गोष्ट भावभावनांची : पेक्षा कमी, पेक्षा जास्त
मुखपृष्ठ >> गोष्ट भावभावनांची >> गोष्ट भावभावनांची : पेक्षा कमी, पेक्षा जास्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गोष्ट भावभावनांची : पेक्षा कमी, पेक्षा जास्त Bookmark and Share Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
नीलिमा किराणे - शनिवार, ११ फेब्रुवारी २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altघरातल्या मोठय़ा माणसांनी आपण ‘तुलनेचे’ बळी आहोत हे लक्षात घेतलं तर अनेक घरांतली परिस्थिती हळूहळू बदलू शक ते. समोरच्याला छोटं करून आपण मोठे होत नाही हे समजून घ्यायला पाहिजे. त्याबाबत मुलांशी, परस्परांशी बोललं पाहिजे. एकमेकांना मदत करून या सवयीतून बाहेर यायला पाहिजे. मुलांच्या चांगल्या गोष्टींचं मोकळेपणानं स्वच्छ कौतुक उपयोगी पडू शक तं. थेट सांगायचं तर ‘पेक्षा कमी, पेक्षा जास्त’ हे शब्द पूर्ण बंद केले पाहिजेत.
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा झाडापाशी गेला. वेताळाला खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे चालू लागला. वेताळ म्हणाला, ‘‘राजा, तू हट्ट सोडणारच नसशील तर मी तुला आणखी एका कुटुंबाची कथा सांगतो. साक्षी, तिचा मोठा भाऊ रोहन आणि त्यांच्या घराची ही गोष्ट तुला प्रत्यक्ष घडताना दिसेल बघ.. ’’
दहावीतला रोहन अभ्यासाला बसला होता. त्याच्या जवळच चित्र काढत बसलेल्या साक्षीनं एफएमवर जोरात गाणी लावली. ती स्वत:ही मोठमोठय़ानं रेडिओसोबत गायला लागली. रोहन वैतागला. ‘गाणी बंद कर’ म्हणून ओरडला. साक्षीला तेच हवं होतं. त्यांची शब्दाशब्दी सुरू झाली आणि लवकरच ती गुद्दागुद्दीपर्यंत पोहोचली. आवाज ऐकून आई धावत आली. काय घडलंय ते लक्षात आल्यावर साक्षीच्या पाठीत आईचा एक दणका बसला.
‘‘दादा दहावीला आहे ना साक्षी? का त्रास देतेस त्याला? नेहमीचं आहे तुझं. अभ्यास तर बाजूलाच राहिला पण चित्र तरी पूर्ण कर. काहीच धड करत नाहीस. सगळं उखीरवाखीर. रोहनची बहीण मुळीच शोभत नाहीस.’’  
‘‘मी कशाला? तोच शोभत नाही माझा भाऊ. बावळा नुसता, अभ्यास एके अभ्यास करत बसतो. काल वर्गात सिद्धान्त याच्याशी बोलत होता तर सरांनी यालाच तासभर उभं केलं. साधी स्वत:ची बाजू मांडता येत नाही त्याला. मला सिद्धान्तनंच सांगितलं.’’
‘‘रोहनचं पहिल्यापासून असंच. तू दोन वर्षांची असतानासुद्धा किती घडाघडा बोलायचीस. कविता, गाणी म्हणायचीस. तेवढं हा पाच वर्षांचा असूनपण बोलत नव्हता.’’
‘‘आईऽ, कधीकाळचं का बोलतेयस?’’ साक्षीनं आपल्यावर उलटवलेलं समजून रोहन वैतागला.
‘‘हो हो. तू विषय बदलू नको साक्षी. दादाला जे येतं ते तुला येत नाही. तुझ्या बोलण्याचं कौतुक केल्यामुळे तू आगाऊ झालीयस. जरा कुणाला काही चांगलं म्हटलं की राग येतो तुला. मग आपणही चांगलं वागून दाखवावं ना. सतत कुणाशी ना कुणाशी भांडणं घरात आणतेस. रोहनची तक्रार घेऊन कधी कुणी आलं नाही घरी. तुझ्याबद्दल जगाच्या तक्रारी,’’ आईचा पट्टा सुरू झाला.
त्यांचा आवाज ऐकून स्वयंपाकघरातून आजी ओरडली,  ‘‘अगं, किती भांडताय, किती आवाज. उगीच रोहिणीकडून लवकर परत आले बाई. तिथेच बरी होते मी. केवढं मोठं घर तिचं. आपापल्या खोलीत कुणी कितीही आवाज केला तरी दुसऱ्याला त्रास नाही. या तुमच्या फ्लॅटमधे जरा खुट्ट वाजलं की सर्वाना आवाज जातो.’’
‘‘हं. यांचं तिसरंच. मग राहायचं ना तिथेच लेकीकडे. एवढय़ा मोठय़ा घरात माणसाचं माणसाला तोंड दिसत नाही म्हणून इथे परत आलात ना?’’ आई पुटपुटली ते आजीला ऐकू गेलं नाही, पण साक्षीनं नीट ऐकलं. ते जाणवून आई पुन्हा साक्षीवर घसरली. ‘‘अगदी आजीवर गेलीयस तू साक्षी. आपल्या माणसांचं कध्धी कौतुक वाटत नाही.’’
आठवीतली साक्षी तशी अभ्यासात बरी होती. पण त्यापेक्षा तिच्या हातात कला होती. आई-वडिलांना त्याबद्दल तिचं थोडंफार कौतुकही होतं, पण थोडंच.
‘‘अभ्यास जास्त महत्त्वाचा. नुसती कला काय उपयोगाची? ती तन्वी बघ. इतके चांगले मार्क मिळवते, वर चित्रंही तुझ्यापेक्षा सुंदर काढते. असं पाहिजे,’’ एकदा बाबा म्हणाले.
बाबांनी पण तन्वीचं कौतुक केल्यावर साक्षी बिथरली. कितीही अभ्यास केला तरी रोहनपेक्षा जास्त मार्क मिळवणं तिला शक्य नव्हतं. शिवाय समंजसही असल्यामुळे तो सर्वाचा लाडका होता. साक्षीला रोहनचा राग यायला लागला. तिनं त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याचा अभ्यासाचा वेळ गेला की तो कासावीस व्हायचा आणि साक्षीला आसुरी आनंद व्हायचा. रोहनच्या अबोलपणावर टीका होईल अशी परिस्थिती ती घडवून आणायला लागली. तन्वीच्या चित्रावर हळूच पाणी सांडणं, वर्गातल्या मुलामुलींच्या बारीक खोडय़ा काढून त्यांना शिक्षा होईल असं पाहणं हा तिचा स्वभावच बनला. पूर्वी सजावट करण्यासाठी, मिळेल तिथे आपली कला दाखवण्यासाठी ती उत्सुक असायची. आता कुणी बोलावलं की, आखडायला लागली. दुसऱ्यातील छोटीशीही कमी शोधून त्यावर बोचरी कॉमेंट करणं हा तिचा आवडता खेळ बनला. त्यासाठी तिची निरीक्षणक्षमता वाढली, कान आणि मन अगदी सरावलं.
एकदा आईबाबांना आíथक अडचणीबद्दल बोलताना तिनं ऐकलं. त्याच सुमारास  तिला म्यूरल्स आणि कलाकुसरीच्या एका महाग शिबिराला जायचं होतं. पण त्याबद्दल विचारल्यावर आई म्हणाली, ‘‘आधी सहामाहीत ऐंशी टक्क्यांच्या वर जाऊन दाखव आणि मग वाढव तुझी कला.’’
साक्षी तडकली, ‘‘माझ्या मार्काचं कशाला काढतेस? तुझ्याकडे पसे नाहीत ते सांग ना. तुझ्या सगळ्या अटी मलाच लागू. रोहनला तो म्हणेल तिथे पाठवतेस. तन्वीचं कौतुक करताना तिला घरात स्वतंत्र खोली आहे, तिची आई तिला कुठल्याकुठल्या शिबिरांना पाठवते आणि किती महागडे रंग
आणि वस्तू घेऊन देते ते तू पाहणार नाहीस,’’ साक्षीनं तलवारच उपसली.
‘‘हो. तुम्हाला सगळं मिळतंय तरी कटकट. आम्ही कसे दिवस काढलेत लहानपणी, पण असं वर तोंड करून तर कधीच बोललो नाही. आम्ही ..’’  आईनंही तलवार परजली आणि युद्ध सुरू झालं..
राजाला दिसणारं दृश्य अस्पष्ट होत होत नाहीसं झालं.
वेताळ म्हणाला, ‘‘राजा, साक्षी सतत युद्धाच्याच पवित्र्यात का असते? ती कधी कुणाला टाग्रेट करेल, काय बोलेल याचा अंदाजच येत नाही. तिच्या बोलण्यात तथ्य असल्यामुळे तिला खोडूनही काढता येत नाही. साक्षी अशी का वागते? ती कधीच बदलणार नाही का? या प्रश्नांची उत्तरं माहीत असून तू दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकलं ..’’
‘‘हा प्रश्न एकटय़ा साक्षीचा नाही वेताळा. या घराच्या समस्यांचं मुख्य कारण ‘सततची तुलना’ हे आहे. कशाशी तरी तुलना केल्याशिवाय या घरातलं कुणी बोलतच नाही. तसंच बोलण्याची आणि विचार करण्याची त्यांची पद्धत पडली आहे. आजी मुलीच्या आणि मुलाच्या घराची तुलना करते. आईबाबा साक्षीची तुलना रोहन, तन्वीशी करतात. आई कधी स्वत:च्या लहानपणाशी तर कधी आजीशीपण करते. तोच धागा साक्षीनं पकडला आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी साक्षीला कुणा तरी‘पेक्षा’ सरस दिसायला हवं.  
‘‘पण म्हणून साक्षीनं असं वागावं? संधी साधून लागट बोलावं?’’
‘‘हो. कारण तिच्याजवळच्या क्षमतांचं घरच्यांना कौतुक कमी आहे. कलेतसुद्धा ती तन्वीपेक्षा कमीच वाटते आईला. अभ्यासात तिनं प्रयत्न केले तरी ती रोहनपेक्षा कमी पडणारच. आपण सतत सगळीकडे कमी पडणं कुणालाच आवडत नाही. साक्षीची दुसरी क्षमता आहे परिस्थिती समजून घेऊन बोलणं. मात्र या गुणाचा ती पुढे जाण्यासाठी विधायक वापर करत नाही. इतरांची कमी दाखवून त्यांची बोलती बंद करायची, विषय बदलायचा, टाग्रेट स्वत:वरून दुसऱ्याकडे सरकवायचं किंवा धक्का तंत्र वापरून समोरच्याला विचलित करायचं अशा पद्धतीनं ती स्वत:ची क्षमता नकारात्मकतेनं वापरते आहे.  तिची सगळी बुद्धी आणि ऊर्जा पुढे जाण्यासाठी वापरण्याऐवजी ती स्वसंरक्षणासाठी वापरते आहे. समोरच्याला गप्प करणं म्हणजेच तिचं स्वत:ला सिद्ध करणं झालं आहे.’’
‘‘म्हणजे राजा, या घरातली युद्धपरिस्थिती कायमच राहणार का?’’
‘‘घरातल्या मोठय़ा माणसांनी आपण ‘तुलनेचे’ बळी आहोत हे लक्षात घेतलं तर परिस्थिती हळूहळू बदलू शकेल. समोरच्याला छोटं करून आपण मोठे होत नाही हे समजून घ्यायला पाहिजे. त्याबाबत मुलांशी, परस्परांशी बोललं पाहिजे. एकमेकांना मदत करून या सवयीतून बाहेर यायला पाहिजे. मुलांच्या चांगल्या गोष्टींचं मोकळेपणानं स्वच्छ कौतुक इथे उपयोगी पडू शकेल. थेट सांगायचं तर ‘पेक्षा कमी, पेक्षा जास्त’ हे शब्द पूर्ण बंद केले पाहिजेत. ‘रोहन अभ्यासात, वागण्यात चांगला आहे, साक्षी खूप चांगली कलाकार आहे. तन्वीनं कला आणि अभ्यास दोन्ही जमवलं आहे’ अशी स्वच्छ वाक्यं बोलायला शिकलं पाहिजे. दुसऱ्याला आपल्यासमोर चांगलं म्हटलं म्हणजे आपण वाईट आहोत असा निष्कर्ष साक्षी तरीही काढू शकते. पण तिच्या गुणांचं कौतुक झाल्यावर ती थोडी निवळेल. हळूहळू तुलनेशिवाय विचार करणं तिलाही जमेल. रोहननं जसा कुणाच्या अधेमधे न येता आपल्याला जे जमतं त्यात पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे तो समजला तर साक्षीलाही कालांतरानं जमेल. मात्र त्यासाठी प्रत्येकानं ‘आपण कधीच चुकत नाही’ या गृहीतकातून बाहेर येऊन स्वत:च्या बोलण्याकडे त्रयस्थपणे पाहायला हवं, त्यातून होणारं मुलांचं नुकसान समजून बदलायला हवं वेताळा,’’ राजा म्हणाला.
वेताळाला उत्तर मिळालं. राजाचं मौन सुटताच, ‘‘तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण अवघड आहे राजा,’’ असं म्हणत तो राजाच्या खांद्यावरून अदृश्य झाला आणि झाडाला जाऊन लोंबकळू लागला.       

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो