उधाण समुद्राला आणि मुंबईकरांनाही! हाजीअली दग्र्याचा रस्ता पाण्याखाली महापौर निवासस्थानाची भिंत कोसळली
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

उधाण समुद्राला आणि मुंबईकरांनाही! हाजीअली दग्र्याचा रस्ता पाण्याखाली महापौर निवासस्थानाची भिंत कोसळली Bookmark and Share Print E-mail
महाराष्ट्र
मुंबई, २३ जुलै / प्रतिनिधी
मुंबईच्या किनारपट्टींवर गेल्या दोन दिवसांपासून समुद्राला आलेले उधाण आणि उसळत्या लाटांचा थरार पाहण्यासाठी उत्साही मुंबईकरांनी आज एकच गर्दी केली. उंच लाटांचा थरार अनुभवताना मुंबईकर चिंब भिजून गेले तर या भरतीने समुद्रकिनारी राहणाऱ्या झोपडीवासीयांना बेघर केले. महापौर निवासस्थानाची भिंत उंच लाटेची जोरदार धडक पचवू शकली नाही तर हाजीअली दग्र्याचा रस्ता संपूर्ण पाण्याखाली गेला. उद्या २४ जुलै रोजी आतापर्यंतची सर्वात मोठी भरती येणार असल्याचे आधीच जाहीर झाल्यामुळे उद्या समुद्राचे रुप काय असेल अशी उत्सुकता मुंबईकरांना लागून राहिलीआहे. गेल्या काही दिवसांपासून विविध प्रसार माध्यमातून समुद्राला येणारी मोठी भरती, चार ते साडेचार मीटर उंचीपर्यतच्या उसळणाऱ्या लाटा, २४ जुलै रोजी समुद्राला येणारी सर्वात मोठी भरती, त्यामुळे उसळणाऱ्या सुमारे पाच ते सव्वापाच मीटर उंचीच्या महाकाय लाटा आदींबाबत जोरदार प्रसिद्धी करण्यात आल्यानंतर मुंबईकरांनी किनाऱ्यावर लाटांचा थरार पाहण्यासाठी गर्दी केली. २४ जुलै रोजीच्या भरतीच्या वेळी जोरदार पाऊस झाला तर ‘२६ जुलै २००५’ची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आज दुपारी एकनंतर समुद्राला मोठी भरती आल्यामुळे चार ते साडेचार मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळल्या. मात्र सुदैवाने या काळात अतिवृष्टी न झाल्यामुळे मुंबई जलमय झाली नाही. लाटांचा थरार पाहण्यासाठी उत्साही मुंबईकरांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, वांद्रे-वरळी सागरी सेतू, मरिन ड्राईव्ह, वरळी सी फेस, दादर, वांद्रे, माहीम आदी किनाऱ्यांवर एकच गर्दी केली होती. मात्र उत्साही मुंबईकरांच्या उत्साहाला आवार घालण्यासाठी आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त तसेच महापालिकेने सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. काल दुपारी तसेच आज समुद्राला आलेल्या जोरदार भरतीमुळे समुद्राचे पाणी रस्त्यावर आले होते. शिवाजी पार्क, दादर परिसरातील महापौर निवासस्थान आणि अन्य इमारती तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर हे पाणी आले होते. लाटांच्या धडकेने महापौर निवासस्थानाची भिंत कोसळली. कफपरेड येथील मच्छिमार वसाहत, वरळी कोळीवाडा, वर्सोवा आदी ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावरील झोपडय़ांमध्ये पाणी घुसले होते. या ठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. २४ जुलै रोजी समुद्राला येणारी भरती व उसळणाऱ्या लाटा सर्वाधिक उंचीच्या म्हणजे सुमारे सव्वा पाच मीटरच्या असणार आहेत. २४ जुलैचे उधाण सगळ्यात मोठे असले तरी त्याची रंगीत तालीम गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु आहे. उद्या शुक्रवारीही मुंबईतील विविध किनाऱ्यांवर लाटांचा हा थरार पाहण्यासाठी उत्साही मुंबईकर अशीच गर्दी करतील, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही, हे गेल्या दोन दिवसांत मुंबईकरांनी दाखवून दिले आहे.
 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा.



 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो