निमित्त मात्रेण : अशी ही चरित्रे
मुखपृष्ठ >> निमित्त मात्रेण >> निमित्त मात्रेण : अशी ही चरित्रे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

निमित्त मात्रेण : अशी ही चरित्रे Bookmark and Share Print E-mail

वीणा गवाणकर - शनिवार, १७ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआपल्या महाराष्ट्रातच मुंबईप्रमाणे चार-पाचशे वर्षांचा इतिहास असणारी कितीतरी शहरं आहेत. पुणे- नागपूर- औरंगाबाद- चंद्रपूर- ठाणे- अहमदनगर.. कितीतरी. या नगरींनी कितीतरी शाह्य़ा, राजवटी अनुभवल्यात.. त्यांच्या चारपाचशे वर्षांच्या अनुभवातून त्यांची विशिष्ट मानसिकता, जीवनपद्धती घडलेली असू शकते.. अशा नगरींचा आढावा घेणारी चरित्रं लिहिली गेली, तर तिथलं लोकजीवन, लोकमानस समजून घेण्यासाठी त्यांची मदत होईल. तो एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल. गंगाधर गाडगीळांची मुंबई नगरीवरची कादंबरी ‘प्रारंभ’ ही प्रकाशित झाली २००२ साली. या कादंबरीचा प्रकाशनपूर्व परिचय करून देण्यासाठी माझी एक परिचित लेखिका लेख लिहीत होती. त्या प्रयत्नात ती ‘प्रारंभ’ची मुद्रितं घेऊन माझ्या घरी आली. मुद्रितं चाळल्यावर मी सहज तिला विचारलं, ‘‘एखाद्या नगरीची वा प्रदेशाची सर्वागीण जडणघडण सांगणाऱ्या कादंबऱ्या मराठीत तरी मी वाचलेल्या नाहीत. इंग्रजीतल्या तशा प्रकारच्या ‘टेक्सास’, ‘चिजपीक’ (दोन्ही जेम्स मिचनरच्या) मी वाचल्यात. ‘प्रारंभ’ वाचताना मी नकळत त्यांच्याशीच तुलना करीन. तू असं काही वाचलेलं आहेस का?’’ या माझ्या प्रश्नाला तिनं नकारार्थी उत्तर दिलं.
आता इतक्या वर्षांनंतर ‘प्रारंभ’ पुस्तकरूपात वाचताना मला तो प्रसंग आठवला आणि त्या कादंबऱ्याही. मात्र त्या दोन नावांत एडवर्ड रुदरफर्डच्या ‘रस्का’ आणि ‘सेरम’ या कादंबऱ्यांचीही भर पडलीय.
‘टेक्सास’ ही अमेरिकन लेखक जेम्स मिचनरची अत्यंत गाजलेली कादंबरी. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला नव्या प्रदेशाच्या शोधात मेक्सिकोतून टेक्सासकडे निघालेल्या आणि पुढे तिथेच वसाहत करणाऱ्या पाच वेगवेगळ्या कुटुंबांपासून पाच घराणी सुरू होतात- गार्झा, क्विंपर, कॉब, रस्क आणि मॅक्नॅब. त्या सुरुवातीच्या काळातलं ‘टेहास’ (टेक्सास) मधलं वातावरण- तिथल्या स्थानिक जमाती- आक्रमणं- संघर्ष- सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडी सांगत ती कहाणी पुढे सरकत राहाते. त्या पाच प्रमुख घराण्यांच्या पुढच्या पिढय़ांतून इतिहास घडत जाताना दिसतो. इ.स. १५३५ मध्ये सुरू झालेली टेक्सासची चरितकहाणी १९८५ पर्यंत- म्हणजे पुस्तकाच्या प्रकाशन वर्षांपर्यंत- येऊन थांबते. या प्रवासात विविध जातकुळीचे मानव समूह वाचकाला भेटतात. काऊ बॉईज, गुरांचे प्रचंड कळपराखून असणारे कॅट्ल बॅरन, तेलसम्राट वगैरे मंडळीही अपरिहार्यपणे भेटतातच.
पण ही सर्व कहाणी निरुपणाच्या वा निवेदनाच्या अंगानं सांगितली जात नाही. असंख्य altपात्रं, तितक्याच घटना, संघर्ष, लढाया, डावपेच यातून घडत जाताना दिसते. सत्य आणि कल्पिताच्या रोचक गुंफणीतून ती सादर होते. वाचकाची दमछाक करणारी ही कादंबरी. एखाद्या भूप्रदेशाची साडेचारशे वर्षांत झालेली घडण, तिथली स्थित्यंतरं, तिथं तयार होत गेलेली मानसिकता यांचा अनुभव दीड हजार पानांतून देणारी. सलग ३० महिने अभ्यास करून आपण ही कादंबरी लिहिली असं लेखक प्रस्तावनेत म्हणतो. प्रचंड आवाक्याची आणि तितक्याच तपशिलांची कादंबरीरूपात मांडणी करण्यासाठी कठोर मेहनतीला पर्याय नाहीच.
याच जेम्स मिचरनचा शिष्य शोभावा असा ब्रिटिश लेखक एडवर्ड रुदरफर्ड. इंग्लंडची घडण सांगणारी त्याची ‘सेरम’ (Sarum) आणि रशियाचं आरपार दर्शन घडवणारी ‘रस्का’ (Russka) या दोन्ही कादंबऱ्या अशीच अनुभूती देणाऱ्या.
‘रस्का’ची कहाणी सुरू होते इ. स. १८० मध्ये. रस्का नावाच्या एका खेडय़ात स्लाववर झालेल्या पहिल्या तार्तार आक्रमणापासून घडामोडी सुरू होतात. पाच प्रमुख घराण्यांच्या- बॉब्रोव्ह, रोमानोव्ह वगैरे- पुढच्या अनेक पिढय़ांच्या जीवन संघर्षांतून कहाणी पुढे सरकत जाते. त्या क्रमात वाचकाला इव्हान दे टेरीबल, पीटर द ग्रेट, कॅथरीन द ग्रेट.. सोश्यालिस्टस्, बोल्शेव्हिक्स, मार्क्‍ससिस्टस्.. टॉलस्टॉय, पुष्किन वगैरे सगळे भेटतात. रस्कातून रशिया कसा घडत गेला त्याची १८०० वर्षांची कहाणी समजते.
एखाद्या भूभागावर मानवी वसाहत कशी स्थिरावत, घडत, विकसितहोत जाते, तिथल्या लोकांची मानसिकता एका विशिष्ट प्रकारची का होत जाते हे समजून घेण्यासाठी अशा कादंबऱ्या काही अंशी मदत करतात.
अलीकडे मुंबईवर अशा काही कादंबऱ्या इंग्रजीत प्रकाशित झाल्यात. उदाहरणार्थ सुकेतू मेहतांची ‘मॅक्झिमम सिटी, बॉम्बे लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड’, ‘शांताराम’ या कादंबऱ्यांत समकालीन मुंबईतलं जीवन दिसतं. थोडेफार राजकीय-सामाजिक-आर्थिक ताणेबाणे दाखवले जातात. एका विशिष्ट सामाजिक स्तरातच त्या घुटमळतात. ‘शांताराम’मध्ये मुंबईतल्या गुन्हेगारी जगाचं केवळ वर्णनच केलेलं नाही, पण उत्तम भाषाशैलीत ‘रोमँटिक’- पद्धतीनं गौरवीकरणही केलंय. मुंबई जीवनाच्या पाश्र्वभूमीवर या आत्मचरित्रात्मक कहाण्या सांगितल्या जातात. मात्र त्यातून मुंबईची घडण समजत नाही आणि तसा हेतूही त्या कादंबऱ्यांवर लादता येत नाही. ‘प्रारंभ’चा हेतू तसा असूनही तो तसा साध्य झालेला नाही, असंच ती वाचताना जाणवलं. गोविंदराव माडगांवकर यांचं ‘मुंबई वर्णन’ आणि जगन्नाथ शंकरशेट यांचं चरित्र यांचाच आधार मुख्यत्वेकरून घेऊन लिहिलेली ही कादंबरी बहुतांशी निवेदनपरच आहे. ‘मुंबई वर्णन’ची वाचनीयताही ‘प्रारंभ’ला नाही.
पुरुषोत्तम धाक्रस यांचे ‘ऐक मुंबई तुझी कहाणी’ (डॉक्टर मोहन डेव्हिड यांच्या ‘मुंबई द सिटी ऑफ ड्रीम्स’ या पुस्तकाचा अनुवाद) पुस्तक तर खूप वाचनीय. अगदी अश्मयुगीन मानव मुंबईचा पहिला रहिवासी होता याचे दाखले देत लेखक या शहराचा १९४७ पर्यंतचा इतिहास सांगतो. धाक्रसांच्या मराठी अनुवादाला जयवंत दळवींची प्रस्तावना आहे. ते लिहितात- ‘‘ही एक बहारदार कादंबरी आहे.. एखाद्या शहराला काळाच्या विविध अवस्थेत विविध रूपे प्राप्त होतात. त्यातून त्या शहराला एक व्यक्तिमत्त्व लाभत जाते. एक अख्खे शहर एखाद्या चालत्या-बोलत्या व्यक्तीसारखे दिसू लागते.. मुंबई शहराची ही एक बहारदार चरित्रात्मक कादंबरी आहे.’’
डेव्हिड यांच्या ग्रंथ निर्मितीमागे त्यांच्या ३० वर्षांच्या संशोधनाची तपस्या आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. त्यांनी मनोगतात म्हटलंय ‘‘हा केवळ इतिहास नाही, ही मुंबईची कथा आहे.’’.. असो.
प्रारंभ, रस्का, टेक्सासच्या निमित्तानं सांगावंसं वाटतं ते हेच- आपल्या महाराष्ट्रातच मुंबईप्रमाणे चार-पाचशे वर्षांचा इतिहास असणारी कितीतरी शहरं आहेत. पुणे- नागपूर- औरंगाबाद- चंद्रपूर- ठाणे- अहमदनगर.. कितीतरी. या नगरींनी कितीतरी शाह्य़ा, राजवटी अनुभवल्यात.. आक्रमणं, स्थित्यंतरं, लोकचळवळी वगैरेंच्या त्या साक्षी आहेत. त्यांच्या चारपाचशे वर्षांच्या अनुभवातून त्यांची काही विशिष्ट मानसिकता, जीवनपद्धती घडलेली असू शकते.. अशा नगरींचा र्सवकष आढावा घेणारी चरित्रं लिहिली गेली, तर तिथलं लोकजीवन, लोकमानस समजून घेण्यासाठी त्यांची मदत होईल. तो एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल. मात्र ते चरित्र समर्थपणे, साकल्यानं आणि साक्षेपानं मांडता यायला हवं. वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या कल्पिताचा आधार घेऊन त्यात रंजकताही यायला हवी.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो