शाब्दिक विनोदावर भर
मुखपृष्ठ >> चित्ररंग >> शाब्दिक विनोदावर भर
 

लाइफ स्टाईल-मनोरंजन-कला

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

शाब्दिक विनोदावर भर Bookmark and Share Print E-mail

सुनील नांदगावकर - रविवार, १९ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altविनोदीपट ही तशी मराठी चित्रपटांची खासियत म्हणता येईल. विनोदाची दीर्घ परंपरा मराठी चित्रपटांमध्ये कृष्णधवल जमान्यापासून चालत आली आहे. अलीकडे मात्र वैविध्यपूर्ण विषय हाताळण्यात येतात. परंतु, विनोदाची कास मराठी चित्रपट सोडत नाहीत हे अधोरेखित करणारा शाब्दिक विनोदावर भर देणारा ‘ब्लफमास्टर’ हा चित्रपट आहे. एक तरुण निकी (अंकुश चौधरी) याला एक तरुणी सानिका (तेजस्विनी पंडित) आवडते. त्याचे तिच्यावर प्रेम बसते, तिचेही त्याच्यावर प्रेम बसते आणि लग्न व्हावे म्हणून अखंड चित्रपटभर निकी अनेक क्लृप्त्या लढवितो. चित्रपटाला कथानक म्हणाल तर हे आणि एवढेच आहे. सगळा चित्रपट संवादांतून हसवितो. अर्थात प्रेक्षकाला आपोआप हसू येईल याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे.
निकी आणि पक्या ऊर्फ प्रकाश (मंगेश देसाई) हे दोघे जण अण्णा (विजय कदम) यांच्या घरात भाडय़ाने राहत असतात. सिनेमात करिअर करण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू असल्यामुळे पैशाची प्रचं ड वानवा असते. त्यामुळे अर्थातच अण्णा नेहमी त्यांच्या मागे लागतात, नेहमी हे दोघे अण्णांच्या हातावर तुरी देऊन पसार होतात. ‘स्ट्रगलर’ म्हणून त्यांना दीपक (पुष्कर श्रोत्री) मदत करत असतो. मोटरसायकलवरून जाताना सानिका (तेजस्विनी पंडित) हिला पाहताक्षणी निकी तिच्या प्रेमात पडतो. पण घरच्या मंडळींसोबत चर्चा करून मगच लग्न लावून देऊ असे सानिकाची मावशी (किशोरी अंबिये) सांगते. त्यामुळे खोटी आत्या, खोटे वडील उभे करण्यापासून सगळे प्रयत्न निकी करतो. मुळात एका ओळीच्या कथेभोवती चित्रपट काढायचा असल्यामुळे पक्या, सानिकाची मावशी, दीपक आणि अण्णा यांसारख्या अन्य प्रमुख व्यक्तिरेखा, त्यांचा बिनडोकपणा दाखवून विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शकाचा हा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वीही झाला आहे.
altअंकुश चौधरीने यात वेगवेगळ्या तीन व्यक्तिरेखा चोख साकारल्या आहेत. मंगेश देसाई, किशोरी अंबिये, विजय कदम यांनीही चोख कामगिरी केली आहे.  खरे पाहिले तर जुन्याच बाटलीत नवी दारू भरण्याचा प्रयत्न चित्रपटात निर्माता-दिग्दर्शकांनी केला आहे.
चित्रकाराला भेटल्यानंतर त्याच्या बंगल्यात निकी आणि पक्या एकटे राहतात इथपर्यंत ठीक आहे. परंतु, चित्रकार परत येतो तेव्हा त्यांना पाहिल्यानंतर तो स्वत:च्याच बंगल्याबाहेर पडताना दाखविला असून त्यानंतर तो कधीच स्वत:च्या बंगल्यात जात नाही ही गोष्ट अनाकलनीय आहे. चित्रकाराची व्यक्तिरेखा कशासाठी आहे याचा शेवटी उलगडा होत असला तरी निकीच्या तोंडी शेवटी संवाद आहे की हा सगळा प्रकार त्यानेच घडवून आणला होता. हे म्हणणेही पटत नाही. महत्त्वाचे एकाच बंगल्यात स्वत: निकी, त्याची आत्या, त्याचे वडील या तिन्ही व्यक्तिरेखा एकाच वेळी साकारत असतानाही त्याच बंगल्यात असलेल्या सानिका, सानिकाची मावशी, दीपक व अन्य कुणालाच त्याचा अजिबात थांगपत्ता लागत नाही हेही पटत नाही. सानिकाला पाहिल्यावर निकीला ती आवडते. पण नाटय़अभिनय करण्याच्या एका स्पर्धेत ते भेटतात, त्यानंतर थेट बागेत एका स्वप्नदृश्यानंतर निकी-सानिका भेटतात काय, एकमेकांना आवडतात काय आणि लग्न करायचे ठरवतात काय हे सारे इतके घाईने दाखवून व्यक्तिरेखा प्रेक्षकाच्या मनावर न ठसविताच दिग्दर्शकाला काय साधायचे आहे ते समजत नाही. तेजस्विनी पंडितसारख्या पदार्पणातच निवडक व वैशिष्टय़पूर्ण भूमिका साकारून या चित्रपटातील अतिशय तकलादू भूमिका कशी काय स्वीकारली याचे आश्चर्य वाटते. चित्रपटाचे शीर्षक, त्याला अनुसरून असलेले गाणे हे ठीक असले तरी शीर्षकाला अनुसरून निकी ही व्यक्तिरेखा फुलवलेली नाही. आणखी चिकार मसाला घालून निकीबद्दल अन्य सर्व व्यक्तिरेखांच्या मनात त्याच्याविषयी फसविल्याची भावना तीव्रपणे दाखविले असते तर नायक पराकोटीचा ब्लफमास्टर आहे हे प्रेक्षकालाही पटविता आले असते.
अंबाजोगाई चित्र, मुंबई निर्मित
ब्लफमास्टर
निर्माते - वैभव बढे, राजेश उत्तमचंदानी, नयना रानडे
दिग्दर्शक - किशोर साव
कथा - अनिल दीक्षित
पटकथा - राजेश कोलन
संवाद - विजय पटवर्धन, अनिल दीक्षित
छायालेखन - संजय खानझोडे
कलावंत - अंकुश चौधरी, मंगेश देसाई, पुष्कर श्रोत्री, तेजस्विनी पंडित, किशोरी अंबिये, विजय कदम, जयवंत वाडकर, पूर्वा पवार व अन्य. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो