स्त्री जातक : हौसेचं मोल
मुखपृष्ठ >> स्त्री जातक >> स्त्री जातक : हौसेचं मोल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री जातक : हौसेचं मोल Bookmark and Share Print E-mail

अनघा लवळेकर, शनिवार, २५  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altकुठलीही ‘हौस’ भागवताना तृप्तीची रेघ कुठे आखायची याचा विचार केला पाहिजे. आपला ‘मिडास’ राजा होण्यापासून आपणच वाचलं पाहिजे.
एखादी गोष्ट ‘हवीशी’ वाटणं- म्हणजेच हौस! ही मनाची गरज असते. पुरुषांना नसते का हौस? मग बायकांच्या हौशीचे एवढे नगारे कशाला? असंही आपल्याला वाटल्यावाचून राहत नाही. तरीही या शब्दाबरोबर स्त्रियांचं विश्व जोडलं गेलं आहे, ही वस्तुस्थिती आहेच. कदाचित बायका त्यांच्या ‘हौशी’ जास्त व्यक्त करत असतील आणि पुरुष (पूर्वी आर्थिकदृष्टय़ा जास्त सक्षम असल्याने) त्यांच्या स्वत:च्या हौशी न बोलता, गाजावाजा न करता भागवूनच मोकळे होत असतील!
साधारण ‘स्त्रियांची हौस’ म्हटलं की प्रथम डोळ्यांसमोर येतात ते ‘कपडे’! ‘‘काय घ्यायचं ते ठरवून निघाले, ठरवलेल्या एकाच दुकानात गेले, ठरवलेल्या किमतीची साडी वा ड्रेस पटकन घेतला आणि १५-२० मिनिटांत बाहेर पडले,’’ असं सांगणाऱ्या स्त्रीकडे बाकीच्या जणी ‘कोण हा विक्षिप्त प्राणी आपल्या रसिक कळपात घुसलाय?’ अशा आश्चर्यानंच बघतील. ‘कापड खरेदीची हौस’ संपली असं म्हणणारी बाई दिसणंच मुश्कील. दुसरी मोठी ‘हौस’ म्हणजे अलंकारांची! त्यातही अशीच चिकित्सा, भरपूर ऊहापोह आणि मनासारखी गोष्ट मिळाल्यावर ‘युरेका’ची भावना त्या हौशीचं महत्त्व दर्शवून जाते.
काही दशकांपूर्वी जेव्हा स्त्रियांचं विश्व घराच्या चौकटीपुरतंच होतं तेव्हा त्या दोन हौशींनी तिचं बरंचसं ‘आनंदविश्व’ व्यापलेलं असायचं. मग हळूहळू घराबाहेर जाणं- फिरायला/ नाटक-सिनेमाला/ हॉटेलिंगला.. असे हौशींना फाटे फुटत गेले. त्यातही कपडे, दागिने या हौशींची पुरेपूर अभिव्यक्ती करायला वाव असे. संगीत नाटकांच्या सुवर्णकाळात नाटकाला जाण्याची हौस भागवताना ठेवणीतले कपडे, ठसठशीत दागिने, गजरा असा जामानिमा करणं हा जणू संकेतच होता. (तो अगदी अजूनही काही अंशी टिकून आहे!)
कपडे-दागिने यानंतरच्या हौशीच्या यादीत वर्णी लागते ती सण समारंभांची! यात प्रत्यक्ष कार्यक्रम- विधीपेक्षा त्या वेळच्या ‘मिरवण्याचीच’ हौस जास्त असते. एरवी हौसेने केलेले दागिने व घेतलेले कपडे कुठे दाखविणार? मनपसंत मेजवानी दिल्याचा आनंद कसा जाणवणार? अशा वेळेला ‘हौस’ ही फक्त आवड किंवा छंद न राहता एक ‘गरज’ होऊन बसलेली असते. ही गरज मग हौसेला ‘हव्यासा’कडे सहज घेऊन जाते. लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीला आर्थिक अडचणीमुळे नवऱ्याने दीड तोळ्याच्या बांगडय़ा केल्या नाहीत, म्हणून हाताची नस कापून घेणारी नवोढा सून काय आणि लग्नात व्याह्य़ांनी हौसमौज हवी तश्शी पुरवली नाही म्हणून सुनेच्या आयुष्याचं उभं वाळवंट करणारं सासर काय- हौसेपेक्षा हे हव्यासाचे बळी!
काळ बदलत गेला तशा हौशीच्या संकल्पनाही (काही अंशीच) बदललेल्या दिसतात. प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या हौशी-मौजीच्या वेगवेगळ्या कल्पनांमुळे ती संकल्पना अजून वैविध्यपूर्ण बनत चालली आहे. यात वेगवेगळ्या अनुभवसंधी जागतिकीकरणाच्या रेटय़ात स्त्रियांना मिळत आहेत, शिक्षणाच्या उपलब्धीमुळे ज्ञानाच्या जगाची कवाडं उघडत चालली आहेत. यांत्रिक साहाय्यामुळे रोजच्या किचकट वेळखाऊ कामातून बऱ्यापैकी सवलत-सवड मिळत आहे. नजरेसमोरच्या आदर्श व्यक्तींच्या साचेबद्धपणातही खूप भिन्नता येत आहे. या सगळ्यांमुळे हौशी-मौजीच्या नव्या पर्यायांची भर पडते आहे आणि जुने पर्याय कात टाकून नव्या रूपात येत आहेत. 'छी३'२ ॠ ३ ३ँी स्र्ं१३८' ही तरुण मुलींची भाषा, तर ‘भिशी’ मंडळाला मध्यम गटाची पसंती! चांगली नाटकं, ज्ञातींची संमेलनं, दणदणीत साजरी केलेली डोहाळजेवणं, बारशी आणि मुंजी (साठी, पंच्याहत्तरीसुद्धा!) ही ज्येष्ठांची हौशीची ठिकाणं. त्यातही घरगुती, त्याच त्या मेन्यूऐवजी ‘आंतरभारती’ची हौशी योजना! एकूण पूर्वी ‘कुटुंबवेदी’ असलेली हौसमौज आता बाहेरून इव्हेंट मॅनेजरच्या मदतीने साजरी केली जाते आहे.
पूर्वी ‘कुटुंबाची आर्थिक गरज’ असलेला स्त्रीचा कमावता हात आता तिच्या ‘आत्मगौरवाचंही’ चिन्ह बनलंय हे खरं, पण काही प्रमाणात ‘बदलत चाललेल्या हौशींना पूर्ण करणारा एक भक्कम स्रोत’ म्हणून प्रस्थापित झालंय! आठवडाअखेरीस रेस्टॉरंटमध्ये जेवणं, देशविदेश फिरण्यातली मजा अनुभवणं, लक्झरी अपार्टमेंटमधील सोयीसुविधा प्राप्त करणं या सगळ्यामागे बाईचा भक्कम बँक बॅलन्स असण्यानं त्या आवाक्यात वाटताहेत. ‘किती कमवू आणि किती खर्चू?’ असं वाटणारा तरुण उच्च मध्यमवर्ग आज झपाटय़ानं वाढतोय. शॉपिंग इज फॉर फन (नॉट रिक्वॉयरमेन्ट), शिवाय हौशी-हौशीनं जगणारे रोल्स मॉडेल्स आपल्या डोळ्यांसमोर असतातच! (आठवा- सोन्यानं लगडलेले/ शेकडो पादत्राणांची, हिऱ्याच्या दागिन्यांची मस्ती दाखविणारे/ गाडय़ांची रांग दारासमोर लावणारे/ साठमजली मनोऱ्याचं बांधकाम ‘एका’ कुटुंबासाठी करणारे आपल्यातलेच राजकारणी- कलाकार- उद्योजक) स्त्रियांच्या हौसेच्या कल्पनांतही याचं प्रतिबिंब न पडलं तर नवलच!
कधी कधी ‘अर्थार्जनातून हौस’च्या ऐवजी ‘हौशीतून अर्थार्जन’ होतं. कालांतराने उद्योजक बनलेल्या अनेक महिलांची सुरुवात ‘आवडतंय तर करून बघूया’ अशी झालेली असते. खाद्यपदार्थाची उत्पादनं, प्रसाधनं, विणकाम, भरतकाम, नृत्य-संगीत, ड्रेस डिझायनिंगपासून खासगी शिकवण्या आणि पुस्तक लेखन इथपर्यंतच्या अनेक गोष्टींची सुरुवात निव्वळ वेळ चांगला जावा म्हणून होते आणि त्या कामातल्या गुणवत्तेमुळे त्या स्त्रीच्या प्रामाणिकतेमुळे आणि उमलत्या आकांक्षेमुळे बघता बघता लक्षावधींची उलाढाल सांभाळणारा उद्योग बनतो. पुण्यात गेली ६१ वर्षे चालू असलेला ‘कै. मंदाकिनी परांपजे’ यांचा भरतकामाचा वर्ग हे वानगीदाखल उदाहरण! अशा हौशी मंडळींना सूर गवसतात. त्यामुळे अनेकींना आपला छंद जोपासण्याची संधी मिळते.
‘समाजसेवा’ हीसुद्धा स्त्रियांची एक ‘हौसच’ मानली जाते. ‘लष्कराच्या भाकऱ्या’ असं एक भारी नाव त्या हौशीला आहे. ज्यातून ॠं्रल्ल नाही, असलाच तर स्र्ं्रल्ल आहे- कष्ट आहेत, अशी ही हौस. अर्थात त्यातल्या समाधानाची तुलना कुठल्याच ॠं्रल्ल शी होऊ शकत नाही हे खरं. पण ही हौस काही वेळा निव्वळ मिरवण्यासाठी स्वत:चं महत्त्व पटवण्यासाठी, ‘मी’पणा गोंजारण्यासाठीसुद्धा केली जाते हे आहेच. अशा हौशीतून ना खरी समाजसेवा होत, ना मनाचं खरं समाधान! पण याउलट ज्या अनेक मैत्रिणी अत्यंत निरलसपणे आपल्याजवळचं ज्ञान, कौशल्य, उपलब्धी, सहवास निव्वळ सेवेच्या उद्देशानं- मन त्यात अत्यंत रमून जातं म्हणून समाजाला देताना दिसतात, त्याला खरंच तोड नाही! अशा व्यक्तीच्या समर्पणामुळे ‘हौस’ या शब्दाला एक निराळा- सखोल अर्थ मिळतो असं वाटतं.
‘प्रसिद्धी’ ही एक नवी हौस किंवा (चटक!) सध्या प्रसारमाध्यमांनी आपल्याला परिचित करून दिली आहे. कर्तृत्वाच्या शिडीवर पहिल्या तीनचार पायऱ्यांवर असतानाच ‘आपण कसे जगप्रसिद्ध आहोत’ हे जगाला ओरडून सांगायची पद्धत रूढ होत आहे. सगळीकडेच समानतेची हवा असताना स्त्रिया का मागे राहतील? निवडणुकीच्या रणधुमाळीत ही हौस पुरेपूर भागवता येते. बघावं तिकडे ‘श्री व सौ’चे २०-२० फुटी बॅनर्स! त्यात सौं.चा सोज्ज्वळ (मेकओव्हर केलेला),खास पारंपरिक लूकमधला ‘स्मिताळू’ फोटो (गल्लीगल्लीमध्ये ताज्या‘राबडीदेवी’ हौशी हौशीनं आणि इशाऱ्या इशाऱ्यानं राजकारण करणार याची जाहिरात!) सध्या या हौशीचं प्रदर्शन रस्तोरस्ती मांडलं आहे.
‘तंत्र-मित्र’ किंवा ‘टेक्नोसॅव्ही’पणा ही शहरी तरुण पिढीची हौशीची अभिव्यक्ती आहे. मोबाइलचं ‘लेटेस्ट अँड्रॉइड’ मॉडेल घेण्यापासून ते घरबसल्या वैश्विक अंगणात इंटरनेटच्या मदतीने चिवचिवण्यापर्यंत तिची रेंज आहे, पण या ‘टेक-मित्र’ पिढीला ‘जुन्याचंही’ तितकंच आकर्षण आहेच. लग्नात अक्षतांच्या वेळी नऊवारी, खोपा, अग्रफुलाचा साज लेण्याची हौस आहे. तसेच ‘रोजचे भविष्य’ वाचून पत्रिका दाखवून गुरू-शनी इत्यादींच्या पुढे मान तुकविण्याचीही आहे.
सर्व प्रकारच्या ‘व्यसनांना उदार आश्रय’ हीपण नव्याने रूढ होणारी मौज आहे. कोणताही आनंदाचा क्षण ‘चार घोट’ घशात ओतल्याशिवाय साजरा करता येत नाही. समाजात स्त्री-पुरुष समानतेचा नवा पायंडा या ‘हौसे’च्या रूपाने पडताना दिसतोय.
या सर्व गोष्टी पाहताना मनात काही विचार वजा प्रश्न येतात ते मांडते.
* हौस म्हणून एखादी गोष्ट करताना वेळ + पैसा किती खर्च करतो आहोत, खरंच उचित मार्गावर नेणारी ती मौज आहे ना, की प्रवाहाबरोबर फरफटत नेणारी आहे, याचं भान आपण ठेवतो आहोत ना? प्रत्येक ‘हौशी-मौजीला’ उपयुक्तता मूल्य असायलाच हवं असं नाही, पण ती निखळ आनंद देणारी असावी. या आनंदापायी इतरांचा आनंद आपण हिरावून घेत नाही ना?
* कुठलीही ‘हौस’ भागविताना तृप्तीची रेघ कुठे आखायची याचा विचार केला आहे ना? थोडक्यात, आपला ‘मिडास’ राजा तर होत नाहीये ना? (सोन्याच्या हव्यासापायी स्वत:चं जगणंच शापवत झालं असा ग्रीक पुराणातला राजा).
* कधी काळी राहिलेली हौस संधी मिळाल्यावर दामदुपटीनं पूर्ण करण्याचा अविवेक आपण करीत नाही ना? (तरुणपणी खाण्यापिण्याची- लेण्याची हौस राहून गेली म्हणून उतारवयात प्रकृतीला न झेपणारं खाणं, वयाला न शोभणारं लेणं आदी हव्यासातून येऊ शकतं..!)
संयमित, सर्वानाच आनंदाचा अनुभव देणारी, कुणावर अन्याय न करणारी ‘हौस-मौज’ करणं हा प्रगल्भ स्त्रीत्वाचाच एक आविष्कार असेल - नाही का?

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो