स्त्री समर्थ : पैशांचं झाड
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : पैशांचं झाड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : पैशांचं झाड Bookmark and Share Print E-mail

मेघा वैद्य - शनिवार, १७ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altनावही कधी माहीत नसलेलं ते ग्लॅडिओलसचं फूल, पण या फुलशेतीनं किमया केली. मेहनतीच्या जोरावर नाशिकच्या महिलांनी आपल्या आयुष्यात फुलबाग फुलविली.
अनेकदा शेअर मार्केटमध्ये पैसे झटपट वाढविण्यासाठी गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात जोखीम उचलतो. वेगवेगळ्या टिप्स वापरतो. आर्थिक सल्लागारांना मत विचारतो. सरतेशेवटी कमी वेळात जास्त पैसे मिळविण्याच्या नादात टेन्शन अर्थात मानसिक तणाव विकत घेतो. रात्रीची झोप उडवून बसतो. मात्र महिला बचत गटाने कमी वेळेत जास्त पैसे मिळविण्याचा राजमार्ग शोधून काढला आहे. ‘ग्लॅडिओलस’ची फुलशेती करून अवघ्या अडीच महिन्यांत या आदिवासी महिलांनी लाखो रुपयांची उलाढाल करायला सुरुवात केलीय.
साधारणपणे दीड वर्षांपूर्वी महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात ‘माविम’नं नाशिक जिल्ह्य़ातल्या महिला बचत गटांसाठी ग्लॅडिओलस फुलशेतीचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा समन्वयक अधिकारी या नात्याने प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी ज्योती निभोरकर यांच्याकडे आली. या फुलाची कुठलीच माहिती नसल्यामुळे माहिती एकत्र करण्यापासून कामाला सुरुवात झाली. इंटरनेटच्या माध्यमातून त्यांनी या फुलांविषयीची सर्व माहिती मिळविली. जगात ग्लॅडिओलस फुलाच्या वेगवेगळ्या सुमारे २५ हजार जाती आहेत. महाराष्ट्रात चार जाती असल्याचं समजलं. राज्यात ही फुलं लाल, पिवळी, जांभळी आणि पांढऱ्या रंगांमध्ये येतात. यातल्या पांढऱ्या रंगाच्या फुलाला सर्वाधिक मागणी असल्याचं बाजार सव्‍‌र्हेक्षणानंतर समजलं. फुलाची प्राथमिक माहिती मिळविल्यावर या फुलशेतीसाठी महिला बचत गटाला तयार करण्याचं मोठं आव्हान होतं.
नाशिकपासून २० किलोमीटर अंतरावर असलेलं जानोरी गाव फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे. या गावात गुलाब आणि झेंडूची शेती केली जाते. या शेतीत गावातल्या आदिवासी महिला काम करतात. त्यामुळे त्यांना फुलशेतीची पूर्ण माहिती आहे. म्हणूनच ग्लॅडिओलस फुलशेतीच्या नावीन्यपूर्ण शेतीसाठी जानोरीतल्या बचत गटाची निवड करायची असं ठरविण्यात आलं. या गावात एकूण १२ बचत गट काम करतात. त्यापैकी सहा गट टोमॅटो,  भुईमूग, कोथिंबीर आदींचं पीक घेऊन वर्षांला दीड लाख रुपयांपर्यंत उत्पादन घेतात. मात्र गटातल्या कुठल्याच महिलेकडे स्वत:ची हक्काची जागा नाही. या  सर्व महिला भूमिहीन आहेत. शेतीकामाचा मोठा अनुभव गाठीशी आहे. त्यामुळे बडय़ा शेतकऱ्यांकडून भाडय़ाने शेती घेऊन त्या शेती करतात. ही शेती करताना जागा स्वत:ची नसल्यामुळे फुलशेती काही करता येत नाही. अशा सगळ्या तडजोडीच्या वातावरणात या बचत गटाच्या महिला जिद्दीने काम करतात.
अशा परिस्थितीत ग्लॅडिओलसच्या फुलशेतीसाठी जागा, पैसा आणि सोबतीला महिलांची प्रयोगशीलतेसाठीची मानसिकता तयार करावी लागणार होती. मग याबाबत चर्चा करण्यासाठी गटाने शेती करणाऱ्या महिलांची बैठक बोलाविण्यात आली. बैठकीत ग्लॅडिओलस  फुलशेतीची माहिती देण्यात आली. मोठय़ा चर्चेनंतर प्रगती महिला बचत गटाने ही फुलशेती करण्यासाठी तयारी दर्शविली. ग्लॅडिओलस फुलशेतीतून कमी वेळात नफा मिळू शकतो, ही गोष्ट त्यांच्या पचनी पडत नव्हती. शेवटी त्यांना समजावून सांगण्यात यश आलं.
प्रगती बचत गटात ११ महिला आहेत. या गटाची स्थापना २००५ मध्ये झाली. गटात २८ ते ४५ वयोगटातल्या महिला आहेत. गटातल्या सर्व महिला भूमिहीन असल्याने जागेसाठीचा शोध सुरू झाला. या भागात शेतीचे भाडे प्रचंड महागडे आहे. याशिवाय मजुरांनी शेती केल्यावर आपल्याला परत शेती मिळणार नाही, असादेखील गैरसमज इथल्या बडय़ा शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे जागेसाठी मोठा संघर्ष करावा लागला. शेवटी सुनील तिळके यांनी अर्धा एकर जागा दिली. ही जागा चार हजार रुपये या किरकोळ दराने दोन वर्षांसाठी भाडय़ाने मिळाली. त्यानंतर गटाला ग्लॅडिओलस फुलशेतीसाठी प्रशिक्षण देण्यात आले. तीन दिवसांच्या या प्रशिक्षण वर्गात गटाला ग्लॅडिओलस फुलशेतीची तांत्रिक आणि शास्त्रीय माहिती देण्यात आली. कांदा आणि द्राक्षे संशोधन केंद्र, पिंपळगाव इथं हे प्रशिक्षण झालं. प्रशिक्षणानंतर ग्लॅडिओलस फुलाच्या लागवडीसाठी चांगला कंद मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाले. पुण्यातल्या प्रादेशिक संशोधन केंद्रात प्रति कंद पाच रुपये असा दर होता; तर साताऱ्याचा शेतकरी तीन रुपये दराने कंद द्यायला तयार होता. मग त्याच्याकडून ४० हजार कंद मागविण्यात आले.
दुसरीकडे आर्थिक समीकरण सोडविताना या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी ‘माविम’कडून सव्वा लाख रुपयांचा निधी उपलब्ध होता. अर्धा एकर जागेवर कंद लागवडीसाठी एक लाख ७९ हजार १२५ रुपये एवढा खर्च अपेक्षित होता. त्यामुळे महिलांनी ५४ हजार १२५ रुपयांचा निधी गटातून उभा केला. त्यानंतर सप्टेंबर २०११ च्या अखेरीस फुलशेतीच्या लागवडीसाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. १६ डिसेंबरला महिलांनी ग्लॅडिओलसचं पहिलं फूल आयुष्यात पाहिलं. मग फुलांची कापणी सुरू झाली. या कापणीचंही एक तंत्र असतं. फुलांची कापणी करताना खालच्या बाजूने फक्त चार पानं सोडून कापणी केली जाते. सोबतच फूल कळीच्या स्वरूपात असतानाच कापणी होते. जेणेकरून ग्राहकाच्या हातात फूल देताना ते उमललेल्या रूपात देता येतं. पॅकिंग करताना २५ काडय़ांचं एक बंडल बनवून ते पाठविलं जातं.
गटाला या फुलासाठी बाजारपेठ शोधणं सहज शक्य झालं. गावातल्या फुलशेतीमुळे बाजारपेठेशी संपर्क साधणं सोपं गेलं. मुंबई आणि दादरच्या फूल मंडईत अगदी थेट फुलं पोहोचविता आली. पहिल्यांदा गटाच्या या ग्लॅडिओलसच्या फुलांना प्रति फूलासाठी सात रुपये असा दर मिळाला. त्यानंतर बाजारपेठेच्या मागणीनुसार ७ ते १० रुपयांपर्यंत फुलांची विक्री झाली. या फुलशेतीमधून आतापर्यंत एक लाख ८५ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. शिवाय पहिल्या कापणीनंतर मिळालेले कंद वेगळे. त्यामुळे प्रगती बचत गटाला ग्लॅडिओलस फुलांच्या रूपात पैशांचं झाडच हाती लागलं आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
या फुलशेतीमुळे प्रगती बचत गटाच्या महिला आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झाल्या आहेत. त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय. ‘‘ताई, आता आमीबी पैशांचे निर्णय घेतो. लेकरासनी चांगले शिक्षण देतो,’’ असं त्या अभिमानानं सांगतात. अनेकदा कुटुंबावर आर्थिक संकट आलं तर बचत गटाची मोठी मदत होते, असं कमलाताई उमिया सांगतात. एकदा त्यांच्या मुलाचा अपघात झाला. त्यावेळी बचत गटामुळेच त्याचे प्राण वाचवू शकलो, असं त्या सांगतात. गटाच्या मदतीमुळेच त्यांना यंदा मुलाला डिप्लोमामध्ये अ‍ॅडमिशन करता आली, असं त्या प्रामाणिकपणे सांगतात. हातात पैसा आल्यामुळे आता नवरा आपल्याला मान देतो. सांगितलेलं ऐकतो, असं संगीता सरनाईक आवर्जून व अभिमानाने सांगतात.
ग्लॅडिओलसची फुलशेती फुलविताना ज्योतीताईंनीदेखील मोठी मेहनत घेतली. आठवडय़ातून दोन दिवस शेतीला भेट देणं, पाहणी करणं, महिलांना मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलं. जेव्हा बाजारपेठेत फुलांना चांगला भाव मिळाला तेव्हा कष्टाचं चीज झाल्याचं त्या सांगतात. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, मात्र आता पूर्ण आत्मविश्वास आलाय. त्यामुळेच आता निफाड तालुक्यातील शिंगवे, भुसे आणि नांदुरमध्यमेश्वर इथेही हा प्रकल्प राबविला जात असल्याचं त्या सांगतात.
थोडक्यात, महिला बचत गट म्हणजे पापड, लोणची, अगरबत्ती यांचे उत्पादन, अशी ओळख बनलेली दिसते. मात्र प्रगती बचत गटाने ग्लॅडिओलसची फुलशेती करून बचत गटसुद्धा वेगवेगळय़ा उद्योग-व्यवसायात प्रयोगशील असल्याचं दाखवून दिलं आहे. महिला बचत गटांनासुद्धा नावीन्याची ओढ आहे. कमीत कमी जोखीम उचलून जास्तीत जास्त नफा मिळविण्याचे कौशल्य आणि किमयासुद्धा आहे, असं स्पष्ट केलंय. बचत गटांची प्रतिमा बदलत असून मोठय़ा उद्योग-व्यवसायात त्यांचा प्रवेश होतोय, असंच दिसतंय.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो