ब्लॉग माझा : रुसवा..
मुखपृष्ठ >> ब्लॉग माझा >> ब्लॉग माझा : रुसवा..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ब्लॉग माझा : रुसवा.. Bookmark and Share Print E-mail

मधुकर धर्मापुरीकर - शनिवार, १० मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआपलं घर सोडून निघताना मनाची सदैव होणारी ती चलबिचल. ऑडिटची दौऱ्याची नोकरी केली; तेव्हापासूनची माझी ती सवय असावी. तयारी होत असतानाच माझी पोरं शाळेला निघालेली असायची. ती मला टाटा करायची. पण मीच अध्र्या तासानंतर तिथून निघून जाणारा.. कसं अधांतरी वाटायचं. शिवाय, बायकोला, मुलांना सोडून चालल्याची भावना भलतीच अपराधी करून टाकायची. तीच सवय अंगात भिनली. कुठेही निघताना उल्हास कमी, उदासी जादा..  माझ्या रुसव्याचं कारण..
सकाळचे साडेपाच वाजले आहेत. आता निघायची तयारी सुरू झाली आणि ठरलेलं- ठरविलेलं असतानासुद्धा मनात निरुत्साह गोळा व्हायला लागतो. प्रवासाला निघताना करण्यात येणाऱ्या तयारीतली ती सफाई, ती सवय लोडशेडिंगने अचानक लाइट जाऊन गच्च अंधार व्हावा तसा माझा उत्साह, माझी गती अचानक थांबून गेली. कुठं जायचं आहे? का जायचं आहे? केव्हा परतायचं आहे.. माझं मन विचारीत होतं. पलंगावर बॅगा ठेवलेल्या, त्यात भरायचं सामान बाजूला. हे राहिलं, ते राहिलं असं आता होतच नाही. आता या तयारीत एक प्रकारची व्यावसायिकता आल्यासारखं झालं आहे.. त्यामुळेच कंटाळा आला असावा का..
हा कंटाळा आलेला असतो, रुसव्यातून. मुलं येत नाहीत इकडे, त्यांना सवड नसते इकडे येण्याची आणि मग आपल्याला जावं लागतं ही ती भावना. मग वयाचा-थकव्याचा विचार न करता करावी लागणारी ती लगबग, नातवाला भेटायची ती ओढ.. सामानसुमान आवरावं तसं शरीर-मनही आवरून निघायची ती घाई आणि असं करताना रुसलेलं ते आपलं मन. कॉलनीतली अर्धीअधिक घरं अशीच रुसून बसल्यासारखी एकली..
लोडशेडिंगची वेळ. सकाळी सहाला लाइट गेले. इन्व्हर्टरची टय़ूब सूक्ष्म आवाज ठेवून चालू झाली. बायको सफाईने आवरत होती- गॅस बंद करणे, लाइटचे खटके बंद करणे, कॉम्प्युटर, कपाट.. मग उरलेले अन्न बाहेर ठेवणे.. आवराआवरी चालू होती तिची आणि मी कपाटातून आठवणीने आमची आयडेंटिटी कार्ड्स काढून घेतो. जपून बॅगमध्ये ठेवून देतो.
प्रवास हासुद्धा आता शरीराच्या हालचालीइतकाच सवयीचा. गरजेचा झालेला आहे- मनाला सोबत घेऊन जायचं आहे अशी कल्पना आली आणि मन विचारतं आहे- सोबत घेऊन का कडेवर घेऊन.. शरीरालाही आता जाणवतं आहे मनाचं ओझं.. निघावं तर लागणार आहे, पण तरीही प्रवासाची मानसिकता अस्थिर करते. आजकाल प्रवासाहून परत यायची घाई होते. केव्हा एकदा घर गाठू की- असं होत आहे. घरी आलं की मोठं सुरक्षित, निवांत वाटतं. या संदर्भात मी बऱ्याच जणांना सांगितलं आहे की, कुत्रं जसं बाहेरून वाडय़ात आपल्या जागी परतलं की, स्वत:भोवती गोल फिरून निवांत बसतं; तसं मी बाहेरगावाहून घरी आल्यावर पलंगावर निवांत होतो.
मागच्या महिन्यात मुलीकडे गेलो होतो. तनयाच्या सोबतीचे ते दहा-बारा दिवस.. तिथे त्यांचे शेजारी; त्यांचा मुलगा आनंद. हा तनयच्याच वयाचा. आता दोघंही तीन वर्षांची झालेली. जिगरी अशी त्यांची दोस्ती, त्यांची ती दिवसभराची संगत. हा त्याच्या घरी जाऊन बसणार, तो याच्या घरी येणार. सायकल, क्रिकेट खेळत राहणार. आनंद हा तनयपेक्षा शरीराने थोडा किरकोळ, उंचीला थोडासा कमी असा. त्याचं बोलणं-वागणं मोठं बारीक. त्याच्या उलट तनयचं; त्याचा आवाज, त्याच्या हालचाली मोठय़ा. हा आनंद पटकन रुसून बसणारा; त्याच्या मनासारखं नाही झालं की, लागलीच हाताच्या छोटय़ा मुठीतून करंगळी वर करतो, ‘कट्टी’ म्हणून गेटकडे निघतो घरी जायला. मग तनय पटकन त्याला बोलावतो. ‘आनंद, हे घे’ असं म्हणत त्याला हवं ते देतो, कधी गेटपाशी जाऊन त्याला परत घेऊन येतो. कधी बसल्या जागीच त्याला आवाज देतो. त्याला बोलावतो.
तिथून इकडे घरी परतलो आणि तनयचं आनंदशी तसं वागणं, बोलणं आठवू लागलो. राहून राहून आठवू लागलो.. गेटकडे जाताना फक्त करंगळी दाखवून निघणारा आनंद बोलत नाही जादा. घराच्या आसपास, वातावरणात- परिसरात कुठे आवाज नसतात, गोंगाट नसतात. त्या पाश्र्वभूमीवर तनयचं त्याला बोलावणं लक्षात राहून गेलेलं. आग्रहाने बोलावताना तनय ओरडत असतो- ‘‘आनंऽऽद, आनंद रेऽऽ’’
इथे तनयचं ते ‘रेऽऽ’ काही मनातून जाईना. उच्चाराला थोडा ‘ल’चा स्पर्श असणारे ते ‘रेऽऽ’..
माझंही मन.. माझं एक मन दुसऱ्या मनाच्या पाठीमागे असतं. ‘रेऽऽ’.. असं आवाज देत राहतं.
आजही असंच झालं. तिकडल्या नातवाची आठवण झाली- अर्णवची. तिकडे जावं वाटू लागलं. त्याची ओढ वाटू लागली. नातू तो नातूच. मुलीचा असो की मुलाचा. दुधावरची साय असं जे म्हणतात, त्याला दुसऱ्या शब्दाचा पर्याय नाहीच. अनामिक अशी ओढ जिवाला लागलेली असते. नातवाला भेटायची. अर्णवला भेटावं वाटू लागलं. निघायचं ठरलं. निघायची तयारी झाली.
आणि परत तोच अनुभव. तिच मन:स्थिती. रुसल्यासारखी. शरीराच्या हालचाली असतात निघायच्या आणि एक मन गती हरवलेल्या स्थितीने रेंगाळत असतं. घर सोडून जायचं, इथल्या आपल्या वस्तू, आपले कपडे, आपल्या वापरातल्या- आवडीच्या म्हणाव्यात अशा त्या चिजा.. या सततच्या जाण्या-येण्यामुळे आपल्या जगण्याची मुळंच कशी ढिली होत आहेत. वस्तूवर-वास्तूवर- इथल्या जगण्यावरचीच पकड कशी सैल झाल्यासारखी होते; हे कारण- हेच कारण असतं. मग अचानक मुठीतून करंगळी उभी करून निघावं तसं माझ्या मनाचं होऊन जातं. कमालीची नाराजी, रुसवा..
मन खोदत राहतं. लक्षात येतं की, आपलं घर सोडून निघताना मनाची सदैव होणारी ती चलबिचल. ऑडिटची दौऱ्याची नोकरी केली; मला वाटतं तेव्हापासूनची माझी ती सवय असावी. नऊ-दहाची बस असायची. तयारी होत असतानाच माझी पोरं शाळेला निघालेली असायची. ती मला टाटा करायची. मी त्यांना निरोप द्यायचो, पण माझा तो तसा निरोप.. मीच अध्र्या तासानंतर तिथून निघून जाणारा.. कसं अधांतरी वाटायचं. शिवाय, बायकोला, मुलांना सोडून चालल्याची भावना भलतीच अपराधी करून टाकायची.
तीच सवय अंगात भिनली. कुठेही निघताना उल्हास कमी, उदासी जादा.. कारणमीमांसा करणारं एक मन तरीही ‘रे ऽऽ’ म्हणत सावरत असतं, समजावीत असतं. स्वप्नांचे हवाले देत राहतं, स्वप्नात ही पोरं आलेली असतात. त्यांच्या वागण्या- बोलण्या- खेळण्याने जाग आलेली असते. अवचित रात्री उठून बसलेलो असतो आपण, आपल्या शरीराचे ते दूरवरचे हिस्से जवळ घेऊन गोंजारावे वाटत असतात. मग निघताना का बरं उदास होतो मी.. तिकडून इकडे निघताना घाई असते, पण तरीही पोरं झोपल्यावरच किंवा बालवाडीत गेल्यावरच परस्पर निघून जावं वाटतं. तशीच वेळ साधून निघत असतो- नातू रडेल, आपल्या जवळून निघणार नाही, या भावनेने नाही, तर त्याला सोडून निघताना माझीच काळजी मला वाटत असते- डोळ्यांत पाणी कसं आडमुठासारखं दाटून आलेलं असतं म्हणून. एकदा असंच तिथून निघाल्यावर प्रवासात असताना मोबाइल करून सुनेला विचारलं होतं, ‘रडतो का गं तो आजोबा-आजी कुठे गेले म्हणून?’ तर कळलं, की नाही, नाही. तो गेला खेळायला. तनयचाही अनुभव तसाच- मग पुन्हा कधीच अशी चौकशी केली नाही. आपल्याला विसरून आपला नातू खेळायला लागला ही बाब किती चांगली आहे, हे समजावीत असतानाच दुसरं मन खट्टू झालेलं असतं.. एकदा तिथून निघताना सूनबाई पाया पडत असतानाच अर्णव विचारीत होता, ‘तू कुठे चाल्ला आजोबा?’ श्रीनिवास खळे यांची गाणी अवचितपणे कधी उसळी घेत असतात मनात- ‘काल पाहिले मी स्वप्न गडे, नयनी मोहरली गं आशा..’ आणि त्या गाण्याच्या सोबतीला लागलीच आणखी ते गाणं कसं कोण जाणे चिकटलेलंच आहे- ‘रुसला मजवरती कान्हा, रुसला मजवरती..’
शाळेत असताना ‘कुमार’ मासिकातली वाचलेली ती गोष्ट कायम मुक्कामाला बसून तर आहेच, पण तसं बसून त्या गोष्टीने माझी प्रकृतीही घडविली आहे : एका माणसाच्या दोन मुली एकाच गावात दिलेल्या असतात. एक शेतकऱ्याला तर एक कुंभाराला. एके दिवशी हा लेकींना भेटायला जातो. आभाळ आलेलं असतं. कुंभाराकडची लेक अंगणात कच्ची मडकी मांडून मोठय़ा काळजीने आभाळाकडे पाहात बसलेली असते. ‘बघा नं बाबा, मडकी सगळी कच्ची आहेत अन् हे आभाळ येऊन बसलं!’ असं ती म्हणते आणि हा तिला समजावतो, ‘काळजी नको करू, पाऊस येणार नाही.’ आणि दुसऱ्या मुलीला भेटायला जातो. गुडघ्याएवढय़ा पिकात बसलेली तीही आभाळाकडे टक लावून बसलेली असते. ‘बघा नं बाबा, नुसतंच आभाळ येतंय, माझी पिकं पाहा कशी वाळून चाललीत..’ हा सांगतो, ‘येईल पोरी पानी येईल..’ आणि तिथून निघतो.. माझ्या प्रकृतीतच झिरपून राहिलेली ही गोष्ट.
सामानाची बांधाबांध होत असते. शरीराची लगबग सुरू असते अन् रेंगाळलेल्या रुसलेल्या मनाला मी उठवीत असतो, सोबतीला घेताना ‘रेऽऽ’ म्हणत असतो, रिझव्र्हेशन आहे, ‘एसी’ने जायचं आहे, अशी लालूच दाखवीत राहत असतो.. चल रे..  कधी कारणांशी झोंबत राहतो- इकडे अर्णवशी खेळताना अन् तिकडे तनयशी खेळताना देहभान विसरतं, हरवून जातं.. आणि ते तसं हरवून गेलेलं देहभान तसंच- तिथंच ठेवून मग निघून यावं वाटतं घराकडे. कारण तर सांगता येण्यासारखं नसतं, समजलेलं मात्र असतं. चांगलं खेळताना, वागताना- बोलताना मध्येच कंटाळलेलं, थकलेलं मन करंगळी वर धरतं, गेटकडे धावतं. इकडचे वेध लागतात. नातवांना भेटायला जायचं या विचारानेच उत्साह सळसळत असतो अंगात. मग नेमकं काय बिघडतं.. आपल्या मांडीवर खेळणारा, कडेवर राहणारा आपला नातू खाली उतरून आपल्या कक्षेबाहेर निघून जातो खेळायला, तेव्हा रुसवा तयार व्हायला सुरुवात होत असते. म्हणूनच का ही परतायची घाई.. नाही म्हणवत तर नाही, शिवाय तेवढंच एकमात्र कारण असतं असंही नाही. एक नक्की निघावं वाटतं..
ही नातवंडं जेव्हा माझ्या घरी -मी बांधलेल्या माझ्या घरी- येतात, तेव्हा ती माझ्याशी खेळत नसतात; मीच खेळत असतो त्यांच्याशी, पण चार दिवसांतच ती भुर्रकन उडून जाणारी असतात इथून. मी कसं त्यांना अडविणार, थांबविणार.. या नातवंडांना रजा कुठे असते तेवढी- माझं मन भरण्याएवढी. मग मी मनाची समजूत काढत असतो. शब्दांशी खेळत बसतो.. रजा म्हणजे निरोपसुद्धा आणि रजा म्हणजे सवडसुद्धा..
खरं कारण हेच तर आहे माझ्या रुसव्याचं. इथं माझं घर सोडून मला तिकडे राहवत नसतं, दहा-बारा दिवसांतच मोबाइलची चार्जिग उतरावी, तसा उत्साह ओसरतो माझा; आणि त्याहीपेक्षा खरा मुद्दा असा की, इथून माझ्या घरी चार दिवस राहून जेव्हा नातवंडं परत जायला निघतात, तेव्हा निघताना त्यांना ‘रेऽऽ’ म्हणून मला थांबविता येत नसतं. ती थांबणारी नसतात.
रुसून जाणाऱ्या आनंदची समजूत घालून तनय त्याला परत बोलावतो, खेळण्यात पुन्हा रंगून जातो. माझ्या घरातून निघताना मात्र तनय असो वा अर्णव- ती आनंदाने टाटा करून निघालेली असतात, रुसून बसलेला असतो मीच.. मीच रुसणार, मीच त्यांच्या मागे धावणार. अशा रुसव्याची कारणं सांगता येत नसतात. बळेच गोळा केलेली कारणं बोबडी झालेली असतात.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो