गोष्टी भावभावनांच्या : आय एम द बेस्ट
मुखपृष्ठ >> गोष्ट भावभावनांची >> गोष्टी भावभावनांच्या : आय एम द बेस्ट
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गोष्टी भावभावनांच्या : आय एम द बेस्ट Bookmark and Share Print E-mail

आई - बाबा तुमच्यासाठी
नीलिमा किराणे - शनिवार, १० मार्च २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altएखाद्या स्पर्धेत हरलो तर आपला खेळ कमी झाला हे स्वीकारणं, हा बदलण्याचा पहिला टप्पा आहे. पुढचा टप्पा आत्मविश्वासाचा. कधीतरी कमी पडणं म्हणजे कायमचं संपणं नव्हे. ती एक फेजही असू शकते. हा विश्वास आईबाबांच्या आपलेपणातून मिळू शकतो. जिंकलेलं मूल सर्वाचं असतं, पण हरलेलं नेहमी एकटंच असतं. खरा मुद्दा असतो तो वस्तुस्थिती स्वीकारण्याचा आणि दृष्टिकोन बदलण्याचा..
विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. तो पुन्हा झाडापाशी गेला. वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, ‘‘राजा, तू अजूनही हट्ट सोडणारच नसशील तर मी तुला आणखी एका घरातली गोष्ट सांगतो. बघ.’’ हातातली रॅकेट रागानं फेकून वेदांग कोचावर धपकन बसला. शोकेसमधल्या मेडल्सकडे पाहताना उदास झाला. कॅमेरा फिरल्यासारखी त्याची नजर शोकेसवरून फिरत होती. ही सुंदर शोकेस मेडल्स आणि शील्डस्साठी खास बनवून घेतलीय हे कळतच होतं. राज्य, जिल्हास्तरीय आणि आंतरशालेय बॅडिमटनची कित्येक मेडल्स, अनेक वक्तृत्व स्पर्धा, बोर्नव्हिटा जनरल नॉलेज, राज्यस्तरीय चित्रकला, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, जवळजवळ प्रत्येक इयत्तेसाठीची पहिल्या किंवा क्वचित दुसऱ्या क्रमांकाची मेडल्स आणि प्रशस्तिपत्रकं.  वेदांगची चौफेर प्रगती दाखवत होती. जवळच वेदांग आणि आईबाबांचा हसरा फोटो. दोघांच्याही डोळ्यांत वेदांगबद्दलचा प्रचंड अभिमान.
आईबाबा पाठोपाठ आत आले. बाबांचा चेहरा चिडका, आईचा दु:खी. ‘वेद, असा कसा सेमी फायनललाच हरलास तू? प्रॅक्टिस कमी पडली, ओव्हरकॉन्फिडन्स नडला. गेल्या वर्षी तुझ्याकडून १६ पॉइंटनी हरलेला तेजस यंदा इतका सहज कसा हरवू शकतो तुला? या वर्षांतली ही तिसरी मॅच हरलायस तू वेद. हे चालणार नाही.’
वेदांग चिडला. ‘मी काही कमी ट्रेिनग करत नाही बाबा. आज खूप कमी जेवलो होतो.एनर्जी कमी पडली. खेळूनखेळून या रॅकेटचा स्ट्रोकपण कमी झालाय.’
आईला एकदम भरून आलं. ‘होय हो. आज खूप कमी खाल्लं त्यानं. रात्रीसुद्धा जागून शाळेचा अभ्यास पूर्ण केला. उगीच रागवू नका त्याला. हरला त्यात त्याची चूक काय? तेजस केवढा ताडमाड उंच आहे वेदपेक्षा.’
‘आज पहिल्यांदा मॅच खेळतोय का तो? कुणी सांगितलं उपाशी जायला? आणि तेजस गेल्या वर्षी पण उंचच होता. कोचिंग वाढवायचं असेल तर तसं सांग वेद, पण हुशार मुलांनी स्पध्रेत कधीच हरता कामा नये..’ बाबा रागवत राहिले.

वेदांगचे मित्र वर्गात कालच्या मॅचबद्दल बोलत होते. ‘तो आधी खूप लाईटली खेळत होता. नंतर नंतर चक्क भीती भीतीच दिसायला लागली त्याच्या चेहऱ्यावर. त्याचे जबरी स्ट्रोक काल दिसलेच नाहीत.’
मित्रांचा चिडवण्याचा उद्देश नसेलही, पण वेद चिडला. काहीतरी समर्थनं देत त्यानं भांडणच सुरू केलं. तेवढय़ात सर वर्गात आले. त्यांच्या हातातले सहामाहीचे पेपर्स पाहून वेद खूष झाला. गणिताचा टॉपर तोच असणार. पण यंदा टॉपर रोहित होता. वेदांग ५० पकी ४५ मार्क घेऊन चौथा आला होता. ‘वेदांग, एका प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायला चुकलायस. एकदम पाच मार्क गेले. इतकं सोपं गणित चुकण्याची तुझ्याकडून अपेक्षाच नाही. बोर्डात अशा सिली मिस्टेक्स चालणार नाहीत. शाळेच्या अपेक्षा आहेत तुझ्याकडून.’ सर म्हणाले, वेदचा चेहरा विलक्षण पडला. त्यानं रोहितचं अभिनंदनपण केलं नाही. घरी आल्यावर रागारागानं आदळआपट केली, सर्टििफकेटस फाडली.
*  * *
वेद निराशपणे घरात पलंगावर झोपला होता. त्याच्या पोटात दुखत होतं, मळमळत होतं, हातपाय गळून गेले होते. भेटायला आलेल्या आपल्या मत्रिणीला वेदची आई सांगत होती, ‘हल्ली सारखं काहीतरी होत असतं त्याला. चेकअपमधे काहीच निघालं नाही. गेल्या दोन-तीन मॅचेसमध्ये नेमका सेमी फायनलला हा आजारी. बिचारा. त्यात शाळा बुडली की मार्कही कमी पडतात. बिचारा. मॅचचे कसेपण लॉट पाडतात, एका दिवशी दानदान मॅचेस, शाळेतही पार्शलिटी होते.  मग याची उलाघाल. खूप चिडतो, भांडतो, फेकाफेकी करतो. अभ्यास, खेळ, अ‍ॅक्टिव्हिटीज सगळीकडे धावाधाव करून दमलाय बिचारा माझा सोन्या. थोडे दिवस विश्रांतीच घे म्हणतेय मी.’
* * *  
राजाला दिसणारं दृश्य अस्पष्ट होत होत नाहीसं झालं ..
वेताळ म्हणाला, ‘राजा, एवढा गुणी वेदांग असा अचानक का बिथरला? चॅम्पिअनचा खेळ एकदम एवढा ढिला कसा पडला? तो स्पर्धा टाळायला का लागला? गणिताचा टॉपर अचानक सिली मिस्टेक्स कशामुळे करायला लागला? माझ्या प्रश्नांची उत्तरं माहीत असूनही तू दिली नाहीस तर तुझ्याच डोक्याची शंभर शकलं.. ’
राजा म्हणाला, ‘‘वेताळा, तुझ्या सगळ्या प्रश्नांचं मूळ एकच आहे. वेदांगला थोडंसंही अपयश सहन करता येत नाही कारण तो सगळं काही फक्त जिंकण्यासाठी करतोय. सतत पहिलाच येत राहिल्यामुळे आणि सततच्या कौतुकामुळे पहिलं येणं हा आपलाच हक्क आहे असं तो गृहीत धरायला लागलाय. त्याच्याहून चांगलं खेळणारंही कुणी असू शकतं हे त्याला मान्यच नाही आणि आजूबाजूच्यांनीही त्याला हे भान दिलं नाही.
अजूनही वेदांग ‘आय एम द बेस्ट’ च्या फुग्यातच अडकलाय. आधीच्या दोन मॅचेसमधलं हारणं ही सावधानतेची सूचना वेदला कळली नाही. तो ढिला पडलाही नसेल. तेजसनं जिद्दीनं स्वत:चा खेळ सुधारला असू शकतो. तसं पाहिलं तर एखाद दोन मॅचेस हारणं किंवा गणितातल्या सिली मिस्टेक्स काही फार जगावेगळ्या नाहीत. ते कुणाचंही होऊ शकतं. सुधारणेसाठी थोडा सराव आणि थोडी सावधानता लागते.  पण ‘वेदांग द बेस्ट’ला मात्र हे छोटे पराभव आणि बाबांचं रागावणं, सरांचं बोलणं झेपलं नाही. ‘मी बेस्ट नाही, म्हणजे मी बाद आहे, आता सगळं संपलं’ इथे तो पोहोचला। स्वत:च्या क्षमतेवरचा त्याचा विश्वास संपला.
त्या भीतीतून पलायनवाद सुरू झाला असावा. स्वत:ची हार त्यानं स्वीकारलीच नाही. समर्थनं शोधणं, चिडणं, भांडणं, फेकाफेकी करून त्यानं मनातली हरण्याची भीती स्वत:च्याही नकळत रागाखाली लपवली. याचा पुढचा टप्पा त्याचं आजारपण. ते नेहमी सेमी फायनलच्या वेळीच उपटतं कारण तिथून त्याची हरण्याची भीती सुरू होते हे असावं. ही भीती त्याला निराशेपर्यंत नेते. आता त्याच्या मनात ‘माझ्यात काही अर्थ नाही’ हे स्वगत चालू आहे आणि दुसरीकडे आईची, ‘अरेरे, बिचारा’ ही सहानुभूती त्याला हरण्यापेक्षा सुरक्षित वाटतेय.
‘थोडक्यात, आईनं प्रेमानं कौतुक पण करायचं नाही आणि बाबांनी रागवायचं पण नाही, असं सांगतोयस तू राजा. वेदांगला मदत करण्याचा हाच उपाय आहे का तुझ्याजवळ?’ वेताळ तिरकसपणे म्हणाला.
‘नाही. असं अजिबात नाही. त्याची मदत आईबाबा, मित्र आणि तो  स्वत:एवढे जण करू शकतात. माझा आक्षेप आईबाबांच्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून वागण्यावर आहे. दोघं दोन टोकाचं वागतात. वेदांग काही न खाता मॅचला गेल्याचं आई कौतुक करते. वर तेजस उंच आहे हे नवं समर्थन वेदांगला सुचवते. ‘गुणी बाळ’च्या कौतुकातून बाहेर येऊन वेदांगला शांत करणं आणि नंतर समर्थनं त्याच्या लक्षात आणून देण्याचं काम ती खूप चांगलं करू शकते.
बाबांना वेदांगचं कौतुक आहे, पण तो जिंकला तरच. त्याची हार त्यांनाही झेपत नाही. वेदांगची समर्थनं ते आईसारखी आंधळ्या प्रेमानं स्वीकारत नाहीत. पण समजावून सांगण्याऐवजी स्पध्रेत जिंकलं पाहिजे या भावनेतून त्याला रागावत राहतात. वेदांगच्या चुका सिद्ध करून त्याला खाली दाखवतात. खेळात एकाची हार आणि एकाची जीत असणारच हे विसरतात.
‘‘ म्हणजे राजा, तू आता ‘स्पर्धा नको आणि सुधारणाही नको’ कडे
येणार ?’’ वेताळ खवचटपणे म्हणाला.
‘मी स्पध्रेकडे कसं पाहायचं याकडे येणार ‘स्पर्धा म्हणजे जिंकलंच पाहिजे’च्या रेटय़ामुळे अप्रत्यक्षपणे असं घडतं की वेदांग शिकण्यासाठी शाळेत जात नाही, तर पहिला येण्यासाठी जातो. खेळण्याच्या आनंदासाठी किंवा फिटनेससाठी खेळत नाही, तर शोकेसमधली मेडल्स वाढवण्यासाठी खेळतो. ज्याला आईबाबांकडून, शिक्षकांकडून नकळत खतपाणी मिळतं. स्पध्रेबाबतची सगळी गडबड इथे आहे. स्पध्रेच्या निमित्तानं स्वत:ची कुवत वाढवता येते. सततच्या स्पर्धेत कुवतही सातत्यानं वाढू शकते आणि आत्मविश्वासही टप्प्याटप्प्यानं वाढत जातो. जे वाढण्यासाठी खेळतात त्यांना आनंद मिळतो. जे फक्त जिंकण्यासाठी खेळतात त्यांना आतमध्ये हरण्याची भीती वाटते. खरं तर हारजीत कुणाच्याच हातात नसते.  
हरल्याच्या धक्क्यातून सावरल्यावर वेदांगही शांतपणे आत्मपरीक्षण करू शकतो. हरलो तेव्हाचा आपला खेळ कमी झाला हे त्यानं समजून स्वीकारणं हा बदलण्याचा पहिला टप्पा आहे. तेजसनं अपयश स्वीकारलं म्हणून त्यातून शिकून तो पुढे गेला. ते वेदांगलाही जमेल. पुढचा टप्पा आत्मविश्वासाचा. कधीतरी कमी पडणं म्हणजे कायमचं संपणं नव्हे. ती एक फेजही असू शकते. हा विश्वास आईबाबांच्या आपलेपणातून त्याला मिळू शकतो. जिंकलेलं मूल सर्वाचं असतं, पण हरलेलं नेहमी एकटंच असतं. इथं आईनं आपला कौतुकाचा चष्मा आणि बाबांनी अपेक्षांचा चष्मा जरा उतरवून ठेवला तर वेदांगला त्यांच्या मनातल्या प्रेमाची मदत मिळेल. वेताळा, खरा मुद्दा आहे तो वस्तुस्थिती स्वीकारण्याचा आणि दृष्टिकोन बदलण्याचाच.’ राजा म्हणाला.
त्याचं बोलणं संपेतो वेताळ खांद्यावरून अदृश्य होऊन झाडाला लोंबकळू लागला होता.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो