स्त्री जातक : ऊर्मी स्वातंत्र्याची !
मुखपृष्ठ >> स्त्री जातक >> स्त्री जातक : ऊर्मी स्वातंत्र्याची !
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री जातक : ऊर्मी स्वातंत्र्याची ! Bookmark and Share Print E-mail

अनघा लवळेकर - शनिवार, ११ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altस्त्रियांच्या ‘मी’केंद्रित स्वातंत्र्याच्या व्याख्यांमुळे किती कुटुंबं बनण्याआधीच संपत आहेत? कुठे किती ताणायचं आणि कुठे सोडून द्यायचं याचं तारतम्य सुटल्यामुळे किती नाती कडवट होऊन अकाली तुटत आहेत? नवनव्या मानसिक आजारांनी पछाडलेल्या तरुणींची संख्या का वाढत आहे? याचाही विचार व्हायला हवा.
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक सुरेख आवाहनपर जाहिरात लागायची. एक तान्ही मुलगी. तिच्या डोळ्यांवर, ओठांवर लावलेली पट्टी, बांधलेले हात-पाय. काही क्षण त्या चित्रावर डोळे खिळून राहायचे आणि मग यायचा एक आश्वासक हळुवार स्वर- ‘उघडा तिचे डोळे- बघू द्या तिला जग आपल्या स्वत:च्या नजरेनं!’ मग एकेक करून तिचे ओठ, हात, पाय त्या बंधनातून मोकळे व्हायचे आणि एक जितंजागतं चैतन्य आपल्या नजरेला सुखावायचं. ती जाहिरात पाहताना लक्षात यायचं की, किती सहजपणे एका मूलभूत ऊर्मीचा आविष्कार आपल्याला अनुभवता यायचा! स्वातंत्र्याची- बंधमुक्ततेची- निर्भरतेची ही ऊर्मी कुणाला जाणवत नाही? व्यक्त करावीशी वाटत नाही?
पण स्त्रियांच्या बाबतीत मात्र या ‘ऊर्मीच्या’ अभिव्यक्तीला कैक शतकांपासून अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागत आहे.
- स्त्रियांनी धर्मग्रंथांचं पठण- पाठण- अध्यापन करणं म्हणजे महापाप!
- स्त्रियांनी कलांची अभिव्यक्ती करणं म्हणजे संस्कारहीनता!
- स्त्रियांनी अमुक प्रकारे उठणं-बसणं-चालणं हेच योग्य!
- स्त्रियांनी इतरांच्या निर्णयांचं फक्त पालन करणंच अपेक्षित आहे. निर्णय घेणं नाही.
अशा अनेक ‘करा’ आणि ‘करू नका’च्या आज्ञावलींमुळे १९ व्या शतकापर्यंत जगभरच्या स्त्रिया कमी-जास्त फरकानं ज्ञान मिळवणं आणि वाटणं, हवं तसं व्यक्त होणं, शारीरिक हालचालींमधून निर्भय वाटणं, सारासार विचार करून स्वत: निर्णय घेणं अशा अगदी मूलभूत स्वातंत्र्य ऊर्मीपासून वंचित होत्या. मग ते चीनमध्ये सौंदर्याच्या नावाखाली ‘पावलं बांधून’ त्यांचा आकार लहानपणीच मर्यादून टाकणं असेल किंवा काही आफ्रिकन देशांमध्ये केली जाणारी स्त्रियांची हिंसक सुंता असेल, त्याच ताठर बंधनांची ही उदाहरणं आहेत.
पूर्वीपेक्षा आज परिस्थिती खूप पालटली आहे, हे खरंच. पण तरीही असा प्रश्न पडतो की, ‘स्वातंत्र्याची’ खरी अनुभूती-आविष्कार स्त्रीच्या कक्षेत आला आहे का? या अत्यंत मूलभूत-उत्कट प्रेरणेची जबाबदारी घेण्याची तिची खंबीर तयारी आहे का?
‘स्वातंत्र्याचं’ रूप काहीसं माणसाच्या ‘माकड हाडासारखं’ आहे. थोडक्यात- व२ी ्र३ १ ’२ी ्र३! मिळालेल्या स्वातंत्र्यसंधीचा योग्य आणि निश्चित-विधायक वापर झाला तर ती बळकट होईल, पुन:पुन्हा संधी मिळत राहतील, व्यक्तीला आणि तिच्या सभोवतालच्यांनाही आनंद मिळत राहील. आज दिसणारं चित्र कसं आहे?
चित्र १ : जिल्ह्य़ाच्या शाळेत जाणारी सुचित्रा. अभ्यासात फार हुशार नाही, पण पास होते. तिला दहावीनंतर नर्सिगचा कोर्स घ्यायचाय. ‘जातवाले काय म्हणतील’ म्हणून आणि ‘फार शिकली तर उजवायला जड जाईल’ म्हणून आई-वडील तिला दहावीनंतर घरी बसवण्याच्या विचारात आहेत.
चित्र २ : विभावरी ही नोकरी करणारी- शहरातली सुशिक्षित उपवर मुलगी. स्थळं बघायला सुरुवात करतानाच जवळच्या माणसांनी तिला बजावून ठेवलंय- ‘फार चिकित्सा करायची नाही. आपलं नाणं जरा डावंच आहे. उगीच याला-त्याला नको म्हणशील आणि घोडनवरी होशील.’
चित्र ३ : नफिसा ही घरगुती शिवणकाम करणारी महिला. वयाच्या अठराव्या वर्षीच दोन मुलांची आई बनलेली, तिसऱ्याला जन्म द्यायच्या तयारीत असलेली. मनातून ‘नकोत आता ही बाळंतपणं’ असं वाटूनही त्याबद्दल ‘ब्र’ही न काढू शकणारी.
चित्र ४ : फॅशन डिझायनर म्हणून जम बसवत आणणारी तनया. लाडात वाढलेली लेक तशाच लाडाकोडाच्या सासरची सून. पण या सुनेचं सासरी एक क्षण मन रमत नाही. तिला पूर्णपणे तिच्या ‘टम्र्स’वर आयुष्य जगायचंय. अगदी पूर्ण स्वातंत्र्य उपभोगायचंय. स्वातंत्र्याच्या तिच्या व्याख्येत ‘ती आणि तिचं’ यापलीकडे शब्द नाहीत.
‘स्वातंत्र्य’ असण्या-नसण्यामुळे आयुष्यातल्या किती प्राधान्यांवर, निर्णयांवर कसा परिणाम होतो हे या प्रातिनिधिक चित्रांमधून दिसतं. ‘स्त्री’ला स्वतंत्र विचार असणं, मत असणं, अभिव्यक्ती असणं म्हणजे महापाप- या समजुतीपासून आपण बरेच पुढे आलो असलो तरी सूक्ष्म स्वरूपात अनेक ठिकाणी- अगदी खऱ्या अर्थानं मोक्याच्या ठिकाणी तिच्यासमोर एक अदृश्य लक्ष्मणरेषा ओढून ठेवलेली दिसते.
माझ्या परिचयाची एक अत्यंत बुद्धिमान-संवेदनशील स्त्री आहे. आर्थिक संपन्नता, कुटुंबात आदर- मनाजोगा संसार करण्यातलं स्वतंत्रपण- सगळं आहे. पण आता मध्यमवयात सर्व जबाबदाऱ्या एका टप्प्यापर्यंत पूर्ण केल्यानंतर त्यांना त्या वर्तुळाबाहेरचं काही करून बघायचं आहे. पण त्या गोष्टीला नवऱ्याचा अगदी ठाम, कडवा विरोध! कुटुंबाच्या सिस्टीमला हलवणारी एकही गोष्ट तिनं करायची नाही हा पक्का अट्टहास. या प्रतिक्रियेमुळे त्या सक्षम, संवेदनशील बाईची किती घुसमट होत असेल! केस कापावेत का नाही, साडी कुठली कधी नेसावी इथपासून ते स्वत:चा हक्काचा वेळ कसा घालवावा इथपर्यंत अशी ‘प्रेमळ बंधन’ सोन्याच्या साखळदंडासारखी अनेकींना मनात खोलवर टुपत असतात. अनेक वर्षे असा ‘आभासी-फसव्या स्वातंत्र्याचा’ (खरं तर अलिखित बंधनांचा) काच ज्यांना सोसावा लागतो, त्यांची मन:स्थिती खूप विचित्र बनते. कधी न कळेशी हताशा वेढून टाकते तर कधी पराकोटीची बंडखोरी मनात उसळते. मनोकायिक विकारांना निमंत्रण देते.
स्वातंत्र्य म्हणजे माणसाच्या आत फुलणाऱ्या ऊर्जेचा, चैतन्याचा एक अत्यंत हवाहवासा अनुभव! पण म्हणजे ऊर्जेचा बेबंद स्फोट नव्हे. त्या ऊर्मीनाही काही रेखीवपण, बांधीवपण असणं गरजेचंच आहे. ही बंधनं स्वीकृत, स्वेच्छेनं स्वीकारलेली असतील तर त्यांचा त्रास होत नाही. कारण त्यामागचा विचार स्पष्ट असतो. त्या बंधनांचं भावनिक मोल देण्याची आणि त्यात आनंद घेण्याची स्पष्ट समजूत असते. पण खरं तर अनेकदा असं घडत नाही. वरवर ‘स्वेच्छेनं’ दाखवलेल्या या चौकटी मनात ‘लादलेल्या’ वाटत राहतात.
कधी कधी या दुबळेपणात- बंधनात राहण्याचाही एक ‘कम्फर्ट झोन’- आश्वस्तपणा आहे असा समज होऊ शकतो. ‘मी बाई एकटी कु ठेही जात नाही. आमच्याकडे चालतच नाही!’- इथपासून ते- ‘नको उगीच नस्ती जबाबदारी- ठरवताहेत ना बाकीचे- बरंच की मग!’ अशा उद्गारांनी त्या दुबळेपणाची भलावण केली जाते.
याचं कारणही स्पष्ट आहे. कुठलंही स्वातंत्र्य- मुक्तता- संधी घ्यायची असेल तर स्वत:च्या प्रत्येक कृतीची शंभर टक्के जबाबदारी घेण्याची तयारी असावी लागते. त्यातून कटू- नकोसे- त्रासदायक काही वाटय़ाला येऊ शकतं- ते पचवावं लागेल- याचीही तयारी ठेवावी लागते. आज मुलींचं संगोपन ज्या पद्धतीनं केलं जातं त्यात या ‘जबाबदारीची’- ‘पचवण्याची’ ताकद निर्माण करण्याची व्यवस्था फार क्षीण आहे.
गेल्या दोन दशकांत शहरी- सुशिक्षित- उच्चभ्रू वर्गामध्ये एक-दोनच मुलं असल्यानं आवडी-निवडीचं स्वातंत्र्य खूप सहजपणानं मुलामुलींना दिलं जातं असंही चित्र दिसतंय. पण दुर्दैवानं ते ‘स्वातंत्र्य उपभोगण्यातल्या संयमाचं शिक्षण’ अभावानंच मिळतंय असंही दिसतंय. स्वातंत्र्याच्या या अनावर ऊर्मीचा परिणाम आपल्याला कुठे घेऊन जात आहे?
- कुठल्याही प्रकारचं व्यसन करण्याचं स्वातंत्र्य
- कुठल्याही बंधनाशिवाय शरीराचे उपभोग घेण्याचं स्वातंत्र्य
- स्वत:ला कायम कम्फर्ट झोनमध्ये ठेवण्यासाठी इतरांचं हित झिडकारण्याचं स्वातंत्र्य.
या न संपणाऱ्या ‘मी’ केंद्रित स्वातंत्र्याच्या व्याख्यांमुळे किती कुटुंबं बनण्याआधीच संपत आहेत? कुठे किती ताणायचं आणि कुठे सोडून द्यायचं याचं तारतम्य सुटल्यामुळे किती नाती कडवट होऊन अकाली तुटत आहेत? नवनव्या मानसिक आजारांनी पछाडलेल्या तरुणींची संख्या का वाढत आहे? व्यसनमुक्ती केंद्रांना ‘स्त्रियांसाठी’ विशेष दालनं- कक्ष निर्माण का करावे लागत आहेत?
या सर्व प्रश्नांची उत्तरं या ‘स्वातंत्र्याच्या’ अपुऱ्या, नीट न आकलन झालेल्या कारणांमध्ये आहेत. एकीकडे उघडउघड बंधनांचा अट्टहास आहे. (स्त्रियांच्या पोशाखांवर घातलेली संचारबंदी किंवा गर्भधारणेच्या- ते मूल जन्माला घालण्या/ न घालण्याच्या बाबतीतले दबाव..) दुसरीकडे वरवर दिलेल्या संधी-स्वातंत्र्याचं मृगजळ आणि प्रत्यक्षात त्याकडे पाठ फिरवण्याचे- कुणी हट्टानं तिकडे गेलीच तर हुशारीनं पाय खेचण्याचं चतुर राजकारण आहे आणि या सगळ्याला छेद देणारं- पूर्ण बंडाच्या- उन्मुक्ततेच्या वाऱ्यावर भरकटत जाणारं काही स्त्रियांचं बेबंद- अर्निबध रूप आहे.
स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या नैसर्गिक ऊर्मीला नीट वाट मिळायला हवी असेल तर ‘कायम तुम्ही आणि समाज’ आणि ‘कायम मी आणि मीच’ याच्या मधला मार्ग प्रयत्नपूर्वक निर्माण करायला हवा आहे. तो स्त्रीच्याच समतोल विचारांनी घडवावा लागेल. (पुरुषांची मदत अपेक्षिता येईल, पण गृहीत धरता कामा नये!) त्यातून जबाबदारीनं स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या, शिकवणाऱ्या नव्या स्त्री-पिढीची घडण होईल!   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो