतात. ती उपटून सावलीत वाळवण्याचा आणि मग तो चुरा डबाबंद करून ठेवण्याचा माझा परिपाठ आहे. अनेक प्रकारच्या पारंपरिक वनौषधी मी माझ्यासाठी, मुलांसाठी, नातवंडासाठी वापरत आलेय. त्यामुळेच ‘आले-विजया’ची वार्ता मनाला आनंद देऊन गेली. असाच आनंद हळदीचा, कडूनिमची लढाई जिंकलो   तेव्हाही झाला. अजून काल्र्याच्या, जांभळाच्या लढाया बाकी आहेत. त्याही जिंकायला हव्यात.
या लढय़ांच्या निमित्तानं आठवल्या त्या स्वाझीलॅण्डच्या लिडिया माखुबू. (छ८्िरं टं‘ँुं४) लिडियाचे वडील पेशानं शिक्षक. साऊथ आफ्रिकेत नोकरी करत असताना त्यांनी वैद्यकीय तंत्रज्ञानासाठीचं प्रशिक्षण घेतलं. स्वाझीलॅण्डमध्ये परतल्यावर आरोग्य केंद्रावर मदतनीस म्हणून काम केलं. लिडियाचं बालपण अशा आरोग्य केंद्राच्या परिसरात गेलं. गणित आणि रसायनशास्त्रात त्यांनी १९६३ साली बी.एस्सी. केलं. त्यांना कॅनेडियन कॉमनवेल्थ स्कॉलरशिप मिळाली. एडमंटनच्या अलबेटी विद्यापीठातून १९६७ साली एम.एस्सी. आणि टोरोंटो विद्यापीठातून १९७३ साली पीएच.डी. मिळवली. मेडिसिनल केमिस्ट्री हा त्यांच्या पीएच.डी.चा विषय. पीएच.डी. मिळवणाऱ्या त्या पहिल्या स्वाझी महिला.
अध्ययन संपवून लिडिया मायदेशी परतल्या आणि स्वाझीलॅण्ड विद्यापीठात अध्यापन करू लागल्या. त्याच काळात त्यांनी एक मोलाची कामगिरी बजावली.
आजही आफ्रिकेच्या अनेक भागांत रुग्ण दवाखान्यात वा रुग्णालयात न जाता पूर्वापार पद्धतीनं औषधोपचार करणाऱ्या वैद्याकडं जाणं पसंत करतात आणि बऱ्याचदा तिथे त्यांच्यावर केलेले इलाज यशस्वी ठरतातही.
मौखिक परंपरेनं चालत आलेलं हे वैद्यकीय ज्ञान देशाच्या सांस्कृतिक स्थित्यंतरात लुप्त होऊ नये, असं लिडियांना वाटे. ‘रुग्णाच्या केवळ लक्षणांवरच लक्ष केंद्रित करून नव्हे, तर त्याच्या मानसिक सामाजिक बंधांनाही विचारात घेऊन इलाज करणं महत्त्वाचं असतं.. आणि त्यामुळेच ही परंपरागत उपचार पद्धती आजवर टिकून आहे’ असा त्यांचा विश्वास आहे.
लिडियांनी १९७०च्या दशकांत पारंपरिक स्वाझी औषधीत वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास केला. कोणत्या व्याधीसाठी कोणती वनस्पती वापरली जाते याच्या व्यवस्थित नोंदी केल्या.. जागतिक आरोग्य संघटनेकडून त्यांना अनुदान मिळालं. या मदतीमुळे लिडियांना स्वाझी वैद्यांना स्वाझीलॅण्ड विद्यापीठात बोलवून, त्यांच्याकडून विविध वनौषधी तयार करवून घेता आल्या आणि त्या परीक्षणार्थ अमेरिकेला पाठवता आल्या. त्या बहुतेक सर्व वनौषधी गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक आहेत, असा निर्वाळा मिळाला.
परंपरेनं चालत आलेल्या या औषधींचं प्रमाणीकरण व्हावं, त्यात नेमकेपणा यावा, रुग्णाला देण्यासाठी त्याची मात्रा ठरवता यावी, यासाठी लिडियांचे प्रयत्न होते. असं झालं तर पारंपरिक वैधकाला दर्जाही मिळणार होता. आधुनिक आणि पारंपरिक वैद्यकशास्त्रानं एकमेकांना समजून घेत, एकमेकांविषयी आदर दाखवत हातात हात घालून पुढं जावं, असं लिडियांना वाटतं.
या लिडिया माखुबूच्या जन्मवर्षी म्हणजे १९२७ साली मराठीत एक महत्त्वाचं ग्रंथ प्रकाशित झाला.- ‘ओषधी संग्रह, हिंदुस्थानातील ओषधी वनस्पतींची ओळख, त्यांचे गुणधर्म व उपयोग.’ लेखक डॉ. वामन गणेश देसाई (१८७४-१९२७), राहणार-वसई. (ओषधी म्हणजे औषधी वनस्पती)
ग्रँट मेडिकल कॉलेजमधून १९००च्या सुमारास वामन गणेश देसाई एल. एम. एस. परीक्षा प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना अनेक स्कॉलरशिप्स, पदके, बक्षिसे मिळाली.. मुंबईत वैद्यकीय व्यवसायात उत्तम जम  बसला. १९०६ साली ते लंडनला उच्च शिक्षणासाठी गेले. परंतु तोवरच्या पाच-सहा वर्षांच्या काळात त्यांना देशी वनौषधींच्या उपचारांचेही यशस्वी परिणाम जाणवले होते. लंडनहून  बी. एस्सी. आणि एम. बी. पदव्या मिळवून ते १९१० साली परतले. तेव्हापासूनच त्यांनी पौर्वात्य आजारांवर- विशेषत: आतडय़ांचे आजार, बालरोग यांवर इंग्रजीत लेख लिहिण्यास सुरुवात केली. पाश्चात्त्य वैधकाच्या आधारे व्यवसाय करत असतानाच त्यांनी आयुर्वेदाच्या सखोल, शास्त्रशुद्ध अभ्यासात लक्ष घातले.. पाश्चात्त्य रुग्णविज्ञान शास्त्र (ढं३ँ’ॠ८) आणि आयुर्वेद यांची सांगड घालण्याकडे त्यांचा ओढा होता. अशी सांगड घालता आल्यास रोगचिकित्सा अधिक अचूक होईल, अशी त्यांची खात्री होती.
आपल्या सर्व अभ्यासाच्या आधारे इंग्रजीतून ग्रंथ सिद्ध करण्याच्या तयारीत डॉ. देसाई होते. त्या सुमारास त्यांची पत्नी त्यांना म्हणाली- ‘‘या इंग्रजी ग्रंथाचा आमच्यासारख्या मराठी जाणणाऱ्यांस काय उपयोग? मराठीत औषधीसंबंधी काही लिहिल्यास, आम्हास तरी त्याचा फायदा घेता येईल.’’ ..त्या दिवसापासून डॉ. देसाईंनी मराठीत वनौषधींवर टिपणे काढायला सुरुवात केली.
या प्रकल्पात मुख्य अडचण होती ती नेमकेपणानं औषधी वनस्पतींची ओळख पटण्याची. डॉ. देसाईंनी वनस्पती शास्त्राच्या अभ्यासावर जोर दिला. भारतातील ठिकठिकाणांहून जिवंत वनस्पती मागवल्या. शास्त्रशुद्ध वर्गवारी, नोंदी केल्या.
त्याच काळात पुण्यात आठवे वैद्य संमेलन भरले. तिथे त्यांनी वनस्पती कशा ओळखाव्यात, त्यांचे गुणदोष, त्यांचा औषधी उपयोग यावर व्याख्याने दिली. पाच दिवसांत मिळून ते एकूण ४० तास बोलले.. या व्याख्यानांनी त्यांना प्रसिद्धी दिली. जाणकारांनी त्यांना ‘ही माहिती ग्रंथरूपाने जपा’ असा आग्रह धरला. डॉ. देसाईंनी मराठी ग्रंथाचे काम हाती घेतले. या कामी काही हितचिंतक वैद्यांनी नानाप्रकारे मदत केली. ग्रंथाची छपाई सुरू झाली.. हा ग्रंथ नोव्हें. १९२७ मध्ये प्रकाशित झाला. परंतु तत्पूर्वी १६ मे १९२७ रोजी डॉ. देसाईंचे देहावसान झाले.
‘मेटेरिया मेडिका’च्या धर्तीवर लिहिलेला, परंतु वनस्पतींविषयी अधिक माहिती देणारा हा ग्रंथराज मराठीचे वैभव आहे. डॉ. देसाईंनी आपल्या या ग्रंथासाठी छोटीशी प्रस्तावना लिहिलीय. ते म्हणतात- ‘‘वैद्यकीय पुस्तके मातृभाषेत लिहिली असता वैद्यास नीट समजतील असे माझे मत आहे.. मातृभाषेमध्ये शास्त्रीय विषयाची चर्चा केलेली असली म्हणजे शिकणाराची विचारसरणी ठीक चालते..’’
मला माझ्या मातृभाषेत ‘ओषधी संग्रह’ वाचायला मिळाल्यानेच ‘सुंठीच्या श्लेशघ्न धर्मामुळे कफरोगात ती नेहमी वापरतात. कफरोगांत आल्याचा रस अनुपानार्थ वापरणे इष्ट होते’ हे त्यांचे सांगणे मी समजू शकले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो