स्त्री समर्थ : कुस्करलेल्या कळीचं उमलणं..
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : कुस्करलेल्या कळीचं उमलणं..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : कुस्करलेल्या कळीचं उमलणं.. Bookmark and Share Print E-mail

altप्रतिभा गोपुजकर, शनिवार, २४  मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एका दुर्लक्षित गावातली ती उमलणारी एक कळी. गावातल्या इतर मुलींबरोबरच प्रमिलाताईंच्या शाळेत आपलं व्यवहार ज्ञान वाढवणारी. एके दिवशी अनहोनी झाली. गावातच तिच्यावर बलात्कार झाला. ती करपून गेली. श्रीमंतांची ती पोरं पैसे चारून पळून गेली. पण, प्रमिलाताईंनी व गावाने तिला हिम्मत दिली. गावाच्या मदतीने तिने लढा दिला. त्या लढाईची ही कहाणी.. हिम्मतनगर हे एक छोटे, दुर्गम खेडे. डोंगरावर वसलेले, पायी चालत जायला अवघड. वाहनाशिवाय पर्याय नाही. गावातली कुटुंबे गरीब शेतकऱ्यांची, त्यांच्याकडे स्वत:ची वाहने नाहीतच. गावची वस्ती अठरापगड, त्यात गोंड, कोलाम, वंजारा आणि मुस्लीम सारे एकोप्याने राहतात. बाहेरच्या जगाशी ह्या लोकांचा संपर्क फारसा नाही. हे लोक खूप अंधश्रद्धाळूही आहेत.
या छोटय़ा गावातील एक मध्यमवयीन, प्रौढ महिला. प्राथमिक शिक्षणातच शाळा सोडलेल्या प्रमिलाताई. उमलत्या वयातील मुलींसाठी त्या ‘दीपशिखा’ प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण वर्ग घेतात, त्यांना त्यांच्या स्वत:विषयी, जीवनविषयक कौशल्यांबाबत, समाजजीवनाबद्दल बरेच काही समजावून सांगतात. प्रशिक्षण वर्गात त्या प्रेरिका म्हणून ओळखल्या जातात. गावात काम करताना गावातील माणसांविषयी कळकळ, प्रेम नसेल, कामाची आवड नसेल तर केवळ औपचारिक शिक्षण गावात उपयोगी पडत नाही. प्रमिलाताईंचे कमी शिक्षण त्यांच्या गावाच्या विकास कामात कधीच आड आले नाही. गावातल्या लहानथोरांशी त्या आपुलकीने बोलतात. नवऱ्याला शेतीत मदत करतात आणि तीन मुलांसह संसार सांभाळून प्रेरिकेचे कामही करतात. प्रमिलाताईंची जिद्द, त्यांचे बारीक निरीक्षण त्यांना त्यांच्या कामात खूप उपयोगी पडते.
प्रमिलाताईंनी स्वत: ‘दीपशिखा’प्रकल्पासंबंधी प्रशिक्षण घेतले आणि प्रशिक्षण संपवून परतल्यावर त्यांनी गावात ३० मुलींचा ‘दीपशिखा’ प्रशिक्षण वर्ग चालू केला. संध्याकाळी वर्ग घ्यायचे तर लांबवर राहणाऱ्या मुलींचे पालक मुलींना पाठवायला नाराज. प्रमिलाताईंनी स्वत:च्या घरी, सुटीच्या दिवशी, शनिवारी व रविवारी, जास्त वेळ वर्ग घेतले आणि सत्र पूर्ण केले. यानंतर पालकांचा विरोधही मावळला. ‘दीपशिखा’ प्रकल्पाच्या दुसऱ्या सत्राचे प्रशिक्षणही प्रमिलाताईंनी पूर्ण केले. त्यांनी आरोग्य सेविकांची मदत घेतली. गोड बोलणाऱ्या प्रमिलाताईंना मदत करायला कोणीही नाही म्हटले नाही. आरोग्य सेविका, मुली, सारेच त्यांच्या खूप जवळचे झाले होते. त्यांच्या वर्गातील किशोरींनी आपला बचत गटही चालू केला. पंधरा किशोरींचा हा बचत गट दर महिना ३० रुपयांची बचत करतो.
प्रमिलाताईंच्या किशोरी वर्गात एकूण २६ मुली. सगळ्याच साधारण पंधरा-सोळा वर्षांच्या. अवघी पंधरा वर्षांची, आठवीत शिकणारी मंदाही रोज प्रमिलाताईंच्या वर्गाना यायची. हसरी, खेळकर मुलगी. वर्गातल्या सगळ्यांशी तिची मत्री. वर्गात गोष्ट सांगायला, गाणी म्हणायला ही सगळ्यांच्या पुढे. प्रमिलाताईंचा तर ती उजवा हात. कोणतेही काम असो, मंदा त्यात असायचीच. याच मंदावर २२ ऑक्टोबर २०१० रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दुर्धर प्रसंग ओढवला. त्या दिवशी किशोरी वर्गातल्या सगळ्याजणींनी रात्री नऊ वाजता एकत्र जमायचे ठरविले होते. त्याआधी, संध्याकाळी सात वाजता, शौचाला जायचे म्हणून नेहमीप्रमाणे मंदा रस्त्याच्या कडेला, आडबाजूला जाऊन बसली. आज रस्त्यावर संध्याकाळी उशिराही वाहने जाताना दिसत होती. त्यांच्या दिव्यांचा उजेड चुकविण्यासाठी, झुडपांमागून मंदा थोडी लांब लांब जात राहिली. थोडी निश्चिंत झाली. ती उठली तेवढय़ात एक गाडी हॉर्न वाजवीत, प्रखर दिव्यांचा उजेड टाकत येताना दिसली. मंदा पुन्हा झुडपाआड गेली. पण गाडीच्या प्रखर दिव्यांनी तिचे तेथील अस्तित्व केव्हाच दाखवून दिले होते. गाडी निघून जाण्याची वाट पाहात ती थांबली. तेवढय़ात गाडीतून उतरलेल्या एका तरुणाने  तिच्या तोंडावर हात दाबून धरला. पाठोपाठ दुसरा मुलगाही गाडीतून उतरला होता. दोघांनी तिला तोंड दाबलेल्या स्थितीतच गाडीत टाकले आणि दूर शेताडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मंदा ओरडत होती, गयावया करत होती, पण ऐकायला कोणीच नव्हते. तिला त्याच अवस्थेत टाकून ती मुले गाडी घेऊन निघून गेली.
बराच वेळ झाल्यावर रडणे थांबवून थरथरणाऱ्या मंदाने आजूबाजूला पाहिले. दूर दिसणाऱ्या स्थिर दिव्यांनी तिला धीर दिला. ती धडपडत, ठेचकाळत त्या दिशेने चालत आली. हे गाव तिला ओळखता आले. समोर दिसलेल्या एका घरात ती गेली. अपरात्री दार उघडले ते घरच्या कर्त्यां पुरुषाने. एकटी मुलगी पाहून त्यांनी तिला घरात घेतले. मंदाने मान वरही केली नाही, पण दिसले तेवढय़ावरून तिला हे घर ओळखीचे वाटले, बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज तिला परिचित होता. हे पलीकडच्या गावच्या सरपंचांचे घर होते. पूर्वी कधीतरी काही कारणनिमित्ताने येथे आल्याचे तिला अंधुकसे स्मरले. तिने त्यांना तिला घरी सोडण्याची विनंती केली. सरपंचांनी अर्थातच चौकशी केली, एवढय़ा रात्री ती कोठे गेली होती, काय झाले, वगरे विचारणा केली. पण मंदा काहीच बोलेना. तिच्या अवतारावरून, तिच्या उलटय़ा घातलेल्या कपडय़ांवरून, काहीतरी विपरीत घडले आहे एवढे त्यांच्या लक्षात आले. हिम्मतनगरच्या सरपंचांकडे फोन करून त्यांनी मंदा आपल्याकडे आली असल्याचे सांगितले आणि गावातील दोन माणसांना बरोबर घेऊन ते हिम्मतनगरच्या सरपंचांकडे आले. मंदाच्या घरी ती सापडल्याचे कळविले. अजूनही मंदा काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतीच. तिची आई येऊन तिला घरी घेऊन गेली.
मंदाच्या घरी ती आणि तिची आई दोघीच राहात होत्या. वडील पूर्वीच देवाघरी गेले होते. या मायलेकी मिळेल तशी मजुरी करून कसेबसे जगत होत्या. रात्र पडली आणि आईच्या कुशीत विसावल्यावर मंदाने घडलेला प्रकार आईच्या कानावर घातला. पोरगी सापडली या आनंदात असलेल्या तिच्या आईला या प्रकाराने दुसरा धक्का बसला. आईच्या दृष्टीने आता प्रश्न मंदाच्या, त्यांच्या घराच्या अब्रूचा होता. आई कावरीबावरी झाली. शेवटी सकाळी तिने धीर करून ही कहाणी प्रमिलाताईंच्या कानावर घातली. प्रमिलाताईही भांबावल्या, प्रशिक्षणात समजावलेली ‘नीतूची गोष्ट’ त्यांना छान माहीत होती. लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची त्यांना जाण होती. डोळे बांधून दुसऱ्याच्या हातातील मेणबत्ती पेटवण्याचा, जागृती करण्याचा खेळ त्या वर्गात घेत होत्या. पण मंदावर झालेल्या अन्यायामुळे प्रमिलाताईंचे गुण कसोटीला लागले. त्यांनी नेटाने या मायलेकींना रीतसर पोलीस चौकीवर जाऊन तक्रार करायला लावली. पंचवीस तासांच्या आत पोलिसांकडे तक्रार केली गेली पाहिजे हे त्यांना माहीत होते. पोलिसांनी सुरुवातीला थोडी उडवाउडवीचीच उत्तरे दिली. तुम्ही जा, आम्ही पाहतो काय करायचे ते वगरे सांगितले. निग्रहाने प्रमिलाताईंनी पोलिसांकरवी डॉक्टरना बोलावून मंदाची वैद्यकीय तपासणी मात्र करून घेतली. दोन दिवस झाले तरी पोलिसांनी काहीही हालचाल केली नाही. नंतर कळले की ती मुले श्रीमंताघरची होती. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पसे भरून ती गावातून नाहीशी झाली होती.
ही हकिगत गावात पसरलीच हळूहळू . लोक उलटसुलट बोलू लागले. किशोरी वर्गातील मुली मात्र एकत्र आल्या. सुरुवातीला तर त्यांनी मिळून मंदाला अजिबात एकटे पडू दिले नाही. सावलीसारख्या त्या आळीपाळीने तिच्याबरोबर राहिल्या. सरभर झालेल्या मंदाला त्यांनीच रोज दोन वेळा गोळाभर अन्न घ्यायला लावले. झाल्या प्रकारात मंदाची काहीच चूक नाही, तिने तोंड लपवून बसण्याची बिलकूल गरज नाही हेही त्यांनी तिच्या मनावर िबबविले. प्रमिलाताईंबरोबर विचार करून त्यांनी निश्चय केला की, मंदावर अन्याय करणाऱ्या या मुलांना शिक्षा झालीच पाहिजे. गावातून पाटणकडे जाणाऱ्या एकुलत्या एक रस्त्यावर त्यांनी रास्ता रोको आंदोलन चालू केले. एकही वाहन त्या रस्त्याने जाऊ दिले नाही. मुलींचे हे धाडस पाहून गावातील मुलेही पुढे झाली. आपल्या गावातील मुलीवर झालेला अन्याय त्यांनाही सहन होत नव्हता. सुरेश, लहान्या, बबन्या, सगळे  या मुलींबरोबर आंदोलनात सामील झाले. हे आंदोलन आता साऱ्या गावानेच आपले मानले. तीन दिवस हे आंदोलन केल्यावर आजूबाजूच्या गावातील लोकांची खूपच अडचण होऊ लागली. मग ही बाब चंद्रपूपर्यंत गेली. चंद्रपूरच्या पोलीस स्टेशनवरून पोलीस चौकशीसाठी गावात आले. साऱ्या गावाने त्यांच्यासमोर जाबजबाब दिले. त्यांना सत्य परिस्थिती समजली. आम्ही निश्चितपणे कारवाई करू, असे त्यांनी आश्वासन दिल्यावर हे आंदोलन थांबले. नाक दाबल्यावर तोंड उघडले. या वेळी पोलिसांनी आपला शब्द पाळला. त्या गुंड प्रवृत्तीच्या श्रीमंत मुलांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला दाखल झाला.
आता वेळ अधिक कसोटीची होती. मंदाला धमक्या येऊ लागल्या. आता कोठे ती सावरू पाहात होती. पुन्हा एकदा मुलींनी आणि प्रमिलाताईंनी तिला उभारी दिली. त्यांच्या आधाराने मंदा उभी राहिली. मनाचा हिय्या करून तिने घडलेली सारी हकीकत न डगमगता कोर्टात सांगितली, प्रतिस्पर्धी वकिलांच्या वेडय़ावाकडय़ा प्रश्नांना शांतपणे उत्तरे दिली. रीतसर नोंदविलेली तक्रार, मंदाची शारीरिक तपासणी, बाजूच्या गावच्या व हिम्मतनगरच्या सरपंचांच्या साक्षी, गावातील सगळ्या मुलामुलींचाच नव्हे तर साऱ्या गावाचाच पािठबा या जोरावर मंदा जिंकली. त्या मुलांपकी मुख्य आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड झाला तर त्याच्या साथीदाराला सहा महिन्यांची शिक्षा झाली.
या किशोरींनी दाखविलेल्या धर्याला तोड नाही. मंदाचे तर कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या त्यांच्या कामामुळे त्यांच्या वर्गाच्या प्रतिनिधीला दिल्लीला जाऊन हे अनुभवकथन करण्याची विनंती करण्यात आली. आपल्यामधील एकीवर झालेला अन्याय हा आपल्यापकी कोणावरही होऊ शकतो हे सगळ्यांच्याच प्रकर्षांने लक्षात आले.
गाव आता सावरले आहे, मंदाही सावरायचा प्रयत्न करते आहे. तिची आई, प्रमिलाताई, तिच्या किशोरी वर्गातील मत्रिणी साऱ्याजणी मिळून अजूनही तिला सावलीसारखी सोबत करत आहेत. ही हसती-खेळती मुलगी आता अबोल झाली आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हसू मावळले आहे. पण तिच्या चेहऱ्यावर आता वेगळ्याच करारीपणाचे तेज आहे, वाकडी नजर करून तिच्याच काय पण गावातील कोणत्याही मुलीकडे बघायची आता कोणाचीही हिम्मत नाही. मंदाचे शिक्षणही सुरळीत चालू झाले आहे. शालान्त परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न तिच्या डोळ्यात उतरले आहे ..    

तुम्हीही कळवू शकता तुमच्या गावातील सामथ्र्यवान स्त्रीची वा स्त्रियांची माहिती. बचत गटाच्या माध्यमातून असो की वैयक्तिकदृष्टय़ा कर्तृत्व गाजवलेली स्त्री असो, आम्हाला कळवा. गावासाठी काही एकत्रित उपक्रम राबवले असतील तर आम्ही प्रसिद्धी देऊ तिच्या, त्यांच्या यशोगाथेला. आम्हाला कळवा- संपर्क - (०२२) २७६३९९३१ किंवा ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई ४००७१० किंवा This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो