स्त्री समर्थ : मुंगी उडाली आकाशी
मुखपृष्ठ >> स्त्रीसमर्थ >> स्त्री समर्थ : मुंगी उडाली आकाशी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

स्त्री समर्थ : मुंगी उडाली आकाशी Bookmark and Share Print E-mail

अलकनंदा पाध्ये - शनिवार, २१ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altडोक्याला गोणपाट लावून रस्त्यावर कचरा वेचणारी ती, हळूहळू नेतृत्वगुण सिद्ध होत होत १८० बचत गट असणाऱ्या संघटनेची अध्यक्ष होते आणि कोपनहेगन, बीजिंग, दरबान येथे भारताचे प्रतिनिधित्व करते. हा प्रवास विस्मयकारक आहे खरा, पण अशक्य नव्हताच..
‘‘आ म्ही कचरा जाळत नाही. आम्ही कोरडा कचरा पुनर्निर्मितीसाठी वापरतो, ओल्या कचऱ्यापासून खत बनवतो. आमच्या बायका कचरा वेचतात त्यामुळे महापालिकेचे कचरा गोळा करण्याचे काम कमी होते. त्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाडय़ांचे इंधन वाचते. पर्यायाने प्रदूषण कमी होते. डम्पिंग ग्राऊंडची जागा मोकळी होते. आम्ही कचऱ्यापासून बायोगॅस करतो. जगातील श्रीमंत देशच बऱ्याचदा जगातील प्रदूषण वाढवतात. म्हणूनच आमच्या लोकांसाठी वेगळा निधी मिळावा,’’ असे डिसेंबर २०११ मध्ये दरबान येथे झालेल्या ‘हवामान बदलाव परिषदे’त ठणकावून सांगणारी महिला एखाद्या कॉर्पोरेट कंपनीची अधिकारी किंवा मोठय़ा एनजीओची प्रतिनिधी नव्हे तर ती आहे गेली ३०-३५ वर्षे  डोक्याला गोणपाट अडकवून दिवसभर रस्त्यावरचा कचरा वेचणारी तडफदार सुशीला साबळे!
कुर्ला-घाटकोपरच्या रस्त्यांवरून कचरा वेचून संसार चालविणारी सुशीला ते १८० बचत गट असलेल्या ‘परिसर भगिनी विकास  संघा’ची अध्यक्षा या नात्याने कोपनहेगन, नंतर बीजिंग व तीन महिन्यांपूर्वी दरबान येथे ‘अलायन्स ऑफ इंडियन वेस्ट पीकर्स’तर्फे भारताचे प्रतिनिधित्व करणारी एक झुंजार महिला सुशीलाबाई साबळे यांचा हा प्रवास ‘स्त्री’मधील सुप्त सामर्थ्यांचे दर्शन घडवीत आपल्याला अचंबित करतो.
१९७२ साली महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाने ग्रामीण भागातील अनेकांना अक्षरश: देशोधडीला लावले. पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकजण घरेदारे, उजाड जमीन, गुरेढोरे सर्व सर्व मागे सोडून अन्नाच्या शोधात वाट फुटेल तिकडे चालत गेले. अशा अनेकांना मुंबापुरीने आपल्यात सामावून घेतले. अशा अनेकांपैकी एक म्हणजे सुशीलाबाई. जेमतेम १०-११ वर्षांच्या सुशीलाबाई आपल्या छोटय़ा भावंडांसह आईचा हात धरून मुंबईत येऊन घाटकोपरला माणिकलाल कम्पाऊंडशी आपल्या गाववाल्यांच्या साथीने स्थिरावल्या. एकेकाळी स्वत:च्या जमिनीत धान्य पेरणारे हात मुंबापुरीच्या रस्त्यावरचा कचरा गोळा करू लागले. दिवसभराच्या मेहनतीतून येणाऱ्या मिळकतीतून चार-पाच जणांचे पोट भरणे कठीणच होते. तेव्हा १०-११ वर्षांची सुशीलासुद्धा छोटीशी गोणी डोक्याला लावून आईच्या मागे मागे रस्त्यावरचा कचरा गोळा करायला जाऊ लागली. सुरुवातीला नक्की काय वेचले की जास्त पैसे मिळतील याची कल्पना नसल्याने त्या चणे-दाण्याच्या रिकाम्या पुडय़ा हौसेहौसेने उचलीत; परंतु संध्याकाळी काटेवाल्याकडे कचरा विकायला नेला की अगदीच मामुली कमाई हातावर पडे. नंतर मात्र कचऱ्याच्या ढिगातून जास्त भाव देणारा कचरा शोधायला त्यांची नजर तयार झाली. जाड प्लॅस्टिक, प्लॅस्टिकच्या बाटल्या, दुधाच्या पिशव्या (ज्याला फुगा म्हटले जाते) त्याचा भाव सर्वाधिक, त्यानंतर पत्रे, डबे, काचा वगैरेंचा क्रम. त्यांच्या मते पोटासाठीच ही मोलमजुरी करणाऱ्या या लोकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बरेचदा संशयी असतो. कचरा वेचण्यासाठी झोळी घेऊन फिरताना कंबरेला कळ लागते. दरुगधीने डोके ठणकते. कचरा वेचताना कुत्री मागे लागतात. लोकही कित्येकदा गल्लीतून हाकलून लावतात, पण असे कष्टप्रद जीवन जगताना कुणाच्या सुतळीच्या तोडय़ालाही मी कधी स्पर्श केला नाही, असे त्या अभिमानाने सांगतात. अशा प्रकारे उपजीविका चालू असतानाच १६ व्या वर्षी वस्तीतील एकाशी लग्न झाले. त्याच्याबरोबर काही काळ गावी गेल्या. पुन्हा मुंबईत आल्यावर कचरा वेचणे चालू झाले. गरोदरपणी अवघडल्या अवस्थेतही पोटासाठीची ही भटकंती चालूच होती. अक्षरश: पोटात कळा येईपर्यंत त्यांचे कचरा वेचण्याचे काम चालूच होते. तिथूनच त्या रुग्णालयात दाखल झाल्या. गर्भारपणातील आबाळ आणि कुपोषणामुळे अत्यंत कमी वजनाचा मुलगा झाला. मग आईने तिच्यापरीने लेकीचे बाळंतपण केले. जेमतेम दोन-तीन महिने घरी थांबल्या, पण याहून जास्ती दिवस घरी थांबणे कुणालाच परवडणारे नव्हते. ना आईला ना लेकीला! १०-१२ वर्षांच्या छोटय़ा बहिणीवर ते छोटेसे बाळ सोपवून सुशीलाबाईंची पुन्हा डोक्याला गोणी लावून भटकंती सुरू झाली. त्याच सुमारास ऐतखाऊ नवऱ्याशी बेबनाव झाला आणि मग त्या कायमच्याच आई-भावंडांच्या सोबतीने मुलासह माहेरी राहू लागल्या. सुशीलाबाईंचे पूर्ण आयुष्य कदाचित असे कचरा वेचण्यातच सरले असते; परंतु एकदा स्त्रीमुक्ती संघटनेच्या काही कार्यकर्त्यां त्यांच्याकडे आल्या. या बायकांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. किती पैसे कमावता? त्याचे काय करता? गरज पडली तर कुठून उभे करता? असे अनेक प्रश्न विचारून त्यांना दहाजणींचा बचत गट बनवायला सुचवले. सहा महिने त्या या बायकांना समजावण्याचा प्रयत्न करीत होत्या. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सुशीलाबाईंसह १० जणींनी ‘सुजाता बचत गट’ स्थापन केला व कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी अभ्युदय बँकेत खाते उघडले. कचरावेचक महिलांचे बँकेत खाते उघडणारा सुशीलाबाईंचा हा बचत गट पहिला म्हणता येईल. यापूर्वी अडीनडीला सावकाराकडून काहीच्या काही व्याजाने पैसे घेणाऱ्या महिलांना आता बचतगटाची उपयुक्तता कळू लागली आणि हळूहळू बचतगटांची संख्याही वाढू लागली. संघटनेने प्रत्येक गटातील १-२ चुणचुणीत आणि उत्साही महिलांना नेतृत्वाचे प्रशिक्षण द्यायचे ठरवले. सुशीलाबाई अर्थातच सर्वात आघाडीवर. त्यांनी बचतगट कसा उभारायचा, चालवायचे याचे यथोचित शिक्षण घेतले. या गटांच्या किंवा कुठल्याही कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी, आभार मानण्यासाठी छोटेसे भाषण करण्याचे इतरांच्या दृष्टीने काहीसे धाडसाचे कामही त्या सहजपणे आणि उत्तम रीतीने करू लागल्या. त्यांच्यातील ही धडाडी, नेतृत्वगुण संघटनेने अचूक हेरले आणि त्यांना परिसर भगिनी विकास संघाच्या कार्यालयात काम करायला बोलावले. इथेच त्यांच्या पाठीवरची गोणी गेली. सुरुवातीला त्यांना काही कंपन्यांत साफसफाईचे काम मिळाले. पण नंतर त्यांनी कचऱ्यापासून खत तयार करण्याचे शिक्षण घेतले. त्यात तयार झाल्यावर त्यांच्यासारख्याच इतर महिलांना त्या प्रशिक्षित करू लागल्या. दिवसभर राबून गोळा केलेला कचरा संध्याकाळी काटेवाल्याच्या (कचरा विकत घेणारा) हवाली करून दिवसाला काही रुपये मिळवणाऱ्या सुशीलाबाईंच्या हाती एकरकमी मानधन / वेतन येऊ लागल्यावर सहाजिकच त्यांचा आत्मविश्वास दुणावला. आपणही काही करू शकतो हा विश्वास वाटू लागला.
२००४ साली परिसर भगिनी विकास संघाची (कचरा वेचक महिलांची संघटना) स्थापना झाली. जिच्यामध्ये आज १८० बचत गट संलग्न आहेत. त्या संघटनेच्या सुशीलाबाई आज अध्यक्ष आहेत. शाळेचे तोंडही न पाहिलेल्या सुशीलाबाई कामापुरते, जुजबी लिहा-वाचायला शिकल्या. त्यांच्याकडे एक छोटी वही असते. अध्यक्ष या नात्याने त्यांना घाटकोपर, चेंबूर, गोवंडी, भांडुप अशा अनेक ठिकाणी गटांच्या बैठकीसाठी जावे लागते. अनेक ठिकाणी सल्लागाराचे काम करावे लागते. त्यामुळे प्रत्येक दिवशी कुठे जायचे? काय काम करायचे? कुणाशी बोलायचे याची नोंद त्यांच्या वहीत त्यांनी स्वत: केलेली असते. शिवाय कुठे, कधी काय झाले? याचीही तारीखवार नोंद त्यांच्या वहीत असते. त्या वहीनुसार त्यांचा दिनक्रम असतो. बस नंबर कळायचे नाहीत, रिक्षावाला कुठेतरी घेऊन जाईल या भीतीपायी कुठे प्रवास करायला घाबरणाऱ्या सुशीलाबाई आज मुंबईभर त्यांच्यासारख्या इतर महिलांना मार्गदर्शन करायला आत्मविश्वासाने फिरत असतात. परिसर भगिनी विकास संघाची अध्यक्षा या नात्याने मुंबईच काय त्यांना गेली ३-४ वर्षे कोपनहेगन तसेच बीजिंग आणि सुरुवातीला ज्या भाषणाचा उल्लेख झाला तिथे म्हणजेच दरबानला जागतिक पर्यावरण परिषदेत तसेच हवामान बदलाव परिषदेसाठी आमंत्रण आले. एकेकाळी कुल्र्याला जरीमरीच्या टेकडीवर कचरा वेचताना जवळच्या विमानतळावरून आकाशात उडणाऱ्या विमानांकडे बघताना त्यांनी कल्पनाही केली नसेल की आपणही विमानातून प्रवास करून अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपल्याला हजर राहावे लागेल. परंतु सुशीलाबाईंमधल्या ‘समर्थ स्त्रीने’ हे सर्व शक्य करून दाखवले. अनेक देशांच्या प्रतिनिधींसमोर हिमतीने उभे राहून त्यांच्यासारख्या कचरावेचक महिलांचे पर्यावरणासंबंधीचे योगदान समजावून सांगितले. या प्रगतीचे श्रेय  त्या स्त्री मुक्ती संघटनेला देण्यास कधीही विसरत नाहीत.
एका मुंगीची ही आकाशातली भरारी खरोखरच कौतुकास्पद! 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो