अनेकांचे संसार वाहून गेले..
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अनेकांचे संसार वाहून गेले.. Bookmark and Share Print E-mail
ठाणे, २३ जुलै /प्रतिनिधी
अरबी समुद्राला आलेल्या उधाणामुळे खाडीला आलेल्या भरतीचे पाणी घरात घुसल्याने कोपरीतील १५० हून अधिक लोकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले.
आज समुद्राला आलेल्या प्रचंड उंचीच्या लाटांमुळे खाडीला मोठी भरती आली होती. त्याचा सर्वाधिक फटका कोपरीतील कोळीवाडय़ाला बसला असून, सावरकरनगरातील सुमारे १००, तर कृष्णानगरात ७० ते ८० घरात पाणी घुसले आहे. विशेष म्हणजे चार वर्षांंपूर्वी २६ जुलै रोजी झालेल्या पुरातही या भागात पाणी घुसले नव्हते. मात्र आजूबाजूला खाडीत भराव टाकण्यात आल्याने ही आपत्तीओढवल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला. त्या भागात चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचल्याने लोकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
कळव्यात खाडीकिनारी असलेल्या जानकीनगर, शास्त्रीनगर, महात्मा फुले नगर, तसेच खारेगाव भागातील अनेक चाळींत तीन फुटांपर्यंत पाणी भरले होते. सुदैवाने भरतीचे पाणी हळूहळू येत असल्याने लोकांनी आपले सामान अन्यत्र हलविले, त्यामुळे मोठी आपत्ती टळली. दिवा, मुंब्रा भागातही काही घरांमध्ये पाणी घुसले होते. याशिवाय जिल्ह्यात वसई, अर्नाळा, पालघर, डहाणू या भागांतही भरतीचे पाणी घुसले होते.
सोसाटय़ाचा वारा आणि धुवाँधार पावसामुळे शहरातील काही भागांत पाणी साचले, तसेच वृक्ष उन्मळून पडले. घंटाळीत कमलाकर वारे चाळीत इमारतीचा स्लॅब कोसळून मिलिंद व अमित सावंत असे दोघेजण जखमी झाले. मखमली तलावाजवळ एक झाड चाळीवर कोसळले, तर चेंदणी कोळीवाडा, नाखवा हायस्कूल येथेही पाणी साचले होते.
दरम्यान, जिल्ह्यात सर्वच दमदार पाऊस सुरू असून, कवडासपाठोपाठ धामणी धरणही पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. तर भातसा, अप्पर वैतरणा, तानसा, बारवी, मोडकसागर ही धरणेही ४० टक्क्यांच्या आसपास भरली आहेत.