मुक्तायन : अंतर दिसणं आणि होण्यातलं
मुखपृष्ठ >> मुक्तायन >> मुक्तायन : अंतर दिसणं आणि होण्यातलं
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुक्तायन : अंतर दिसणं आणि होण्यातलं Bookmark and Share Print E-mail

altमुक्ता बर्वे , शनिवार, ७ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मला सगळंच खूप निर्घृण वाटायला लागलं. माझं (सुलीचं) देवाशी  लग्न लावताना, गावची पोरं मला (सुलीला) छेडताना माझ्यातली अभिनेत्री हळूहळू हरवली. एका शहरी आवरणात स्वत:ला गुंडाळून वेगळ्या पायरीवर उभं राहून दुसऱ्यावर होणारा अन्याय थंडपणे बघणारी एक शहरी मुलगीपण हरवली आणि मग शिल्लक राहिली ती ‘सुली’. मी कशी दिसते, बसते, बोलते, नेसते हे प्रश्न कधीच मागे पडले. उरलं फक्त शरण जाणं..  परिस्थितीला, सुलीला.

तुम्हाला असं कधी झालंय का हो, की तुम्ही आरशासमोर उभे आहात आणि तुमचं प्रतिबिंब बघून तुम्हाला ओळखूच येत नाहीये, की ही समोर जी व्यक्ती दिसतेय ती कोण आहे? मला बऱ्याचदा असं झालं की, फार काहीतरी वेगळंच वाटतं, विचित्र वाटतं.
मी अभिनेत्री आहे, वेगळा मेक-अप करते, वेगळे विग्ज वापरते, वेगवेगळे गेटअप करते म्हणून मी स्वत:ला ओळखू येत नाही असं नाहीये. कारण कितीही वरकरणी बदल केले तरी आतला माणूस थोडाच बदलतो ? तो तोच राहतो ना. पण नाही, काही काही भूमिकांनी मला अंतर्बाह्य़ बदललं. अगदी बदललं नसलं तरी गदागदा हलवलं, विचार करायला भाग पाडलं आणि मग तेव्हा आरशात दिसणाऱ्या मला मीच नाही ओळखू शकले.
प्रसंग फार जुना नाही. माझ्या ‘जोगवा’ नावाच्या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी आम्ही महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या सौंदत्ती, गडहिंग्लज अशा भागांत राहत होतो. चित्रीकरणसुद्धा आसपासच चाललं होतं. साधारण महिना-सव्वा महिन्याचा सलग काळ सगळी टीम हे चित्रीकरण करीत होतो. जोगते-जोगतीण, त्यांची परंपरा, चालीरीती, त्या अनुषंगाने तयार झालेल्या रूढी या सगळ्यांवर  मुक्तपणे(बोल्ड)भाष्य करणारा हा चित्रपट. चित्रपटाचा विषय जरी आपल्याच समाजातल्या मन विषण्ण करणाऱ्या सामाजिक रूढी-परंपरांवर भाष्य करणारा होता तरी तो संजय कृष्णाजी पाटील या कवीच्या लेखणीतून उतरलेला असल्याने मुळातच हळुवार पद्धतीने उमटला होता. त्या जोडीला आमचा दिग्दर्शक राजीव पाटील यांनी एका प्रेमकथेच्या चौकटीतून हा प्रश्न हाताळायचं ठरवलं होतं. त्यामुळे पहिल्यापासूनच त्या विषय मांडणीची दिशा त्याने ठरवून दिली आणि या सगळ्याला दृश्यरूप देणारा आमचा सिनेमॅटोग्राफर (कॅमेरामन) संजय जाधवनेही याच दृष्टिकोनातून हा चित्रपट चितारला. इतकं भगभगतं आणि गडद सत्य मांडणारा सिनेमा दृश्यरूपात मात्र प्रत्येक फ्रेममध्ये एक देखणं चित्र असावं, असा दिसत होता. त्या जोडीला अजय-अतुल या संगीतकारद्वयीचं मन हेलावून टाकणारं संगीत, राजेश रावचं संकलन, सगळेच पडद्यामागचे आणि पडद्यावरचे कलाकार एका दिशेने झपाटल्यासारखे कामाला लागले होते.
‘‘जोगवा ही एका जोगत्याची आणि जोगतिणीची प्रेमकथा आहे. त्यांच्या एकत्र येण्यानं, समाजाविरुद्ध बंड पुकारण्याचं बळ त्यांना मिळतं आणि ते दोघं त्यांचं स्वतंत्र आयुष्य जगण्याची धडपड करू पाहतात.’’ आमच्या पहिल्याच बैठकीला राजीव (पाटील) मला हे सांगत होता. नेहमीच्या रूटीन भूमिकांपेक्षा वेगळीच भूमिका, उपेंद्रसारखा अप्रतिम सहकलाकार, राजीवसारखा वेगळ्या वाटा शोधणारा अतिशय मनस्वी दिग्दर्शक, सगळंच अगदी जुळून आलं होतं. सिनेमा नाकारण्याचा किंवा फार विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. मी पहिल्याच भेटीत होकार दिला. मग धावपळ सुरू झाली. मी साकारलेलं पात्र म्हणजे ‘सुली’. ही सुली कशी दिसेल, कशी वावरेल, काय नेसेल, तिची भाषा, डोक्यात तयार झालेली ‘जट’, त्या जटीचा विग, लूकटेस्ट, फोटोशूट, त्या अनुषंगाने काही वाचन, काही संदर्भासाठीचे फोटो, स्क्रीप्ट, चर्चा अगदी शूटिंगला पोहोचे-पोहोचेपर्यंत सगळी धावपळ नुसती. करता करता आम्ही गडहिंग्लजला जाऊन पोहोचलो. शूटिंग सुरू झालं होतं. मी दोन दिवस उशिरा रुजू झाले होते. आज माझ्या कामाचा पहिला दिवस. कोणतंही नवं काम सुरू होणार असलं की खूप दडपण येतं, झोप उडते, सगळी तयारी झाली असली तरी सगळंच राहिलंय असं वाटतं. मी तयार झाले. साडी-भंडारा-कवडय़ांची माळ, डोक्यावर जट असलेला विग. मी आरशात बघितलं. अगदी मस्त मनासारखं दिसत होतं माझं रुपडं. फिट्ट जोगतीण. सुंदर, अप्रतिम. मी खूश होते. आमचे रंगभूषाकार पप्पू पलांडेंना मी धन्यवाद दिले आणि राजीवसमोर उभी राहिले. त्यांनीही लूक ओके केला आणि माझा पहिलावहिला शॉट पार पडला. या भूमिकेसाठी लागणारं ‘वर्किंग-वर्किंग’ म्हणतात ते सगळं नीट माझ्या हातात आलं होतं. ‘मी’ ‘सुली’च्या गेटअपमध्ये मस्त दिसत होते, पण..  मी सुली झाले नव्हते.’’
खरं तर फक्त शब्दांचा खेळ वाटेल. ‘सुलीच्या गेटअपमध्ये मस्त दिसणं’ आणि ‘सुली होणं’; पण या दोन्हींमध्ये खूप अंतर आहे. हे ‘सुली होणं’ मला कसं सापडलं ते सांगते, या चित्रीकरणाच्या वेळीच बऱ्याच मंडळींनी आम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मदत केली. त्यात काही स्थानिक लोक, काही सोशलवर्कर तर काही जोगते-जोगतिणीसुद्धा होत्या. प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत, या खऱ्या माणसांना भेटेपर्यंत ‘जोगवा’ हा चित्रपट माझ्यासाठी एक फक्त सामाजिक विषयावर भाष्य करणारा, थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन विषयाची दाहकता अंगावर येण्याकरिता, थोडा अतिरंजित असा चित्रपट होता. ज्यात मी सुली नावाचं एक काल्पनिक पात्र ‘रंगवत’ होते. इथंच माझी गडबड होत होती. मी सुली ‘रंगवत’ होते?
साधारण माझ्याएवढीच किंवा माझ्यापेक्षा खरं तर लहानच असलेली ही सुली माझ्यासाठी काल्पनिक असली तरी ती आणि तशा अनेक ‘सुली’ आणि अनेक तायप्पा या माझ्याच देशात जगत आहेत. केवळ चित्रपटाच्या रंजकतेसाठी अतिरंजित वाटणारी दृश्यं ते क्षण काही लोक प्रत्यक्ष अनुभवत आहेत. हे ‘जोगवा’ चित्रपटाचं प्रोजेक्ट संपलं की एक शहरी लूकमधली ‘लव्हस्टोरी’ करीन, असं प्लानिंग करीत असताना कोणी तरी हे जोगतेपणाचं ओझं आयुष्याच्या अंतापर्यंत निभावण्याच्या आणाभाका घेत होतं. या आणि अशा अनेक परस्परविरोधी गोष्टी एकाच वेळी समोर येत होत्या. तिथलं एका सामाजिक कार्य करणाऱ्या ताईंनी ‘‘परवाच एका पोरीला देवाला सोडण्याचा कार्यक्रम झाला इकडं. आणि कोवळी पोरगी देवाला सोडली की काय, गडी मानसं हापापल्यागत करणारच नाओ,’ असं शांतपणे सांगितलं. त्या बोलत राहिल्या बराच वेळ आणि मला थोडा वेळानं काही ऐकू येईनासं झालं. मन आणि कान सुन्न झाले होते. ज्या कोणी या अमानुष परंपरा सुरू केल्या त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको, पण त्या परंपरा जपणारे आपण सगळे पाषाणहृदयी समाजातले सर्व स्तरांवरचे घटक!!! अंगातून त्राण गेल्यासारखं झालं. मी काय करतेय? कुठं जाणार आहे? मी कोण आहे? मला सगळंच खूप निर्घृण वाटायला लागलं. क्षणभर वाटलं,  इथून पळून जावं. माझं (सुलीचं) देवाशी  लग्न लावताना, गावची पोरं मला (सुलीला) छेडताना माझ्यातली अभिनेत्री हळूहळू हरवली. एका शहरी आवरणात स्वत:ला गुंडाळून वेगळ्या पायरीवर उभं राहून दुसऱ्यावर होणारा अन्याय थंडपणे बघणारी एक शहरी मुलगीपण हरवली आणि मग शिल्लक राहिली ती ‘सुली’. मी कशी दिसते, बसते, बोलते, नेसते हे प्रश्न कधीच मागे पडले. उरलं फक्त शरण जाणं- परिस्थितीला, सुलीला. सुलीचं जगणं माझ्या डोळ्यांत उतरलं. हतबलतेपुढे ‘मी’ गळून पडला. सुरुवातीला अतिरंजित, खोटी, बाहेरची, काल्पनिक वाटणारी ‘सुली’ प्रत्यक्षात समोर उभी ठाकली. ती माझ्याबरोबरच होती. नव्हे या चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये तिनं मला तिच्याबरोबर घेतलं. माझ्या हाताला धरून तिनं मला तिचं जग दाखवलं. तिच्या नजरेतून तिचं जग बघताना तिचं बांधलेपण, अडकलेपण, तिची तगमग माझी होती गेली आणि मी सुली झाले. त्या वेळी आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाला मीच नाही ओळखलं. त्या महिना-सव्वा महिन्याने माझं आयुष्य बदलून गेलं, दृष्टिकोन बदलला. खूप अस्वस्थ करणारा काळ होता तो. चित्रीकरण पूर्ण झालं. आम्ही मंडळी पुन्हा आपापल्या कामाला लागलो. पुढे चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचे असंख्य पुरस्कारही मिळाले, पण आपण आपल्यातलं काहीतरी, लांब कुठं तरी सोडून आलो, असं आजही वाटत राहतं. माझ्यातल्या सुलीला मी पुन्हा तिकडेच त्या रूढी-परंपरांनी जखडलेल्या, गडद काळोख्या जगात सोडून आलेय, अशी खंत लागून राहते. तिच्यासाठी, तायप्पासाठी मी काय करू शकेन? मला माहीत आहे, या भावनिक उद्रेकानं, अस्वस्थ करणाऱ्या अनुभवानं हलून जाऊन मी काही लगेच हातातली कामं बाजू टाकून, खांद्याला झोळी अडकवून कार्य करायला बाहेर पडू शकणार नाही. पण माझ्या कार्यक्षेत्रात राहून माझ्या पातळीवर मी जेवढी म्हणून बांधीलकी जपू शकेन तेवढी मी नक्की जपेन.
आजही एखाद्या सिग्नलला माझी गाडी उभी राहते आणि क्वचित हातात परडी घेतलेली जोगतीण किंवा डोक्यावर देवी नाचवणारा एखादा तृतीयपंथी काचेवर हात मारतो तेव्हा मला माझं न ओळखू आलेलं, अस्वस्थ करणारं ‘सुली’रूपातलं प्रतिबिंब आठवतं आणि गाडीबाहेरच्या माणसांची भीती वाटण्याऐवजी त्यांच्यातलं माणूसपण दिसत राहतं.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो