पसाय-धन : आम्ही दैवाचे, दैवाचे
मुखपृष्ठ >> पसायधन >> पसाय-धन : आम्ही दैवाचे, दैवाचे
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पसाय-धन : आम्ही दैवाचे, दैवाचे Bookmark and Share Print E-mail

अभय टिळक ,शुक्रवार,१३ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altविषम आणि निर्मम समाजव्यवस्थेत आत्मबळ संबंधित समाजघटकांना पुरविण्यासाठीच संतांनी नीच कामे स्वअंगे करणाऱ्या विठ्ठलाचा रोकडा आदर्श व्यवहारात सिद्ध केला. संतांना अभिप्रेत असलेली ऐहिक कर्मप्रधान, श्रमांची प्रतिष्ठा जपणारी, श्रमविभागणीतील दांभिक संकेतांचे निर्थकपण निर्देशित करणारी कार्यसंस्कृती आपल्या समाजात रुजल्याचे का अनुभवास येत नाही? शहरांतले ठाऊक नाही, पण ‘हरिपाठ’ माहीत नाही असा मराठी माणूस महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सापडणे कठीणच.  अगदी, वारकरी सांप्रदायिक नसलेल्या व्यक्तीलाही ज्ञानदेवांचा ‘हरिपाठ’ ज्ञात असतोच. आता, नामदेवबाबा, नाथराय, तुकोबा आणि निळोबाराय या वारकरी संत परंपरेतील अन्य संतांचीही ‘हरिपाठ’ रचना आहे, हे कदाचित काहींच्या गावी नसेल. परंतु, ‘देवाचियें द्वारी उभा क्षणभरी’, हे शब्द कानावर आले की, ‘अरे! हा तर ज्ञानदेवांच्या हरिपाठातील पहिला अभंग’, अशी खूण बहुतेकांना चट्दिशी पटते. अवघ्या २७ रचनांचा समावेश असणारा ‘हरिपाठ’ नावाचा अभंगांचा हा गुच्छ म्हणजे ज्ञानदेवांची तत्त्वपरंपरा असलेल्या आगम सिद्धांताचे सार होय. ऐहिक जीवनाची उचित बूज राखणारी आगमाची भूमिका ‘देवाचियें द्वारी उभा क्षणभरी’, या हरिपाठाच्या पहिल्याच अभंगाच्या पहिल्याच चरणातील पूर्वार्धात सर्वार्थाने व्यक्त झालेली आहे.
प्रापंचिकांबद्दल संतांना विलक्षण कळवळा आहे. नोकरीधंद्याच्या रहाटगाडग्यात सतत गरगर फिरणाऱ्या कुटुंबवत्सल व्यक्तीला देवाच्या दाराशी उभे राहायला नेमका किती वेळ मिळेल, याचे ज्ञानदेवांनी मांडलेले गणित अचूकच म्हणायला हवे. देवळावरून जाता-येताना आपण देवाच्या दारात फारतर क्षणभरच डोळे मिटून उभे ठाकू शकू, हे ज्ञानदेव जाणतात. इथे ध्यानात घेण्याजोगी बाब म्हणजे, ज्ञानदेवादी संत त्याबद्दल प्रापंचिकांची टिंगल वा अवहेलना मुळीच करत नाहीत. क्षणभर एकाग्र चित्त करून मनोभावे हात जोडले तरी देवाला पुरते, हेच ज्ञानदेव हरिपाठाच्या सुरुवातीसच सांगून टाकतात. तासन्तास देवाच्या दाराशी ठाण मांडले तर घरातील नित्याची कामे करणार कोण? आणि परमार्थाच्या नावाखाली प्रपंचातील रोजच्या कामांना हीन लेखणे वा टांग मारणे, हे तर संतविचारास साफ नामंजूर!
‘भक्तांच्या घरी राबणारा देव,’ ही त्या विठ्ठलाची भागवत धर्मस्थापक संतांनी प्रस्थापित आणि प्रतिष्ठित केलेली प्रतिमा ही केवळ आध्यात्मिकच नव्हे तर सामाजिकदृष्टय़ाही क्रांतिकारक बाबच ठरते. प्रपंच साधून तोच प्रपंच निकोप आणि नीतिमान बनावा यासाठी परमार्थ अनुसरणारा प्रापंचिक, देव आणि संसारातील रोजची कामे यांच्या परस्परनात्याचा एक अ-साधारण आयाम संतांनी आपल्यासमोर मांडला तो ‘देव’ या संकल्पनेला हा नवीन आशय प्रदान करून. आपल्या ऐहिक जीवनाचा पोत बदलून टाकणाऱ्या एकूण तीन गोष्टी त्यातून साध्य झाल्या.
देव धाव घेतो, भक्ताच्या घरी येतो आणि अंगेजणीने त्याच्यासोबत कामाला भिडतो ते भक्ताला  प्रपंचातून सोडविण्यासाठी नव्हे, ही बाब या ठिकाणी मुद्दाम अधोरेखित करून ठेवली पाहिजे. मुळात, ऐहिक प्रपंच हा ‘भ्रामक’ अथवा ‘लटका’ नसल्यामुळे त्यातून सुटण्याची बात संतविचारात नाही. त्यामुळे, वाटय़ाला आलेला प्रपंच त्यातील सुखदु:खांसकट प्रत्येकाला करावाच लागतो. संसारात कराव्या लागणाऱ्या कर्माचे बरेवाईट भोग भोगल्यावाचून कोणाचीही सुटका नसते. त्यामुळे देवाची आराधना केल्यानंतर, संतांच्या शिकवणुकीनुसार, तो धावून येतो ते त्याचा धावा करणाऱ्या भक्तांची सांसारिक कामांपासून मुक्तता करण्यासाठी नव्हे, हा पहिला धडा इथे शिकायचा. देव धावतो आणि भक्ताबरोबर कामाला भिडतो तो त्याच्या उपासकाला त्या कामांचा शीण वाटू नये म्हणून! इथे मुक्ती आहे; पण ती कर्मापासून नव्हे तर कर्माच्या शिणवटय़ापासून!
सगळी संतचरित्रे आपण डोळस बारकाईने वाचली तर ही बाब आपल्या ध्यानात येईल. संतचरित्रेही राहू द्या एकवेळ, संतांचे अभंग जरी विचक्षणपणे वाचले तरी हीच गोष्ट आपल्याला जाणवेल. आमच्या नामदेवबाबांच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक बनून गेलेल्या जनाबाई माउलींचे अभंग जरा वाचून बघा; कळेल आपल्याला. नामदेवबाबांचे कुटुंब १४ माणसांचे होते. घरचा बारदाना सांभाळताना नानाविध कामांचा भार जनाबाईंनी उचलावा तो विठ्ठलाच्या मदतीच्या बळावरच. एकटय़ाने राबणाऱ्या जनाबाईंसाठी विठ्ठलाने यावे आणि पीतांबर खोवून दळणकांडणापासून सडासारवणापर्यंत सर्व कामे जनाबााईंना करू लागावीत, याचा मोठा लडिवाळ वृत्तान्त जनाबाईंच्या अभंगरचनेत आपल्याला पाहायला मिळतो. जनाबाई पाणी भरायला गेल्या की पंढरीनाथाने त्यांच्यामागे धाव घ्यावी. पाणी देवानेच भरावे. ‘पाणी रांजणात भरी। सडासारवण करी’, असा खुद्द जनाबाईंचाच दाखला आहे. अंगणाची झाडलोट जनाबाईंनी केली तर घमेल्यात केर भरावा विठ्ठलाने! भरलेला केर टाकण्याचे कष्ट जनाबाईंना होऊ नयेत म्हणून, जनाबाईच म्हणतात त्याप्रमाणे, ‘पाटी  घेऊनिया शिरीं। नेऊनिया टाकी दुरी’।। कर्तुम् - अकर्तुम्-अन्यथा कर्तुम सामथ्र्य असणाऱ्या विठ्ठलाने, सर्व कामे एका क्षणात उरकून टाकणारी जादूची कांडी जनाबाईंना दिली नाही, हे आपण नीट लक्षात घेतले पाहिजे. भक्ताच्या बरोबरीने राबणारा विठ्ठल आपल्यासमोर उभा करून ऐहिक जीवनाचा गाडा गतिमान राखणारी श्रमसंस्कृती आणि कार्यप्रधान उपासनेचा वस्तुपाठ संत समाजासमोर ठेवतात.
त्रलोक्याचा धनी असणारा विठ्ठल केराने भरलेली टोपली उचलून टाकतो, हा श्रमप्रतिष्ठेचा संतकृत सांगावा होय. ‘ऐसा भक्तिसी भुलला। नीच कामें करू लागला’,  हे जनाबाईंनी मोठय़ा प्रेमाने काढलेले उद्गार, एकाच वेळी, भक्तीचे अमोघ सामथ्र्य आणि श्रमांची प्रतिष्ठा अधोरेखित करतात. ‘सांडूनिया थोरपण। करी दळणकांडण’, असे विलक्षण कौतुकभरले वचन उच्चारत, समाजाच्या हाडीमाशी खिळलेल्या पुरुषप्रधान, लिंगभावकेंद्री श्रमविभागणीच्या संकेतांमधील फोलपणही जनाबाई विलक्षण प्रगल्भतेने उघडे पाडतात. आज इतकी शतके आपण संतविचारांचे जागरण-श्रवण-पठण करतो आहोत; मग संतांना अभिप्रेत असलेली अशी ऐहिक कर्मप्रधान, श्रमांची प्रतिष्ठा जपणारी, श्रमविभागणीतील दांभिक संकेतांचे निर्थकपण निर्देशित करणारी कार्यसंस्कृती आपल्या समाजात रुजल्याचे का अनुभवास येत नाही?
वर्ण आणि कर्म यांची सांगड आपल्या समाजरचनेत जन्मजातच घातली जाते. त्यामुळे गुणकर्मानुसार निश्चित होणारी श्रमविभागणीच जातिवर्णप्रधान समाजरचनेत अभिप्रेत आहे, असे गोंडस प्रतिपादन कितीही केले तरी, जातिव्यवस्थेमध्ये श्रमांच्या बरोबरीनेच श्रमिकांचीही विभागणी व्यवहारात जन्मजातच केली जाते, हे जळजळीत सत्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकर्षांने वेळोवेळी मांडले. अशी जातिभेदप्रवण मानसिकता आजही मंदतेज झालेली दिसत नाही. त्यामुळे अशा विषमतापूर्ण व्यवहाराची दाहकता संतकाळात किती पराकोटीची असेल, याची कल्पना करायला कल्पनाशक्ती फार ताणण्याची गरज नाही. परिणामी, नीच अथवा हलकी समजली जाणारी कामे करणाऱ्या तत्कालीन समाजघटकांच्या झोळीत सतत अपमान, छळ, विषमता, उपेक्षा आणि पिळवणूक यांचेच दान त्या काळच्या धर्मव्यवस्थेने घातले. अशा त्या विषम आणि निर्मम समाजव्यवस्थेत टिकाव धरून जगण्यासाठी नितांत आवश्यक असलेले आत्मबळ संबंधित समाजघटकांना पुरविण्यासाठीच संतांनी नीच कामे स्वअंगे करणाऱ्या विठ्ठलाचा रोकडा आदर्श व्यवहारात सिद्ध केला. मानवनिर्मित समाजव्यवस्थेत आमचे स्थान काहीही असो, परंतु त्रलोक्याधीश असणारा विठ्ठल आमच्याबरोबर मळ्यात राबतो, मडकी घडवतो, कातडे कमावतो, केर काढतो, त्यामुळे आमच्यासारखे दैववान आम्हीच; असे विलक्षण लखलखीत आत्मभान, जगण्याचे बळ आणि प्रतिष्ठा हिणकस, पददलित समजल्या जाणाऱ्या तत्कालीन समाजघटकांना कर्ममूर्ती विठ्ठलाच्या साहचर्याने मिळाली. ‘देव’ या संकल्पनेचा आशय बदलून टाकण्याच्या संतांच्या अजोड कार्याची ही सर्वात मोठी सामाजिक व व्यावहारिक फलश्रुती. ‘आम्ही दैवाचे दैवाचे। दास पंढरीरायाचे’, हे नामदेवबाबांचे उद्गार म्हणजे त्याच जाज्वल्य आत्मभानाचा आविष्कार!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो