पसाय-धन : विश्वात्मक देवाची सेवा..
मुखपृष्ठ >> पसायधन >> पसाय-धन : विश्वात्मक देवाची सेवा..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पसाय-धन : विश्वात्मक देवाची सेवा.. Bookmark and Share Print E-mail

अभय टिळक ,शुक्रवार, १६ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altज्ञानेश्वरीतील पहिल्याच ओवीत मराठी संतविचाराला लाभलेली विशाल तात्त्विक चौकट साररूपाने सामावलेली आहे. समाजामध्ये राहणे, त्याच्या भल्यासाठी काया झिजवणे, लोक व समाज नीतीच्या मार्गाने चालावेत यासाठी जगाचे बोल सहन करणे, ही सारी संतांच्या लेखी विश्वात्मक देवाच्या सेवेची आचारसंहिताच जणू! भक्त आणि संत या दोन भूमिकाही मग एकरूप होतात.. वाचलेली जरी नसली, तरी ऐकून का होईना ‘ज्ञानेश्वरी’ बहुतेकांना ठाऊक असते. आता, संपूर्ण ज्ञानेश्वरी जरी वाचलेली नसेल तरी, गेला बाजार, ज्ञानेश्वरीतील पहिली ओवी तरी परिचयाची असतेच. ‘ॐ नमो जी आद्या..’ एवढे जरी कोणी उच्चारले तरी ‘जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा’ पर्यंत गाडी विनासायास जाऊन पोहोचते. एकंदरच आपल्या मनावर पठण - पारायण यांसारख्या उपक्रमांचे गारूड भक्कम असल्याने निवडक ओव्या-अभंग चट्दिशी पाठही होऊन जातात. ज्ञानेश्वरीतील पहिली ओवी त्याच गटातील आहे. पाठांतरावर भर असला की बहुतेकदा त्या ओवी अथवा अभंगातील अर्थगाभ्याकडे आपली पाठच वळते. अर्थाकडे आपले लक्षच जात नाही. शब्द नीट कळलेच नाहीत तर त्यांचा गाभा उकलत नाही. गाभ्याला भिडणे झाले नाही तर अर्थ अंत:करणाला लगडत नाही. आणि अर्थाचा ठसा मनावर उमटलेला नसेल तर पारायणाची परिपूर्ती आचरणात होत नाही. पारायण आणि आचरण यांत फट असेल तर तिथे दंभाचारांचे बीजारोपण होते.
ज्ञानेश्वरीतील पहिलीच ओवी या अर्थाने विलक्षण अर्थगर्भ ठरते. मराठी संतविचाराला लाभलेली विशाल तात्त्विक चौकट त्या ओवीत सामावलेली आहे. संत आणि जग यांच्या परस्पर नातेसंबंधांतील चढ - उतार आणि त्या बहुमिती नात्याची सारी परिमाणे या चौकटीचे सम्यक् आकलन झाले की आपल्याला आकळतात. ‘याजसाठी वनांतरा। जातो सांडूनिया घरा,’ असे एके ठिकाणी म्हणणारे तुकोबा दुसऱ्या ठिकाणी ‘बुडती हे जन देखवें ना डोळा,’ असे का म्हणतात? ‘निर्वाहापुरते अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोपी गुहा,’ असे पराकोटीचे वैराग्य एका पातळीवर धारण करणारे तुकोबा, ‘अवघे जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे’ इतके लोकसन्मुख कसे बनतात? ‘भक्त’ असणारे तुकोबा आणि ‘संत’ पदास पावलेले तुकोबा या दोहोंत द्वैत आहे का?
ज्ञानेश्वरीतील पहिल्याच ओवीचा आशय हस्तगत झाला, तर या व अशा अनेक प्रश्नांचा परिहार विनासायास होतो. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी जयजयकारपूर्वक नमन केलेले आहे ते शब्दब्रह्मरूप गणेशाला. हा आत्मरुप गणेश विश्वाचे आदिकारण. त्यामुळेच, ‘ॐ नमो जी आद्या,’ असे ज्ञानदेव त्या आत्मरूपाचे स्तवन करतात. इथून पुढे मोठी गंमत आहे. विश्वाचे आदिकारण असणाऱ्या आत्मरुप गणेशाला ज्ञानदेवांनी दोन विशेषणे बहाल केलेली आहेत. ‘वेदप्रतिपाद्या’ आणि ‘स्वसंवेद्या’ ही ती दोन विशेषणे. विश्वाचे आदिकारण असणाऱ्या आत्मतत्त्वाची ही दोन; वास्तविक पाहता स्वरुपलक्षणे होत. या दोन्ही संज्ञांमध्ये ज्ञानदेवांच्या चिद्विलासाचे तत्त्वज्ञान काठोकाठ भरलेले आहे. त्या तत्त्वज्ञानाच्या चौकटीतच ‘भक्त’ आणि ‘संत’ या दोन संकल्पना आणि त्यांचे परस्परांशी असलेले नाते आपण समजावून घेतले तर आपली दिशाभूल होत नाही.
ओवीमध्ये ज्ञानदेवांनी त्या आत्मरुप चैतन्याला पहिले विशेषण बहाल केलेले आहे- वेदप्रतिपाद्या. वेदाने ज्याचे प्रतिपादन (म्हणजेच विवरण वा वर्णन) केलेले आहे, असे त्या चैतन्याचे स्वरुप म्हणजे - वेदप्रतिपाद्य. ‘वेद’ याचा अर्थ वाङ्मय. म्हणजेच पर्यायाने भाषा अथवा शब्दसमूह. ते परमात्मतत्त्व शब्दाच्या माध्यमातून मांडण्याजोगे आहे, असे ज्ञानदेव ‘वेदप्रतिपाद्या’ या विशेषणाने सुचवितात. दोन व्यक्ती अथवा पदार्थ विद्यमान असतील तरच शब्दव्यवहाराचे प्रयोजन उरते. म्हणजेच, ‘वेदप्रतिपाद्या’ या विशेषणाद्वारे ज्ञानदेव परमात्मतत्त्व आणि इंद्रियगोचर विश्व यांचे सहअस्तित्व अधोरेखित करतात. हेच परमात्मतत्त्व, ज्ञानदेवांनीच वर्णन केल्यानुसार ‘स्वसंवेद्य’ही आहे! ‘स्व-संवेद्य’ याचा अर्थ ‘स्वत:च स्वत:ला जाणणारा’. या विशेषणाद्वारे ज्ञानदेव त्या परमात्मतत्त्वाचे एकाकीपण, एकमेवत्व सूचित करतात. जगाचे आदिकारण असणारे परतत्त्व एकाच वेळी ‘वेदप्रतिपाद्य’ आहे आणि ‘स्व-संवेद्य’ सुद्धा आहे, हे मंगलाचरणाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेव स्पष्ट करतात.
चिद्विलासाचा गाभा हाच तर आहे. ‘वेदप्रतिपाद्य’ असणारे आदितत्त्व अनंतरुपधारी आहे. तेच विश्वरुपाने नटलेले आहे. परतत्त्वाच्या अशा जगरुपाला पारिभाषिक संज्ञा आहे ‘विश्वात्मक’. ज्ञानदेवांनी पसायदान मागितलेले आहे ते ‘अनंतरुपे आणि अनंत वेषें’ नटलेल्या विश्वाकार, विश्वात्मक परमात्मरुपाकडे. ‘विश्वात्मक’ देव म्हणजेच ‘वेदप्रतिपाद्य’ देव. तर, त्याच परतत्त्वाचे शब्दामध्ये पकडता न येणारे तरल, सूक्ष्म, अन्य कोणत्याही बाह्य़ साधनाद्वारे जाणता न येणारे; म्हणूनच स्वत:च स्वत:ला जाणण्यास समर्थ असणारे दुसरे रुप म्हणजे ‘स्वसंवेद्य’. या अशा स्वसंवेद्य देवालाच चिद्विलासाच्या परिभाषेत म्हणतात- विश्वोत्तीर्ण देव. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेव परतत्त्वाच्या विश्वात्मक (वेदप्रतिपाद्य) आणि विश्वोत्तीर्ण (स्वसंवेद्य) अशा दोन्ही रूपांना नमन करतात.
एकच तत्त्व एकाच वेळी ‘विश्वात्मक’ आणि ‘विश्वोत्तीर्ण’ अशा दोन्ही रुपांत विराजमान असते याचे भान जागणे म्हणजेच चिद्विलासाचा गाभा हस्तगत होणे. ‘विश्वात्मक’ आणि ‘विश्वोत्तीर्ण’ या दोन्ही संकल्पना नीट समजल्या, तर ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ अशी आपण केलेली विभागणी किती लटकी आहे, याची प्रचिती येईल. ‘संसार’ आणि ‘संन्यास’ यांत आपण मानत असलेले द्वैत आणि संसाराच्या सापेक्ष संन्यासाचे मानले जाणारे श्रेष्ठत्व अप्रस्तुत ठरेल. आपल्यासकट संपूर्ण जग हे त्याच विश्वात्मक देवाचे दर्शन आहे, याची जाणीव आपल्याला असते का? प्रपंचात राहणे याचा अर्थ विश्वात्मक देवाच्या सान्निध्यात राहणे; तर डोळे बंद करून त्याच हृदयस्थ परमात्मतत्त्वाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्याच तत्त्वाच्या विश्वोत्तीर्ण रुपाची आराधना करणे. कोणत्याही रुपात केली तरी उपासना एकाच तत्त्वाची!
हे एकदा का कळले, तर ‘भक्त’ आणि ‘संत’ ही एकाच अस्तित्वाची दोन परिमाणे आहेत, हे स्पष्ट व्हायला अडचण पडू नये. आमचे तुकोबा ‘भक्त’ही आहेत आणि ‘संत’ही आहेत, ते याच अर्थाने. किंबहुना, प्रत्येकच संताच्या जीवनात ही दोन्ही परिमाणे आपल्याला दिसतात. ‘विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज’, असे म्हणताना तुकोबांमधला भक्त रममाण झालेला असतो विश्वोत्तीर्णाच्या आराधनेत. तर, ‘आमुचा स्वदेश । भुवनत्रयामाजी वास’, असे म्हणणारे तुकोबा लोकरत, समाजसन्मुख ‘संत’पुरुषाचा आदर्श आपल्या पुढय़ात ठेवत असतात. ज्या प्रमाणे ते परमात्मतत्त्व एकाच वेळी विश्वात्मक आणि विश्वोत्तीर्ण अशा दोन्ही रुपांनी नांदत असते, त्याचप्रमाणे विवेकी व्यक्ती ‘भक्त’ आणि ‘संत’ अशा उभय अवस्थांमध्ये विद्यमान असते. भक्त हा पूर्ण निरुपाधिक असतो तर संतांना जगव्यवहाराच्या उपाधीतच विश्वात्मक देवाचे दर्शन घडत असते. जगाचा संपर्क भक्ताला सोसवत नाही, तर जगाला वगळून संतांचा विचारच करता येत नाही.
‘भक्त’ आणि ‘संत’ या दोन भूमिका परस्परांना छेद देणाऱ्या नाहीत, त्या अशा. परतत्त्वाच्या केवळ स्वसंवेद्यच असणाऱ्या विश्वोत्तीर्ण रूपाची आराधना करण्यासाठी तुकोबा ‘चित्ताचे आसन। तुका करितो कीर्तन’, या पर्यायाचा अवलंब करतात. तर, ‘एकंदर शिका । पाठविले इहलोका,’ असा पुकारा करीत तेच तुकोबा लोकशिक्षकाची भूमिका धारण करून त्याच परतत्त्वाच्या विश्वात्मक रूपाच्या सेवेमध्ये प्रवर्तित होतात. समाजामध्ये राहणे, त्याच्या भल्यासाठी काया झिजवणे, लोक व समाज नीतीच्या मार्गाने चालावेत यासाठी जगाचे बोल सहन करणे, ही सारी संतांच्या लेखी विश्वात्मक देवाच्या सेवेची आचारसंहिताच जणू! संतांच्या या अशा उभयरूपी उपासनेचे मर्म लोकमान्य टिळक - न्यायमूर्ती रानडय़ांनी अचूक हेरलेले होते. क्लिष्ट खटल्याचे निकालपत्र लिहिण्यासाठी स्वत:ला खोलीमध्ये कोंडून घेणे, ही न्यायमूर्ती रानडय़ांसाठी विश्वोत्तीर्णाची उपासना असे. तर, वसंत व्याख्यानमाला, वक्तृत्त्वोत्तेजक सभा यांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात पुढाकार घेणे, हे  त्याच न्यायमूर्तीच्या दृष्टीने विश्वात्मक देवाच्या सेवेचे माध्यम होते. आपल्याला मात्र आज या कशाचाच पत्ता नाही, कारण आपल्या सारा भर एकवटलेला आहे तो संतवचनांच्या निव्वळ पारायणावरच!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो