स्त्री जातक : मूर्तिमंत व्यवस्थापन
मुखपृष्ठ >> स्त्री जातक >> स्त्री जातक : मूर्तिमंत व्यवस्थापन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री जातक : मूर्तिमंत व्यवस्थापन Bookmark and Share Print E-mail

डॉ. अनघा लवळेकर, शनिवार, २४  मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘बाई म्हणजे मूर्तिमंत व्यवस्थापन’ हे खरं असलं तरी फिरत्या रंगमंचावरच्या या कॉमन कलाकारानं ‘गुंतुनी गुंत्यात साऱ्या- पाय माझा मोकळा’ असं जादाचं भावनिक कौशल्यही व्हॅल्यू अ‍ॅडिशन म्हणून कमवायला हवं तर त्या व्यवस्थापनाची मजाही घेता येईल अन् सार्थ अभिमानही बाळगता येईल .. नमिताच्या डायरीतील एक पान :
आज किती दिवसांनी डायरी लिहायला बसता आलं. हौसेहौसेनं घेतलेली डायरी पण रोजच्या धबडग्यात तश्शीच कोपऱ्यात पडून राहिली. आज तरी काय वेगळं झालं म्हणा! पहाटे पाच वाजल्यापासून आपला फिरता रंगमंच सुरू झालाच आहे. सगळ्यांचं चहा-पाणी-न्याहारी करता करता एकीकडे क्षिप्राची युनिट टेस्ट प्रॅक्टिस तर दुसरीकडे आजी-आजोबांना औषधं देणं, एकीकडे फोनवरचे समरच्या मित्रांचे निरोप आणि आपली वेळेवर आवरून बस गाठायची धडपड.
बँकेत गेल्यावर सीन चेंज! लेजर्स, कॅशफ्लो, कस्टमर आणि टॅली या नेपथ्यावर आपला एकपात्री प्रयोग चालूच! मध्येच ब्रेक होताक्षणी मावस नणंदेच्या मुलीच्या बारशासाठी करायची फास्टट्रॅक खरेदी आणि कामावर परत रुजू होणं. मधून मधून कर्णपिशाच्चा (अर्थात मोबाइल) वरून घरच्या-दारच्या वेगवेगळ्या खबरा घेणं आणि प्रसारित करणं, ऑफिसमधून परतताना वाटेतल्या वस्तीमध्ये तिथल्या मुलांना थोडाच वेळ अभ्यासातल्या अडचणींवर उपाय सांगून, त्यांचं टेन्शन कमी करणं! घरी पोचताक्षणी एकमेव मेकअप रूम्समध्ये (बेसिनवर) उभं राहून ‘तोंडावर पाण्याचे हबके मारणं’ हा ‘पराकोटीचा मेकओव्हर’ करून रंगमंच क्रमांक एक वर पुन्हा यशस्वी भूमिकेत शिरून जिवापाड परफॉर्म करणं आणि ‘रात्री’च्या भूमिकेसाठीही मनाची तयारी करणं! हुश्श! आजचा दिवस संपला. (पार पडला, सुटला, उरकला, गेला एकदाचा इत्यादी इत्यादी..)
मला माहीत आहे की, ही डायरीसुद्धा बहुतेक मनातल्या मनात लिहिली असणार. एऽवढं सगळं लिहीपर्यंत ही ‘फिरती रंगमंचीय कलाकार’ जागी तर राहायला हवी, पण या प्रातिनिधिक उदाहरणावरून ‘बाईच्या व्यवस्थापकीय कौशल्यांचा’ साक्षात्कार कुणालाही होईल!
सत्तरच्या दशकातील एका चित्रपटात पती-पत्नीची एकमेकांच्या भूमिकेची झालेली अदलाबदल दाखवली आहे. त्यात शेवटी नवरा वैतागून म्हणतो, ‘बायकांना दहा हातांनी करायच्या गोष्टी एका हातानं करता येतात म्हणून पुरुषांनीपण तसंच करायचं की काय? या वैतागात त्याच्या नकळत एक तथ्य आहे. संशोधनातूनही सिद्ध होतंय. बायका कशाकशाचं व्यवस्थापन एकहाती पाहात असतात? नमिताच्या डायरीवरूनच बघा ना ‘उपलब्ध वेळ, कौशल्यं, वेगवेगळे Resources, माणसं आणि या सर्वाबरोबर स्वत: आपण इतक्या गोष्टींची एकाच वेळी अनेकपदरी जुळवाजुळव करणं ही कसरत स्त्रिया वर्षांनुर्वष कसलेल्या सर्कसपटूसारख्या करीत असतात.
जरा आधीच्या पिढीतल्या स्त्रियांची आत्मनिवेदनं वाचली की त्यात ‘आर्थिक व्यवस्थापना’ची प्रतिबिंबं जागोजागी दिसतात. चार आण्याची कोथिंबीर विकत घेता यावी म्हणून आठवडय़ातले तीन दिवस बसऐवजी पाच-सात किलोमीटरची पायपीट करणं, उरलेल्या पोळ्यांची फो.पो. किंवा नव्या काढलेल्या पलंगपोसाची चाळण होत- त्याचं डिमोशन पायपुसण्यापर्यंत करून मगच ते डिस्पोज करण्यापर्यंत! यालाच ‘काटकसर / निगुतीनं करणं/ भागवाभागवी ’ अशी अनेक नावं होती आणि त्या काळी ती गृहव्यवस्थापनाच्या अभिमानाची बाब होती. रद्दी जमवून- ती विकून घेतलेल्या पैशांची इरकली साडी किंवा एखादी गृहोपयोगी वस्तू एखाद्या स्मृतिचिन्हाप्रमाणं जपण्यात एक आनंद होता.
आज कदाचित व्यवस्थापनाच्या ‘काटकसर’ मुद्दय़ाला फार कुणी थारा देत नसलं तरी आर्थिक गुंतवणुकी कुठे- कशा करायच्या, कर्जाचे हप्ते कसे भरायचे, खिशाला परवडेल पण एन्जॉय करता येतील, अशा ट्रिप्स प्लॅन करायच्या, हे व्यवस्थापनही अनेक स्त्रिया आपल्या दशभुजांपैकी कुठल्यातरी भुजेनं सावरत असतात.
व्यक्तीच्या सकाळपासून रात्रीपर्यंतच्या कामांच्या तपशिलांचा ४०० मध्यमवयीन स्त्री-पुरुषांचा अभ्यास एका संशोधनात केला होता. त्यात दिसलं की, साधारण पहाटे पाच ते रात्री ११ या १८ तासांत बाई सुमारे ६१-६८ प्रकारची कामं करते, तर पुरुष २५ ते ३२ प्रकारची कामं करतात. (यात आवरण्यापासून- व्यावसायिक कामांपर्यंतची मोठी यादी होती.) त्यातही कामांचे गट पाडले तर स्त्रिया साधारण १५ ते १८ गटांमधली कामं करतात आणि पुरुष ७ ते १० गटांमधली कामं करतात असं दिसून आलं होतं. थोडक्यात ‘कामातलं वैविध्य’ या मोजपट्टीवर स्त्रिया खूप पुढे होत्या. ‘गुणवत्ता’ या मोजपट्टीवर दोघांत फारसा फरक नव्हता. व्यावसायिक स्तरावरील कामात पुरुष स्त्रियांपेक्षा किंचित (दखलपात्र नव्हे) पुढे होते. याचा अभ्यास करणाऱ्यांना प्रश्न पडला की, ‘तास अठराच’ पण मग दोघांत एवढा फरक का? तेव्हा लक्षात आलं की, एका खास स्त्रीविशिष्ट कौशल्याचा यात हात आहे. ते म्हणजे ‘कामात काम करणे!’ एकीच्या पोटात दुसरी.. अशा लाकडी रशियन बाहुल्यांचे संच पूर्वी खेळण्यात मिळायचे. तसं बायका मोठय़ा कामात- छोटी कामं जिगसॉ पझल जुळवावं तशा पद्धतीनं करीत जातात. दुसरं कारण म्हणजे स्त्रियांच्या मेंदूतील डावा-उजवा मेंदू जोडणारा पूल जास्त रुंद आणि अधिक पेशींनी बनलेला असल्यानं दोन्ही मेंदू ज्यासाठी जबाबदार असतात अशा वेगवेगळ्या कामांमधली कौशल्यं त्या एका वेळेला किंवा आलटून पालटून फार त्रास न पडता करू शकतात. लेखिका मंगला गोडबोले यांच्या ‘एक आडवी रेघ’ या कथेची इथे हटकून आठवण येते. स्वैपाकपाणी- मुलांचा अभ्यास- पासून ते स्कूटर दुरुस्ती- हिशेब आणि नातेवाईक सांभाळणं (नमिताची डायरी..!) करणाऱ्या ‘आईच्या’ नावापुढे ‘काय करते’? या प्रश्नाला ‘मार एक आडवी रेघ!’ हे उत्तर वडील जराही न थबकता देऊ शकतात- ही आपली सामाजिक वस्तुस्थिती आहे (जी खूप दु:खदायक आणि चीड आणणारी आहे.) आज कदाचित या आडव्या रेघेपुढे ‘नोकरी’ ‘खासगी व्यवसाय’ असे शब्द पडत असतीलही, पण त्यामुळे बाईच्या या जोपासलेल्या हरहुन्नरीपणाचं खरं मोजमाप होतं का- हा प्रश्न ९९ टक्के जणींच्या मनात असतो. उरलेल्या १ टक्के जणींनी तो सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न चालवलेला असतो.
या स्वत:हून निमंत्रित केलेल्या ‘सुपरवुमनायटिस’ची (पुन्हा मंगलाताईंचा लाडका शब्द!) किती अवाजवी किंमत बाई मोजत असते याची तिला अंधुक (किंवा कधी स्पष्ट) कल्पना असली तरी तिच्या भवतालच्या मंडळींना ती फारच क्षीण असते. ‘दहा ते पाच’च्या पलीकडे व्यावसायिक काम करणाऱ्या स्त्रियांच्या या कॉस्ट्स तर कितीतरी पटीनं वाढत असतात. माझी एक समुपदेशक मैत्रीण सांगत होती, ‘काही वर्षांपूर्वी साधारण चाळिशीनंतर बर्नआऊट (अतिश्रमानं येणारं वैफल्य) किंवा मनोकायिक आजार होणाऱ्या बायका जास्त होत्या. आता तर माझ्याकडे अगदी ३०-३२ च्या मुलीही येतात. रेसमध्ये नुसत्या धावत असतात. सगळंच परफेक्ट हवं असतं त्यांना आणि त्यांच्या जवळच्यांनाही!
मध्यंतरी एका उद्योगासाठी महिला सदस्यांसाठी ‘पालकत्वा’वर कार्यशाळा घेण्यासाठी गेले होते. तो उद्योग असा होता की, सकाळी आठला घर सोडणं प्रत्येकीला क्रमप्राप्त होतं आणि रात्री आठच्या आत घरी पोहोचणं दुर्धर होतं. दोन वर्षांच्या पिल्लाला घरी आजी आजोबांकडेच ठेवायचं आणि वीकेण्ड पॅरेन्टिंग करायचं असा पर्याय एकीनं शोधला होता, दुसरीनं पाळणाघराचा! काहींनी वर्षभरात नोकरीलाच रामराम ठोकला. (उत्तम भवितव्य असूनही!) तर काहींनी ती धावपळ झेपेल त्या पद्धतीनं चालू ठेवली होती. या सगळ्यात सर्वात पणाला लागली होती ती त्यांची ‘व्यवस्थापकीय कौशल्यं!’ घर आणि नोकरी यात ‘आत-बाहेर’ (switch on - switch off) कसं करायचं कुठली कामं कुणाला सोपवायची, कशी करून घ्यायची, प्राधान्यं ठरवताना काय विचार करायचा, पदोपदी फालतू ते गंभीर प्रश्नांना चटचट उत्तरं शोधायची, कुठले रिसोर्सेस कसे वापरायचे हे सगळं उठता-बसता-निजता करायला लागतच होतं. ‘मातीच्या चुली’ नावाच्या चित्रपटात,नवी लग्न झालेली आयटी सून कामावर रुजू होताना घरी असलेल्या ‘सासूबाईंना’- ‘++++ ’ अशा कामांच्या सूचना देत असते. फणकाऱ्यानं सासूबाई म्हणतात, ‘बघा- कशा मला कामं सागून गेल्या मॅनेजरीणबाई!’ असं ‘नखशिखांत मॅनेजर बनणं’ आजच्या बाईला आवश्यकच आहे. ती काळाची गरजही आहे यात शंका नाही, पण त्या मॅनेजरबाईंची आपल्या अवतीभवतीच्या लोकांकडून (जवळच्या हं!) थोडकीशी अपेक्षाही आहे. ती म्हणजे, तिचं हे ‘मॅनेजरपद’ जन्मजात आहे, असं न समजता तिनं ते प्रयत्नपूर्वक मिळवलं आहे, हे लक्षात घेऊन त्याबद्दल कधीतरी उत्स्फूर्त दाद द्यावी. ‘एवढं करून दमली असशील ना- बस आता थोडा वेळ- आम्ही आहोत ना मदतीला..’ असं आवर्जून कुणी म्हणावं आणि करावंही!’ या एका वाक्यानंही मॅनेजरीणबाई आनंदी होतील, हे नक्की. अनेक गोष्टींची / जबाबदाऱ्यांची हत्यारं एकाच व्यक्तीनं पारजायची तर कुठल्या ना कुठल्या हत्याराची धार कमी पडणार, कधी ते धरलेल्या लक्ष्यापासून ढळणार, कधी हातातलं बळ आटणार, तर कधी एखादंच हत्यार जास्त वापरलं जाणार, याचंही भान बाईनं स्वत: ठेवणं आवश्यक आहे, त्याची जाणीव इतरांना योग्य त्या शब्दात योग्य त्या वेळी करून देणंही आवश्यक आहे. नाहीतर मग आपणच तयार केलेल्या जाळ्यात आपलाच पाय अडकून दमछाक होते. सर्व व्यवस्थापनात ‘स्व-व्यवस्थापन’ अग्रेसर हवं- मग बाकीच्या क्षेत्रांना हवा तितका हवा तेवढा मान देता येतो. कष्टी न होता किंवा अपराधी न वाटून घेता, असं मला वाटतं.
‘बाई म्हणजे मूर्तिमंत व्यवस्थापन’ हे खरं असलं तरी फिरत्या रंगमंचावरच्या या कॉमन कलाकारानं ‘गुंतुनी गुंत्यात साऱ्या- पाय माझा मोकळा’ असं जादाचं भावनिक कौशल्यही व्हॅल्यू अ‍ॅडिशन म्हणून कमवायला हवं तर त्या व्यवस्थापनाची मजाही घेता येईल अन् सार्थ अभिमानही बाळगता येईल, नाही का?

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो