प्रसार-भान : ..पण लक्षात कोण घेतो?
मुखपृष्ठ >> प्रसार-भान >> प्रसार-भान : ..पण लक्षात कोण घेतो?
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

प्रसार-भान : ..पण लक्षात कोण घेतो? Bookmark and Share Print E-mail

विश्राम ढोले ,शुक्रवार, २४ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

टीव्ही मालिकांमधलं स्त्रियांचं भडक, उथळ आणि आक्षेपार्ह चित्रण, हा या लेखाचा विषय नाही.. त्याबद्दलच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी एक यंत्रणा आहे.. तिच्याहीकडे आपण तसंच दुर्लक्ष करणार का, जसं स्त्रियांच्या चित्रणाकडे करू लागलो आहोत?
खरेतर ही बातमी कोणत्या वाहिनीवर आलेली नाही. पेपरांमधूनही बहुधा छापून आलेली नाही. आणि आलीही असती कदाचित तर तिला फार किंमत मिळाली नसती.

आणि तरीही वाचली गेली असतीच तर वाचणाऱ्यांना त्याचे फार काही वाटले नसते. आता इतकी नकारघंटा वाटय़ाला आलेली ही बातमी कोणती आणि तिची इथे दखल घेण्याचे कारण काय, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. मनोरंजनपर टीव्हीच्या कार्यक्रमांवर नजर ठेवणारी, त्यातले बरेवाईट ठरविणारी आणि प्रसंगी त्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार असलेली ‘ब्रॉडकास्ट कन्टेन्ट कम्प्लेंट कौन्सिल’अर्थात बीसीसीसी नावाची एक संस्था आहे. ही बातमी तिच्यासंबंधीची आहे. या संस्थेने वाहिन्यांसाठी गेल्या आठवडय़ात एक आवाहनात्मक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात टीव्हीवरील मालिकांमधील महिलांच्या चित्रणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून वाहिन्यांनी त्याबाबत संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले होते.
बीसीसीसीचे अध्यक्ष न्या. शहा यांनी दिलेल्या या निवेदनाचा मथितार्थ असा आहे की, मनोरंजनपर वाहिन्यांमधील कार्यक्रमांत, विशेषत धारावाहिक मालिकांमध्ये महिलांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीवरच खूप जास्त भर असतो. शारीरिक हल्ले, छळ, अपमान आणि स्त्री-देहाचे आणि भावनांचे वस्तूकरण (कमॉडिफिकेशन) अशा प्रसंगांमधून हे चित्रण केले जाते. हे प्रसंग कथानकाचा भाग म्हणून येतात आणि खरे तर अशा वागणुकीला विरोध म्हणूनच आम्ही त्याचे चित्रण करतो, असा युक्तिवाद वाहिन्या आणि कार्यक्रम निर्माते करतातही पण ज्या पद्धतीने ते चित्रण होते त्यातून स्त्रियांविषयीचा पारंपरिक पुरुषी दृष्टिकोन आणि सवंग उत्तेजनेचा हव्यासच दिसून येतो. बीसीसीसीला वाहिन्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीवर उगाच मर्यादा वगरे आणायची नाही; पण अशा प्रकारच्या चित्रणातून स्त्रियांविषयीच्या नकारात्मक प्रतिमाच घट्ट होऊ शकतात. म्हणून वाहिन्यांनी आपल्या कार्यक्रमांतून स्त्रियांवरील हल्ले, छळ, मारहाण, अपमान वगरे प्रसंग दाखविण्यापूर्वी खूपदा विचार करावा.
महिलांच्या अशा चित्रणाबाबत नवीन ते काय आणि वाहिन्यांनी संयम बाळगावा या आवाहनात ठोस ते काय, असे वाटून बहुधा या निवेदनाला बातमीचा दर्जा मिळाला नसावा. आणि ती आली नाही म्हणून आपल्यालाही फार काही चुकल्यासारखे वाटले नसावे. फार संयमी भाषा वापरत आणि भूमिका घेत बीसीसीसीने हे निवेदन केले आहे, म्हणूनही असेल कदाचित.. पण त्यावर फार काही चर्चा झाली नाही. कृती होण्याची शक्यता तर फारच कमी.
पण निवेदनाची बातमी होणे न होणे हा मुद्दा महत्त्वाचा नाही. ते दखल न घेण्याइतपत सर्वसामान्य वाटणे, हे गंभीर आहे. वाहिन्यांवरील कार्यक्रमांमधून स्त्रियांचे साचेबद्ध, विकृत, आक्षेपार्ह, परंपराशरण यांसारख्या विशेषणांनी वर्णन करता येईल, असे चित्रण होते, ही बाब आता दुर्दैवाने इतकी अंगवळणी पडली आहे की, त्याबाबत काही वाटेनासे झाले आहे. आणि असे होण्यातच या निवेदनाचे खरे मूल्य- खरे तर अवमूल्यनच- दडलेले आहे. ‘‘नॉर्मल’ इज पोलिटिकल’असे म्हणतात. त्यानुसार असे चित्रण होणे आणि ते सार्वजनिक पातळीवर फार खळखळ न होता, थंडपणे स्वीकारले जाणे यातच माध्यमांची खरी राजकीय शक्ती वा प्रभाव दडलेला आहे.
स्त्रियांचे असे साचेबद्ध, अन्यायकारक, पुरुषी, पारंपरिक वगरे चित्रण काही आत्ताच होत आहे, असे नाही आणि फक्त टीव्हीवरील मालिकांमध्येच होत आहे असेही नाही. पण टीव्ही मालिकांनी ते फार बटबटीत आणि दररोजच्या पातळीवर आणून ठेवले आहे. आणि प्रेक्षकांचे फक्त लक्ष वेधून घेण्याचीच स्पर्धा मानणाऱ्या टीव्ही वाहिन्यांनी त्यासाठीचे नाटय़ आणि मसाला स्त्रियांच्याच व्यक्तिरेखांमध्ये जास्त भरले आहे. त्या अर्थाने या व्यक्तिरेखांना एकाच वेळी भडक आणि साचेबद्ध केले आहे. आणि त्यांचे साचेही सीता, मंथरा किंवा द्रौपदी यांच्या व्यक्तिरेखांतील ढोबळतेपलीकडे गेलेले नाहीत. सासू-सुनेचा संघर्ष, विवाहबाहय़ संबंध, कौटुंबिक संघर्ष, संपत्तीचा हव्यास किंवा सूडाचा प्रवास यांसारख्या मोजक्या कथासूत्रांभोवती फिरणाऱ्या मालिकांनी त्यांच्या दररोजच्या अवतारातून हे साचे सामान्य करून टाकले आहेत. आणि टीव्ही पाहण्याशी संबंधित एका सार्वत्रिक बधिरतेने आपण ते स्वीकारतही चाललो आहोत.
नाही म्हणायला ‘बीसीसीसी’सारख्या संस्थेने त्याविरुद्ध क्षीण का असेना पण आवाज उठविला आहे. स्वतहून उठविला आहे ही एक समाधानाची बाब आहे. पण ते समाधान आवाज उठविणे एवढय़ाच कृतीपुरते मर्यादित राहील याची भीती आहे. कारण शेवटी ‘बीसीसीसी’ ही टीव्ही वाहिन्यांची फक्त स्वनियमन करणारी संस्था आहे. तिला वैधानिक संस्थेचा दर्जा नाही. शिक्षा सुनावता आली तर तिची प्रामाणिक अंमलबजावणी करू शकणारी यंत्रणा या संस्थेकडे नाही. भारतात खासगी वाहिन्या गेल्या वीसेक वर्षांपासून असल्या तरी त्यांची स्वनियमन करणारी बीसीसीसी अगदी आता आता- म्हणजे गेल्या वर्षी जूनमध्ये- स्थापन करण्यात आली. ती देखील बराच दबाव आल्यानंतर! गेल्या आठेक महिन्यात परिषदेकडे टीव्ही कार्यक्रमांविरुद्ध तीन हजार तक्रारी आल्या खऱ्या; पण त्यापैकी जेमतेम १३.५ टक्के तक्रारी परिषदेने सुनावणीसाठी विचारात घेतल्या. जवळपास ५८ टक्के तक्रारी विविध कारणांमुळे विचारार्थ घेण्यात आल्या नाहीत आणि उरलेल्या तक्रारी या बातम्या, चित्रपट किंवा जाहिरातींशी संबंधित असल्यामुळे त्या संबंधित परिषदांकडे वर्ग करण्यात आल्या. ज्या विचारार्थ घेण्यात आल्या, त्यात अश्लीलतेसंबंधी आणि घाणेरडय़ा भाषेविषयी तक्रारी सर्वात जास्त होत्या. आणि स्त्रियांच्या अशा आक्षेपार्ह चित्रणाविषयी तक्रारी होत्या जेमतेम तीसेक. आणि या विविध प्रकारच्या तक्रारींवर बीसीसीसीने केलेली ‘कारवाई’ शाब्दिक ताकीद देणे, बदल सुचवणे किंवा चांगल्या चित्रणाचे वचनपत्र मागविणे यापलीकडे गेली नाही.
खरे तर, परिषदेची कारवाई यापलीकडे फार जाईल, अशी फारशी अपेक्षाही करता येत नाही. याचे एक कारण परिषदेचे टीव्ही उद्योगातील मर्यादित स्थान आणि स्वनियमनाच्या मर्यादा हे तर आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे कारण आहे प्रेक्षक म्हणून आपण या सगळ्या प्रकारांना दिलेली एक बधिर स्वीकृती! ‘कार्यक्रमाबाबत काही तक्रार असल्यास आम्हाला कळवा,’ असे आवाहन करणारी बीसीसीसीची एक संदेशपट्टी दररोज टीव्हीच्या पडद्यावर सरकताना आपल्याला दिसत असते. येनकेनप्रकारेण प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याच्या स्पध्रेत उतरलेल्या ना वाहिन्यांच्या लेखी त्याला फार महत्त्व असते, ना एका यांत्रिक अपरिहार्यतेने टीव्हीकडे लक्ष देण्याची सवय लागलेल्या प्रेक्षकांच्या तिचे महत्त्व लक्षात येते. सुमारे शंभरेक वर्षांपूर्वी हरि नारायण आपटय़ांनी ‘पण लक्षात कोण घेतो?’ या कादंबरीतून बालविधवा झालेल्या यमूच्या वाटय़ाला आलेले भोग आणि त्याची झालेली बधिरस्वीकृती यांचे वर्णन केले होते. काळ बदलला. खूप सारे संदर्भही बदलले. पण ‘पण लक्षात कोण घेतो?’तून व्यक्त होणारी आपली सार्वत्रिक बधिरता, बेफिकिरी निदान स्त्री-प्रतिमांच्या बाबतीत तरी फार काही बदलली असे वाटत नाही. बीसीसीसीचे काम आणि त्याला आपण आणि आपल्या माध्यमांनी दिलेला प्रतिसाद हे त्याचे फक्त एक ताजे उदाहरण.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो