पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा Bookmark and Share Print E-mail

alt

संकलन :रोहन टिल्लू, रविवार, २६ फेब्रुवारी २०१२
मीअभिनय करायला लागलो, तो काळ माझ्यासाठी फार मजेशीर आहे. लहानपणी शाळेत असताना मला नाटकं खूप आवडायची. शाळेत एका नाटकात भागही घेतला होता. पेरूगेटजवळची भावे हायस्कूल ही माझी शाळा.

त्यावेळी आमच्या मास्तरांनी गोखले, टिळक, रानडे वगैरे पात्र असलेलं नाटक बसवलं होतं. त्यात गोपाळ कृष्ण गोखल्यांची भूमिका माझ्या वाटय़ाला आली होती. मास्तरांनी चांगल्या तालमी घेतल्या होत्या आणि आमची भाषणंही तोंडपाठ होती.
प्रयोगाचा दिवस उजाडला. सकाळपासून आम्ही गॅदरिंगच्या हॉलमधील स्टेजवर बंद पडद्यासमोर तालमी केल्या. मात्र आमचं नाटक सुरू झालं, पडदा उघडला तेव्हा मी विंगेत होतो आणि समोर मला भला मोठा प्रेक्षकवर्ग दिसला. माझ्या घशाला कोरडच पडली. मी माझी एण्ट्री विसरलो आणि तसाच विंगेतच उभा राहिलो. मात्र मला कोणीतरी स्टेजवर ढकललं पण माझी दातखिळी बसली होती. नंतर मी जो काही बोलायला लागलो, तो सगळ्यांची भाषणं म्हणूनच गप्प बसलो.
त्यानंतर मात्र मी शपथच घेतली की, यापुढे मी अभिनयाच्या वगैरे फंदात पडणारच नाही. याच जन्मी नाही, तर पुढल्या जन्मीही नाही. मग मी माझं लक्ष चित्रकलेकडे वळवलं. त्यावेळी मी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षा वगैरेही दिल्या होत्या. त्यामुळे दहावीनंतर स्वाभाविकपणे आर्ट्सला अ‍ॅडमिशन घेण्याकडे माझा कल होता. मात्र वडील प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी अक्षरश: ब्रेन वॉशिंग करत मला सायन्स आणि मेडिकलकडे वळवलं.
याच दरम्यान माझी ओळख भालबा केळकर यांच्याशी झाली. भालबा त्यावेळी हौशी रंगभूमीवर प्रचंड प्रमाणात कार्यरत होते. माझं नाटकात काम करण्याचं वेडही मला स्वस्थ बसून देत नव्हतं. मग आम्ही एकत्र येत व्ही. जे. मेडिकल कॉलेजसाठी नाटकं बसवायला आणि त्यात काम करायला सुरुवात केली. त्या चार वर्षांत मी चार नाटकांत काम केलं. पण कॉलेज संपल्यावर आता नाटक कुठे करायचं हा प्रश्न समोर आला आणि आपसूकच त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत, असं वाटलं. मग आम्ही प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन ही संस्था स्थापन केली.
पीडीएतर्फे नाटक करताना आम्ही कोणताही प्रकार वज्र्य मानला नाही. नाटक, मग ते इंग्रजीत असो, आवडलंय ना, मग ते करायचंच. सुरुवातीला आईवडिलांनीही कौतुक केलं, पण नंतर मग वाद सुरू झाले. पण मला नाटकाची आवडच एवढी होती की, मी नाटकात काम करण्यापासून स्वतला कधी थांबवूच शकलो नाही. पण त्यावेळी ते सगळं खूपच हौशी पद्धतीचं होतं. पुढे जाऊन नाटक करण्यावर बंधनं येत गेली, तेव्हा लक्षात यायला लागलं की नाटक हा गंभीरपणे करण्याचा आणि गंभीरपणे बघण्याचा कलाप्रकार आहे.
मला वाटतं त्याच वेळी माझ्या नाटय़विषयक जाणिवा ठाम होऊ लागल्या. त्या काळात बालगंधर्व, नानासाहेब फाटक यांसारख्या दिग्गज नटांपासून ते पार हॉलीवूडच्या नटांच्या अभिनयापर्यंत सगळं पाहिलं. नकळत मनात तुलना सुरू झाली. आपल्याकडील रंगभूमीवरचा अभिनय अतिशय बटबटीत असल्याचं जाणवलं, पण त्याचबरोबर त्या नटांचा वास्तवदर्शी अभिनय खूप भावला. या नटांची पातळी खूप वरची आहे, हे लक्षात आलं. म्हणजे आम्हाला नानासाहेब फाटक आवडत नव्हते, अशातला भाग नाही, किंबहुना आजही नानासाहेब फाटक हे फार थोर नट होते, असंच माझं मत आहे.
याच दरम्यान नाटकाच्या तालमींना, प्रयोगाला एक शिस्त हवी, हा विचारही माझ्या मनात यायला लागला. मी नाटक बसवताना मला अभिप्रेत असलेल्या शिस्तीचा मी आग्रह धरू लागलो आणि मला वाटतं तिथेच माझे आणि भालबांचे मतभेद सुरू झाले. कलाकार म्हणजे सैनिक नाही आणि आम्ही इथे नाटक बसवायला म्हणजे मजा करायला येतो, असं भालबांचं मत होतं. पण मला नेहमी वाटायचं की, नाटक म्हणजे गंमत नाही आणि नाटक बसवताना मजा करायचीच तर तीदेखील शिस्तीनेच केली पाहिजे आणि त्यावेळी पाश्र्वनाथ आळतेकर ही शिस्त मुरवायचा प्रयत्नही करत होते. त्यामुळे पीडीएमध्येच माझा आणि भालबांचा, असे दोन गट पडले. हे प्रकरण एवढं पुढे गेलं की, ‘तू भालबावादी की लागूवादी’, असा प्रश्नही त्यावेळी पीडीएचे कलाकार आपापसात विचारत.
मग संस्था फुटू नये म्हणून मी पीडीएचा राजीनामा दिला. त्याआधीच मी रंगायनसाठी नाटकं करत होतो. मी जी शिस्त लावण्याचा प्रयत्न पीडीएत करत होतो, रंगायनमध्ये ती शिस्त सुरुवातीपासूनच होती. विजयाबाईंबरोबर काम करतानाही, त्यांच्याकडे प्रचंड पोटेन्शिअल असल्याचं जाणवत होतं. पुढे मी अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलं. मला वाटतं की, त्यांच्या दिग्दर्शनाच्या शैलीत फरक असला, तरी शेवटी सर्वाना एक समान गोष्टच मांडायची असते. त्याहीपुढे जाऊन नटही सर्जनशीलतेच्या पातळीवर दिग्दर्शकाला खूप मदत करतो, आणि त्याने ती तशी करणं अपेक्षित आहे.

देव आणि मी
काही वर्षांपूर्वी मी केलेल्या एका वक्तव्याबद्दल गदारोळ उडाला होता. ते वाक्य होतं, ‘देवाला आता रिटायर करायला हवं!’ पण ती अर्थात माझी भूमिका होती, आणि माझ्यात हा जो काही स्पष्टवक्तेपणा आणि बिनधास्तपणा आला आहे, तो वेगवेगळ्या प्रसंगांमुळे आला आहे. विकासासाठी विचार करणं ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. बऱ्याचदा आपण एखाद्या त्रासदायक गोष्टीचा विचार करणं alt

टाळतो. तर अनेकदा, ही गोष्ट मला त्रास देतेय, तर मी तिचा पिच्छा सोडणारच नाही, अशी भूमिकाही अनेक जण घेतात. मी दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझ्या मते वैचारिक देवाणघेवाण व्हायलाच हवी. ती वैचारिक घुसळण आहे आणि त्याला आपला हातभार लागलाच पाहिजे. पण म्हणून, मी म्हणतो तेच अंतिम सत्य आहे, ही भूमिकाही चुकीची आहे. पण आपल्याला वाटतं ते मांडलंच पाहिजे. पण त्याचबरोबर एखाद्याच्या न पटलेल्या मतांचाही तेवढय़ाच खिलाडूपणे आदर करायला हवा. देवाबद्दलच्या माझ्या त्या वक्तव्यामागे फार लहानपणीची आठवण आहे. सदाशिवपेठेतील ताई रास्ते राममंदिराजवळ आमचा वाडा होता. आमचा म्हणजे, आम्ही त्यात भाडेकरू म्हणून राहात होतो. त्यावेळी त्या राममंदिराच्या पुजाऱ्याचा मुलगा प्रचंड दारू प्यायचा आणि झिंगत झिंगत मंदिराच्याच पायऱ्यांवर बसून देवाला अर्वाच्य शिव्या द्यायचा. तो आला की आम्ही घाबरून आईला बिलगून बसायचो. त्यावेळी मी आईला विचारलं होतं की, देव सगळ्यांना सद्बुद्धी देतो असं म्हणतात. मग देव याला का नाही सद्बुद्धी देत. तो तर देवालाच शिव्या घालतोय.
दुसरा प्रसंगही त्याच दरम्यान घडलेला. त्यानंतर तर देवावरचा माझा उरलासुरला विश्वासही पार उडाला. त्या मुलाच्या घरी आम्ही खेळायला म्हणून जायचो. त्याची आई अत्यंत सत्शील आणि साध्वी स्त्री होती. एकदा आम्ही असेच त्याच्याकडे गेलो असता तो पाटय़ावर भांग वाटत बसला होता आणि त्याची आई जवळच कपडे वाळत घालत होती. तिला पाटय़ावर चटणी वाटायची होती म्हणून तिने त्याला एकदोनदा ‘लवकर आटप’ असं सांगितलं. त्यावर त्याने भडकून जवळचा कप उचलून आपल्या आईला फेकून मारला. साहजिकच तो कप फुटला आणि त्याच्या आईच्या कपाळाला जखम झाली व भळाभळा रक्त वाहू लागलं. आजही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यावेळी तर मला अंधारीच आली होती. पण त्या मुलाला त्याचं काहीच वाटलं नाही. माझ्या डोक्यात पहिला विचार असा आला की, अरे हे देवाचे पुजारी आणि याने याच्या आईला असं मारावं. आणि देवाने हे बघून कसं घेतलं. देव जर काहीच करत नसेल, तर मग त्याचा उपयोग काय. हट्, देव वगैरे काही नाही, हे माझं मत त्यावेळीच भक्कम झालं.
एक मात्र आहे की, देव मानत नसलो, तरी मी मंदिरं मात्र आवर्जून बघायला जातो. कारण त्यातलं शिल्पकाम! या कलाकारांनी जे काही करून ठेवलंय, ते प्रचंड अद्भुत आणि अलौकिक आहे. कलेचा सवरेत्कृष्ट नमुना म्हणून त्याकडे आपण पाहू शकतो. मात्र त्यावर देवत्व लादलं जातं, हे चूक आहे. पण आपल्याकडे सध्या असं देवत्व लादण्याचं प्रमाण भयंकर वाढतंय. त्याला कारण प्रचंड प्रमाणात वाढलेली लोकसंख्या.
माझ्या मते, हा आपल्यासमोरचा प्रश्न नाहीये. प्रश्न आहे तो, हे बरोबर आहे की नाही. हे बरोबर नसेल, तर ते बरोबर नाही, हे लोकांना सांगणं माझं कर्तव्य आहे की नाही. जर ते माझं कर्तव्य असेल, तर मी ते का करत नाही. मग मला मी रॅशनल आहे वगैरे म्हणवून घेण्याचा काय अधिकार? पण चिंतेची बाब म्हणजे हा असा विचार करणाऱ्यांची संख्याही कमी होत चालली आहे. आता एवढं सगळं होऊन, एवढे पुरावे समोर येऊनही देव, बाबा, बुवा, साधू यांची चलती आहे. पण हा केवळ भारतीयांसमोरचाच प्रश्न नाही, तर हे संपूर्ण जगात असंच आहे. याचं कारण म्हणजे युगानुयुगं देव वगैरे विचार बालपणापासूनच आपल्या मनात कोंबले गेले आहेत. अमुक कर नाहीतर देव चिडेल, तमुक कर नाहीतर देव कान कापेल, वगैरे धमक्यांमुळे आपण देवाला घाबरायला लागतो. आणि तो पगडा घट्ट बसतो. एकदा या संस्कारांमध्ये माणूस अडकला की त्याचं त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन बसतं.

भूमिका जगायची नसते, तर आभास निर्माण करायचा असतो !
मी मेडिकलचं पुढील शिक्षण घेण्यासाठी कॅनडा आणि नंतर इंग्लंडला गेलो. तिथे तीन-चार वर्षांच्या काळात फार नाटकं केली नाहीत, तरी प्रचंड चांगली नाटकं पाहिली, हे मात्र नक्की! ही नाटकं पाहताना काही गोष्टी प्रकर्षांने जाणवल्या. नाटक करताना प्रत्येक नटाचा पोहोचायचा बिंदू एकच असतो. पण काही नट अतिशय आक्रमक, बटबटीत अभिनय करत त्या बिंदूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, तर काही अतिशय संयत आणि ताबा ठेवून त्या बिंदूला गवसणी घालतात. डोळ्यांची हालचाल, alt
हाताची छोटीशी हालचालही तुम्हाला हवा तो परिणाम साधू शकते. त्यासाठी आक्रस्ताळेपणा करण्याची गरज नाही. ही दुसरी पद्धत मला जवळची वाटली आणि मी ती अवलंबली. भारतात परतण्याचं निश्चित केलं, तेदेखील या वेडापायी. परत आल्यानंतर मग अभिनय क्षेत्रात कसे पाय रोवायचे, हा प्रश्न पडला नाही. एकामागोमाग एक नाटकं येत गेली. माझं पहिलं गाजलेलं नाटक म्हणजे ‘इथे ओशाळला मृत्यू’. त्यातली संभाजीची भूमिका मी मला संभाजी जसा दिसला, त्या पद्धतीनं केली. पण तरीही मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे ऐतिहासिक भूमिका करताना त्या नेमक्या कशा पद्धतीने साकाराव्यात, याबद्दल मला तरी ठोस असं काहीच कळलेलं नाही. ती फार बटबटीत केली, तर स्वतला पटत नाही आणि अगदी ‘एकच प्याला’मधल्या सुधाकरासारखी केली, तर प्रेक्षकांना अपील होणार नाही. त्यामुळे सुवर्णमध्य काढण्याची गरज मला जाणवली. पण त्यावेळी नैसर्गिक अभिनय म्हणजे पावित्र्यभंगच समजला जायचा, हेदेखील खरं.
या सगळ्या प्रवासात मला जास्त भावलेला नाटककार म्हणजे विजय तेंडुलकर. तेंडुलकरांनी आपण व्यवहारात वापरतो तशीच भाषा वापरून नाटकं लिहिली म्हणूनच त्यांच्यावर टीका झाली, पण त्यांची शैली तशीच होती. पण प्रेक्षकांना ती कळायचीच नाही. काचेचा चंद्र या नाटकाच्या बाबतीत अशीच गोष्ट झाली. त्या नाटकाचे तब्बल २८ प्रयोग वायाच गेले. त्यात छोटे छोटे सीन्स होते. पण प्रेक्षकांना त्या नाटकात काय चाललंय हे कळायचंच नाही. पण तेंडुलकरांनी नाटकातला नाटकीपणा काढून त्यात नैसर्गिकपणा आणला. मी, विजयाबाई, तेंडुलकर, जब्बार आम्ही असे एकत्र आलो, त्यामुळे त्या नाटय़ चळवळीला वेग मिळाला, एवढंच. पण एकटय़ानेच कोणी तसं करायचा प्रयत्न केला असता, तर ते शक्य झालं नसतं.
नाटकात काम करत असतानाच मला सिनेमाची ऑफर आली आणि तीदेखील व्ही. शांताराम यांच्यासारख्या चित्रतपस्व्याकडून. पण त्याहीवेळी माझी भूमिका अशीच होती की, नाटकातला अभिनय, चित्रपटातला अभिनय असं काही वेगळं नसतं. अभिनय हा अभिनय आहे. मग तो फारतर चांगला अभिनय किंवा वाईट अभिनय, एवढाच फरक त्यात असू शकतो. त्यातही सिनेमात काम करणं, म्हणजे काहीतरी कमीपणाचं आहे, असं मला कधीच वाटलं नाही. नाटकाच्या आधी सिनेमा आला असता, तर लोकांनी कदाचित नाटकाला हिणवलं असतं. एक मात्र खरं की, सिनेमात टेक्निक किंवा तंत्रज्ञानामुळे हळूहळू नैसर्गिकपणा आला. पण तो यायलाही काही काळ जावा लागला. सुरुवातीचे काही चित्रपट पाहिले, तर ते म्हणजे थेट नाटकांचीच प्रतिकृती वाटावे, एवढे बटबटीत होते.
तर व्ही. शांताराम यांचा चित्रपट ‘पिंजरा’ करतानाही मी त्यांना माझ्या अभिनयशैलीबाबत सांगितलं होतं. त्यांनी माझी नाटकंही पाहिली होती. त्यामुळे त्यांनी माझ्यावर कधीच दबाव आणला नाही. माझं नाटक पाहून त्यावेळी ते म्हणाले होते की, ‘ही इज डिलिव्हरिंग द गूड्स’. त्यामुळेच मी ‘पिंजरा’मध्ये माझ्या पद्धतीने काम करू शकलो.
एखाद्या नटाने एखादी भूमिका खूप उत्तमरीत्या साकारली, तर तो नट ती भूमिका जगला, असं आपण सर्रास बोलतो. पण भूमिका जगणं हे नाटकाला आवश्यक तर नाहीच, पण हानिकारक आहे. आपण भूमिका जगायची नसते, तर ती जगत असल्याचा आभास निर्माण करायचा असतो. हे काम करणारे डॉ. लागू नसून तो अमुक अमुक आहे, असं लोकांना वाटलं पाहिजे, एवढं ते नैसर्गिकपणे साकारायचं असतं. पण हे करत असताना आपण अभिनय करत आहोत, हे भान एक सेकंदही सुटता कामा नये. हे माझ्याप्रमाणे निळूभाऊंनाही खूप उत्तम जमत असे.

अण्णांचं आंदोलन आणि मी

काही वर्षांपूर्वी मी अण्णा हजारेंना पाठिंबा दिला होता. अण्णांचा हेतू चांगला आहे, हे मी त्याचवेळी सांगितलं होतं. पण त्यांनी alt
टाकलेलं प्रत्येक पाऊल बरोबरच आहे, असं मी म्हणणार नाही. सध्याच्या आंदोलनाकडे मात्र मी फार बारकाईनं पाहिलेलं नाही. त्या आंदोलनाशी मी जोडलेला आहे, असंही मला वाटत नाही. एखाद्या माणसाने एखाद्या तत्त्वप्रणालीला घट्ट चिकटून राहाणं चूक आहे. ती प्रणाली आऊटडेटेड झाली असेल, तर ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ ही प्रवृत्ती अंगीकारली पाहिजे. नाहीतर तो माणूस हट्टी म्हणून ओळखला जाईल, पण म्हणून मी हा जो काही विचार मांडला आहे, तोच बरोबर आहे, असाही माझा दावा नाही. त्या विचाराला छेद जाऊ शकतात.
सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत मात्र मी कोणतंही भाष्य करणार नाही, कारण त्याबाबतीत माझा अभ्यास नाही. पण एक मात्र खरं, ‘सिंहासन’च्या वेळी जी काही राजकीय परिस्थिती होती, ती आजही थोडय़ाफार फरकानं तशीच आहे. कारण हे विचार वर्षांनुर्वष समाजात मुरलेले असतात. त्यात आमूलाग्र बदल करायचा असेल, हे विचार समूळ काढून टाकायचे असतील, तर त्यासाठी थोडय़ाफार लोकांनी का होईना, सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे.
माझ्या मते, माणूस हा इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे, पण त्याच्याकडे एकच शक्ती जास्त आहे, ती म्हणजे विचार करणे. या एका शक्तीमुळेच तो उत्क्रांतीच्या शिडीवर एक पायरी वर आहे. पण उत्क्रांतीची ही प्रक्रिया इथेच थांबणार नाही तर ती अशीच चालू राहणार आहे. माणूस आणखी पुढे जाणार आहे म्हणजे काय, याची कल्पना शॉसारख्या माणसांनी सुपरमॅनच्या माध्यमातून मांडली होती. मानवाच्या उत्क्रांतीचा एकूण इतिहास पाहिला, तर ते सहजशक्य आहे. त्यावेळी तुम्ही आम्ही काय, पण आपली दहावी पिढीही कदाचित अस्तित्वात नसेल. पण ही प्रक्रिया अशीच निरंतर चालू राहील.. त्यानंतरही..

नाटकाबाहेरचा मी

नाटक वगैरे करत असताना मी सामाजिक बांधीलकीच्या दृष्टीनेही अनेक उपक्रम केले. समाजकल्याण निधी जमवण्यासाठी आम्ही राज्यभर दौरे केले. पण या सर्वाचा, मला वाटतं, मी काय किंवा इतर कोणीही काय, बाऊ करण्याची गरज नाही. सामाजिक बांधीलकी हा सर्वस्वी वैयक्तिक मुद्दा आहे. आपण ज्या पद्धतीने आपलं काम करतो, तेवढय़ाच प्रामाणिकपणे आपण वागायला हवं.

राहून गेलेली गोष्ट

आता कारकीर्दीच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना अनेक भूमिका करायला हव्या होत्या, असं वाटतं. आतापर्यंत हजारो नाटकांमध्ये लाखो भूमिका लिहिल्या गेल्या असतील त्या सगळ्याच एका नटाने करणं शक्य नाही, पण तरीही मला ‘एकच प्याला’मधील सुधाकर करायचा होता. त्याचप्रमाणे हॅम्लेटही साकारायला आवडला असता. पण ते राहूनच गेलं.

प्रेक्षक आणि अभिनेता

अनेकदा असा वाद होतो की, नाटक हे नटानं स्वतसाठी करायचं की प्रेक्षकांसाठी? याला माझं उत्तर आहे, प्रेक्षकांसाठी! पण म्हणून alt
नटाने स्वत्त्व जपायचंच नाही, असंही नाही. कसं होतं, की एखादी भूमिका नटाला आवडते आणि तो विशिष्ट पद्धतीने ती साकारतो, पण तो प्रयोग लोकांना आवडेलच असं नाही. तर कधीकधी नटाला एखादं काम अजिबात आवडलेलं नसतं, पण लोकांनी ते डोक्यावर घेतलेलं असतं. अशा वेळी लोकांच्या म्हणण्याला आदर दिला पाहिजे. लोकांसाठी करतो, म्हणूनच त्याला प्रयोग म्हणतात ना. नाटक स्वतसाठीच करायचं असेल, तर मग ते रंगमंचावर कशाला करायला हवं? घरी आरशासमोरही ते करता येईल. अनेकदा एखादी भूमिका आपल्याला ठरावीक पद्धतीने करायची असते. पण ते जमत नाही. मग आपण तीच भूमिका वेगवेगळ्या पद्धतींनी साकारायचा प्रयत्न करतो. असं माझ्या बाबतीत अनेकदा झालं आहे. त्यामुळे काही बाबतीत अजूनही मी हौशी नटच आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो