नवनीत : गुरुवार, १ मार्च २०१२
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवनीत : गुरुवार, १ मार्च २०१२ Bookmark and Share Print E-mail
नवनीत

गुरुवार, १ मार्च २०१२
इतिहासात आज दिनांक..
१ मार्च

१६४० लंडन ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासमध्ये व्यापारी केंद्र काढण्यास दिल्लीचा मुघल सम्राट जहांगीरने परवानगी दिली. ३१ डिसेंबर १६०० रोजी स्थापन झालेल्या कंपनीने ४० वर्षांच्या आत मिळविलेले हे फार मोठे यश होय. कंपनीचा आरंभ व्यापाराने आणि शेवट साम्राज्य स्थापनेत झाला. भारतातील ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे व्यापाराचा बुरखा पांघरलेले एक राज्यच होते. सर थॉमस रो हा कंपनीच्या भारतातील धोरणाचा आद्य शिल्पकार मानला जातो. मच्छलीपट्टण, हरिहरपूर, मद्रास, बंगाल, मुंबई या क्रमाने कंपनीचा भारतात विस्तार झाला. १६०८ मध्ये भारतीय भूमीवर ब्रिटिशांनी पाऊल ठेवले ते १९४७ ला परत उचलले.
१८६९ रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी ‘जगद्वितेच्छु’ नावाचे पत्र सुरू केले. या पत्रातून वाचकांची बातम्यांची भूक भागविली जायची. १९०२ च्या अगोदर केसरीपेक्षा जास्त बातम्या या पत्रात छापल्या जायच्या. अन्य पत्रांना मागे टाकण्यासाठी या पत्राने समकालीन पत्रांपेक्षा स्वत:चा आकार १८८९ मध्ये दीडपट केला होता. किंमत फक्त १२ आणे ठेवली होती. शिवरामपंत परांजपे यांचे ‘काळ’ पत्र सुरुवातीला जगद्वितेच्छुच्या छापखान्यात छापले जायचे. १९०५ च्या आगेमागे हे पत्र बंद पडले. गोंधळेकर संस्कृत ग्रंथांचे मराठी अनुवाद उत्तम करीत असत.
१९६९  नवी दिल्ली आणि कलकत्ता यांच्या दरम्यान धावणारी पहिली सुपरफास्ट ट्रेन (रेल्वेगाडी)- ‘राजधानी एक्सप्रेस’ सुरू झाली.
प्रा. गणेश राऊत  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची
रूसो

altफ्रान्समध्ये सतराव्या आणि अठराव्या शतकात राजेशाही, धर्मगुरू व उमराव यांच्या वर्चस्वामुळे सामाजिक विषमता वाढून सामान्य जनता भरडून निघाली. त्यातून आंदोलन  सुरू होऊन पुढे राज्यक्रांती झाली. संतापलेल्या लोकांच्या उठावाला निश्चित दिशा देण्याचे काम फ्रेंच विचारवंतांनी केले. त्यांनी वैचारिक वातावरण निर्माण करून क्रांतिकारकांचे मनोबल वाढविले. त्या विचारवंतांपैकी आणि तत्त्ववेत्यांपैकी रूसो हा एक होता. जाँ-जाक रूसो (Jean-Jacques Rousseau,, १७१२ ते १७७८) चा जन्म स्वित्र्झलडमध्ये झाला. आईचा लवकरच मृत्यू झाला आणि वडील रूसोला मामाकडे सोडून दुसरीकडे गेले. रूसो सोळाव्या वर्षी घराबाहेर पडून गावोगाव हिंडत असताना पॅरिसमध्ये १७४२ साली आला. मिळेल ते काम करीत शेवटी एका राजदूताकडे मदतनीस म्हणून होता. चिंतन, मनन यातून त्याचे विचार प्रगल्भ झाले. त्याने प्रथम डिस्कोर्स ऑन दि आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस हा ग्रंथ लिहिला. त्याने मानवाच्या निसर्गदत्त मूलभूत हक्कांवर भर दिला. मानवनिर्मित संस्थांमध्ये सर्वत्र गरिबांवर अन्याय झाला आहे. राजा किंवा प्रशासन जुलमी असेल तर ती उलथून टाकण्याचा अधिकार जनतेला आहे. पुढच्या काळात त्याने लिहिलेला ‘सोशल कॉन्ट्रॅक्ट’ हा त्यांचा सिद्धान्तग्रंथ जगप्रसिद्ध झाला. फ्रान्समधील सुरू झालेल्या आंदोलनात हा ग्रंथ क्रांतिकारकांना मार्गदर्शक ठरला. त्यात त्याने लिहिले आहे : शास्त्राच्या प्रगतीने व्यक्तीऐवजी सरकारेच सशक्त झाली. आधुनिक काळातला तो पहिला लेखक आणि तत्त्ववेत्ता की ज्याने व्यक्तीच्या खासगी मालमत्ता वाढविण्याला विरोध केला आहे. या विचारसरणीमुळे कार्ल मार्क्‍सने त्याच्या ग्रंथात रूसोला समानवाद व कम्युनिझम यांचा मूळ सिद्धान्त मांडणारा प्रथम तत्त्ववेत्ता असे म्हटले आहे. फ्रान्समध्ये जी अनागोंदी निर्माण झाली होती, अत्याचार चालू होता, तो रूसोने प्रखरतेने मांडून हा अत्याचार आपण मोडून काढू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे फ्रेंच क्रांतीला चालना मिळाली.
सुनीत पोतनीस
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल
जहाजावरील बिनतारी यंत्रणा

altसंकटकाळी मदत मिळवण्याच्या दृष्टीने आपण संकटात आहोत हे कमीत कमी वेळात संबंधितांना कळणे आवश्यक आहे. तरच ते आपल्याला योग्य मदत करू शकतील आणि अनेकांचे प्राण वाचू शकतील.  हे कळवण्यासाठी बिनतारी यंत्रणा प्रत्येक जहाजावर असते. मुख्य कार्यालयाशी तसेच इतर कार्यालयाशी संपर्क साधणारी बिनतारी यंत्रणा जहाजावर असावी, असा कायदाच आहे. वापरले जाणारे फ्लेअर्स हे मरिन फ्लेअर्स म्हणून ओळखले जातात. याच्या सहाय्याने आपत्काळी साध्या रॉकेटचे तत्त्व वापरून जहाजावरून किंवा समुद्रातून रंगीत धुराचा सिग्नल वर आकाशाच्या दिशेने पाठवला जातो.  हे सिग्नल जमिनीवरील लोकांचे किंवा आकाशात असलेल्या विमानाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी पाठवले जातात. आता तर पाण्याखाली, समुद्राच्या तळाशी असतानाही यशस्वीपणे वापरता येतील असे फ्लेअर्स तयार केले गेले आहेत. हे फ्लेअर्स नळीच्या आकाराचे लहान असल्याने हाताळायलाही सोपे असतात.
तरंगण्यास मदत करणारे लाइफ जॅकेट्स ही सुरक्षचे एक महत्त्वाचे साधन. नियमानुसार जहाजावरील प्रवाशांच्या अधिक कर्मचाऱ्यांच्या संख्येइतके लाइफजॅकेटस् जहाजावर असायला हवेत. एका व्यक्तीसाठी एक लाइफजॅकेट असतो. हल्ली डोक्यापासून पायापर्यंत सर्व शरीर झाकून टाकणारे फ्लोटेशन सूट जहाजांवर असतात. हे सूट बुडण्यापासून वाचवतात. अगदी थंड पाण्यातही ते शरीराचे रक्षण करतात.  जहाजावरील अजून एक महत्त्वाचे साधन म्हणजे लाइफ राफ्टस् म्हणजे फुगवलेल्या तराफा. जणू ते एक फुगवलेले नावेच्या आकाराचे भांडे असते. यात वल्ही असतात. काहींना छतही असते.  शिवाय फ्लेअर्स, पाण्याची पाकिटे, सिग्नल देण्यासाठी आरसे अशा इतर गोष्टीही असतात. खूप जोराच्या वादळात याचा निभाव लागणे तसे कठीणच. पण इतर संकटात मात्र फार उपयोगी आहेत.   या गोष्टी वापरायच्या कशा हे माहीत असायला हवेच, पण वेळोवेळी त्याचे प्रात्यक्षिकही व्हायला हवे. संकटकाळी ही साधने सहज उपलब्ध असतील, अशा पद्धतीने ठेवली गेली असली पाहिजेत.  प्रत्येक साधनाच्या वापरण्याच्या मुदतीची तारीख पाहिली पाहिजे आणि ते साधन काटेकोरपणे तपासून घेतले गेले पाहिजे.
चारुशीला जुईकर
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२  

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा..
अनाहत नाद..

altएक होता राजा! अनेक र्वष राज्य केल्यावर त्यानं आपल्या एकुलत्या एक राजपुत्रावर राज्याभिषेक करायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं राजपुत्राची युद्धविद्येची परीक्षा घेतली. धनुर्विद्या, नेमबाजी, तलवारयुद्ध सर्व स्वसंरक्षक कलेमध्ये राजपुत्र निष्णात होता. राजाला वाटले, संरक्षणाची व्यूहरचना आणि अर्थव्यवहार राजपुत्राला जमेल, परंतु प्रजेशी तो कसे संबंध ठेवेल? त्याची मानसिकता कशी आहे? त्यानं राजपुत्राला आज्ञा केली. राजासमोर युवराज मुजरा करून अदबीने उभा राहिला. ‘तुम्ही अनेक विद्यांमध्ये प्रवीण आहात, हुशार आहात हे खरंय, पण तुम्हाला आखणी काही शिकावं लागेल. केवळ आमचे सुपुत्र म्हणून इलेक्शनचं तिकीट मिळणार नाही. तुम्ही राजगुरूंना भेटा. त्यांचे आदेश पाळा.’
चेहऱ्यावरची नाराजी कशीबशी लपवत राजपुत्र राजगुरूंसमोर उभे राहिले. राजगुरू म्हणाले, ‘तुझं प्रशिक्षण जंगलात होईल. तिथे नि:शस्त्र, एकटाच जा, मौन पाळ, चार दिवस राहा, मग आपण बोलू!’
राजपुत्र वेगानं घोडा हाकत जंगलात पोहोचला. एखाद दिवस घुश्श्यात गेल्यावर जंगलाचा वेध घेऊ लागला. कुठे वाघाच्या डरकाळ्या, वेळीअवेळी सिंहगर्जना, अधूनमधून हत्तींचे चित्कार आणि माकडांची सदैव चीं-चीं. जंगल अजिबात शांत नव्हते. चार दिवसांनी राजपुत्र गुरूंसमोर हजर. गुरूंचा थेट प्रश्न, काय ऐकलंस? राजपुत्राने सगळी ध्वनिकथा कथन केली. ‘इतकंच!’ राजगुरू काहीशा तुच्छतेनं म्हणाले, ‘जा राहा अजून आठ दिवस तिथे, मौन पाळ, मग आपण बोलू.’
राजपुत्राने गुरूंना वंदन करून जंगलाकडे प्रयाण केले. वाटेतल्या वस्त्या न्याहाळत तो शांतपणे जंगलात पोहोचला. लवकरच स्थिरावला. दिवसभर इतस्तत: फिरायचं आणि रात्री विश्राम. पण हे मधुर कूजन करणारे हे कोणते पक्षी? आकाशात उडतानाही घरटय़ाकडे काटेकोर लक्ष देणारा हा कोणता विहंग? आणि हा गंभीर गुंजारव करणारे भुंगे काय म्हणत असतात? झुळझुळ वाहणारी नदी कोणती गाणी म्हणते? आणि अहोरात्र गर्जणारा दूरवरचा प्रपात कोणते ध्वनिसंकेत करतोय? आणि हा टाहो कोणाचा? राज्यात परत येऊन राजगुरूंना राजपुत्राने सर्व नादकथा सांगितली. राजगुरू त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले ‘जा पुन्हा जंगलात. दुप्पट दिवस राहा. मौन पाळ. मग बोलू.’
राजपुत्र जंगलाकडे पायी वाटचाल करीत गेला. वाटेत भेटणाऱ्या प्रजेचे चेहरे न्याहाळत, त्यांची घरदारं नि जीवनपद्धती लक्षपूर्वक पाहत जंगलात पोहोचला. आता तो जंगलात जंगलातला घटक म्हणून राहू लागला. नि:शब्दपणे दिवस जात होते. राजपुत्र स्थिरचित्त राहून सारं अनुभवत होता आणि सोळाव्या दिवशी स्वत: गुरू त्याच्यासमोर हजर झाले. राजपुत्र त्यांना वंदन करून म्हणाला, ‘तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत मजकडे?’ गुरू फक्त मंद हसले. राजपुत्र म्हणाला, ‘इथे मी शांततेचा आवाज ऐकला. वेळोवेळी शांततेतील नीरवता भंग व्हायची. झाडांची पानं दिवसभरात आपलं हरितद्रव्य बदलायची, त्यांच्या छटा बदलायच्या, त्या बदलत्या रंगाचा आवाज ऐकू यायचा आणि रानफुलांच्या कोमल मुकुलिका उमलताना सौंदर्याची गाणी म्हणायच्या, त्यांचा मोहक सुवास डोळ्यांना विलक्षण भावायचा. पिकली पानं गळताना समाधानाचा नि:श्वास टाकायची. त्यानं त्याचा अंगांगाला स्पर्श व्हायचा.’
गुरुवर्य सद्गदित होऊन म्हणाले, ‘दीर्घायु भव.  तू कोणालाही ऐकू न येणारे नाद ऐकलेस. भवतालच्या सूक्ष्म बदलाची तू चाहूल अनुभवलीस. रंगांचे गंध जाणलेस आणि गंधांचे रंग ओळखलेस.’
‘शब्दावाचून विचार केलास आणि आविष्कार होण्यापूर्वी भावनांचे आशय जाणलेस. तू धन्य आहेस. युद्धविद्येत निपुण आहेस, पण आता युद्ध टाळण्याकरिता माणसामाणसात कसा संवाद असावा लागतो, हे शहाणपण मिळवलं आहेस. राजपुत्र गुरूंचे चरणस्पर्श करून म्हणाला, ‘आज्ञा असावी. निघतो आता, कारण कोसभर दूर असलेल्या पूज्य पिताजींना माझी आठवण येतेय आणि राजमातेचे नयन पाण्यानं भरत आहेत. माझी प्रजा, माझे बांधव, त्यांच्या व्यथा-वेदनांनी मी कासावीस होतोय. त्यांना दिलासा, व्यापारउदीम आणि संरक्षण देण्याकरिता अधीर झालोय.’
गुरू म्हणाले, ‘पुन: मिलान:। भेटू पुन्हा.’
डॉ. राजेंद्र बर्वे  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो