ग्रंथविश्व : द. आशियातील लोकशाही आणि हिंसा
मुखपृष्ठ >> ग्रंथविश्व >> ग्रंथविश्व : द. आशियातील लोकशाही आणि हिंसा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ग्रंथविश्व : द. आशियातील लोकशाही आणि हिंसा Bookmark and Share Print E-mail

ज. शं. आपटे - शनिवार, ३१ मार्च २०१२
alt

समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंश शास्त्र, मानसशास्त्र ही सामाजिक शास्त्रे आहेत. सामाजिक व सांस्कृतिक मानववंश शास्त्रामध्ये येणाऱ्या नवीन विषयासंबंधी लक्ष वेधणाऱ्या ग्रंथमालेतील प्रस्तुत पुस्तक आहे.  लेखक जोनाथन स्पेन्सर एडिंबर्ग विद्यापीठात दक्षिण आशिया मानववंशशास्त्राचे प्राध्यापक आहेत. मुख्य विषयाची मांडणी, विवेचन लेखकाने आठ प्रकरणांत केले आहे.

दक्षिण आशियामधील भारत व श्रीलंका या दोन देशांमधील घटना, घडामोडींसंबंधी लेखकाचे अध्ययन, संशोधन विशेषकरून झाले आहे. विचारवंत व कार्यकर्ते यांच्याशी तसेच इतिहास, राजकीय विचारसरणी आणि मानववंशशास्त्र या बैद्धिक शाखामधील प्रतिनिधीबरोबर लेखकाचा संवाद, चर्चा, संभाषण झाले; त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
८० च्या दशकातील पंजाबमधील शीख अलगतावादाचा उदय, अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावरील लष्करी कारवाई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निर्घृण हत्या आणि त्यानंतर उफाळलेले शीखविरोधी हिंसक आंदोलन, अयोध्येतील बाबरी मशिदीचा पाडाव आणि भारतीय जनता पक्षांची १३ दिवसांची केंद्रीय सत्ता या साऱ्या घटना, घडामोडी १९८० ते १९९६ या पंधरासोळा वर्षांतील आहेत. याच काळात श्रीलंकेतील असंख्य तामीळ जनतेविरुद्धचे हिंसक आंदोलन, तेथील शासन व एलटीटीईमधील यादवी युद्ध आणि नेपाळमधील उत्स्फूर्त लोकशाही क्रांती व माओवाद्यांचे अतिरेकी लढे या घडामोडी घडल्या. या साऱ्या घटना, घडामोडी आंदोलने, लढे समजून घेत असताना ‘आपण’ आणि ‘ते’ इतर नेमके कोण आहेत याचे निश्चित आकलन होणे अगत्याचे आहे असे लेखकाचे प्रतिपादन आहे. त्याचबरोबर न्यायव्यवस्था याविषयी विविध दृष्टिकोन, राजकारणाचे अनेक ठिकाणचे पैलूही समजून घ्यायला हवेत. यासाठी मानववंशशास्त्र ही सुयोग्य विद्याशाखा आहे व अलीकडच्या काळात त्या विद्याशाखेची कामगिरी लक्षणीय आहे असे लेखकाने आवर्जून म्हटले आहे.
राजकीय मानववंशशास्त्रामधील राजकीय भाग काय असतो हे लेखकाने दुसऱ्या प्रकरणात विशद करून सांगितले आहे. १९८० च्या दशकात तामीळनाडूचे सिनेअभिनेते व राजकारणी एम. जी. रामचंद्रन यांच्याबद्दल तामीळ जनमानसात भक्ती, प्रभाव, आकर्षण कसे होते हे स्पष्ट केले आहे. त्यांच्या निधनानंतर  २० लाख शोकाकुल स्त्री-पुरुष, ३१ आत्महत्या, असंख्य तरुणांनी करून घेतलेले मुंडण असे शोकप्रदर्शन तामीळ जनतेने केले, याचा तपशीलही येथे आहे. १९९० मध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा, १९९३ नंतर लालूप्रसाद यादव यांना पाच वेळा झालेली अटक या वेळी व्यक्त झालेली लोकभावना याचीही माहितीही दिली आहे. हे सारे वर्तन राजकीय होते. प. बंगालमध्ये अरिल्ड रुड या मानववंश शास्त्रज्ञास वेगळा अनुभव आला. राजकारण म्हणजे घाणेरडे काम, तत्त्वशून्य. चारित्र्यवान माणसे सौदेबाजीचा व अप्रामाणिकतेच्या व्यवसायाला हात देखील लावणार नाहीत.  यातून  राजकीय विचारसरणी व राजकीय एकात्मता या दोन्हींचा अभाव दिसून येत आहे, असे  त्यास वाटते
‘संस्कृती, राष्ट्र आणि दैन्य’ या प्रकरणात राष्ट्रवादासंबंधी म्हटले आहे, की राष्ट्रवाद ही एक राजकीय शक्ती आहे व ती स्वत:च्या सर्व आविष्कारासंबंधी अस्मितेबद्दल आग्रहपूर्वक प्रतिपादन करते. ती शक्ती वारंवार खूप जुन्या भूतकाळासंबंधी आठवण देत असते पण ते तपासांती नवीनच आहे असे वाटत असते. राष्ट्रवादाच्या मानववंशशास्त्राच्या गर्भित अर्थासंबंधी लिहिताना लेखकाला असे समजून आले की, श्रीलंकेतील सर्व विचारसरणीचे राष्ट्रवादी ‘संस्कृती’ च्या संकल्पना वापरत होते आणि त्या संकल्पना मानववंशशास्त्रीय वापरातील संकल्पनाशी मिळत्याजुळत्या, सारख्या होत्या पण डिसेंबर २००५ मध्ये भरलेल्या द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय श्रीलंकन अभ्यास परिषदेतील एका शोधनिबंधात म्हटले होते. ‘‘श्रीलंकन मानववंशशास्त्र निर्वसाहतीकरण प्रक्रियेतून गेले नाही आणि सहजपणे ते उग्र वासाहतिक मार्गात घसरले.. येथे स्थानिक वास्तवतेचे अत्यंत चुकीचे अर्थ काढले जातात व ते मुख्यत: बौद्ध अभ्यासाचे विषय होतात’’ त्यामुळे वसाहतीनंतरच्या मानववंशशास्त्रासंबंधी प्रखर व दूरवर टीकाटिप्पणी केली जात आहे.
‘कार्यरत लोकशाही’चे विवेचन करताना लेखकाने लंकेतील सार्वजनिक निवडणुकीतील एका खेडय़ासंबंधीचे विश्लेषण केले आहे. राजकीय कर्मकांड, प्रसंग, घटना यांच्या आधारे हे विश्लेषण आहे. राजकीय कर्मकांड म्हणजे मतदारांना भेटणे, त्यांना एकत्र आणणे, सबलांना, प्रभावी माणसांना दुर्बलांना आश्वासनपूर्वक निश्चित करणे. प्रत्येक वेळी उत्तर असते ते कर्मकांडाच्या बाहेर, सामाजिक जीवनात काही घवघवीत रोख असे उपलब्ध करून देणे आवश्यक असते. निवडणुकांत अस्मितांचे मतभेदांचे नाटक असते. १९८० च्या दशकातील श्रीलंकेमधील खेडय़ातील राजकारणाचे मूल्यमापन करताना स्थानिक व बौद्धिक शहाणपणापेक्षा वेगळे असे शहाणपण पाहावयास मिळाले असे लेखक जोनाथन स्पेन्सर म्हणतात. ‘पक्षीय राजकारणामुळे खेडय़ात ‘विभाजन’ झाले आहे. पूर्वी खेडय़ातील वातावरण सौहार्दपूर्ण व ऐक्याचे होते, असे एम. एस. रॉबिनसन आपल्या ग्रंथात म्हणतात. लेखक ओ स्पेन्सर म्हणतात, की राजकारण जर खेडय़ात आले नसते, तर खेडय़ातील जनसामान्यांना ते नवीन तयार करावे लागेल. खेडय़ातील पूर्वीपासून असलेल्या मतभेदांना, भिन्न गटांना राजकारणामुळे एक नवीन शैली प्राप्त करून दिली आहे.
‘राज्यशासन व हिंसा’ या प्रकरणांत लेखकाने १९८३ मधील श्रीलंकेतील हिंसाचार, १९८४ मधील दिल्लीतील हिंसक हल्ले, त्यामागची परिस्थिती व विचारसरणी यासंबंधी विस्ताराने विश्लेषण केले आहे. दिल्लीतील हिंसाचारांत तीन प्रकारचे सार्वभौमत्व होते. कायद्याच्या नावाखाली दंगेखोरांना साहाय्य करणारे पोलीस, इंदिरा गांधींच्या मृत्यूविषयी दंगेखोरांना दिले जाणारे राष्ट्रीय आवाहन आणि स्थानिक राजकारणातील गटांचे, समूहांचे व दैनंदिन हिंसेचे ‘तात्त्विक बहुविधता, आचारातील बहुविधता’ आणि राजकारण व विरोधी राजकारण यासंबंधी विवेचन, विश्लेषण. प्रतिपादन शेवटच्या दोन प्रकरणांत लेखकाने केले आहे. पुस्तकाच्या शेवटी लेखक प्रो. जोनाथन स्पेन्सर यांनी,  ‘आत्मज्ञानात रुतलेले’ व ‘स्वत:च्या व्याख्यांची पद्धतशीर तपासणी आवश्यक असलेले’ राजकीय मानववंशशास्त्र ३० वर्षांनी पुनरुज्जीवित झाले, याबद्दल समाधान व्यक्त केले आहे! पुस्तक वाचल्यावर अभ्यासकांना ते सार्थ वाटेल.
‘अँन्थ्रपॉलॉजी, पॉलिटिक्स अँड द स्टेट’
- जोनाथन स्पेन्सर
केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, २००७,
पृष्ठे २०३, किंमत  १७.९९ पौंड

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो