स्त्री समर्थ : सेवेचा अध्याय
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : सेवेचा अध्याय
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : सेवेचा अध्याय Bookmark and Share Print E-mail

altसंपदा वागळे, शनिवार, १४  एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altचौदाव्या वर्षी ९ रुपये पगारावर शिक्षिका होण्याचा मार्ग स्वीकारलेल्या आणि आज ८० व्या वर्षीही आपल्या सेवेचा अध्याय अखंड चालू ठेवणाऱ्या वत्सलाबाई कुलकर्णी यांनी कौटुंबिक स्तरावरील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याचं सामथ्र्य स्वत:त आणलंच, पण अनेक मुलींना, तरुणींनाही समर्थ केलं.. सक्षम केलं. पासष्ट-सहासष्ट वर्षांपूर्वीची गोष्ट. राजापूर तालुक्यातील सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘शिवने’ या छोटय़ाशा गावातील साखळकरांच्या घरात १३-१४ वर्षांची एक मुलगी, मालती, गुडघ्यात डोकं खुपसून मुसमुसून रडत होती.. कारण होतं, फायनलच्या परीक्षेत नापास झाल्याचं. यापुढे शाळेचं तोंडही बघायचं नाही, एवढंच नव्हे, तर घराच्या चार भिंतींच्या बाहेरदेखील पडायचं नाही असा मनाचा निश्चय झाला होता. यात बदल होण्याचं मुळी कारणच नव्हतं. घरात शिक्षणाचं वातावरण नव्हतंच, उलट ही घरी राहिली तर चार कामं तरी निपटेल ही आईची धारणा. पण घडलं वेगळंच. तिच्या आयुष्याचा अध्याय ‘रंजल्या-गांजल्यांच्या सेवेसाठी’ लिहिला गेला. आज ८०च्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या या वत्सलाबाई कुलकर्णीना अलीकडेच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आलंय.
मालू (मालती) फायनलला नापास होऊन घरी बसलीय ही बातमी राजापूर हायस्कूलमध्ये शिक्षक असणाऱ्या तिच्या काकांच्या कानावर गेली आणि ते तडक तिला आपल्या घरी राजापुरास घेऊन आले. शिक्षकाची तुटपुंजी मिळकत, त्यात त्यांची स्वत:ची आठ मुलं, शिवाय आला गेला, तरीही या घराने तिला आपलं म्हटलं.
चुलत्यांनी म्हणजेच साखळकर गुरुजींनी मालूला फायनलची परीक्षा पुन्हा द्यायला लावली आणि निकालाआधीच तिला शिवन्याच्या ‘कालिका विद्यालय’ या एकशिक्षकी शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी बोलावणं आलं. त्या काळी गावाकडच्या शाळांना शिक्षकच मिळत नसल्याने ‘या, या’ अशी परिस्थिती होती. १४ वर्षांच्या या ‘बाईंचा’ पगार ठरला महिना ९ रुपये. पुढे हा पगार वाढत वाढत १९५५ साली ३५ रुपयांवर जाऊन पोहोचला आणि त्याच वर्षी तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या. मालती भगवान साखळकर, वत्सला राजाराम कुलकर्णी झाली.
लग्नानंतर वर्षभरात मुलगा झाला, पण संसारसुख मात्र तिच्या नशिबी लिहिलेलं नव्हतं. सहजीवनाचा अर्थ कळायच्या आतच जोडीदाराला वेडाचे झटके येऊ लागले आणि त्याची रवानगी रत्नागिरीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये करावी लागली. यापुढची लढाई एकटीनेच लढायची आहे हे तिला कळून चुकलं. त्यातच प्रायमरी टीचर्स ट्रेनिंगसाठी मालवणला जाणं तिला क्रमप्राप्त झालं. लहानग्याला बघण्यासाठी हक्काचा असा आधार नव्हता. काका-काकूने स्वत:च्या पायावर उभं केलं तेच उपकार मोठे होते. परिस्थितीने तिला खंबीर बनवलं. अंगावरचे होते-नव्हते ते चार दागिने विकून तिने आपलं  ट्रेनिंग पूर्ण केलं. एवढंच नव्हे तर पुढे एस.एस.सी. आणि डी.एड. हे टप्पेही पार केले. त्यानंतर ‘राजापूरच्या कन्याशाळे’त मुलींना घडविताना बाईंची कारकीर्दही घडत गेली.
१९९० मध्ये मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त होईपर्यंत बाईंनी अनेक उपक्रम धडाडीने पार पाडले. कन्याशाळेत मुली शिकायला यायच्या खऱ्या, पण बऱ्याच जणींच्या आया निरक्षर. त्यामुळे एकदा नापास झाल्या की या मुली पुन्हा शाळेकडे वळायच्याच नाहीत. आई शिकली तरच या समस्येतून मार्ग निघू शकतो हे ओळखून बाईंनी ‘प्रौढ साक्षरता वर्ग’ सुरू केले. त्यासाठी एका पालकाची पडवी मिळवली आणि शनिवारी शाळा सुटल्यानंतर व रविवारी दुपारचा वेळ सत्कारणी लावला. हे वर्ग सलग पाच र्वष सुरू होते आणि या प्रयत्नातून ३५ ते ४० स्त्रिया लिहायला, वाचायला शिकल्या.
त्या काळी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांवर कुटुंब नियोजनाच्या कॅम्पसंदर्भात जबाबदारी असे. पेशंटस्ना नाश्ता, जेवण व औषधं पुरविण्यासंदर्भातील व्यवस्थापनाची जबाबदारी स्वत:हून अंगावर घेतली आणि उत्तम प्रकारे निभावली. हे कामही चार/पाच र्वष चाललं.
तेव्हा सातवीची परीक्षा बोर्डाची होती. कुलकर्णी बाईंकडे सातवीचा वर्ग होता. त्यांच्या जीवतोड मेहनतीमुळे शाळेचा रिझल्ट १०० टक्के लागू लागला. साहजिकच रत्नागिरी जिल्हा परिषदेने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना १९७८-७९ सालचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान केला.
निवृत्तीनंतर मुलगा व सून मुंबईत बोलवत असतानाही, पुढचं आयुष्य गरजू महिलांसाठी कारणी लावायचं ठरवून, त्यासाठी त्यांनी आप्तस्वकीयांचं वास्तव्य असलेल्या राजापूरजवळील पाचल या गावाची निवड केली. मुलाने घर बांधून दिलं आणि बाईंचा ‘सेवेचा अध्याय’ सुरू झाला. गावाकडील गरीब पण होतकरू मुलींना स्वत:जवळ ठेवून त्यांना शिकवून, मार्गी लावायला सुरुवात झाली. वैशाली गोठणकर ही कुणबी समाजातील अत्यंत गरीब मुलगी. तिची वाचनाची आवड ओळखून १२ वीनंतर त्यांनी तिला रत्नागिरीला पाठवून ग्रंथपालाचा अभ्यासक्रम पूर्ण करायला लावला. त्यासाठी जी काही फी होती, ती स्वत: भरली; इतकंच नव्हे तर ओणी गावात शिक्षक असलेल्या एम.ए., डी.एड. मुलाशी तिचं लग्नही लावून दिलं. नंदा माटलला कोल्हापुरात पाठवलं. तिथं तिने चार वर्षांचा नर्सिग कोर्स पूर्ण केला. आता ती तिथंच नोकरी करतेय. सध्या त्यांच्याजवळ राहणारी सुनीता मटकर बी.ए.च्या शेवटच्या वर्षांला आहे. त्यानंतर तिला कॉम्प्युटरमध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की, ‘समाजाने अडचणीच्या वेळी दिलेल्या मदतीची सदैव जाण ठेवायची’ हा मोलाचा संस्कार बाईंनी या मुलींवर केला. त्यामुळेच आज स्वावलंबी झालेल्या त्यांच्या पंचकन्या गरजू मुलींसाठी आपला खारीचा वाटा बाईंकडे आठवणीने पाठवत आहेत.
कोणतीही अपेक्षा न ठेवता उपवर मुला-मुलींची लग्नं जमवणं हा बाईंचा एक आवडता छंद. आतापर्यंत ५० च्या वर विवाह त्यांच्या मध्यस्थीने जमले आहेत आणि सर्वच्या सर्व जोडपी सुखात नांदत आहेत. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. सावंतवाडीत राहणाऱ्या एका देखण्या इंजिनीअर तरुणाला केवळ तो कोंबडय़ांचा धंदाही करतो, शेतीत रमतो म्हणून मुली नकार देत होत्या. हे कानावर येताच बाईंना एक मुलगी आठवली. ती होती मंडणगडची; सी.ए. फायनलच्या परीक्षेचा अभ्यास करीत असलेली. बाईंनी पुढाकार घेतला आणि गेल्या २५ फेब्रुवारीला नवऱ्याला (अनुरूप) नवरी मिळाली.
योगायोगाने काही वर्षांपूर्वी ‘कांता नाबर’ या मुंबईतील एका इंजिनीअरिंग कॉलेजातील प्राध्यापिकेशी बाईंची ओळख झाली. हे बंध पुढे इतके जुळले की, कांताताईंनी आपल्या या मैत्रिणीचा ‘मदतीचा हात’ बळकट करण्यासाठी दरवर्षी भरघोस अर्थसहाय्य पाठविण्यास सुरुवात केली. त्यातून अनेक विधवा व निराधार स्त्रियांना स्वावलंबी होण्यासाठी आधार मिळू लागला. दोन वर्षांपूर्वी कांताताईंचं निधन झालं, पण त्यांच्या अमेरिकास्थित मुलीने, छाया कुलकर्णी हिने आईचा वारसा पुढे चालवलाय. गेल्या वर्षी तिने पाठवलेल्या दोन लाख रुपयांतून तळकोकणातील दोन वाचनालयांना उभारी मिळाली. पाचल गावात सुसज्ज ग्रंथालय उभं राहिलं. शिवाय ‘शिवने’ या आपल्या मूळ गावी बाईंनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने एक छोटं वाचनालय सुरू केलं. जेमतेम ५००- ६०० वस्तीच्या या छोटय़ाशा गावातील किमान ५० - ६० जण तरी आता रोज या ठिकाणी येऊन निदान वर्तमानपत्रं तरी वाचतात. या ग्रंथालयासाठी मुंबई-पुण्याच्या फेरीत आप्तेष्टांकडून पुस्तकं गोळा करणं हा कुलकर्णी बाईंचा एक आवडता नेम. आता ८० व्या वयात त्यांनी या वाचनालयासाठी ‘नवी इमारत’ उभी करण्याचा संकल्प सोडलाय.
‘सुभद्राबाई शिक्षण निधी’ या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला फंड उभा करून देण्यासाठी बाई दरवर्षी जिवाचं रान करतात. दारोदार फिरून कमीत कमी ३० ते ४० हजार रुपये त्या प्रत्येक वर्षी मिळवतातच. या उपक्रमाला नियमितपणे मदत करणारी अनेक घरं त्यांनी जोडून ठेवली आहेत.
बाईंची राहणी एकदम साधी. काहीशी अघळपघळच म्हणा ना! सुती कापडाचं नऊवारी लुगडं, अंगभर पोलकं आणि पाठीवर ‘चिमटीत मावेल’ अशी सैलसर वेणी आणि हसतमुख चेहरा. बोलणं-वागणं मात्र साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म..’ या काव्यपंक्तीची आठवण करून देणारं. आत्यंतिक गरजेच्या वेळी ‘सासरच्या माणसांनी’ पाठ फिरवली तरी थोडं सावरल्यावर मोठय़ा मनाने त्यांनी स्वत: जाऊन त्यांची विचारपूस केली; आपल्या तीन पुतण्यांची लग्नं जमवली. आता तर ही मंडळी एवढी जवळ आलीत की त्यांचे बाईंशिवाय पानही हलत नाही.
देण्याघेण्याच्या बाबतीत बाईंचा हात ‘समोरच्याने दिङ्मूढ व्हावं’ इतका सढळ. त्यांच्या घरातून जाणारा कोणीही रिकाम्या हस्ते कधी परतणारच नाही. कुळथाचं पीठ, वडय़ांचं पीठ, थालीपीठाची भाजणी, हातसडीचे तांदूळ, काजू, कोकमं, फणसाचे गरे.. अशा कोकणच्या मेव्याच्या पुरचुंडय़ा येणाऱ्याच्या पिशवीत टाकल्या की त्यांचं पोट भरतं. तसंच आलेल्याला ‘कोंबडीवडे’ करून घातल्याशिवाय त्यांच्यातील अन्नपूर्णेचं समाधान होत नाही. त्यांच्या नातेवाईकांमध्ये तर मालूबाई आणि कोंबडीवडे हा समानार्थी शब्द झालाय.
कुलकर्णीबाईंच्या घराला लागून ‘कुणबी’ विद्यार्थ्यांसाठी एक छात्रालय आहे. या गरीब मुलांवर त्यांची आईसारखी माया. कुणाला पुस्तक-वह्य़ांची मदत कर, तर कुणाची फी भरून टाक. कुणी आजारी पडल्यास मऊ भात, लिंबाचं लोणचं पाठव, तर कोणी सर्दी-पडशानं हैराण झाल्यास त्याला काढा करून दे.. अशा प्रेमाला प्रतिसाद न मिळाला तरच नवल. या मुलांनी अत्यंत काटकसर करून चार पैसे जमवले आणि बाईंना जरासुद्धा सुगावा न लागू देता त्यांचा ८० वा वाढदिवस अलीकडेच अगदी केक कापून मोठय़ा प्रेमाने सारा केला. ही आठवण सांगतानाही बाईंचे डोळे पाणावतात..
आपल्या वाटय़ाला रखरखीत जीवन येऊनही आनंदी मनाने इतरांच्या आयुष्यात फुलबाग फुलविणाऱ्या ‘कुलकर्णी बाईंकडे’ पाहताना कवी म. पा. भावे यांचे शब्द आठवतात-
माझ्याआधी सुख दुसऱ्याचे, प्रेरक शक्ती जगण्याची
प्रसन्नतेची बाग फुलावी, घराघरांतून सौख्याची
कर्तृत्वाची हीच पूर्तता, यासाठी तर जन्म भला
उदास होणे धर्म न माझा, जगणे ही तर एक कला।
(पुस्तकं वा मदत पाठवण्यासाठी- वत्सलाबाई कुलकर्णी, मृदगंध, छात्रालयाजवळ, मु.पो.पासल, तालुका राजापूर, जि.रत्नागिरी. भ्रमणध्वनी-०९४२००५५४३२)

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो